मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे सुट्टीपुराण! ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ माझे सुट्टीपुराण☆ उज्ज्वला केळकर

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज. आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत म्हणा, किंवा अनुभव म्हणा. त्यावेळी मी डी. एड. कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रामायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात नं, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं काही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय. ’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवारा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीच वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात. मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठे तरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजं-तवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

आता मला सुट्टी मिळणार मिळणार

खूप खूप मज्जा मी करणार करणार.

आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावार नुसतंच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

आता सकाळी जाग आल्यावर उठून फिरायला जायचं मी ठरवलं. उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या. ’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

आता टी. व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी. व्ही. च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन् नसून खोळंबा झाला. शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी. व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’ मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मीटूनच घ्यायचा.

तर असं हे माझं सुट्टीपुराण. जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर

“पुण्यात पाणी कपात आणि चक्क डाव्या हाताने पुण्य कर्म”

आपल्या डाव्या हाताला छान पुण्य कर्म करण्याची संधी लाभणार आहे.

देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन्ही अगदी तंतोतंत सारखे आहेत, तरीपण का ते माहित नाही, आपण सगळेच जण उजव्या हातावर जास्त प्रेम करतो.

जेवण उजव्या हाताने करतो,

देवाची पूजा करताना देवाला गंध लावणे; हळदीकुंकू वाहणे; फुलं वाहणे; हे सगळे उजव्या हाताने करतो,

कुणी प्रसाद दिला तर तो उजव्या हातावर घेतो, दानधर्म उजव्या हाताने करतो, वगैरे वगैरे.

आणि आपण डाव्या हाताला फक्त टॉयलेट मध्ये असतानाच न आवडणारे काम देतो.

आता डाव्या हाताला पुण्य कर्म करायला देण्याची पुणेकर मंडळींना छान संधी येत आहे.

कशी ते आता बघू –

येत्या सोमवारपासून म्हणजे १५ जून पासून नळाला पाणी एक दिवसाआड येणार आहे. म्हणजे पाणी वाया न घालवता वापरले तरच साठवलेले पाणी दोन दिवस पुरणार आहे. आणि पाणी वाया न घालवणे हे छानच पुण्य कर्म आहे.

आपल्या घरांमध्ये पाणी कुठे कुठे वाया जाते याचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात येईल, बेसिन च्या नळांमधून दिवसभरात खूप पाणी वाया जात असतं.

दिवसातून आठ ते दहा वेळा आपण प्रत्येक जण नक्कीच वॉश बेसिन पाशी जातो.

सकाळी उठल्यावर दात घासणे, काही खाल्ल्यानंतर /जेवल्यानंतर तोंड धुणे; चुळा भरणे, मधून मधून चेहरा स्वच्छ करण्याकरता चेहऱ्यावर पाणी मारणे, मधून मधून नाक शिंकरणे, वगैरे वगैरे.

आणि आपल्या बहुतेकांची सवय अशी असते, की, बेसिन जवळ जायचे, नळ सुरु करायचा (काहीजण तर नळ अगदी फुल उघडतात) आणि वर दिल्याप्रमाणे दात घासणे, वगैरे कार्य करायचे आणि मग चेहरा बघायचा, आ करून जीभ बघायची / मान डावीकडे उजवीकडे वळवून आपण छान दिसतोय ना, हे बघायचे आणि शेवटी बेसिनचा नळ बंद करायचा.

थोडक्यात काय, तुमचं काम छान होते, पण ज्या कामा करता अर्धा मग पाणी पूरलं असतं, त्याकरता चार-पाच मग पाणी ड्रेनेज मध्ये जात असतं.

बहुतेक जण बेसिनचा नळ पूर्ण का उघडतात हे कोडेच आहे. आपल्याला एका हाताच्या ओंझळीत मावेल एवढेच पाणी प्रत्येक वेळी घ्यायचे असते, त्याकरता अगदी बारीक नळ पण चालतो. (प्रत्येक बेसिनच्या खाली एक कॉक असतो. आपण सगळ्यांनीच तो कॉक कायम अर्ध्याच्या वर बंद करून ठेवावा म्हणजे बेसनची धार आपोआपच लहान येते. हे जरूर करा).

आता तुम्ही म्हणाल की डाव्या हाताला पूण्य कर्म कसे करायला मिळणार.

सांगतो – 

बेसिन पाशी गेल्यानंतर डावा हात नळावर ठेवायचा. जेव्हा जेव्हा उजव्या हातावर पाणी घ्यायचे असेल, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी डाव्या हाताने नळ उघडायचा, ओंजळ भरली की डाव्या हाताने प्रत्येक वेळी नळ बंद करायचा. जोपर्यंत आपण बेसिन जवळ आहोत तोपर्यंत डावा हात नळावरच ठेवायचा.

म्हणजे आपण डाव्या हाताने काय केले आहे – पाहिजे तेव्हा नळ सोडला, नको तेव्हा नळ बंद केला. आणि यामुळे भरपूर पाण्याची बचत होणार आहे. आणि ती पण रोजच्या रोज, आणि घरामधल्या प्रत्येकाकडून.

पाणी वाचवणे / वाया न घालवणे हे पुण्य कर्म नक्कीच आहे.

आज करून बघा.

जलदेवता खुश होईल, आपल्याकडून पुण्य कर्म होत आहे म्हणून डावा हात खुश होईल, शरीर देवता पण खुश होईल. आपल्या वास्तूमध्ये हे पुण्यकर्म होत आहे म्हणून वास्तुदेवता पण खुश होईल.

वाचवलेल्या पाण्यामुळे काही लोकांची तहान भागणार आहे त्यामुळे निसर्ग देवता पण खुश होईल, आणि वरच्या देवता पण खुश होतील…

एखादी गोष्ट सतत एक महिना केली तर ती सवय लागते असे म्हणतात. पुण्यामध्ये एक दिवसाआड पाणी बंद हे महिनाभर नक्की चालू राहणार.

अशा रीतीने एक दिवस पाणी बंद यामुळे आपल्याला अगदी सोप्या रीतीने पुण्य कर्म करत राहण्याची सवय लागणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी पाणी बंदी नाही, त्यांनी पण ही सवय जरूर लावून घ्यावी, आणि पुण्य कर्म करत राहावे… आणि खुश रहावे.

खुशिया ही खुशिया हो,

दामन में जिसके,

क्यू ना खुशी से वो दिवाना हो जाये…

आणि याकरता करायचे काय आहे – तर काहीही कारणाकरता बेसिन जवळ गेल्यावर डावा हात बेसिनच्या नळावर ठेवणे, पाहिजे तेव्हा नळ उघडणे आणि नको तेव्हा बंद करणे.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे- – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे– – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

– – – सागर आणि नेत्रा पाटील

संध्याकाळ होत जाते, घरोघरी दिवे लागतात आणि अंधार मागे सरतो. पण ‘अंधार’ म्हणजे नेमकं काय? काहींसाठी तो प्रकाशाचा अभाव असतो; तर काहींसाठी संधींचा.

सागर पाटील यांना हा फरक आयुष्याच्या अगदी लहान वयातच समजला. डोळ्यांवर अनेक शस्त्रक्रिया होऊनही वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली. त्यानंतर समाज दिव्यांग व्यक्तीकडे कसा पाहतो, हे त्यांनी जवळून अनुभवले. दुर्लक्ष, उपेक्षा, दया किंवा ‘बिच्चारा’ असा शिक्का—यापलीकडे अनेकांना काही दिसतच नव्हते.

या सर्व प्रवासात अत्यंत खंबीरपणे, खमकेपणाने सागर यांच्यासोबत त्यांचे आई वडील उभे राहिले. मुलाला अंधत्व आले असतानाही त्यांनी कधीच “हे करू नकोस” किंवा “तुला जमणार नाही” असा नकारात्मक सूर लावला नाही. उलट, सागर काही नवी गोष्ट अजमावत असतील, तर आई वडील म्हणायचे, “आमच्या समोरच कर, काही मदत लागली तर आम्ही आहोतच”. हा सकारात्मक दृष्टीकोन, सागर यांच्या आत्मविश्वासाचा पाया ठरला.

यामुळे सागर यांच्या मनात एक विचार दृढ झाला होता—एखाद्या व्यक्तीची “मर्यादा (limitation) / कमजोरी” ही तिच्या मूल्याची मोजपट्टी असू नये. पुढे हाच विचार एका चळवळीचा पाया ठरला.

त्यांच्या सोबतीला होत्या नेत्रा पाटील—शांत, संवेदनशील आणि कृतीतून परिवर्तन घडवण्यावर विश्वास ठेवणाऱ्या.

सागर यांनी मराठी साहित्य विषयात एम. ए. केले; पण त्यांचा जीव रमला तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये. वडिलांना सरकारी नोकरी सोडावी लागलेली पाहून त्यांनी लहानपणीच ठरवले होते—नोकरी करणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा उद्योजक व्हायचे.

शालेय वयापासूनच त्यांचे इस्त्री, रेडिओ, ट्यूबलाईट दुरुस्त करणेही सुरू झाले. वापरात नसतानाही बॅटऱ्या का उतरतात (drain होतात) ? हा प्रश्न त्यांना सतावत राहिला. त्यातून पुढे त्यांनी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचे तंत्र विकसित केले.

२०१३ मध्ये त्यांनी IIG (Ideal Innovative Group) कंपनीची स्थापना केली. संगणक आणि एलईडी उत्पादनांची जुळणी सुरू झाली. नामांकित कंपन्यांसाठी बल्ब व ट्यूबलाईट तयार करण्याबरोबरच स्वतःच्या ब्रँडनेही उत्पादने बाजारात आली.

कामाची व्याप्ती वाढू लागल्यावर, सागर यांनी सॉल्डरिंगची कामं घरी आणायला सुरुवात केल्यावर, वयाची साठी उलटून गेलेल्या त्यांच्या आईंनी हे कौशल्य स्वतः आत्मसात केले. आजही त्या नातवाला सांभाळत, घर सांभाळत दिवसाला सॉल्डरिंगचे १०००-१५०० टाके सहज लावतात.

पुढे एलईडी उत्पादने स्वस्त झाल्यावर सागर आणि नेत्रा यांनी पुनर्भरणीय उत्पादनांवर (rechargable products) लक्ष केंद्रित केले. टाटा पॉवर हे त्यांच्या सुरुवातीच्या नामवंत ग्राहकांपैकी एक. उत्पादनाचा दर्जा हा यशाचा पाया असतो, या त्यांच्या विश्वासाला टाटा पॉवरने दीर्घकालीन कराराद्वारे (lifetime contract) दुजोरा दिला.

पुढे त्यांच्या संशोधनातून विकसित झालेल्या विशेष पुनर्भरणीय (rechargable) बॅटऱ्यांनी रेल्वे क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. रेल्वे गार्ड आणि मोटरमन सिग्नल देण्यासाठी वापरत असलेल्या विशेष बॅटऱ्यांच्या उत्पादनात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. सुमारे चारशेहून अधिक उत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘VC – व्हिज्युअली चॅलेंज्ड’ या त्यांच्या ब्रँडच्या उत्पादनांनी सर्व तांत्रिक कसोट्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि महत्त्वाच्या ऑर्डर्स प्राप्त केल्या. गुणवत्ता, नित्यनूतनता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी उद्योगविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

परंतु या दांपत्याचा प्रवास केवळ स्वतःपुरता उद्योग उभारण्यापुरता आणि पैश्यांची धन करण्यापुरता मर्यादित राहिला नाही.

रुईया महाविद्यालयातील शिक्षणकाळात त्यांना संतोष फडके, अनघा पेंडसे यांच्यासारख्या समविचारी मित्रमैत्रिणी भेटल्या, महाविद्यालयानंतरही हे मैत्र अबाधित राहिलं. आणि या सर्वांच्या परस्पर सहकार्य, संवाद आणि सामूहिक विचारातून, दृष्टिबाधित व्यक्तींना आणि एकंदरीतच समाजातील गरजूंना प्रशिक्षण देण्यासाठी IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना झाली.

या सगळ्यांना एक साधी पण महत्त्वाची गोष्ट उमगली होती—लोकांना सहानुभूतीपेक्षा संधीची अधिक गरज असते.

अनेक दृष्टिबाधित व्यक्तींमध्ये त्यांनी बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, शिस्त आणि अपार क्षमता पाहिली. समाज जिथे “हे लोक काय करू शकत नाहीत?” असा प्रश्न विचारत होता, तिथे त्यांनी “त्यांना संधी मिळाली तर ते काय करू शकतील?” हा प्रश्न विचारला.

…… आणि त्या एका प्रश्नाने अनेक आयुष्यांची दिशा बदलली.

ट्रस्टने दानधर्माऐवजी सक्षमीकरणाचा मार्ग निवडला. कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि स्वावलंबन हे त्यांच्या कार्याचे केंद्र बनले. इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण, संगणक साक्षरता, उद्योजकता मार्गदर्शन, व्यावसायिक मराठी, क्रीडा आणि जनजागृती उपक्रमांद्वारे अनेकांना नवी दिशा मिळाली.

प्रशिक्षित हातांनी तयार होणारा प्रत्येक एलईडी दिवा जणू एक संदेश देत होता—

“मी सक्षम आहे. ”

कार्यशाळा वाढल्या. प्रशिक्षणार्थी उत्पादने तयार करू लागले, उपकरणे दुरुस्त करू लागले, स्वतः कमाई करू लागले. अनेकांना वर्षानुवर्षांनी आत्मविश्वास मिळाला. चिंतेत जगणाऱ्या कुटुंबांना आशेचा किरण दिसू लागला.

या प्रवासात नेत्रा यांनी भावनिक आधाराची महत्त्वाची भूमिका निभावली. व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपुलकीची ऊब दिली. लोकांना ‘प्रकरण (case study)’ म्हणून नव्हे, तर स्वप्ने आणि क्षमता असलेल्या व्यक्ती म्हणून वागवले.

मोठ्या ऑर्डर्स आल्या असताना त्यांची पूर्तता करण्यात आणि प्रशिक्षण कार्यशाळांच्या पूर्वतयारीत सागर यांच्या आईंचा सहभाग आजही अत्यंत महत्त्वाचा आहे.

सागर यांची दृष्टी केवळ उद्योग किंवा प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या वाटेवर नेण्याची त्यांची वृत्ती तितकीच प्रेरणादायी आहे.

अलिबाग येथील कुटुंबाच्या सामायिक मालकीची जमीन अनेक वर्षे वाद आणि मतभेदांचे कारण बनली होती. सागर यांच्या मेहुण्याने (मावशींच्या जावईबापूंनी) या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्याची कल्पना मांडली. सागर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात पुढाकार घेतला. आज तीच जागा एका सुंदर रिसॉर्टमध्ये रूपांतरित झाली आहे आणि त्याचा लाभ सर्व भागीदारांना मिळत आहे.

समाजहित आणि लोकांना जोडण्याच्या या कार्यासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. अलीकडेच अमरावती येथे सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या मातृसंस्था असलेल्या रुईया महाविद्यालयाचा ‘रायझिंग स्टार’ हा सन्मानही त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

आज ट्रस्टने ५० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि १००० हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे. यापैकी ३५०हून अधिक जण दृष्टीबाधित आहेत, अनेकजणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, तर काही स्वमग्न (ऑटिस्टिक) आहेत. विविध कारणांनी गरजू असलेल्या या सर्वांना एकच व्यासपीठावर समान संधी देण्याचा प्रयत्न हा या उपक्रमाचा विशेष पैलू आहे.

सागर आणि नेत्रा यांनी या सगळ्यांना केवळ मदत केली नाही; त्यांनी हरवलेला स्वाभिमान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीतील १८ कामगारांपैकी १४ जण दृष्टिबाधित आहेत.

एकेकाळी ज्या शैक्षणिक संस्थांनी सागर यांना इलेक्ट्रॉनिक्स शिकवण्यास नकार दिला होता, त्याच संस्था आज त्यांना प्रशिक्षक म्हणून सन्मानपूर्वक निमंत्रित करताना दिसतात.

काही प्रशिक्षणार्थी आज स्वतः मार्गदर्शक झाले आहेत. काहींनी स्वतःचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. जे पालक कधीकाळी भविष्याबद्दल साशंक होते, ते आज अभिमानाने बोलतात.

या यशोगाथा कदाचित वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत फारशा झळकत नसतील; पण त्यांनी अनेक आयुष्ये उजळवली आहेत.

कारण सागर आणि नेत्रा पाटील यांनी केवळ दिवे तयार केले नाहीत—

…… त्यांनी माणसांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला आहे.

अधिक माहितीकरता : 

IIG Education and Development Trust,

संपर्क :  शॉप क्रमांक २बी, जिजामाता चाळ, कोकणीपाडा, अशोकवन, दहिसर (पूर्व), मुंबई, ४०००६८. मो ९३२२०१७१४०.

डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जिलेबीवाला… माहिती संकलक : डॉ. डी. डी. देशमुख कामठेकर ☆ प्रस्तुती – बिल्वा शुभम् अकोलकर ☆

बिल्वा शुभम् अकोलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जिलेबीवाला… माहिती संकलक : डॉ. डी. डी. देशमुख कामठेकर ☆ प्रस्तुती – बिल्वा शुभम् अकोलकर 

उज्जैनच्या महाकाल मंदिरामागे एक छोटीशी गल्ली होती…

त्या गल्लीत घीसू नावाचा एक हलवाई राहत होता.

तो रोज पहाटे चार वाजता जीलेबी बनवायचा… पण विकण्यासाठी नाही — महाकालांना अर्पण करण्यासाठी.

 

घीसूच्या वडिलांनी 1952 मध्ये दुकान सुरू केलं होतं.

दुकानाचं नाव होतं — “महाकाल जिलेबी”.

दुकान लहान होतं, पण गर्दी प्रचंड असायची.

कारण घीसूची जिलेबीं कुरकुरीत, रसाळ आणि स्वस्त होती.

पण घीसूचा एक नियम होता —

पहिली कढई महाकालांसाठी.

तो रोज पहाटे उठायचा… पीठ मळायचा, पाक तयार करायचा…

आणि पहिली गरमागरम जीलेबी थाळीत सजवून मंदिराच्या मागच्या दरवाजातून पुजाऱ्यांकडे द्यायचा.

भोग लागल्याशिवाय दुकान उघडायचं नाही.

लोक विचारायचे,

“घीसू, धंदा कधी करणार?” 

तो हसून म्हणायचा,

“धंदा तर महाकाल करतात… मी तर फक्त प्रसाद वाटतो. ” 

 

2020 मध्ये लॉकडाऊन लागलं…

मंदिर बंद झालं… गर्दी गायब झाली…

घीसूचं दुकानही बंद पडलं.

कर्ज वाढत गेलं.

मुलगा म्हणाला,

“बाबा, पहिली कढई बंद करा… आधी ग्राहकाला विकूया. ”

पण घीसूने नकार दिला.

तो रोज पहाटे उठून दहा जलेबी बनवायचा…

आणि मंदिराच्या बंद दरवाज्यापाशी ठेवून यायचा.

पुजारी नव्हता… मंदिर बंद होतं…

तरीही तो ठेवायचा.

बायको रागाने म्हणाली,

“घरात पीठ नाही… आणि तुम्ही बंद मंदिरात देवाला जीलेबी चढवताय?” 

घीसू शांतपणे म्हणाला —

“देव बंद नाही… फक्त दरवाजा बंद आहे. ” 

 

कर्जदारांनी धमक्या दिल्या…

घीसूने मोठी कढई विकली.

आता तो तव्यावर हाताने जीलेबी बनवू लागला.

एक दिवस मुलगा म्हणाला,

“मी पुण्याला नोकरीसाठी जातोय. ” 

घीसूने आशीर्वाद देत फक्त एवढंच सांगितलं —

“पहिल्या पगारातून महाकालांना जीलेबी चढव. ” 

 

2021 मध्ये मंदिर पुन्हा उघडलं.

लोकांची गर्दी परत आली.

पण घीसूकडे कढई नव्हती…

तो तव्यावरच जीलेबी बनवत होता.

लोक हसायचे —

“घीसू म्हातारा झाला. ” 

एका सकाळी एक वृद्ध साधू आला…

मळके कपडे, मोठ्या जटा… 

तो म्हणाला,

“जीलेबी खायची आहे. ”

घीसूने गरम जीलेबी दिली.

साधूने डोळे मिटून खाल्ली… आणि हळूच म्हणाला —

“तोच स्वाद…” 

घीसू चकित झाला.

“तुम्ही आधी खाल्ली आहे?”

साधू हसला —

“1978 मध्ये… तुझ्या वडिलांच्या हातची.

मी रोज पहिली कढई खायचो… जेव्हा मंदिर बंद असायचं. ” 

घीसूच्या डोळ्यांत पाणी आलं… 

साधूने झोळीतून एक छोटी पितळी कढई काढली.

“ही ठेव… आता ती तुझी. ” 

घीसूने नकार दिला.

साधू म्हणाला,

“मला आता जीलेबी नाही… मुक्ती हवी आहे. ” तो निघून गेला…

घीसूने कढईत पाहिलं…

आत एक चिठ्ठी होती —

“कर्ज माफ. ” 

त्याच दिवशी कर्जदार आला आणि म्हणाला —

“कोणीतरी तुझं पूर्ण कर्ज फेडलं. ”

घीसूने पुन्हा पहिली कढई सुरू केली.

लोक म्हणू लागले —

“घीसूच्या जलेबीत आता अमृत आहे. ” 

 

एक दिवस तोच साधू महाकालांच्या शाही मिरवणुकीत दिसला…

घीसू धावत गेला… पण तो गर्दीत नाहीसा झाला.

नंतर पुजारी म्हणाले —

“ते साधू नव्हते… महाकालांचे नागा संत होते.

ते फक्त त्या प्रसादाला स्वीकारतात जो कोणत्याही स्वार्थाशिवाय अर्पण केला जातो. ” 

तेव्हा घीसूला समजलं…

त्या दोन वर्षांत बंद दरवाज्यासमोर ठेवलेली जलेबी कुत्रे खात नव्हते… 

 

आज घीसू 68 वर्षांचा आहे.

दुकान मुलगा चालवतो.

पण पहिली कढई अजूनही घीसूच बनवतो… रोज पहाटे चार वाजता.

तो आजही थाळी घेऊन मागच्या दरवाज्यापाशी जातो…

कधी थाळी रिकामी परत येते… कधी भरलेली…

पण घीसू कधी प्रश्न विचारत नाही.

 

लोक विचारतात,

“बाबा, तुमच्या यशाचं रहस्य काय?” 

घीसू हसून म्हणतो —

“जीलेबी गोल असते… तिला ना सुरुवात असते ना शेवट.

धंदाही तसाच असतो…

तुम्ही ग्राहकापासून सुरुवात करता…

मी देवापासून करतो. ” आणि आजही उज्जैनमध्ये पहाटे पाच वाजता महाकालांच्या नैवेद्यात घीसूची जीलेबी चढते… 

पुजारी म्हणतात —

“नैवेद्यात गोडवा नाही चढत…भरोसा चढतो. ” 

 

कारण घीसूने शिकवलं —

“जेव्हा दरवाजे बंद असतात… तेव्हाही अर्पण करणं थांबवू नका…

कारण घेणारा कधीच दरवाज्यातून येत नाही…

“देवावरचा विश्वास खरा असेल… तर बंद दरवाज्यांमागेही तो तुमचं ऐकतो, असं तुम्हाला वाटतं का?

संकलन :- डॉ. डी. डी. देशमुख कामठेकर

पुणे.

प्रस्तुती :  बिल्वा शुभम् अकोलकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्फटिक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ स्फटिक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

दिव्यसहस्रनामाचा जन्म आणि जगातला पहिला ‘Tape Recorder’ : स्फटिक

कुरुक्षेत्रावर कोणी notes घेतले नाहीत, मग विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत कसे पोहोचले?

आपल्याला माहीत असलेली गोष्ट :

भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर. युधिष्ठिर समोर. श्रीकृष्ण साक्षीला. वेदव्यास उपस्थित. भीष्मांनी विष्णूची एक हजार नावे सांगितली.

आपण सगळे हे जाणतो.

पण एक प्रश्न कधी मनात आला का?

त्या भयाण रणांगणावर, बाणांच्या शय्येजवळ बसून कोणी notes घेतल्या होत्या का? कागद होता? लेखणी होती? कोणी लिहित होते का?

नाही.

 आणि इथेच सुरू होते, ती गोष्ट ~ जी तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल.

भीष्मांनी सांगितले ~ पण कोणी लिहिले नाही!

भीष्म पितामह जेव्हा विष्णूची सहस्त्र नावे सांगत होते, तेव्हा तिथे असलेले सगळे म्हणजे युधिष्ठिर, पाचही पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्मांचे सांगणे संपले आणि सगळ्यांनी डोळे उघडले.

पहिला आवाज आला युधिष्ठिराचा–

“थांबा… पितामहांनी एक हजार नावे सांगितली. आपण सगळे ऐकत होतो. पण कोणी लिहून ठेवले का? क्रम गेला! सहस्त्रनाम हरवले!”

सगळे एकमेकांकडे पाहू लागले.

मग सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिले..

“तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल!”

श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले “मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो. माझ्याकडेही उत्तर नाही. ”

सगळे हतबल झाले. इतके मोठे ज्ञान आणि ते हरवणार? 

 मग श्रीकृष्णाने सांगितला एक अद्भूत उपाय!

श्रीकृष्ण म्हणाले : एकच मार्ग आहे. सहदेव.

सगळे चकित झाले. सहदेव? पाचव्या पांडवाला हे कसे शक्य होईल?

श्रीकृष्ण म्हणाले “सहदेव हा आपल्यात एकमेव असा आहे, जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे, की शांत वातावरणात उच्चारलेले शब्द तो आपल्यात साठवून ठेवतो. भीष्मांनी जेव्हा ती नावे सांगितली, तेव्हा सहदेवाच्या स्फटिकाने ते सगळे टिपून ठेवले आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले, तर तो स्फटिकातून ते ध्वनी परत मिळवू शकतो आणि वेदव्यास ते लिहून घेतील. “

जगातील पहिला ‘Tape Recorder’

स्फटिक!

सहदेव आणि वेदव्यास त्याच जागी बसले, जिथे भीष्म पितामहांनी सहस्त्रनाम सांगितले होते.

सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एकेक नाव लिहून घेऊ लागले.

असे वेदव्यासांनी विष्णू सहस्त्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले.

हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, “जगातील सर्वात पहिला Tape Recorder म्हणजे हा ‘स्फटिक’ ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्त्रनाम जपून ठेवले. “

हे ऐकून सगळे स्तब्ध झाले.

आणखी एक गोष्ट, जी कमी माहीत आहे.

महाभारतात दोन महान उपदेश आहेत : एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता आणि दुसरा युधिष्ठिराला भीष्मांनी दिलेले विष्णू सहस्त्रनाम आणि हे दोन्ही वेदव्यासांनी लिहून ठेवले. विशेष म्हणजे, विष्णू सहस्त्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोता होते!

विचार करा… ज्याची नावे सांगितली जात होती, तो स्वतः ऐकत होता!

 हे किती जुने आहे?

महाभारत युद्ध साधारण इसवीसनपूर्व ३०६७ मध्ये झाले, असे मानले जाते ~ म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत येऊन आता जवळपास ५१०० वर्षे झाली आहेत.

५१०० वर्षांपूर्वी रणांगणावर सांगितलेले, एका स्फटिकात साठलेले; वेदव्यासांनी लिहून ठेवलेले आणि आज आपण घरी बसून म्हणतो. हा धागा तुटला नाही, कारण श्रद्धा तुटली नाही.

आजचा विचार :

पुढच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम जेव्हा म्हणाल, तेव्हा एक क्षण थांबा!

कुरुक्षेत्राच्या त्या भयाण रणांगणावर, बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले, वेदव्यासांनी जे लिहिल; ते ५१०० वर्षांनंतर तुमच्या ओठांवर आहे.

हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, ही दिव्य स्पंदनं आहेत!

॥ॐ नमो भगवते वासुदेवाय॥

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रिंगणी भुईरिंगणी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रिंगणी भुईरिंगणी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत: वर्ण संख्या १६ यती ८ व्या अक्षरावर) 

शुभ्रखणी जांभूळली अवनीच्या गं अंगणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||ध्रु||

*

नागमोडी चाल तुझी खोडावर काटेकुटे

पानावर हिरव्याशा देखणी कलिका फुटे

शुभ्रकांती मनमोही भासते जणू चांदणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||१||

*

फुले जांभळी पांढरी कनकाचा वर गोंडा

देखण्याशा रुपावर मधमाशांचा गं लोंढा

तुला चिचुर्डी म्हणती कुणी डोर्ली भोरिंगणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||२||

*

अनेक रूपात तुझी नावे वेग वेगळाली

फुलाफळांसह फांदी बहराला पहा आली

वैद्य तू बहुगुणी पान, फूल, खोड, चणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||३||

*

कतेली कताई आणि निदिग्धिका, कंटकारी

नागमोडी चाल तुझी रानीवनी दिसणारी 

करतात सारे तुझी भाजी, आमटी, चटणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||४||

*

पावसात बहरते कटेरी तू कंटकारी

काटे रिंगणी गं बाई नावे तुझी किती सारी

रानरिंगणी म्हणती तुला गं मोतीरिंगणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||५||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १४८ ☆ अंदेशा बाढ़ का ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “इंतज़ार” ।)

✍ जय प्रकाश के नवगीत # १४८ ☆

अंदेशा बाढ़ का ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

जेठ सी दोपहरी

अंदेशा बाढ़ का

शायद लौट आया है

मौसम असाढ़ का।

 

छप्पर से छानी तक

एक सुगबुगाहट

आँखों में तैर रही

कोई अकुलाहट

इधर आँधियों से सब

पट गई धरा है

उधर नभ के आँगन में

बूँदों की आहट

 

टूट गया भ्रम सारा

बर्फ़ के पहाड़ का

शायद लौट आया है

मौसम असाढ़ का।

 

खेतों के प्राणों में

सोंधापन महके

वन-उपवन डाल-डाल

पत्ते-पत्ते चहके

नदी ताल पोखर घट

पनघट वंशीवट

सबके मन पावस के

रंगों से दहके

 

उग आया सपना फिर

बंजर में झाड़ का

शायद लौट आया है

मौसम असाढ़ का।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ नफरत के बीज बोए…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी ☆

डॉ. रामेश्वरम तिवारी

संक्षिप्त परिचय

  • हिंदी-प्राध्यापक(सेवानिवृत्त) महारानी लक्ष्मीबाई शासकीय कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय, भोपाल  (म.प्र).
  • नई दुनिया, दैनिक भास्कर, वीणा, हंस, धर्मयुग, कादम्बिनी आदि पत्र-पत्रिकाओं में कविता और लघुकथाएँ प्रकाशित। पुस्तकः कविता के ज़रिए,  मध्य प्रदेश साहित्य अकादमी के सौजन्य से प्रकाशित।

आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता – नफरत के बीज बोए…!

☆ ॥ कविता॥ नफरत के बीज बोए…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी

इंसान इतना बेबस, लाचार कभी न था,

आज से पहले स्वार्थी प्यार कभी न था।

*

गाड़ी-घोड़ा,महल-मढ़ैया,सुख-सुविधा,

सबकुछ होते हुए भी बेज़ार कभी न था।

*

तालीमों की कारगुज़ारी देखकर लगता,

ऐसा अनपढ़,जाहिल,गँवार कभी न था।

*

बाहर दिखावटी हँसी, भीतर से खोखला,

ज़िंदगी का इतना तिरस्कार कभी न था।

*

जिन बेटों को पढ़ा-लिखाकर बड़ा किए,

पर सम्बन्धों का टूटा सितार कभी न था।

*

बेशक; अभावों में जीते थे, आँसू पीते थे,

पर वातावरण ऐसा नागवार कभी न था।

*

धर्मियों द्वारा नफरत के बीज बोए जा रहे,

मानवता का ऐसा बहिष्कार कभी न था।

© डॉ. रामेश्वरम तिवारी

सम्पर्क – सागर रॉयल होम्स, होशंगाबाद रोड, भोपाल-462026

मोबाईल – 8085014478

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पियाँ – (१८) ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – चुप्पियाँ – (१८) ? ?

मेरे शब्दों की

बोलती चुप्पी पर

कुछ छात्र

अनुसंधान करना चाहते हैं,

अपनी चुप्पी की

मुखरता पर

नतमस्तक हूँ!

?

© संजय भारद्वाज   

(2.9.2018, प्रातः 8:52 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ नारायण साधना संपन्न हो चुकी। नई साधना की सूचना यथासमय देंगे। 🕉️

💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Articles ☆ A Front Row Seat to Modern Warfare… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

? ~A Front Row Seat to Modern Warfare… ??

☆ 

35,000 Feet Above the Ground… and a Front Row Seat to Modern Warfare

A friend and coursemate, Captain  PM Joshi, NM (Bar), a highly decorated military pilot and twice recipient of Gallantry Awards from the President of India, recently had an experience that few civilians can even imagine.

Flying over the Middle East, somewhere close to Jordan, he happened to be looking out of the aircraft window during sunset. What first appeared to be unusual lights on the horizon quickly developed into something far more significant.

Bright streaks in the sky. A rapidly expanding high-altitude plume. Multiple interceptors climbing towards their target.

Years of military flying teach us to notice details that others might overlook.

He instinctively captured a few photographs.

Five minutes later, the captain made an announcement confirming missile activity in the area.

The irony was hard to miss.

Inside the aircraft, passengers were engrossed in movies, conversations, and the beauty of the sunset.

Outside, beyond the horizon, an air defence battle was unfolding.

For military professionals, the photographs are a stark reminder of the changing character of warfare.

Today’s battles are not always fought by soldiers facing each other across a battlefield. They are fought through missiles, drones, sensors, satellites, electronic warfare, and layered air-defence networks spanning hundreds of kilometres.

The engagement may have lasted only a few moments.

The technology behind it took decades to develop.

The professionals operating those systems took years to train.

And the strategic consequences may be felt for generations.

To the untrained eye, these are merely beautiful photographs of a colourful evening sky.

But to those who have worn the uniform, they represent vigilance, preparedness, deterrence, and the unforgiving realities of modern conflict.

A sunset.

A civilian airliner.

Missiles in the sky.

A reminder that peace is never accidental.

It is protected every day by men and women who stand watch, often unseen, often unacknowledged, but never unimportant.

The sky may look peaceful. It does not always mean that it is.

🫡🇮🇳

~Pravin Raghuvanshi

 © Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Founder Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares