सध्या सामाजिक कार्य, कवयित्री, ब्यूटी पार्लर आणि लेडीज शॉप चालवते. सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, आणि साहित्यिक 30 आसपास पुरस्कार.वाचन आणि लेखन अविरत चालू आहे…
कवितेचा उत्सव
☆ अंकुरित आभाळ… ☆ सुरेखा चिखलकर ☆
☆
अजाणत्या वयात कळत नव्हते काही
सर्वासारखे मला उभे राहता येत नाही…
*
पण याच जमिनीत एक स्वप्नांचा अंकुर रुजला ,
पंख नसतानाही आभाळाकडे झेप घेण्याचा ध्यास लागला..
*
दोन्ही हात जमिनीवर उड्या मारण्याची हौस भारी ,
पण ह्याच जिद्दीतून फुलली माझ्या अस्तित्वाची गाथा खरी..
*
कळले जेव्हा बालमनाला दोष दिला नाही देवाला
आरूढ झाले दैवावरती केली सुरवात शिकण्याला…
*
केली चिरफाड पायांची जिद्द होती उभे राहण्याची
नशिबाने दिली आस मिळाली साथ कुबड्यांची …
*
शिक्षणाची पायरी दिवसेंदिवस चढत नव्या उमेदीने घडत होते,
लेखणीच्या बळावर मी आभाळालाही स्पर्श करत होते…
*
तुटले होते पंख जरी घेतली झेप उडण्यासाठी
अंकुरलेल्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी…
*
बनेल उदाहरण प्रत्येकाला सोडून लाचारी भिड आयुष्याला
भारतीय संस्कृतीचे एक विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे नमस्कार. नमस्कारायची सुरुवात सकाळी उठल्यापासूनच होते.
‘समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले l विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे’
समुद्र, पर्वत यांना धारण करणाऱ्या विष्णुपती लक्ष्मीला पदस्पर्श करण्याआधी तिला नमस्कार करून तिची क्षमा मागणारी आपली संस्कृती आहे. भूमी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आदर व्यक्त करण्याचा भाव यात आहे. नंतर स्नान झाल्यावर देवाला, आई-वडिलांना, घरातील जेष्टाना, गुरुना नमस्कार करणे व त्यांचे आशीर्वाद घेणे दोन्ही तितकेच महत्त्वाचे. नमस्कारात प्रेम, आदर, नम्रता, सद्भाव आहे.त्यानंतर मिळणारा आशीर्वाद दिवसभराच्या कार्याला यश देणारा,सत्कार्याची प्रेरणा देणारा असतो.
नमस्काराला वंदन,नमन, प्रणाम, प्रणिपात, अभिवादन, असे प्रतिशब्द आहेत. विनय हे नमस्काराचे मूळ आहे. दोन्ही तळवे एकमेकांना चिकटून सरळ छातीवर, आणि मस्तक श्रद्धेने वाकलं की नमस्कार होतो. तेथे अहंकार नाही. नम्रता, आदर, प्रेमभाव असावा. वंदन म्हणजे नमस्कारच पण श्रद्धा जास्त. ‘वंदे मातरम्’ म्हणून मातृभूमीला तसेच ध्वजवंदन म्हणजे ध्वजाला वंदन करतात. नवविधाभक्ती मध्ये वंदन भक्ती आहे.
देव, गुरु,आचार्य, सत्पुरुष यांना साष्टांग नमस्कार करतात. साष्टांग म्हणजे स अष्टांग, आठ अंगे जमिनीला टेकून केलेला नमस्कार. दोन पाय, दोन गुडघे, दोन हात, नाक व कपाळ. यात पूर्ण शरणागती व्यक्त होते. हाच प्रणिपात ऋजुता, नम्रता सांगणारा.
सूर्यनमस्कार ही भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ नमस्कार पद्धती आहे.हे बारा भागात घातले जातात. याचे शारीरिक व मानसिक फायदे आहेत. व्यायाम व आसने दोन्ही साधतात. कोणत्याही साधनाशिवाय करायची ही भारतीय पद्धत आता जगन्मान्य झाली आहे.
आपली संस्कृती सर्वाभूती परमेश्वर पाहणारी आहे.त्यामुळे ‘दीपज्योती नमोस्तुते’ म्हणून साऱ्या तेज तत्वाला नमस्कार. नदीतही मनुष्यत्व बघून तिची ओटी भरून नमस्कार केला जातो. समुद्राला नारळ आपण करून जलतत्त्वाची पूजा असते. वृक्ष पूजा तर सर्वांना माहीतच आहे. एकंदरीत नमस्कार भारतीय संस्कृतीचे सौंदर्य आहे. चूक झाल्यास नमस्कार करून माफी मागितली म्हणजे तोच नमस्कार संरक्षक कवच होतो. भारतात धर्म,भाषा, वेशभूषा यात विविधता असली तरी नमस्कार सगळ्यात आहे. प्रपंच्यात, परमार्थात, स्वागत आणि निरोपातही नमस्काराला स्थान आहे. समोरच्या व्यक्तीला रामराम म्हणून नमस्कार करणे म्हणजे स्वतःच्या व दुसऱ्याच्या हृदयस्थ रामाला नमस्कार होतो. सर्वात तोच आत्मा हा भाव समानता प्रस्थापित करतो. आपोआप राग, द्वेष दूर होतात. दोषरहीत दृष्टीने सर्वत्र भगवंत पाहणे हीच नमन भक्ती.
ग्रंथारंभी किंवा शुभकार्याच्या आरंभी संबंधित सर्वांना नमस्कार करण्याची प्रथा आहे. यातून कार्यपूर्तीसाठी त्यांचे आशीर्वाद मिळतात. ग्रंथाची सुरुवात ‘श्री गणेशाय नमः’ने करतात.‘नमस्ते नमस्ते’ असे दोनदा म्हणल्याने त्याची तीव्रता वाढते.’ सर्वदेव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति l’हा विश्वात्मक भाव नमस्कारातून व्यक्त होतो. गुरु हा नेहमी वयाने मोठा असतो असे नाही. तेव्हा आपल्यापेक्षा लहान गुरु असतात तरी त्याला नमस्कार करावा. हा त्या गुरुतत्त्वाचा मान असतो. कन्या पूजनाच्या वेळी कुमारीकेला व बटू पूजनाच्या वेळी बटूला नमस्कार करतात. डोळे मिटून देवतेला नमस्कार करताना देवतेचे ध्यान होऊन सुख समाधान प्राप्त होते.मानसिक आरोग्य चांगले राहते.
नमस्काराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. हाताने पायाला स्पर्श करून मस्तक खाली वाकवतात. काहीजण चरणावर मस्तक ठेवतात. काहीजण हस्तालोंदन करतात. कोणी आलींगन देतात. कोणी नुसतेच कमरेत वाकतात. तर कोणी टोपी, पागोटे काढतात. पत्रातही ज्याला आपण पत्र लिहितो, त्याला नमस्कार लिहून मग लिखाणाला सुरुवात केली जाते. अशा प्रकारे नमस्कार हा साधा, सोपा, बिन कष्टाचा पण लाभदायक आहे.
या कारणें नमस्कार श्रेष्ठ l नमस्कारें वोळती वरिष्ठ ll
अजय अनिता दोघे ही एकाच college मधे शिकत होते.•• दोघे ही हुषार. त्यामुळे लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं.••••
अनिता ने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली••• मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्यांचे आई-वडील तर चकित झालेच ,बरोबर अनिता चे आई-वडील पण अनिता कडे आश्चर्याने बघू लागले ••
लगेचच अजय चे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिता चे कौतुक वाटतं की तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले.•••थोडा वेळ द्या आम्हाला .••• आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू .असं म्हणून बाबांनी परिस्थिती सांभाळुन घेतली.•••
घरी येताना सर्व शांत होते .अजय व आई खूप disturb आहे .हे बाबांच्या लक्षात आले .
घरी आल्यावर बाबा म्हणाले ••••
अरे !! तुम्ही वेगळे राहिला तर आम्हाला काही हरकत नाही .••जवळ राहिलं म्हणजेच प्रेम असत का ? अनिता चांगली मुलगी आहे. तुम्ही दोघे एकमेकांना मागच्या पाच वर्षांपासून ओळखता. चांगली शिकलेली आहे .दिसायला सुंदर आहे. मुख्य म्हणजे तुला आवडते ना •••.मग आम्हाला काही हरकत नाही ••
.आजी मात्र नाखुश होत्या. त्यांनी एकुलत्या एक सुनेबद्दल बघीतलेली सर्व स्वप्न एका क्षणात संपल्यासारखी त्यांना वाटलं. •••.अजय फक्त ऐकत होता .••••
दुसऱ्यां दिवशी अजयने अनिताला समजविण्याचा खूप प्रयत्न केला .पण काही उपयोग झाला नाही .••••
बाबां मात्र आईला समजविण्यात यशस्वी झाले.•• मुलांच्या सुखासाठी व आनंदासाठी आई वडील नेहमीच कोणतेही निर्णय लवकर घेतात.••कोणत्याही प्रकारची तडजोड करायला ते लगेच तयारी दाखवतात .••••
आता अजय अनिता चा संसार सुरू झाला. आई बाबांनी स्वतः लक्ष देऊन त्यांच्या घरातील सर्व सामान अनिता च्या पसंती ने घेतले .••अगदी चमच्या पासून फ्रीज पर्यंत सर्व वस्तू घरात तयार होत्या ••••.
दोघांची नोकरी होती. अजय आठवड्यातून एकदा घरी यायचा ••.येताना फोन करून , विचारून पिशव्या भरभरून तो आई बाबांकरिता त्यांची औषधे ,फळ ,भाज्या आणून देत असे .•••
बाबा म्हणायचे. अरे !!मग मी काय करू??? आम्हाला बाहेर जायचे कारणच मिळत नाही.•• तेंव्हा अजय हसून म्हणत असे ,•••• बाबा !! तुम्ही फक्त आईला घेऊन फिरायला जात जा.•• अनिता मात्र काही खास कारण असेल तरच यायची.•• आईला त्याचे खूप वाईट वाटत असे .बाबांना याची जाणीव होती. ते खंबीर होते .बायकोला सांभाळायची जबाबदारी पण माझीच आहे .हेही बाबांना माहीत होते .••••
बाबा म्हणजे एक प्रसन्न चित्त व्यक्तिमत्त्व .••नेहमीच वेगळ्या आयडिया असतात त्यांच्या जवळ .••• आणि आपली आयडिया कशी छान आहे ,हे त्यांना पटवून पण देता येत .••••
दोघांची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. वरवरून आई खूष आहेत ,असं दाखवत जरी असल्या ,तरी कुठे तरी त्यांचे मन दुखावले होते .••••
अजय आज येणार हे कळलं की आई अगदी तयारीला लागायच्या.••• बाबा लिस्ट घेऊन आईंनी सांगितले ले सर्व साहित्य आणून द्यायचे .•••आई वेगवेगळे पदार्थ तर करायच्याच. बरोबर त्यादिवशी चा डबा म्हणून दोन तीन भाज्या, पोळ्या पण द्यायच्या••. अरे !! तेवढंच अनिताला काम कमी होईल. असं म्हणायच्या.••• नोकरी करुन सर्व करताना ती थकत असेल .••••
अनिता मात्र आपल्या विश्वात अगदी दंग होती . रमलेली होती .••आता तर project leader होती •••.त्यामुळे आनंदात होती••.पण वाढत्या कामाबरोबरच तिचा stress ही वाढत होता.••••
कंपनी मधे employees साठी कधी कधी काही कार्यक्रम आयोजित होत असतात.••• आजचा कार्यक्रम••
‘ Stress management’ वर होता.••••
अनिता ने attend केला ••.वक्ता अर्थातच तयारीने आले होते .••त्यांनी ‘ what is stress?’ त्यांचे शारीरिक व मानसिक कसे परिणाम होतात. stress management करिता काय काय आपण करू शकतो?? त्याबद्दल ते बोलले .योग करणे , regular excercise करणे का गरजेचे आहे हे सांगितले .••••
आपले भाषण संपवताना ते म्हणाले तुम्ही सर्व शिकलेले तरूण अहात. पैसा , post , promotion , फक्त याचाच विचार करू नका . कुठे तरी फुल स्टोप लावायला शिका . कुठे थांबायचे ?? हे ठरवायला शिका .••••
आनंद केंव्हा घेणार आयुष्यात ?? आनंद घेणे ही वर्तमान काळातील गोष्ट असते . भविष्यात घेऊ म्हणून पूढे ढकलायची गोष्ट नव्हे..••••
Life मधे priorities ठरवायाला शिका. पैसा आणि फॅमिली दोन्ही महत्वाचे.••• freedom, privacy. च्या नावाखाली आपल्या माणसांहुन आपण दूर तर होत नाही ना . याचे भान ठेवा .•• एकटेपणा हे सुद्धा स्ट्रेस चे एक मोठे कारण आहे .•• जेंव्हा व्यक्त व्हायला कोणी विश्वासाचे मिळत नाही.तेंव्हा •• स्ट्रेस एकत्र होत जातो ••. तुमच्या या नवीन कल्चर मधे नोकरी सोडणे ,बदलणे, किंवा नोकरी जाणे, या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत. •• त्यामुळे अस्थिरता व अनिश्चितता या दोन्ही तलवारी सतत टांगलेल्या असतात तुमच्या आयुष्यात .• निश्चित काही गोष्ट असेल तर ती तुमची फॅमिली आहे .••तो तुमचा आनंद आहे. तेंव्हा विचार करा.••
तुम्ही त्या सर्वांबरोबर जीवापाड तडजोड करता जे निश्चित नाही .•••मग परिवार बरोबर का नाही ??? ती तर जास्त सोपी व सहज गोष्ट आहे .ओझ आणि मन हलकं करायला परिवारासारखी दुसरी सेफ जागा नसते.••• तुमचे कौतुक करायला व तुम्हाला, तुमच्या मुलांना सांभाळायलाही कोणी तरी पाहिजेच ना.••••
माझ्या भाषणात हा उल्लेख मी सर्वात शेवटी जरी केला असला ,तरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे .•• हे लक्षात ठेवा .••••
अचानक अनिता च्या डोळ्यासमोर अजय च्या आई बाबांचा चेहरा आला .••त्यांनी पाठविलेले डबे ,वेळोवेळी घेतलेली काळजी तिला आठवली .•••
अनिता घरी आली ती वेगळ्याच विचारात.•• येताना तिने बाबांना फोन केला ••.अजय ला पण सुट्टी घ्यायला सांगितले .••••
अनिता अजय उद्या घरी येतायेत . बाबांनी आईंना सांगितले .दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह??? होते. मिश्रीत भाव होते.•••
बाबा म्हणाले अग !! उद्या अनिता च्या आवडीचा स्वयंपाक कर.••••
दुसऱ्या दिवशी अजय अनिता घरी आले. अनिता ने आई बाबांना सांगितले ,•••
आम्ही येथे तुमच्या बरोबर रहायला येणार आहोत नेहमी करिता .,••
अजय ,आई बाबा पुन्हा एकदा आश्चर्य चकित झाले.•• पण यावेळी मिळणारा धक्का सुखद होता.•••
बाबा म्हणाले •••••
“Yes , you are always welcome .”
फक्त मला पंधरा दिवस द्या. तुमची खोली व्यवस्थित करायला .,••• आई नी बाबांकडे बघीतले , त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व बाबांबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता.••• .
” दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असत. .”
‘संयम ‘आणि ‘माफ करायची ताकद ‘ मनुष्यात असली की सर्व साध्य होते .•••
इतरांकडून कमीत कमी ‘अपेक्षा ‘ व स्वतःकडून जास्तीत जास्त ‘तडजोडी :या दोन गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी व यशस्वी बनवू शकतात .••••
” चुकीने चूकीच्या मार्गावर गेले तर काही हरकत नाही .पण चूक लक्षात येताच मार्ग बदलायची इच्छा व हिम्मत दाखविणे हे कौतुकास्पद आहे .”••••
म्हणतात ना •••••
“जिंदगी हमें हमेशा एक नया पाठ पढ़ाती है — हमें समझाने के लिए नहीं — हमारी सोच बदलने के लिए. “
त्या वेळेला काळ्या, करड्या, निळ्या, लाल इतक्या सगळ्या ढगांची मोजणी केली होती आपण, ती रंगीत सांज आठवते का तुला?
वाढदिवसाच्या दिवशी माझ्या
सायकलच्या कॅरियरवर चाफ्याच्या पिवळ्या फुलांचा पुडा ठेवून गेला होतास तू…
सोबतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी गुलाबी रंगाची चिठ्ठी… तुझ्या वळणदार पण रंगीबेरंगी हस्ताक्षरातलं ते शब्द आणि त्यावर काढलेलं सुंदर जहाज आठवतं का रे तुला?
इतक्या जवळ राहतो म्हणून कधीच पत्र लिहिता येणार नाही म्हणून चार दिवस हट्टाने मामाकडे गेलास आणि एका पोस्टकार्डवर पत्र लिहून पाठवलंस त्यात शेवटी तुझ्या नावाऐवजी छोटंसं रंगीत घर काढलंस…
ते घर आजही स्वच्छ दिसतं मला… पण आठवतं का रे तुला?
तुझ्या घर बांधण्याच्या हौसेनं कितीतरी रंगीबेरंगी दगड, विटा, टाइल्स गोळा करायचो आपण,
तेव्हा एका काचेनं माझ्या बोटावर अचूक वार केला होता… त्यातून येणारं रक्त पाहून तुझ्या आवडीचा पांढराशुभ्र रुमाल माझ्या बोटावर विसावला होता…. अनेक दिवस तुझ्या सॅकच्या चोरकप्यात तो रुमाल ठेवला होतास..आठवतो का रे तुला??
इतक्या वर्षांच्या आठवणींमध्ये किती रंगांची उधळण…
गंधाची पखरण…
आठवते का रे तुला?
चित्रकलेच्या तासाला सर म्हणाले होते काही रंग इतके गडद असतात की ते कधीच पुसले जात नाहीत. त्यावर नवे रंग चढत नाहीत… त्यासाठी कोराच कॅनव्हास वापरावा लागतो. हे ऐकून तुझ्या वहीच्या प्रत्येक पानावर तू माझ्या आवडीचा हिरवा रंग दिलास…
हे आठवतं का रे तुला????
कदाचित नसेल
किंवा असेलही…
पण
प्रियन,
तेव्हापासून मी मात्र पांढऱ्या रंगाचा कागद वापरणं आवर्जून टाळलंय…
हे या रंगोत्सवाच्या निमित्ताने सांगायचं होतं तुला…
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७ आणि ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक ७ – –
मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे |
मना बोलणे नीच सोशीत जावे |
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |
मना सर्व लोकांसि रे निववावे |७ |
अर्थ: हे मना तू धीराचा अंगीकार कर म्हणजेच तुझ्या ठायी धैर्य असू दे. लोकांनी निंदा किंवा टीका केली तरी ती सहन कर. बोलताना नेहमी नम्रतेनेच बोल आणि आपल्या बोलण्याने आणि वागण्याने लोक संतुष्ट होतील असे वाग.
या श्लोकात समर्थांनी मनाला फार सुंदर उपदेश केला आहे. तो लक्षात घेण्याआधी मागील श्लोकाचा संदर्भ घेऊया. मागील श्लोकात समर्थ म्हणतात,” साधकाने काम क्रोध मोह इत्यादी विकारांपासून दूर राहिले पाहिजे.” अर्थात हे दूर राहणे सोपे नाही. त्यासाठी काय करायला हवे ते समर्थ या श्लोकात आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, “आपण धैर्याचा अंगीकार करायला हवा. जीवनामध्ये अनेक संकटे येतात, मोहाचे प्रसंग येतात, आपली परीक्षा पाहणारे प्रसंग येतात. या सगळ्या प्रसंगामध्ये आपले मानसिक धैर्य टिकवून ठेवणे आवश्यक असते. ही एक प्रकारची साधना आहे जी सरावाने जमू शकते.
ज्याला प्रवाहविरुद्ध पोहायचे आहे आणि काही विशेष कर्तृत्व करून दाखवायचे आहे, त्याच्या अंगी धैर्य तर हवेच ! छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईमध्ये काही वेळा माघारही घ्यावी लागली. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला देखील रणांगणातून पळ काढावा लागला. स्वामी विवेकानंदांना देखील अनेक समस्यांचा, टीकेचा, नींदेचा सामना करावा लागला. परंतु या सगळ्या महापुरुषांनी कठीण परिस्थितीतही आपले धैर्य टिकवून ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांना तर केवढी लोकनिंदा सहन करावी लागली परंतु आपण अंगीकारलेले समाजप्रबोधनाचे कार्य ते करीतच राहिले.
अशा महापुरुषांना निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख समान असतात. त्यामुळे ते विचलित होत नाहीत. रामाला राज्याभिषेक होणार होता. तो त्याच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा प्रसंग होता. परंतु दशरथाने कैकयीला दिलेल्या वरामुळे त्याला वल्कले धारण करून वनवासात जावे लागले. परंतु याही परिस्थितीत त्याने आपले धैर्य आणि आनंदी वृत्ती सोडली नाही. आणि अशाही परिस्थितीत भरताला माता कैकयीकडे दुर्लक्ष करू नकोस असे सांगण्यास तो विसरला नाही. म्हणूनच महापुरुषांचे जीवन म्हणजे दीपस्तंभ असतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचा वस्तूपाठ ते आपल्याला घालून देतात. म्हणूनच ते गुण अगदी धारण करण्यासाठी समर्थ आपल्याला तोच उपदेश करतात.
माणसाला स्तुती आवडते परंतु जेवढ्या सहजतेने आपण स्तुतीचा स्वीकार करतो तेवढ्याच सहजतेने निंदेचा करू शकत नाही. त्यासाठी धैर्य लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना बोलणे नीच सोशीत जावे. या ठिकाणी धैर्याचा आणि टीका सहन करण्याचा दुसराही एक अर्थ घेता येईल. तो म्हणजे मनावर संयम राखणे, प्रतीक्षा करणे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही एक काळ असा येतो की त्या प्रसंगामध्ये त्याला मनावर संयम ठेवून कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आजच्या पिढीत हा संयम, हे धैर्य कमी होताना दिसते आहे. तरुण अपयशाचा स्वीकार आणि अपमानाचा सामना सहजपणे करू शकत नाहीत. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळायलाच हवी ती नाही मिळाली तर ते एक तर खचून जातात किंवा हिंसक बनतात. अशी अनेक उदाहरणे आपण व्यवहारात पाहतो. म्हणूनच धैर्य अंगीकारणे, अपमान सहन करणे याचे प्रशिक्षण मनाला देणे आवश्यक आहे. ती वृत्ती अंगी बाणवावी लागते. मुलांना सुद्धा आई-वडिलांनी कठीण परिस्थितीचा सामना करणे, संकटात खचून न जाणे आणि अपयश आले तरी त्यातून पुन्हा उभे राहण्याची हिंमत ठेवणे या गोष्टी शिकवायला हव्यात. क्रिकेटसारख्या किंवा अन्य खेळांमधूनही अशा प्रकारची वृत्ती आपल्याला शिकायला मिळते. एखादा सामना हरला तरी निराश न होता, खेळाडू पुढचा सामना कसा जिंकता येईल त्या तयारीला लागतात. या सगळ्या गोष्टींमध्ये यश आणि अपयश सहजपणे कसे स्वीकारायचे याचे सुंदर शिक्षण आपल्याला मिळते.
जीवनामध्ये वागताना नम्रतेने बोलणे आवश्यक आहे. तसे संस्कार लहानपणापासून व्हायला हवेत ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येतो म्हणूनच पालकांनी तसे आपल्या मुलांना संस्कार द्यायला हवेत. ही नम्रता आतून घ्यायला हवी. ती मनाची वृत्ती व्हायला हवी. बऱ्याच वेळा आजच्या कार्पोरेट जगामध्ये काही लोक कृत्रिम नम्रता किंवा विनय धारण करताना दिसतात. परंतु त्या गोष्टी मनापासून नसतील तर त्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचे ढोंगच !
श्रीकृष्ण, श्रीराम यांचे सर्वांशी वागणे-बोलणे कसे होते हे पालकांनी गोष्टीतून मुलांना शिकवायला हवे. त्यांच्याजवळ ज्ञान होते, सामर्थ्य होते. परंतु तरी देखील त्यांनी आपली नम्रता सोडली नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात,” नम्र झाला भुता, त्याने कोंडीले अनंता.” त्याचे तात्पर्य हेच आहे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याचे समाधान झाले पाहिजे, दुसरी व्यक्ती संतुष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने बोलता आले पाहिजे. आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता देखील उत्तम पद्धतीने सांगता येते. या गोष्टी वरील महापुरुषांच्या उदाहरणांकडे पाहिले तर आपल्या सहज लक्षात येतात.
या श्लोकात समर्थांनी धैर्य, संयम, नम्रता आणि गोड बोलणे ही आपल्या जीवनाला दिशा देणारी चतु:सूत्री दिली आहे. ती आपण लक्षात घ्यायला हवी.
स्वसंवाद:
संकटसमयी माझे मन स्थिर राहते का, की लगेच खचते ?
टीका झाली तर मी संतुलित राहू शकतो का ?
माझ्या वागण्या, बोलण्यात नम्रता आणि सौजन्य आहे का ?
माझ्या बोलण्याने लोक संतुष्ट होतात का ?
– – –
श्लोक ८ वा – – –
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |
मना सज्जना हेचि क्रीया धरावी |
मना चंदनाचे परी त्वां झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे |८|
अर्थ: हे मना ( सज्जन माणसा ), तुझी वागणूक अशा प्रकारे असू दे की मृत्यू पावल्यानंतरही तुझी कीर्ती मागे राहील. सुगंध देण्यासाठी चंदन ज्याप्रमाणे स्वतःला झिजवते अशाच प्रकारे तू देखील इतरांसाठी झिजून सज्जनांना संतोष होईल अशा प्रकारे वागावे.
माणसाचा देह नाशिवंत आहे. जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू निश्चित आहेच. जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. एखादी व्यक्ती किती जगली यापेक्षाही ती कशी जगली हे अधिक महत्त्वाचे. शंभर वर्षांचे दीर्घायुष्य मिळवून आपले आयुष्य मौजमजेत घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अल्पायुष्य लाभलेल्या परंतु इतरांच्या सेवेत आपले जीवन घालवणाऱ्या व्यक्तीचे जीवन कधीही श्रेष्ठ ! स्वामी विवेकानंदांना उणेपुरे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले परंतु या आयुष्यात त्यांनी जी मानवतेची सेवा केली ती अनेक जन्म घेऊनही इतरांना करणे कठीण आहे. आपले आयुष्य सत्कारणी लावायचे असेल तर त्यासाठी इतरांसाठी झिजण्याची तयारी हवी. एक सुंदर मराठी गीत आहे…
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा
झिजूनी स्वतः चंदनाने
दुसर्यास मधुगंध द्यावा…
शीतलता आणि सुगंध हे चंदनाचे गुण आहेत. ते इतरांना देण्यासाठी ते स्वतः झिजत असते. चंदन रोज सहाणेवर थोडे थोडे उगाळले जाते. असे करताना त्याची झीज होत असते. परंतु ही झीज सोसून ते इतरांना सुगंध आणि शीतलता प्रदान करते. आपण असेही म्हणतो की जे हात इतरांना सुगंध वाटतात, त्या हातांनाही सुगंध येतो. तो गंध त्यांना आपोआप प्राप्त होतो.
इतरांसाठी काही करायचे तर फक्त एक दिवस झिजून चालत नाही. ती सवय व्हावी लागते, वृत्तीला तसे वळण लावावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना सज्जना हेचि क्रीया धरावी. अशा प्रकारचे सेवेमध्ये सातत्य असावे लागते. अशा प्रकारचे सातत्य जर आपल्या सेवेत आणि वागण्याबोलण्यात असेल तर त्यामुळे सज्जन म्हणजे समाजातील सदाचरणी लोक प्रसन्न होतात, संतुष्ट होतात.
समाजातील बऱ्याच लोकांकडे सत्ता आणि संपत्ती असते. त्यातील काही लोक आपल्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर विविध संस्थांना देणग्या देऊन आपले नाव द्यायला लावतात. विविध प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तशी ती त्यांना काही काळ मिळते देखील. इमारतीच्या फलकांवर किंवा दगडांवर त्यांचे नाव कोरले गेलेले असते. तरीदेखील काही काळानंतर अशा व्यक्ती विस्मृतीत जातात. परंतु कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा प्रसिद्धीची हाव न धरता जे सातत्याने समाजासाठी झिजत असतात, अशा व्यक्तींचे नाव समाज कायम आदराने घेत असतो. अशा व्यक्तींचे नाव समाजाच्या मनात कोरले जाते. त्याला कायमस्वरूपी आदराचे स्थान असते. अहिल्याबाईंनी आपला राज्यकारभार करत असताना समाजासाठी घाट बांधले, अन्नछत्रे पाणपोया उभारल्या. यासारखी विविध प्रकारची कामे केली आणि त्यासाठी पैसा खर्च केला. त्यामुळे आपण आजही त्यांचे नाव आदराने घेतो. इतरांची नावे विसरली जातात. म्हणूनच त्यांची कीर्ती आजही जिवंत आहे.
समर्थांचा संदेश स्पष्ट आहे —
.. .. .. कीर्ती मागे राहावी असे वाटत असेल तर आयुष्य इतरांसाठी झिजवले पाहिजे. आणि हे झिजणे एकदाच नव्हे, तर वृत्ती म्हणून अंगीकारले पाहिजे.
“मना सज्जना हेचि क्रीया धरावी” —
.. .. .. ही कृती, ही वृत्ती, ही सातत्यपूर्ण सेवा — हाच खरा साधनेचा मार्ग आहे.
स्वसंवाद :
मी केवळ स्वतःसाठी जगतो आहे की इतरांसाठी झिजून त्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहे ?
माझ्या कृतींमागे प्रसिद्धीची अपेक्षा आहे का, की निखळ सेवाभाव ?
हा सेवाभाव मी एक वृत्ती म्हणून अंगीकारला आहे का ?
माझ्या वागण्याने किंवा सेवाभावाने समाजातील सज्जन किंवा सदाचरणी लोक संतुष्ट होतात का ?
☆ “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
‘ऑपरेशन ईश्वर ! ‘
’भारतीय सैन्यावरची अनुभवसिद्ध ‘ईश्वर’कृपा !
(दहा जवान होते..त्यांतील पाच जण त्या जागी विविध ठिकाणी पेरून बसवले आणि इतरांसोबत रोड ओपनिंग चे काम करावे असे ठरले. रात्र झाली…उजाडले….सोबत आणलेल्या पुरी-भाजी खाऊन जवान ताजेतवाने झाले!)
इथून पुढे – – –
आणि…नेमके ईश्वरसिंग ज्या बाजूला बसले होते त्याच रस्त्याने काल अतिरेक्यांना रस्ता दाखवायला गेलेला तो सी.आर.पी.एफ.जवान खाली उतरताना दिसला. त्याने अतिरेकी वर चढून गेल्यानंतर खाली दरीत असलेल्या भागात असलेल्या एका धार्मिक स्थळाजवळ असलेल्या झाडीत लपून बसलेत!
आता वरून खाली गेलो तर ते खालून गोळीबार करतील….त्यासाठी त्यांच्यापासून मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर पाठीमागच्या बाजूने चढून तिथून खाली येणे…ही योजना झाली! एक तुकडी घेऊन जायचे ठरले….आणि ते अतिरेकी निसटून जाऊ नयेत म्हणून दोन रस्त्यांत काही सैनिक तैनात केले!
पथक काही मीटर्स वर चढले…आणि वरून खाली उतरू लागले! बरेच खाली आले तरी अतिरेकी नजरेस पडेनात….ईश्वरसिंग यांचे सोबत एकूण चार लोक होते…..बाकीचे तिघे त्यांनी मशीन गन देऊन एका उंच जागी थांबवून ठेवले होते..गरज पडली तर फायर सपोर्ट देण्यासाठी.
दहा-वीस मीटर्स खाली उतरताच सर्वांत पुढे असलेल्या नेमबाज सैनिकाला एका झाडाच्या जवळ दोन पहारेकरी उभे असलेले दिसले…त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला होती…त्या दोघांत बरेच अंतर होते. ईश्वर सिंग साहेबांनी पुढच्या सैनिकाला हळूच सांगितले….वो दूर वाला मैं उडाता हूं…तू यह नजदीकवाला ले ले! आणि दोघांनीही एकेका गोळीत ते दोघे यमसदनी धाडले….तिसरा समोर आला….त्यालाही या दोघांना सोबत म्हणून वर पाठवले! बाकीचे सात मागे पळाले…..आणि एका कपारीत लपून ईश्वर सिंग साहेबांच्या पथकावर गोळीबार करू लागले…पण त्यांना नेम साधता येत नव्हता! ….आर.एल.अर्थात rocket launcher गन! ईश्वरसिंग साहेबांनी मेसेज देऊन आर.एल.मागवली…त्यांचे वरिष्ठ अधिकारी ते हत्यार घेऊन तिथवर पोहोचले! पण तोवर अतिरेक्यांचा गोळीबार थांबला होता. वरिष्ठ म्हणाले….बाकीचे पळून गेले असतील…त्यावर अनुभवी ईश्वर सिंग म्हणाले….त्यांचे रस्ते अडवून ठेवले आहेत मी…..बाकीचे सात इथंच कुठं तरी लपून बसलेत. त्यावर ते साहेब आणि ईश्वर साहेब आणखी तीन चार जवान घेऊन संभाव्य जागेला वळसा घालून जवळ गेले! तीन अतिरेकी मरून पडलेले. त्यांची एक रायफल ईश्वर सिंग साहेबांनी सोबत आलेल्या सी.आर.पी.एफ.वाल्या सैनिकाच्या हाती दिली! आता दोन वेगवेगळे गट बनवून त्या जागेला घेरण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. वरिष्ठ अधिकारी दोन-तीन सैनिक घेऊन एका बाजूने तर ईश्वर सिंग एका बाजूने निघाले. तेवढ्यात त्या वरिष्ठ साहेबांच्या दिशेने जबरदस्त गोळीबार झाला! हा तर PIKA मशीनगनचा फायर..ईश्वरसिंग साहेबांनी अनुभवाने जाणले! मिनिटाला शेकडो गोळ्या डागणारे हत्यार…पण वरिष्ठ साहेब त्यातून बचावले…..परंतु काहीवेळाने आणखी पुढे सरकताच त्यांच्यावर चायना मेड हातगोळा पडला आणि ते दोन साथीदारांसह जखमी झाले! हाती घेतलेली मोहीम तर फसल्यासारखीच होती. आणखी मोठ्या साहेबांना मेसेज करून हेलीकॉप्टरची मागणी केली…पण त्या भागात हेलीकॉप्टर नेणे धोक्याचे होते. उच्च अधिका-यांनी रस्ते मार्गाने वैद्यकीय मदत पाठवण्याचा निर्णय घेतला! दुर्दैवाने सोबत आलेला सी.आर.पी.एफ.वाला सैनिक PIKA फायरमध्ये सापडला आणि कामी आला! कवर फायर घेत ईश्वर सिंग यांनी दोन जखमी आणि त्या हुतात्मा सैनिकाचा मृतदेह तिथून खाली पाठवण्यात यश मिळवले!
ईश्वर सिंग म्हणाले…साहेब…मी मोहीम अर्धवट सोडून येऊ इच्छित नाही! आणि त्यांनी परत जाऊन नवीन योजना आखली! तोवर त्यांचे सर्वांत वरिष्ठ साहेब तिथे पोहोचले….त्यांनी सोबत एक सैन्य पथक आणले होतेच. त्यांनी ईश्वर सिंग यांना त्यांच्या जागेवरून मागे येण्याची सूचना दिली. अतिरेकी लपल्याची जागा आणि मी यात फारसे अंतर नाही….मी जर मागे फिरलो…तर ते आम्हांला सहज उडवू शकतील…त्यामुळे मी इथंच थांबून कारवाई करीत राहणार आहे! तोवर आपल्याकडील तीन सैनिक हुतात्मा झाले होते…..साहेब म्हणाले….मागे या..आपल्याला आणखी नुकसान नको आहे! त्यावर ईश्वर सिंग यांनी आपला निर्धार असून आता कोणाला काहीही होऊ देणार नाही,असे सांगितले!
ईश्वर सिंग पुन्हा कामाला लागले…..तिकडून PIKAचा जबरदस्त फायर सुरु झाला…जोवर पिका शांत होत नाही तोवर काहीही करण्यासारखं नव्हतं! पण एवढ्यात PIKA शांत झाली…तिच्यातल्या गोळ्यांचा पट्टा संपला…गोळ्यांचे पट्टे असलेली पिशवी अतिरेक्यांनी शेजारच्याच खडकावर ठेवली होती…..PIKAवाल्याने ते पिशवी घेण्याच्या प्रयत्नात ती पिशवी खाली पडली….ती घेण्यासाठी तो थोडा पुढे वाकला….ईश्वर सिंग साहेबांनी निशाणा साधला…..फौजेत आल्यापासून ईश्वर सिंग फायरींग स्पर्धेत कधीच दुस-या क्रमांकावर राहिलेले नव्हते…कायम नंबर एक. तो अतिरेक्याचे डोके केवळ एखाद दोन सेकंदासाठी दिसले असेल….तितका वेळ तर खूप होता….हेड शॉट अचूक! आतापर्यंत दहापैकी चार झालेले होते…दुस-याच मिनिटाला पाचवाही घेतला…..साहेबांना सांगितले….पाच झाला स्कोर. साहेब म्हणाले…आता पुरे झाले…मागे फिरा! नाही साहेब….आणखी पाच आहेत..त्यांना संपवूनच येणार!
गोळ्या पुरवून पुरवून वापरा असा आदेश ईश्वर सिंग यांनी सैनिकांना दिला….आता गवतात लपलेले पाच जण उरले होते….गवत जरासे जरी हलले तरी फायर करा…साहेब म्हणाले……काही मिनिटांमध्ये त्या गवतात पाच मृतदेह मिळून आले…..दहाचा हिशेब लागला होता!
नायब सुबेदार ईश्वर सिंग यांनी आपले शब्द खरे करून दाखवले होते…आयुष्यभर सैन्यात कमावलेला सारा अनुभव वापरला…..प्रसंगी वरिष्ठ अधिका-यांकडे हट्ट धरला…स्वत:चा जीव धोक्यात टाकला…पण हाती आलेले दहा अतिरेकी अजिबात हातचे जाऊ दिले नाहीत! त्या अतिरेक्यांचे मृतदेह तिथून वर आणायचे आदेश मिळाले…पण ईश्वर सिंग म्हणाले….हे काम यावेळी अशक्य आहे…जवान कमी आहेत. शेर किसने मारा? जिसने कान,पूंछ काट ली….या चालीवर मी त्यांची शस्त्रे घेऊन वरती येतो! त्यानुसार त्यांनी केलेही!
दुसरे दिवशी गावक-यांना हाताशी घेत, दहा चारपाई खाटा घेतल्या..त्यावरून ते मृतदेह जागेवरून उचलून आणले. त्यांचे POST MORTEM केले गेले आणि व्यवस्थित दफन विधीही आपल्या लष्कराने करवून घेतला..अगदी त्यांच्या धार्मिक पध्दतीनुसार! वरिष्ठ अधिका-यांनी या मोहिमेला ऑपरेशन ईश्वर असेच दिले होते त्यांच्या पातळीवर! एका सैनिकासाठी तर हा मोठाच पुरस्कार होता! आणि पुढे लवकरच भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महोदय डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांच्या शुभहस्ते कीर्ती चक्र दिले गेले! अगदी सैनिक होण्यासाठीच जन्माला आलेले ईश्वर सिंग यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अतिशय जबरदस्त सैन्य सेवा बजावली. हे सैनिकच भारतीय सैन्याची खरे सामर्थ्य आहेत…त्या सर्वांना मन:पूर्वक नमस्कार….वंदन.
(MONKS AND WARRIORS आणि तत्सम online platforms/ youtube channels वर ईश्वर सिंग साहेबांच्या मुलाखती नुकत्याच प्रसिद्ध झाल्या. त्यात साहेबांची कामगिरी सविस्तरपणे समजावून घेण्यासारखी आहे. ही पेजेस हिंदी,इंग्लिश मध्ये असल्याने मराठी वाचक त्यापासून वंचित राहतो…म्हणून मी हा उपक्रम हाती घेतला आहे. COPYRIGHT ISSUES आहेतच. पण ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे गेली पाहिजे…ही यामागची भावना आहे. जयहिंद.)
☆ रील आणि लाईक्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆
☆
‘स्नेहा’ (वय २८) ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Influencer) होती. तिचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्स होते.
#स्त्रीशक्ती
तिचं आयुष्य म्हणजे फक्त कॅमेरा, रिंग लाईट आणि फिल्टर होतं.
तिचा ६ वर्षांचा मुलगा, ‘आर्यन’, अनेकदा तिच्या व्हिडिओमध्ये दिसायचा. लोक कमेंट करायचे, “So cute! Best Mom-Son duo!”
पण कॅमेरा बंद झाला की स्नेहाचं रूप वेगळं असायचं.
त्या दिवशी रविवार होता.
स्नेहा बेडरूममध्ये मेकअप करून तयार झाली होती. तिला “मदर्स डे स्पेशल” (Mother’s Day Special) रील बनवायची होती.
थीम होती – ‘आईचं प्रेम: जगातील सर्वात सुरक्षित जागा.’
बाजूच्या हॉलमध्ये आर्यन खेळत होता. तो एकटाच होता, कारण बाबा बिजनेस ट्रिपवर गेले होते.
आर्यन धावत बेडरूममध्ये आला. त्याच्या हातात एक तुटलेलं खेळणं होतं.
“मम्मा… मम्मा… हे बघ ना. हे तुटलं. मला भीती वाटतेय, ते सोफ्याखाली गेलंय.”
स्नेहा रिंग लाईट सेट करत होती. ती चिडली.
“आर्यन! तुला कितीदा सांगितलंय मी शूट करतेय? मध्ये मध्ये नको येऊ.
जा बाहेर खेळ. मी १० मिनिटात येते.
मला मूड खराब नकोय माझा. गेट आऊट!”
तिने आर्यनला रागाने हॉलमध्ये ढकललं आणि बेडरूमचा दरवाजा आतून ‘लॉक’ केला. जेणेकरून आर्यनचा आवाज व्हिडिओमध्ये येऊ नये.
बिचारा आर्यन रडवेला झाला. तो हॉलमध्ये एकटाच खेळू लागला.
रेकॉर्डिंग सुरू झालं.
बेडरूममध्ये स्नेहा कॅमेरासमोर अतिशय भावूक होऊन ॲक्टिंग करत होती.
बॅकग्राउंडला एक इमोशनल गाणं वाजत होतं… “तुझसे नाराज नहीं जिंदगी…”
स्नेहा ओठांची हालचाल (Lip-sync) करत होती. डोळ्यातून खोटे अश्रू काढत होती.
कॅप्शन होतं: “माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते. तोच माझा श्वास आहे.”
ती १०-१५ मिनिटं त्या बंद खोलीत रील बनवण्यात मग्न होती. तिने ५-६ रिटेक (Retakes) घेतले.
बाहेर हॉलमध्ये काय चाललंय, याचा तिला थांगपत्ता नव्हता.
इकडे हॉलमध्ये, आर्यन खेळता खेळता ‘स्टोर रूम’ कडे गेला.
तिथे एक जुनी, मोठी ‘लाकडी पेटी’ (Antique Trunk) ठेवली होती, जी स्नेहाने ‘व्हिंटेज शूट’ साठी आणली होती.
त्या पेटीचं झाकण उघडं होतं.
आर्यनला लपाछपी खेळायची हुक्की आली. त्याला वाटलं, “मी यात लपतो, मम्मा आली की तिला ‘धप्पा’ करेन.”
तो त्या मोठ्या पेटीत उतरला.
तो आत बसला… आणि चुकून त्याचा हात झाकणाला लागला.
त्या जुन्या पेटीचं जड झाकण “धडाम!” करून खाली पडलं.
त्या पेटीला बाहेरून ‘ऑटो-लॉक’ (Self-locking latch) होतं. ते जुन्या पद्धतीचं होतं.
झाकण पडताच कडी अडकली. पेटी लॉक झाली.
आर्यन अंधारात घाबरला.
तो ओरडू लागला. “मम्मा! मम्मा! दार उघड! मी अडकलोय!”
तो पेटीवर हाताने बुक्क्या मारत होता. “धड… धड… धड…”
त्या पेटीत हवा जायला जागा नव्हती. ऑक्सिजन कमी होऊ लागला.
त्याचा श्वास गुदमरू लागला.
तो जीवाच्या आकांताने ओरडत होता… “मम्मा… वाचव… मम्मा…”
पण बेडरूममध्ये?
स्नेहाच्या कानात ‘एअरपॉड्स’ (Airpods) होते. ती गाण्यात मग्न होती.
आणि तसंही तिने दरवाजा साऊंडप्रूफ केला होता.
तिने आपलं ‘परफेक्ट रील’ बनवलं. ते एडिट केलं. फिल्टर लावला आणि ‘पोस्ट’ केलं.
काही मिनिटातच लाईक्सचा पाऊस पडू लागला.
“Wow Sneha! You are truly a great mother!” अशा हजारो कमेंट्स आल्या.
स्नेहा खुश झाली.
ती रुमबाहेर आली. “आर्यन? कुठेय माझा बाळ?”
हॉल शांत होता.
तिला वाटलं तो लपला असेल किंवा झोपला असेल.
तिने पूर्ण घर शोधलं. किचन, बाल्कनी, सोफ्याखाली.
आर्यन कुठेच नव्हता.
ती घाबरली. तिने सोसायटीच्या वॉचमनला फोन केला.
“माझा मुलगा खाली आलाय का?”
वॉचमन म्हणाला, “नाही मॅडम. कोणीच नाही आलं.”
स्नेहाची अवस्था वेड्यासारखी झाली.
ती रडत रडत पुन्हा घरात आली.
अचानक तिची नजर त्या ‘स्टोर रूम’ कडे गेली.
तिथे ती जुनी पेटी ठेवली होती.
ती पेटी तिला थोडी हलल्यासारखी वाटली नाही, पण तिला तिथे संशयास्पद शांतता जाणवली.
ती धावत गेली. तिने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला. ती लॉक होती.
तिच्या काळजात धस्स झालं.
तिने कसं तरी करून, स्क्रू ड्रायव्हरने ती कडी तोडली आणि झाकण उघडलं.
आणि…
स्नेहाने जी किंकाळी फोडली, ती पूर्ण इमारतीने ऐकली.
आत आर्यन पडला होता.
त्याचं शरीर निळं पडलं होतं.
त्याचे डोळे उघडे होते… आणि चेहऱ्यावर एक भयानक भीती होती.
तो मम्माला हाक मारत मारत गुदमरून गेला होता.
त्याच्या हाताची नखं पेटीच्या आतल्या बाजूला ओरबाडून तुटली होती.
स्नेहा त्याला हलवू लागली. “आर्यन! उठ ना बाळा! मम्मा आली बघ! उठ ना!”
ती त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली.
डॉक्टरांनी चेक केलं आणि मान हलवली.
“I am sorry. He is gone. मृत्यू होऊन किमान २० मिनिटं झाली आहेत. गुदमरून जीव गेलाय (Asphyxia).”
पोलिस आले. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.
स्नेहा आकांताने रडत होती. तिचं आयुष्य संपलं होतं.
पोलिस इन्स्पेक्टर ‘जाधव’ तपासासाठी घरी आले.
त्यांना शंका होती की नक्की त्यावेळी काय घडलं?
त्यांनी स्नेहाचा मोबाईल जप्त केला.
इन्स्पेक्टरने गॅलरी उघडली.
त्यात तो ‘शेवटचा व्हिडिओ’ (Raw Footage) होता, जो स्नेहाने एडिट करण्याआधी रेकॉर्ड केला होता.
या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं. फक्त स्नेहाची ॲक्टिंग आणि आजूबाजूचा आवाज (Ambient Sound) होता.
इन्स्पेक्टरने हेडफोन लावले आणि तो व्हिडिओ प्ले केला.
व्हिडिओमध्ये स्नेहा हसत होती, रडल्याचं नाटक करत होती.
पण…
व्हिडिओच्या बॅकग्राउंडला, अतिशय बारीक पण स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला होता.
“धड… धड… धड…” (पेटीवर मारल्याचा आवाज).
आणि एका लहान मुलाचा गुदमरलेला, क्षीण आवाज…
“मम्मा… मम्मा… वाचव… मम्मा…”
स्नेहा कॅमेरासमोर ॲक्टिंग करत होती, “माझ्या मुलासाठी मी जीव देऊ शकते…”
आणि त्याच क्षणी, बॅकग्राउंडला तिचा मुलगा खरोखर जीव देत होता.
तिच्या कॅमेऱ्याने त्याच्या मृत्यूचा आवाज रेकॉर्ड केला होता, जो तिने ‘एअरपॉड्स’ आणि ‘लाईक्स’ च्या नादात ऐकला नाही.
जेव्हा पोलिसांनी स्नेहाला तो ऑडिओ ऐकवला…
स्नेहाने स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतलं.
“मी मारलं! माझ्या रीलने त्याला मारलं!
मी जगाला दाखवायला ‘प्रेम’ करत होते, पण माझा बाळ शेजारच्या खोलीत मरत होता!”
आज स्नेहा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे.
ती कोणाशीच बोलत नाही.
ती फक्त भिंतीवर बोटं फिरवते, जणू काही ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतेय.
आणि अधून मधून ओरडते… “कट! कट! रिटेक घ्या! माझा आर्यन परत येईल!” पण आयुष्यात ‘रिटेक’ नसतात.
सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण इतके हरवलोय की, वास्तवातल्या आपल्या माणसांच्या हाका आपल्याला ऐकू येत नाहीत. मोबाईलचा स्क्रीन बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांकडे बघा. कारण ‘लाईक्स’ (Likes) लाख मिळतील, पण गेलेला ‘जीव’ पुन्हा मिळणार नाही. मुलांसाठी ‘परफेक्ट आई’ सोशल मीडियावर नाही, तर घरात बना.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुरेखाचा सुरेखसा कवितासंग्रह ” अंकुरित आभार “हाती लागला आणि पायाची उणीव असणारी “ति “ची आभाळ भरारी बघून पेन उचलल्याशिवाय राहावलच नाही.
मुखपृष्ठ पाहता क्षणी तिथं बसलेली शुभ्रधवल वस्त्र धारी सुंदरी म्हणजेच शुभ्रधवल मन असणारी सुरेखा असे मला वाटले .तिची नजर आभाळाकडे… त्यातून डोकावणाऱ्या किरणाकडे आहे ..आणि त्या प्रकाश किरणात ती न्हाऊ पाहते.. म्हणजेच साहित्यप्रभेने ती उजळतेय! भक्ती प्रकाशनाने समर्पक चित्र दिले त्याबद्दल कौतुकास पात्र आहेत
सुरेखा चिखलकर
मनीषाची विस्तृत प्रस्तावना कवित्रीचा विशाल पट उलघडणारी आहे. आणि सुरेखाचे मनोगत म्हणजे दोन्ही हातावर सुरू झालेला शंभर टक्के दिव्यांग प्रवासातून शंभर टक्के सबल व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करणारे वाटले. दिव्यांग असतानाही शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण, स्वतःच्या पायावर उभे असलेली(ब्युटी पार्लर) आणि साहित्य व सामाजिक कामातील योगदान ही सोपी गोष्ट नाही .असंख्य वेदनाताई शस्त्रक्रियांना पचवून दिव्यांगावर मात करून ज्या आत्मविश्वासाने ती आज समाजात उभी आहे, जे स्थान तिने निर्माण केले आहे त्यासाठी वज्राराचे मन असावे लागते. ते नक्कीच तिच्याकडे आहे .टाकीचे घाव इतके सोसूनही कवितेतील कोमलता ही तिच्याकडे इतकी विपुल असावी याचं आश्चर्य वाटतं !आणि कविता ही कशा तर निराशेचा सूर नसणाऱ्या! कसे जमते सखे हे तुला इतके पॉझिटिव्ह राहणे? सोनाली नावांगुळ, सचिनदा कर्नाळ यांचे मला कौतुक होते …पण आता त्यामध्ये तू ही सामील आहेस. आणि माझी गावकरी म्हणून तर अधिक उमाळा आणि अभिमान !!
असो तुझा कवितासंग्रह म्हणजे तुझ्या प्रतिमेला फुटलेले अंकुर आहेत ..त्यात असणाऱ्या साठभर कविता म्हणजे तुझ्या प्रतिभेचा, स्त्री जाणिवेचा ,संवेदनशीलतेचा, तुझ्या आतील आवाजाचा, तुझ्या उमेदीचा तुझ्यातील प्रेम भावनेचा, आत्मभानाचा अविष्कार आहेत .
पण याच जमिनीत एक
स्वप्नांचा एक अंकुर रुजला
पंख नसतानाही आभाळाकडे
झेप घेण्याचा ध्यास लागला
दोन्ही होत जमिनीवर
उड्या मारण्याची हौस भारी
पण यात जिद्दीतून फुलली
माझ्या अस्तित्वाची गाथा
या एकाच कवितेवर बोलते .. कारण मला तिने खूप अंतर्मुख केले.पंख नसताना आभाळात उडण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे
“मंजिल उनको मिलती है जिनके सपनो मे जान होती है| सिर्फ पंखो से कुछ नही, हौसले से उडान होती है|”
– – हे तू अक्षरशः खरे करून दाखवले आहेस .तेही पंख नसताना !यातून तुझे प्रखर आशावादी चित्र तर समोर येते. “उड्या मारण्याची हाऊस भारी” हे म्हटलं तर एखाद्या अल्लड पोरकट मुलीने म्हणण्याचे उदगार! म्हणले तर गमतीने! पण तुझ्या बाबतीत उड्या माराव्या वाटणारे नक्कीच नाही. पण ज्या सहजपणे तू ते रेखाटले आहेस त्यातील कारुण्याला तू जिद्दीची जोड देऊन अस्तित्वाची गाथा लिहिली आहेस हे मात्र खरे!
मी सगळ्या कवितांचा उहापोह नाही करू शकत . वाचकानी स्वतःच त्याचा आस्वाद घ्यावा. या संग्रहामध्ये बायाच्या, निसर्गाच्या, प्रबोधनाच्या ,आयुष्याच्या विविध रंगाच्या, आणि हो.. प्रेमाच्या ही कविता आहेत .विविधरंगी ,विविधढंगी कविता वाचताना सुरेखाचे अंतर्मन उलगडत जाते आणि आपले रिकामे आभाळही अंकुरित , पुलकित झाल्याशिवाय राहत नाही .
आणि आनंद हरी सरांचा ब्लर म्हणजे या संग्रहाला मिळालेली पोचपावती आहे.
तेव्हा सुरेखा तुझ्या जिद्दी सामाजिक व साहित्य प्रवासासाठी अंकुरणाऱ्या आभाळभर शुभेच्छा देऊन इथेच विराम घेते ..तर कधी खरेदी करतात हा कवितासंग्रह साहित्यरसिकानों?
परिचय : डॉ. राजश्री पाटील
प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डा. मुक्ता जीहरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख “क्या प्रॉब्लम है…?”। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # ३१२ ☆
☆ क्या प्रॉब्लम है…? ☆
‘क्या प्रॉब्लम है’… जी हां! यह वह शाश्वत् प्रश्न है,जो अक्सर पूछा जाता है छोटों से; बराबर वालों से– परंतु आजकल तो ज़माना बदल गया है। अक्सर हर उम्र के लोग इन प्रश्नों के दायरे में आते हैं और हमारे बुज़ुर्ग माता-पिता तथा अन्य परिवारजन– सभी को स्पष्टीकरण देना पड़ता है। सोचिए! यदि रिश्ते में आपसे बहुत छोटी महिला यह प्रश्न पूछे,तो क्या आप सकते में नहीं आ जाएंगे? क्या होगी आपकी मन:स्थिति… जिसकी अपेक्षा आप उससे कर ही नहीं सकते। वह अनकही दास्तान आपकी तब समझ में तुरंत आ जाती है,जब चंद लम्हों बाद आपका अहं/ अस्तित्व पलभर में कांच के आईने की भांति चकनाचूर हो जाता है और उसके असंख्य टुकड़े आपको मुंह चिढ़ाते-से नज़र आते हैं। दूसरे शब्दों में आपको हक़ीक़त समझ में आ जाती है और आप तत्क्षण अचंभित रह जाते हैं यह जानकर कि कितनी कड़वाहट भरी हुई है सोमा के मन में– जब आपको मुजरिम की भांति कटघरे में खड़ा कर दिया जाता है और इल्ज़ामों की एक लंबी फेहरिस्त आपके हाथों में थमा दी जाती है। वह सोमा,जो आपको मान-सम्मान देती थी; सदैव आपकी तारीफ़ करती थी; जिसने इतने वर्ष एक छत के नीचे गुज़ारने के पश्चात् भी पलट कर कभी जवाब नहीं दिया था। वह तो सदैव परमात्मा का शुक्र अदा करती थी कि उसने उन्हें पुत्रवधु नहीं,बड़ी शालीन बेटी दी थी। परंतु जब विश्वास टूटता है; रिश्ते सहसा दरक़ते हैं तो बहुत तकलीफ़ होती है। हृदय कुलबुला उठता है,जैसे अनगिनत कीड़े उसके शरीर पर रेंग रहे हों और वह प्रश्नों के भंवर से चाह कर भी ख़ुद को मुक्त नहीं कर पाती।
‘आपको क्या प्रॉब्लम है?’ यदि बच्चे अपने मम्मी-पापा के साथ एकांत में समय गुज़ारना चाहते हैं; खाने के लिए नीचे नहीं आते तो…परंतु हम सबके लिए यह बंधन क्यों? वह वर्षों से अपने कौन-से दायित्व का वहन नहीं कर रही? आपके मेहमानों के आने पर क्या वह उनकी आवभगत में वह कमी रखती है,जबकि वे कितने-कितने दिन तक यहाँ डेरा डाले रहते हैं? क्या उसने कभी आपका तिरस्कार किया है? आखिर आप लोग चाहते क्या हैं? क्या वह इस घर से चली जाए अपने बच्चों को लेकर और आपका बेटा वह सब अनचाहा करता रहे? हैरान हूं यह देखकर कि उसे दूध का धुला समझ उसके बारे में अब भी अनेक कसीदे गढ़े जाते हैं।
वह अपराधिनी-सम करबद्ध प्रार्थना करती रही थी कि उसने ग़लती की है और वह मुजरिम है,क्योंकि उसने बच्चों को खाने के लिए नीचे आने को कहा है। वह सौगंध लेती है कि भविष्य में वह उसके बच्चों से न कोई संबंध रखेगी; न ही किसी से कोई अपेक्षा रखेगी। तुम मस्त रहो अपनी दुनिया में… तुम्हारा घर है। हमारा क्या है,चंद दिन के मेहमान हैं। वह क्षमा-याचना कर रही थी और सोमा एक पुलिस अफसर की भांति उस पर प्रश्नों की बौछार कर रही थी।
जब जिह्वा साथ नहीं देती,वाणी मूक हो जाती है तो अजस्र आंसुओं का सैलाब बह निकलता है और इंसान किंकर्त्तव्य- विमूढ़ स्थिति में कोई भी निर्णय नहीं ले पाता। उस स्थिति में उसके मन में केवल एक ही इच्छा होती है कि ‘आ! बसा लें अपना अलग आशियां… जहां स्वतंत्रता हो; मानसिक प्रदूषण न हो; ‘क्या और क्यों’ के प्रश्न उन पर न दाग़े जाएं और वे उन्मुक्त भाव से सुक़ून से अपनी ज़िंदगी बसर कर सकें। इन परिस्थितियों में इंसान सीधा आकाश से अर्श से फ़र्श पर आन पड़ता है; जब उसे मालूम होता है कि इस करिश्में की सूत्रधार हैं कामवाली बाईएं–जो बहुत चतुर, चालाक व चालबाज़ होती हैं। वे मालिक-मालकिन को बख़ूबी रिझाना जानती हैं और बच्चों को वे मीठी-मीठी बातों से खूब बहलाती हैं। परंतु घर के बुज़ुर्गों व अन्य लोगों से लट्ठमार अंदाज़ से बात करती हैं,जैसे वे मुजरिम हों। इस संदर्भ में दो प्रश्न उठते हैं मन में कि वे उन्हें घर से निकालना चाहती हैं या घर की मालकिन उनके कंधे पर रखकर बंदूक चलाना चाहती है? छुरी हमेशा खरबूज़े पर ही पड़ती है,चाहे किसी ओर से पड़े और बलि का बकरा भी सदैव घर के बुज़ुर्गों को ही बनना पड़ता है।
वैसे आजकल तो बाईएं ऐसे घरों में काम करने को तैयार भी नहीं होती,जहां परिवार के सदस्यों के अतिरिक्त अन्य लोग भी रहते हों। परिवार की परिभाषा वे अच्छी तरह से जानती हैं… हम दो और हमारे दो,क्योंकि आजकल पति-पत्नी दोनों अक्सर नौकरी करते हैं। उनके घर से जाने के पश्चात् वे दिनभर अलग-अलग पोशाकों में सज-संवर कर स्वयं को आईने में निहारती हैं। यदि बच्चे छोटे हों, तो सोने पर सुहागा… उन्हें डाँट-डपट कर या नशीली दवा देकर सुला दिया जाता है और वे स्वतंत्र होती हैं मनचाहा करने के लिए। फिर वे क्यों चाहेंगी कि कोई कबाब में हड्डी बन कर वहां रहे और उनकी दिनचर्या में हस्तक्षेप करे? इस प्रकार उनकी आज़ादी में खलल पड़ता है। इसलिए भी वे बड़े बुज़ुर्गों से खफ़ा रहती हैं। इतना ही नहीं,वे उनसे दुर्व्यवहार भी करती हैं,जैसे मालिक नौकर के साथ करता है। जब उन्हें इससे भी उन्हें संतोष नहीं होता; वे अकारण इल्ज़ाम लगाकर उन्हें कटघरे में खड़ा कर देती है और घर की मालकिन को तो हर कीमत पर उनकी दरक़ार रहती है,क्योंकि बाई के न रहने पर घर में मातम-सा पसर जाता है। उस दारुण स्थिति में घर की मालकिन भूखी शेरनी की भांति घर के बुज़ुर्गों पर झपट पड़ती है,जो अपनी अस्मत को ताक़ पर रख कर वहां रहते हैं। एक छत के नीचे रहते हुए भी अजनबीपन का एहसास उन्हें नासूर-सम हर पल सालता रहता है। उस घर का हर प्राणी नदी के द्वीप की भांति अपना-अपना जीवन ढोता है। वे अपने आत्मजों के साथ नदी के दो किनारों की भांति कभी मिल नहीं सकते। वे उनकी जली-कटी सहन करने को बाध्य होते हैं और सब कुछ देखकर आंखें मूँदना उनकी नियति बन जाती है। वे हर पल व्यंग्य-बाणों के प्रहार सहते हुए अपने दिन काटने को विवश होते हैं। उनकी यातना अंतहीन होती है,क्योंकि वहाँ पसरा सन्नाटा उनके अंतर्मन को झिंझोड़ता व कचोटता है। दिनभर उनसे बतियाने वाला कोई नहीं होता। वे बंद दरवाज़े व शून्य छतों को निहारते रहते हैं। बच्चे भी उन अभागों की ओर रुख नहीं करते और वे अपने माता-पिता से अधिक स्नेह नैनी व कामवाली बाई से करते हैं।
‘हाँ! प्रॉब्लम क्या है’ ये शब्द बार-बार उनके मनोमस्तिष्क पर हथौड़े की भांति का प्रहार करते हैं और वे हर पल स्वयं को अपराधी की भांति दयनीय दशा में पाते हैं। परंतु वे आजीवन इस तथ्य से अवगत नहीं हो पाते कि उन्हें किस जुर्म की सज़ा दी जा रही है? उनकी दशा तो उस नारी की भांति होती है,जिसे उस अपराध के लिए दोषी ठहराया जाता है; जो उसने किया ही नहीं। उन्हें तो अपना पक्ष रखने का अवसर भी प्रदान ही नहीं किया जाता। कई बार ‘क्यों का मतलब’ शब्द उन्हें हांट करते हैं अर्थात् बाई का ऐसा उत्तर देना…क्या कहेंगे आप? सो! उनकी मन:स्थिति का अनुमान आप स्वयं लगा सकते हैं। सो! चिंतन-मनन कीजिए कि आगामी पीढ़ी का भविष्य क्या होगा?
वैसे इंसान को अपने कृत-कर्मों का फल अवश्य भुगतना पड़ता है,क्योंकि जैसा वह करता है,वही लौटकर उसके पास आता है। लोग चिंतित रहते हैं अपने बच्चों के भविष्य के बारे में और यह सोचकर वे हैरान-परेशान रहते हैं। आइए! यह समझने का प्रयास करें कि प्रॉब्लम क्या है और क्यों है? शायद! प्रॉब्लम आप स्वयं हैं और आपके लिए उस स्थान को त्याग देना ही उस भीषण समस्या का समाधान है। सो! मोह-ममता को त्याग कर अपनी राह पर चल दीजिए और उनके सुक़ून में ख़लल मत डालिए। ‘जीओ और जीने दो’, की अवधारणा पर विश्वास रखते हुए दूसरों को भी अमनोचैन की ज़िंदगी बसर करने का अवसर प्रदान कीजिए। उस स्थिति में आप निश्चिंत होकर जी सकेंगे और ‘क्या-क्यों’ की चिंता स्वत: समाप्त हो जाएगी। फलत: इस दिशा में न चिंता होगी; न ही चिंतन की आवश्यकता होगी।