मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चित्र एक.. काव्ये दोन – मन देह विठूमय होता.. जगणेच वारी आता !! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चित्र एक.. काव्ये दोन – मन देह विठूमय होता.. जगणेच वारी आता !! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

(१)

पाऊस कोसळे येथे

पाऊस कोसळे तेथे

भिजलेल्या पदराखाली

भिजलेले माझे माथे

*

पाऊस असा कोसळतो

थेंबाच्या चिपळ्या होती

पखवाज घुमे देहाचा

जोडून विठूशी नाती

*
पाऊस असा कोसळतो

भिजलेले सारे अंग

ओघळत्या पाण्यामघुनी

ओघवते विठू अभंग

*
मन देह विठूमय होता

नाहीच कशाची चिंता

माऊली जग हे वाटे

जगणेच वारी आता

*
कवयित्री : नीलांबरी शिर्के

(२) 

भाळी अबीर खुलतो

गळा तुळशीची माळ

मुखी विठ्ठल विठ्ठल

हाती लय देती टाळ

*
भेदाभेद अमंगल

हेच वारकरी ब्रिद

माऊली म्हणूनीच

एकमेका घाली साद

*
वारकरी दिंडीमधे

नसतोच दुजाभाव

प्रत्येकाच्या मनामधे

भावभक्तिचेच गाव

*
एकात्मकता दिंडीतली

समाजाची व्हावी निती

सदाचार सदविवेक

व्हावी जगण्याची गती

*
प्रत्येकाच्याच मनात

असो माणूसकी मंत्र

देव मनाच्या देव्हारी

पावित्र्य हे त्याचे वस्त्र

मन पांघरे पावित्र्य

दृष्ट वृत्तीला ना थारा

आपसूक भवताली

शुभ मांगल्याचा फेरा

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सैराट… ☆ सुश्री शीला पतकी ☆

 सुश्री शीला पतकी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ “सैराट…” ☆  सुश्री शीला पतकी 

सैराट मधल्या झाडाला कशाला कधी वाटेल

वठलेल्या त्याला सुद्धा आतून पालवी फुटेल

*

एकेकाळी केवढा विस्तार, केवढा त्याचा बहर 

पक्षांची घरटे आणि चिव चिवचिवाटाचा कहर

*

येते जाते वाटसरू विसावायचे पायथ्याशी

ऐसपैस झोपायचे बुंधा घेऊन उशाशी

*

चरती जनावरं त्यांना सावलीचा निवारा 

मेंढपाळाचं पोर मांडी मेंढराचा पसारा

*

हळूहळू वठलं झाड पानफुल गळालं

उरलं लाकूड वेडंवाकडं म्हणती झाड जळालं

*

एके दिवशी आर्ची संग परशा चढून बसला

प्रेम गोष्टी ऐकून त्यांच्या वठला वृक्ष हसला 

*

सतत असते गर्दी आता झाडाच्या भोवती 

कोणी चढती कोणी बसती सेल्फी आता घेती

*
वठलेल्या झाडालाही आता आलाय भाव 

नागराज मुळे झालंय आता झाडाचे ही नाव

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भरजरी शालू… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ भरजरी शालू ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

हे भरजरी वस्त्र आयुष्याचे,

वरदान मिळे जणू ईशाचे!

या शालूसम वस्त्रावरचे,

बुट्टे जरतारी निमिषांचे !….१

मृदू, रेशमी क्षणाक्षणांची,

काढली नक्षी रंगबिरंगी!

उभ्या आडव्या जरतारींनी,

खुलून जडली ती मनरंगी !…२

चंदेरी जरीच्या स्मृती तारा,

चमकती किती काठावरती!

संचित कोमल, सान,क्षणांचे,

नर्तन करिती मोर किती !…३

हा वार्धक्याचा रंग पांढरा,

मिसळला असे शालूत जरी!

जीर्ण शीर्ण हा शालू आगळा,

अधिक प्रौढ अन् मनहारी!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “गजर हरीनामाचा होई पंढरीत…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ गजर हरीनामाचा होई पंढरीतसौ. वृंदा गंभीर

गजर हरीनामाचा होई पंढरीत

चाले वारकरी मुखी अभंग गात ||धृ ||

 *

टाळ वाजे मृदूंग वाजे कीर्तनात

जात्यावरच्या ओव्या गाई गोपाळपुरात

संतांचा मेळा जमला विठूच्या राऊळात

चाले वारकरी मुखी अभंग गात ||1||

 *

विठुराया चाले माऊली संगे वारीत

तुकोबाराया सोपानदेव मुक्ताई दिंडीत

निवृत्तीनाथ गजानन माऊली भेटतात

चाले वारकरी मुखी अभंग गात ||2||

 *

संसाराची नसे चिंता आनंद ओसंडतं

दुःख सारे दूर पळते वारी सोहळ्यात

सुमनांचा पाऊस पडतो वखारीत

चाले वारकरी मुखी अभंग गात ||3||

 *

गजर हरीनामाचा होई पंढरीत

चाले वारकरी मुखी अभंग गात ||धृ ||

 

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ जगन्नाथ अष्टकम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ जगन्नाथ अष्टकम् ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(जगन्नाथ यात्रेचे औचित्य साधून सादर करीत आहे.) 

कदाचित् कालिन्दी तट विपिन सङ्गीत तरलो

मुदाभीरी नारी वदन कमला स्वाद मधुपः

रमा शम्भु ब्रह्मामरपति गणेशार्चित पदो

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥१॥

 *

भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे

दुकूलं नेत्रान्ते सहचर-कटाक्षं विदधते ।

सदा श्रीमद्‍-वृन्दावन-वसति-लीला-परिचयो

जगन्नाथः स्वामी नयन-पथ-गामी भवतु मे ॥२॥

 *

महाम्भोधेस्तीरे कनक रुचिरे नील शिखरे

वसन् प्रासादान्तः सहज बलभद्रेण बलिना ।

सुभद्रा मध्यस्थः सकलसुर सेवावसरदो

जगन्नाथः स्वामी नयन-पथ-गामी भवतु मे ॥३॥

 *

कृपा पारावारः सजल जलद श्रेणिरुचिरो

रमा वाणी रामः स्फुरद् अमल पङ्केरुहमुखः ।

सुरेन्द्रैर् आराध्यः श्रुतिगण शिखा गीत चरितो

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥४॥

 *

रथारूढो गच्छन् पथि मिलित भूदेव पटलैः

स्तुति प्रादुर्भावम् प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः ।

दया सिन्धुर्बन्धुः सकल जगतां सिन्धु सुतया

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥५॥

 *

परंब्रह्मापीड़ः कुवलय-दलोत्‍फुल्ल-नयनो

निवासी नीलाद्रौ निहित-चरणोऽनन्त-शिरसि ।

रसानन्दी राधा-सरस-वपुरालिङ्गन-सुखो

जगन्नाथः स्वामी नयन-पथगामी भवतु मे ॥६॥

 *

न वै याचे राज्यं न च कनक माणिक्य विभवं

न याचेऽहं रम्यां सकल जन काम्यां वरवधूम् ।

सदा काले काले प्रमथ पतिना गीतचरितो

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥७॥

 *

हर त्वं संसारं द्रुततरम् असारं सुरपते

हर त्वं पापानां विततिम् अपरां यादवपते ।

अहो दीनेऽनाथे निहित चरणो निश्चितमिदं

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥८॥

 *

जगन्नाथाष्टकं पुन्यं यः पठेत् प्रयतः शुचिः ।

सर्वपाप विशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति ॥९॥

 *

☆ ॥ इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं जगन्नाथाष्टकं संपूर्णम् ॥ ☆

*

☆ मराठी भावानुवाद : जगन्नाथ अष्टक

 *

यमुना तटी कधी घुमते मधूर सुरेल तान

स्वाद घेत भृंग प्रमुदित गौळण कमलानन

ब्रह्मा गणेश शिव रमा इंद्र करीत पादार्चन

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥१॥

 *

मुरली वामहस्ते मोरपीस शिरावरी शोभते

कटीवर शेला कटाक्ष मोहक गोपाळ जनांते

वृंदावनी वास लीला सदैव ऐसा परिचय ज्ञान

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥२॥

 *

सागरतीरी नील शिखरावर सुवर्णलोभस

बलशाली बलभद्रासहित प्रासादे निवास

सभद्रा मध्ये, सेवा संधी सर्व देवतांसी दान

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥३॥

 *

कृपासागर सुंदर जलयुक्त मेघसमूह समान 

सरस्वती रमा राम तेजोमय पावन कमलानन

देवेंद्र पूजित ज्ञानी श्रुतिगण करिती चरितगान

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥४॥

 *

रथारूढ मार्गावरती विद्वान समूहा देई दर्शन 

दयार्णव होत प्रकट पदोपदी ऐकोनी भक्तस्तवन 

करुणानिधी सखा जगताचा लक्ष्मीसह निकेतन

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥५॥

 *

नयन मनोहर प्राप्त जयासी परम ब्रह्मज्ञान

वास नीलाद्रीवरी शेषाशिरी सुस्थित ते चरण

राधेसी आमोदे सुंदर रसानंदी देहालिंगन 

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥६॥

 *

नाही याचना राज्य ऐश्वर्य नको माणिक सुवर्ण

वांच्छित नाही सकलांसम सुंदर साथी कोण

सदैव गाइन प्रमथपतीच्या स्तवनाचे गुणगान

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥७॥

 *

मुक्ती द्यावी शीघ्र सुरपते सारहीन संसारातुन 

पापांच्या राशीपासून हे यदुनाथा करावे विमोचन

तव चरणांची कृपा भोगिती अनाथ वा दीन

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥८॥

 *

शुचिर्भूत श्रद्धा पठण करता पवित्र जगन्नाथाष्टक

विशुद्धात्मा विष्णुलोकी विलीन होउन नाश सर्वपातक ॥९॥

*

☆ ॥ इति श्रीमत् शंकराचार्यविरचित निशिकान्त भावानुवादित जगन्नाथाष्टक संपूर्ण ॥ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ही कशी कासाविशी…” – कवयित्री : सुश्री श्रेयसी वझे मंत्रवादी  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “ही कशी कासाविशी…” – कवयित्री : सुश्री श्रेयसी वझे मंत्रवादी  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

 

ढग दाटून येताच, सावळ्याची लगबग

भेटीचीही तगमग, वाढतसे ।।

*

कटेवरूनी निघाले, हात मांगल्य भारले

समचरण हालले, नकळत ।।

*

व्हावी तयारी वेळेत, नको खोळंबा भक्तांचा

माझ्या प्रिय लेकरांचा, भेटीलागी ।।

*

असे पंचामृती स्नान, नवे पितांबर साजे

मुकुटाचा मणी तेजे, झळाळतो ।।

*

भाळी अष्टगंध टिळा, तुळशीचा नवा हार

रूप बघे वारंवार, दर्पणात ।।

*

माझे रूप कसे दिसे, विठू विचारे रखुला

निववेल ना भक्ताला? दर्शनाने ।।

*

रखुमाईला आणली, नवी साडी चोळी खास

आता हीच साडी नेस, सांगे विठू ।।

*

रखुमाई गोड हासे, म्हणे दूर मी थांबते

अशी दुरून पाहते, उत्सवाला ।।

*

मला हेवा वाटे भारी, तुमचा या खास दिनी

उगा माझी दृष्ट झणी, लागो नये ।।

*

मीही राखते अंतर, घेते विश्रामही थोडा

प्रिय पत्नीला हो सोडा, काही वेळ ।।

*

विठू विटेवरी चढे, हात ठेवी कटेवरी

सोनियाच्या या प्रहरी, भक्तांसाठी ।।

*

कानी दुरूनच येई, नाद विठ्ठल रखमाई

मान उंचावून पाही, सावळा हा ।।

*

येई विठुच्या मनात, आपणच तिथे जावे

गोल रिंगणी नाचावे, भक्तांसवे ।।

*

ही कशी कासाविशी, विठू हासतो स्वतःशी

प्रेमाविना मी उपाशी, भक्तांचिया ।।

*

हा साजिरा सोहळा, दर आषाढी रंगतो

मग सारे वाट पाहतो, कार्तिकीची ।।

*

येता कार्तिकीची वारी, पुन्हा तेच समाधान

प्रेम आदान-प्रदान, मनोमनी ।।

कवयित्री : श्रेयसी वझे मंत्रवादी.

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 256 – पांडुरंग ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 256 – विजय साहित्य ?

☆ पांडुरंग…

वारकरी पंथ ।

 झाला एकरूप  ।।

दावी निजरूप  ।

पांडुरंग ।।१।।

*

युगे अठ्ठावीस ।

वाहे चंद्रभागा ।।

अंतरात जागा  ।

 पांडुरंग ।।२।।

*

माळ वैजयंती  ।

हात कटीवर ।।

शोभे रमावर  ।

 पांडुरंग  ।।३।।

*

संत सज्जनांची ।

 पुण्यमयी ठेव।।

आशिर्वादी पेव।

पांडुरंग  ।।४।।

*

वैष्णवांचा मेळा  ।

करीतसे वारी ।।

कैवल्य कैवारी ।

पांडुरंग  ।।५।।

*

हरिनाम मुखी।

सदा घेत जाऊ ।।

जीवनात  पाहू ।

 पांडुरंग  ।।६।।

*

कविराज वाणी ।

चिंतनात रंग।।

जोडीला व्यासंग  ।

पांडुरंग  ।।७।।

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळिज घासुन गंध चंदनी…☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ काळिज घासुन गंध चंदनी☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

काळिज घासुन गंध चंदनी, अक्षरांस या दिधला आहे

सर्व विषांचे करून अमृत, घट गळवट हा भरला आहे

*

नभ करुणेचे पाझरतांना, निष्पर्णाचे रान मोहरे

अनाघ्रात त्या सृजनसुरांचा, मेळा रानी जमला आहे

*

फुटक्या तुटक्या काचमण्यांचे, अखेर झाले शोभादर्शक

नित्य बदलत्या स्वप्नरुपांनी, जन्मच अवघा सजला आहे

*

आत्मवृत्त हे जरी जरासे, त्यात तुझीही वाच कहाणी

रंगविलेल्या चित्री माझ्या, रंग तुझाही भरला आहे

*

श्रावणातले इंद्रधनू हे, निबिड बनातिल अंधकारही

सातसागरी बाष्प अंतरी, ओथंबुन घन झरला आहे

*

सुजाण आणिक जरा कोडग्या, प्रौढहि झाल्या जखमा काही

एक जखम पण सदा वाहती, काळहि येथे हरला आहे

*

बिनकिमतीचे चलनी नाणे, असेल अथवा सुवर्णमुद्रा

प्रत्येकावर पण रसिका रे, शिक्का माझा वठला आहे!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ थेंबे थेंबे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ थेंबे थेंबे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

इवलासा थेंब

इवलेसे त्यात पाणी

संततधार होता

जन्मे सरिता…

 

तैसेचि जाणावे

छोटे छोटे सुविचार

जीवनात घडवी

परिवर्तन आमूलाग्र…

 

साधनरूपी थेंब

नीत, सातत्याने

आचरीता, करीता

मिळे मोक्षरुपी सागरास..

 

विषयातून निवृत्त होवोनी

ज्ञानार्जन करोनी

सोपान चढोनी

मुक्ती मिळवावी…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सूर माझा लागला… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ सूर माझा लागला... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

सूर माझा लागला

अन् अर्थ मजला उमगला

*

जीवनाचा मी प्रवासी, मी न आता थांबणार

गोड अथवा कटू असो ते सर्व काही चाखणार

मंत्र मजला पाठ आहे, थांबला तो संपला

*

निंदकांची झुंड येथे साथ देईना कुणीही

खंत ना त्याची मनाला मीच माझे गीत गाई

वाट काटृयातून जाता ताटवा मज लाभला

*

निसटले क्षण जे तयांचा शोक सारा व्यर्थ आहे

वेध घेण्या या तमाचा सूर्य माझा सज्ज आहे

रंगवावी नित्य स्वप्ने छंद मज हा लागला

*

सूर माझा लागला

अन् अर्थ मजला उमगला.

सुहास रघुनाथ पंडित. सांगली.

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares