☆ – स्वा. सावरकरांची दहशत ! — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(— कोणाला व किती वाटायची —)
दिल्लीचे पालम विमानतळ !
विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता.
त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्याकाळी काम करत होती.
ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहिले आणि मराठीतून विचारले…
“तुम्ही श्री ***** ना ?”
त्या अधिकाऱ्याने सांगितले…”हो”.– ” पण मी आपणास ओळखले नाही !”
त्या प्राचार्यांनी सांगितले… ” तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये “
क्षणार्धात ओळख पटली.
प्राचार्यांनी विचारले… *”ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहिले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्यात दीडशे गुणांचा फरक होता. आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते. बरोबर ?”*
ते अधिकारी उत्तरले “हो.”
“कारण माहीत आहे?”, प्राचार्यांनी विचारले.
“नाही” .. ते अधिकारी उत्तरले.
“जाणून घ्यायचंय ?” .. प्राचार्य.
“हो”, .. अधिकारी.
“सांगतो…”, प्राचार्य.
त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे —–
ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते “रत्नागिरी” ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .
त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता. सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.—- “आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला…. ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षक असल्याने मला सर्व माहीत आहे.”
—सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.
जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले, ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.
— हे प्राचार्य होते रँग्लर रघुनाथराव परांजपे …
— आणि हा विद्यार्थी होता श्रीराम भि.वेलणकर ! संस्कृत भाषेचे तज्ञ ! —- *आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते….*
संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
समर्थ रामदासजींनी दासबोध, आत्माराम, मनोबोध इत्यादी ग्रंथ रचले आहेत, तसेच शेकडो ‘अभंग’ही लिहिलेले आहेत. यासोबतच समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ९० पेक्षा अधिक आरत्या महाराष्ट्रातील घरा- घरात म्हटल्या जातात.
समर्थांचा गायनीकलेचा अभ्यास होता. ‘धन्य ते गायनी कला’ असे म्हणून समर्थांनी गायनीकलेचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेत लयीचा गोडवा अनुभवता येतो. पारमार्थिक विचार असो, आत्मनिष्ठ, अभ्यासपूर्ण चिंतन असो, ते लयीत मांडण्याची खुबी रामदास स्वामींजवळ आहे. याचा प्रत्यय त्यांनी रचलेल्या आरत्यांतून घेता येतो.
गणपती उत्सवात रामदासांनी रचलेल्या आरत्या म्हटल्या जातात. त्या आबालवृद्धांच्या तोंडी सहजपणे येतात. त्या आरत्यांची लोकप्रियताही वर्षानुवर्षे टिकून राहिली आहे. याला कारण म्हणजे त्या आरत्यांतील गेयता, चपखल शब्दरचना, लयबद्धता, शब्दांचे माधुर्य, आघात, भाषेतील ठसका..!
वीररसाने युक्त अश्या हनुमंताची ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन’चा भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे.
आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.
हनुमंताच्या ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ या आरतीतील शब्दरचना मारुतीची प्रचंड शक्ती, अद्भुत कार्य नजरेसमोर उभे करतात. त्यातील शब्द हृदयावर आघात करीत आपले बल वाढवतात. समर्थ भाषाप्रभू होते. गेयता, लय, उचित शब्दयोजना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात.
हनुमंताचे कार्य जेवढे अफाट, तेवढेच त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट. म्हणूनच हनुमंताची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते. परंतू , या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ नीट समजून घेतला, तर ती पाठ होणे अवघड नाही.
समर्थ रामदास रचित, म्हणायला अवघड परंतू आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ —-
कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर, त्या झाल्या पळणी ।। १ ।।
(आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊ या. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने.)
भावार्थ :-समर्थ रामदास वर्णन करतात- मारुती स्वत:च्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली. सागराच्या पाण्यावर उत्तुंग लाटा उसळल्या आणि त्या आकाशापर्यंत पोचून तिथेही खळबळ माजली. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली. पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली. देव, मानव, राक्षस या सर्वांना पळता भुई थोडी झाली. ।।१।।
जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता,
तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता।। धृ।।
(कठीण शब्दांचा अर्थ:- ‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू.)
भावार्थ:- अशा भीमकाय हनुमंता तुझा जयजयकार असो. तुझी कृपा असली, की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही. ।।धृ।।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।
(कठीण शब्दांचा अर्थ – ‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला. ‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक. ‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.)
भावार्थ :– सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला. त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला. त्याचा त्रास होऊन पर्वताचा सुद्धा थरकाप झाला. पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणीमात्रांवर मोठी आपत्ती आली. पक्ष्यांचा विनाशकाळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. तुझ्याठायी असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले. परंतू, या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्त्वाचे ! ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरलीस, यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे.
— ‘दुमदुमले पाताळ’ किंवा ‘थरथरला धरणीधर’, ‘कडकडिले पर्वत’ या शब्दांतून वीररसाचा आविर्भाव होतो. हा वीरमारुती होय.
— ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
(संत श्री ज्ञानदेव महाराजांनी योगीराज चांगदेवांच्या कोर्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी. संत ज्ञानदेवांच्या काळचं प्राकृत म्हणजेच मराठी आजच्या संदर्भात, सर्वसामान्य लोकांना कळायला अवघड आहे. म्हणून सुश्री शोभना आगाशे यांनी सध्या प्रचलित असलेल्या मराठीत या चांगदेव पासष्टीचं केलेलं रूपांतर प्रस्तुत करीत आहोत.)
☆ माझा कात्र्यांचा संग्रह !… श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
सर्वसाधारण माणसांच्या घरात हमखास आढळणारी एक साधी पण उपयुक्त वस्तू म्हणजे कात्री ! लहानपणी वापरायला बंदी असलेली आणि ” काका काकूवर कातावले. कारण काकूने काकांचे कामाचे काही कागद कात्रीने कराकरा कापून काढले ” अशा अनुप्रासातून मनात जाऊन बसलेली कात्री. सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया ( इजिप्त ) येथे एकाच धातूच्या पट्टीच्या दोन्ही टोकांना धारदार पाती असलेली कात्री अस्तित्वात होती. १६६३ मध्ये चीनमध्ये आणि १७६० मध्ये इंग्लंडमध्ये कात्र्यांचे उत्पादन होऊ लागले. आत्ताच्या स्वरूपातील कात्री रॉबर्ट हिंक्लीफ याने १७६१ मध्ये वापरात आणली. फिनलँडमधील कात्र्यांच्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या फिस्कर या गावाच्याच नावाने, म्हणजे FISKAR या ट्रेड मार्कखाली १८३० मध्ये कात्र्यांचे मोठे उत्पादन व्हायला सुरुवात झाली.
माझ्याकडे अशा अनेक कात्र्यांचा एक छोटेखानी संग्रह आहे.
कात्री ही दोन पात्यांची बनलेली असल्याने इंग्रजीत कात्रीला pair of Scissors किंवा नुसतेच Scissors (मूळ फ्रेंच शब्द Cisoires) असे अनेकवचनी नाव वापरले जाते. संस्कृतमध्ये कात्रीला शरारी मुखी म्हणजे ” शर (↑ = बाण ) + आरी (l = छोटी करवत ) मुखी ” असे एक संयुक्तिक नाव आहे. कात्रीचे ‘ कापणे ‘ हे एकच काम असले तरी ती अत्यंत बहुगुणी, सर्वगामी, बहुरूपी आहे. महागाईमुळे खिशाला लागणारी, चित्रपटाला आणि नाटकाला सेन्सॉरची लागणारी, बजेटमध्ये खर्चाला लागणारी अशा अनेक अदृश्य कात्र्या आहेतच !
कात्रीने व्यापलेली क्षेत्रे, तिचे उपयोग आणि तिची भन्नाट रूपे पाहिली की आपण चक्रावून जातो.
कापडाशी संबंधित — कापणे, भरतकाम,नक्षीकाम, काज करणे ( बटन होल ), काही खास आकार कापणे या सर्वांसाठी वेगवेगळ्या कात्र्या
कागद —————— कापणे, किरीगामी, नक्षीकाम यासाठी वेगवेगळ्या कात्र्या
धातू —————— पत्रे, तारा कापणे.
झाडे ——————- छोट्या फांद्या छाटणे, मोठ्या फांद्या तोडणे, गवत कापणे, फुले तोडणे, बोन्साय वृक्ष निर्मिती या सर्वांसाठी खास कात्र्या
सौंदर्य साधना ——— केस, नखे, मिशी, भुवया कापणे / कोरणे. अगदी नाकातील व पानावरील केस कापण्यासाठी सुद्धा अत्यंत वेगळ्या कात्र्या उपलब्ध आहेत.
वैद्यकीय शास्त्र ——– अत्यंत उच्च दर्जाच्या पोलादापासून बनविलेल्या कात्र्या – विविध अवयवांच्या शस्त्रक्रिया, बँडेज बांधणे – काढणे
प्राणी ——————– शेळ्या मेंढ्यांच्या अंगावरील लोकर कापणे
स्वयंपाकघर ———— विविध भाज्या कापण्यासाठी, तुकडे करण्यासाठी.
गालिचे —————— गालिच्याच्या विणकामातून वर येणारे जाड धागे कापण्यासाठी.
दिव्यांच्या वातींसाठी — दिव्याची वात जळत असतांना त्यावरील काजळी काढून टाकणे, वात कापणे यासाठी अत्यंत कलात्मक कात्र्या वापरल्या जात असत. त्यांना वातेऱ्या म्हटले जाते.
काही खूप वेगळ्या प्रकारच्या कात्र्या — जर अर्धाच चिरूट ओढायचा असेल तर त्यासाठी चंद्रकोरीसारखी पाती असलेली कात्री उपलब्ध होती. याच आकाराची पण खूप मोठी कात्री बर्फाच्या मोठमोठ्या लाद्या ओढून नेण्यासाठी वापरतात. पानवाले विड्याची पाने कापण्यासाठी हलकी व मोठ्या मुठींची कात्री वापरतात. आपल्याकडे विविध उदघाटनांसाठी सुंदर आकाराच्या, चांदीच्या, सोन्याचे पाणी दिलेल्या कात्र्या वापरण्याची पद्धत आहे. पाश्चिमात्य देशात अगदी ३ ते ४ फुटांच्या, सोन्याचे पाणी दिलेल्या आणि हजारो रुपये किंमत असलेल्या कात्र्या वापरल्या जातात.
डावखुऱ्यांसाठी खास कात्र्या — कात्रीच्या टोकेरी पाते असलेल्या बाजूला अंगठा अडकविला जातो व अंगठा हा पात्याच्या अधिक जवळ असतो. खालच्या बाजूचे पाते हे रुंद असून त्याची मूठ ३ किंवा ४ बोटे राहतील इतकी मोठी असते. अशी रचना उजव्या हाताने कापणाऱ्यांसाठी आहे. डावखुऱ्या माणसासाठी असलेल्या कात्रीमध्ये ही रचना बरोबर उलट म्हणजे आरशातील प्रतिमेप्रमाणे असते. पण याचा खप फारसा नसल्याने ती आता खूपच दुर्मिळ झाली आहे. त्याचप्रमाणे पायाने चालविता येईल अशी कात्रीही निर्माण केली गेली होती.
कात्री आणि अंधश्रद्धा ?
आता अंधश्रद्धा म्हटल्यावर त्या हिंदूंच्याच असतात का ? आपल्याकडे कात्री ही कुणाच्याही हातात देऊ नये, ती उघडलेल्या स्थितीत ठेऊ नये आणि त्याचा कचकच असा आवाज करू नये असे म्हणतात. पण याच्या मागे फक्त सुरक्षिततेचाच विचार आहे. कात्री दुसऱ्याच्या हातात न देता ती खाली ठेवावी व त्यांनी ती उचलून घ्यावी. देताना जर ती हातातून सुटली तर खाली पायावर उभी पडून मोठी इजा होऊ शकते. कात्री उघडी ठेवल्यामुळे आणि कचकच वाजवतांना होणारी हालचाल यामुळे इजा होऊ शकते. त्यामुळे या अंधश्रद्धा मुळीच नाहीत. पाकिस्तानात अशी कात्री ठेवणे किंवा वाजविणे अशुभ मानले आहे. ( म्हणजे एकूण तेच ). युरोपमध्ये लहान मुलाला वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून बाळाच्या पाळण्यावर नुसतीच छोटी कात्री किंवा क्रॉसप्रमाणे उघडून ठेवण्याची पद्धत होती. न्यू ऑर्लिन्स मध्ये तर रात्री उशीखाली उघडी कात्री ठेवल्यास दुष्ट शक्तींपासून रक्षण होते असे मानले जात असे. तर काही ठिकाणी कात्री उघडून ठेवल्यास एकमेकात भांडणे होतात असे मानत असत. आफ्रिकेतील काही भागांमध्ये नवरदेवाला अपशकुन करण्यासाठी, वाईट शक्तींकडून विघ्न यावे यासाठी उघडलेल्या कात्रीचा वापर केला जात असे.
इतकी बहुगुणी आणि बहुपयोगी कात्री आपल्या समजुतींमुळे उगाच बदनाम होते. पण तिची मात्र काहीच कचकच नाही !
सोबतच्या विविध कात्र्यांची चित्रे जरूर पाहा !
(काही संदर्भ सौजन्य – विकिपीडिया)
(हा लेख व फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत)
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा ११ ते १४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा ११ ते १४
आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील बाविसाव्या सूक्तातील अकरा ते चौदा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
यातील अकराव्या ऋचेत देवीला तर बाराव्या ऋचेत इंद्राणीला आवाहन केलेले आहे; तेरावी आणि चौदावी या दोन ऋचा द्यावापृथिवी देवतांना आवाहन करतात.
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ अतिशय घातक असणारी कबुतर विष्ठा… श्री योगेश पराडकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
कबुतर हा पक्षी दिसायला खूप साधा असला तरी तो आपल्याला फक्त ६ महिन्यात मरणाच्या दारात उभे करू शकतो.– यावर विश्र्वास बसत नाही ना…! पण हे खरे आहे.
२ आठवड्यापूर्वी कबुतर विष्ठा या कारणे, ठाणे इथे राहणारा माझा जवळचा मित्र मी गमावला. मित्र राहत असलेल्या फ्लॅटच्या खिडकीखाली ग्रिलमधे AC च्या duct unite च्या आजूबाजूस कबुतर निवास आणि विष्ठा जवळ जवळ 3 महिने होती. दुर्लक्षित कबुतरे, अंडी पिल्ले, काटक्या- विष्ठा यात राहत होती.
AC मधून जी हवा घरात येते, त्यातून सुकलेल्या विष्ठेमधील सूक्ष्म जंतूयुक्त धूळ घरात जाईल याची तिळमात्र कल्पना त्या कुटुंबाला नव्हती.
कबुतर उडते तेव्हा ही विष्ठा धूळ AC च्या बाहेरच्या outlet च्या मागच्या बाजूने, जाळीमार्गे आतमधे जाते आणि तेथून आत येणाऱ्या पाईपमधून हे जंतू बंद AC तून आत प्रवेश करतात. त्यामुळे खिडक्या घट्ट बंद असतील तरी जंतूसंसर्ग होतोच.
हे जंतू पाणी, फिनेल, एसिड, डेटॉल यामधेही जिवंत राहतात हे नवल आहे… रिपोर्टमधे हे लिहिलेले होते.
अंगाला सूज येणे–जाणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, चिडचिड.होणे. एक विशेष लक्षण म्हणजे अचानक श्वास लागून हायपर होणे, ही आहेत. हे सगळे त्या report मधे वाचून हादरलोच.
जेमतेम पंचेचाळीशीचा मित्र २ महिने आजापणामुळे त्रस्त होऊन, एक्सरे आणि इतर टेस्ट करायला गेला.
(योगायोग असा की ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट साठी गेला आणि उपचार चालू केले, ते डॉक्टर कपूर हे हल्लीच स्वतः वृद्धापकाळाने निवर्तले).
—अक्यूट हाइपर सेंसिटिविटी न्यूमोनाइटिस हे रोगाचे निदान झाले. (हा रोग कबुतर विष्ठा यापासून होतो)
Doctor Kapoor हा दुवा गेल्यावर उपचार पद्धती आणि हॉस्पिटल दोन्ही बदलावी लागली.
Lungs आणि श्वास नलिका पूर्ण infected झाली होती… Report आले त्यात 60 % lungs निकामी झाले होते हे नमूद केले होते. चौकशी करता या विषया संदर्भात माहिती समोर आली. पण फार उशीर झाला होता आणि “यावर काहीच उपचार नाही पेशंट जगेल तितका जगवा” हे डॉक्टर जेव्हा म्हणाले, तेव्हा तो मित्र हादरला.
एक्यूट हाइपर सेंसिटिविटी न्यूमोनाइटिस मधे नक्की होते काय…???—– Lungs मधील आतला भाग आकुंचित होत जातो आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागतो. विशेष म्हणजे हा रोग लवकर समजत नाही. प्रतिकार शक्ती कितीही चांगली असो, effect होतोच.
Lungs प्रत्यारोपण ही सहज होऊ शकले नाही. कारण उपलब्धता नाही आणि costly आहे.
शेवटी म्हणता म्हणता मागील आठवड्यात त्या मित्राला मृत्यूने गाठले. आम्ही सर्व मित्र २ मास्क नाकातोंडावर बांधून वैकुंठ यात्रेत सामील झालो.
— कबुतर हा शांतीदुत नसून यमदुत आहे हे मित्राच्या मृत्यूने शाबीत केले.
आता त्या घरातील सर्व व्यक्तींना वर सांगिल्याप्रमाणे फूफुसाचा रोग कमी जास्त प्रमाणात झालेला आहे.
उपचार सुरू आहेत. पण पुढचा पूर्ण जन्म हा श्वसनाच्या रोगाने त्रस्त असलेले ते उर्वरित कुटूंब
मी पाहिले.— वाईट वाटले पण क्षुल्लक कबुतर किती मोठा घात करू शकते यावर विश्र्वास बसला…
— SO साद। BUT REALITY.
या विषयसंदर्भात जाणकार व्यक्तीकडून माहिती घेऊन हे लिहिण्याचा खटाटोप केला…कबुतर या विषयास थारा देऊ नये…कारण इतर पक्षी प्राणी हे पाणी आणि माती mud bath याची आंघोळ करतात म्हणून ते स्वच्छ असतात. पण कबुतर हे फार गलिच्छ आहे. त्यामुळे रोग संकर पूर्ण अंगभर घेऊन ते वावरत असते. काळ्या रंगाच्या पिसवा कबुतर विष्ठेतून निर्माण होतात, आणि त्या सुईच्या टोकापेक्षा सूक्ष्म असतात.
मुंबई (zoo) प्राणी संग्रहलय आणि पुणे सर्प उद्यान मधील माझे मित्र डॉक्टर आणि डॉक्टर मैत्रीण यांनी कबुतर याबाबत अधिक खुलासा केला. इतर पशू पक्षी हे दाणे आणि नैसर्गिक खाद्य खात असल्याने त्यांच्या मल मूत्र यातून संसर्ग होत नसतो आणि ती विष्ठा खत म्हणून झाडाला पूरक असते.
पण कबुतर, वटवाघूळ, गिधाड, तरस, आणि कमोडो द्रेगोन यांची लाळ आणि विष्ठा Acidic आणि घातक असते.
— शक्यतो कबुतर आसपास वास्तव्य करणार नाही हाच यावर एक जालीम उपाय आहे.
— अपने गुलाब चाचा की प्यारीसी देन शांतीदूत होकर मौत को बुलावा देती है…यह अपने आंखों से देखा है… मामुली कबुतर से जुडी इक आखों देखी सत्य घटना…
लेखक : योगेश पराडकर.
संग्राहक : माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ, ज्योतिष जाणकार आणि गणिती.)
श्रीपती यांचा जन्म रोहिणीखंड या आताच्या महाराष्ट्रातील गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नागादेवा/ नामादेवा असे होते तर त्यांच्या आजोबांचे नाव केशव. ( जन्मदात्रीचे नाव माहीत नाही.)
श्रीपती यांनी श्री. लल्ला यांच्या शिकवणीनुसार अभ्यास केला. त्यांचा मुख्य भर ज्योतिषशास्त्रावर होता. त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास त्यांच्या ज्योतिषशास्त्रावरच्या संशोधनासाठी केला. आणि गणिताचा अभ्यास किंवा त्यातील संशोधन खगोलशास्त्रावरच्या त्यांच्या संशोधनाला पुष्टी देण्यासाठी केला. उदाहरणार्थ ग्रहगोलांचा अभ्यास.
श्रीपती यांनी ज्योतिषशास्त्रातील कुंडलीतील घरांच्या विभाजनाची पद्धत शोधून काढली, त्याला ‘ श्रीपती भव पद्धती’ म्हणतात.
श्रीपती यांची ग्रंथ संपदा :
धिकोटीडा- करणं
धिकोटीडा- करणं (१०३९) या ग्रंथात एकंदर २० श्लोक आहेत ज्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणा संबंधी माहिती आहे.
या ग्रंथावर रामकृष्ण भट्ट (१६१०) आणि दिनकर (१८२३) यांनी टीका ग्रंथ लिहिले आहेत.
ध्रुव- मानस
ध्रुव- मानस (१०५६) यात १०५ श्लोक असून त्यात ग्रहांचे अक्षांश, ग्रहणे आणि ग्रहांची अधीक्रमणे यावर भाष्य केले आहे.
सिद्धांत-शेखर
सिद्धांत-शेखर यात त्यांचं6अ खगोलशास्त्रा वरील महत्वाच्या कामाचा उहापोह १९ प्रकरणांमध्ये केला आहे. त्यातली काही महत्वाची प्रकरणे :
प्रकरण १३: Arithmetic (अंकगणित) यावर ५५ श्लोक आहेत.
प्रकरण १४: Algebra (बीजगणित)
यात बीजगणिताच्या अनेज नियमांची चर्चा केली आहे. पण त्यात सिद्धता किंवा प्रमाण असे दिलेले नाही आणि बीजगणिताची चिन्हे वापरलेली नाहीत.
ऋण आणि धन संख्यांची बेरीज ,वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. बद्दल माहिती आहे.
Quadratic समिकरणे सोडवण्याचे नियम इथे दिले आहेत.
प्रकरण १५: Sphere
Simultaneous indeterminate equations सोडवण्याचे नियम यात दिले आहेत. हे नियम ब्रह्मगुप्ताने दिलेल्या नियमामप्रमाणे आहेत.
गणित- तिलक
गणित- तिलक हा एक अपूर्ण असा ग्रंथ आहे. हा अंकगणितावरील १२५ श्लोकांचा प्रबंध आहे जो ‘श्रीधर’ यांच्या कामावर आधारित आहे. याच्या न सापडलेल्या भागात सिद्धांत शेखरच्या १३ व्या प्रकरणातील १९ ते ५५ श्लोकांपर्यंतचा भाग असावा.
ज्योतिष-रत्न-माला
ज्योतिष-रत्न-माला हा ज्योतिषशास्त्रावरचा २० प्रकरणे असलेला ग्रंथ असून लल्ला यांच्या ज्योतिष-रत्ना-कोषा वर आधारित आहे. श्रीपती यांनी या ग्रंथावर मराठीत टीका लिहिली आहे. मराठी भाषेतील हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे असे मानले जाते. या ग्रंथावर अनेकांचे टीका ग्रंथ आहेत.
जातक- पद्धती
जातक- पद्धती यालाच श्रीपती पद्धती असेही म्हटले जाते. हा एक ८ प्रकरणे असलेला ज्योतिषशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ असून त्यावर अनेक टीका ग्रंथ आहेत.
दैवज्ञ – वल्लभ
हा ग्रंथही ज्योतिषशास्त्रावर आहे, ज्यात शेवटाला वराहमिहिरांच्या ग्रंथातील उतारे आहेत. दैवज्ञ – वल्लभ याची हिंदी आवृत्ती श्री. नारायण यांनी लिहिली आहे.
कल्याण ऋषी यांच्या नावे असलेल्या ‘मानसगिरी किंवा जन्म-पत्रिका-पद्धती’ या ग्रंथात श्रीपती यांच्या ‘रत्नमाला’ ‘श्रीपती पद्धती’ या ग्रंथातील असंख्य उतारे आणि अवतरणे आलेली आहेत.
लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना).
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈