मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९० ☆ पुरूष… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९० ?

☆ पुरूष… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

तू खरंच एक महान पुरूष आहेस,

मीच खूप यद्किंचित,

मी विचारला होता तुला,

तुझ्या सिगारेटचा ब्रँड,

तेव्हा तू म्हणालास,

“तसले कोणतेच,

नाद किंवा छंद नाहीत मला !”

असा तू स्वच्छ, सात्विक,

सद्गुणीच !

 

लोक म्हणतात,

तुला काहीच गरज नाही,आध्यात्माची ,

तू स्वतःच आध्यात्म आहेस,

इतका निष्कलंक!

 

तुझी कडवट भाषा,

पुरूषी अहंकार,

अनुभवूनही, मी मानलेच,

तुझे महानपण,

पुरूषोत्तमच तू !

 पण मी खूप वेगळी आहे,

तुझ्यापेक्षा—

सर्वसामान्य!

म्हणून नाहीच पोहचू शकले,

मी कधीच….

तुझ्या उंचीपर्यंत!!

 

 इतकेच  विधिलिखित दोघांचेही  !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ हत्या / आत्महत्या… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ हत्या / आत्महत्या… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

वेडी झाले कशी, मलाच हवून बसले

कसली भूल पडली, प्रेम तुझ्यावर केले

 *

कळले नाही कसे ते, मधाळ तुझे बोलणे

शब्दात तुझ्या होते, फसवे किती बहाणे

 *

ओळखले नाही कसे भाव तुझ्या डोळयातले

दाखविलेस जे मजला, ते भास स्वप्नातले

 *

रुबाब तुझा मोठा, मी ही नव्हते कमी

कशी दिली होतीस, सहज खोटी हमी

 *

जाळयात तुझ्या अलगद, कशी घावले मी

अडकले पाशात तुझ्या, अन लग्न लावले मी

 *

सोने, मोबाईल, गाडी, हौस सारी पुरविली

प्रत्येक सणावेळी, तहान तुझी भागविली

 *

हाव होती वाढत्, अंत् नव्हता त्याला

माझ्या रम्य स्वप्नांचा, होता चुराडा झाला

 *

धमक्या भीती अनेक जखमा शरीराला

डसत होत्या अनंत वेदना घायाळ मनाला

 *

काय करावे कळेना, हतबल होत गेले

बाळाकडे पाहूनही नाही चित्र बदलले

 *

आतून मी केव्हाच गेले होते तुटून

हत्या आत्महत्या टाकले जीवन संपवून

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – काय उणे जाले… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – काय उणे जाले… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

 *

काय उणें जालें तुज समर्थासी /

जसा मजपाशीं कोण दोष //१//

 *

जो तूं माझा न करिसिं अंगीकार/

सांगेन वेव्हार संतांमधी //२//

 *

तुजविण रत आणिकाचें ठयीं /

ऐसें कोण ग्वाही दावीं मज //३//

 *

तुका म्हणे काय धरुनी गुमान /

सांग उगवून पांडुरंगा //४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

तुकाराम महाराज आपल्या अधीकार वाणीने आपल्या वर्तनात विषयी प्रत्यक्ष पांडुरंगालाच जाब विचारताना म्हणतात. तू पूर्ण समर्थ आहेस.

तू सर्व काही जाणतोस. माझ्या वर्तनामुळे तुला मी कोणता त्रास देतोय?. ज्या मुळे तू माझा स्वीकार करत नाहीस. ते कारण तू मला सांग. नाही तर हा तुझा माझ्या सोबत घडत असलेला व्यवहार काही योग्य नाही असे मी सगळ्या संतमंडळी समोर सांगेन. मी केवळ तुझ्याच चरणाशी लीन होवून तुझीच मनोभावे सेवा करत आहे. मी तुला सोडून दुस-या कुणाची भक्ती करत असल्यास त्याचा तू मला सबळ पुरावा दे. तो माझ्या समोर आण. या बाबतीत तू मौन पाळून गप्प बसू नकोस. तू माझा स्वीकार का करत नाहीस. हे मला आता कळायलाच हवे. या वरून तुकाराम महाराज पांडुरंगाची किती मनोभावे आणि श्रद्धापुर्वक सेवा करत होते ते कळते. त्या मुळेच ते पांडुरंगावर आपला हक्क आहे असे मानत होते. त्याला आपले मनोगत सांगत होते. पांडुरंगाचे मार्गदर्शन घेऊन आपला जीवनक्रम चालवीत होते. हेच यातून आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळून येते.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०५ ☆ खोडरबर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०५ ?

☆ खोडरबर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मित्रा

तुझ्या वाढदिवसाला

काय देऊ

असं मित्राला विचारताच

मित्र म्हणाला…

 

एक पेन्सिल

आणि

एक खोडरबर दे

आयुष्यात

काहीतरी चांगलं

लिहिण्याचा प्रयत्न करीन…

 

जर कधी काही

चुका झाल्याच

तर त्या खोडायला

तुझा खोडरबर

आणि तुझी आठवण

येवढंच पुरेल मला…

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागते रहा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जागते रहा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

कुठेतरी भेग मानवी राज्याला

आणि भेगाच-भेगा समतेच्या

धरणीला.

विलक्षण विभागणी अखंड

नांदिच्या पोळीला,

सारेच अर्धपोटी जगणे

व्यवस्थेच्या साम्राज्यात.

प्रत्येकाची फुशारकी अहंकाराचे

वादळ,

मोठेपणाच्या मान्यतेत

भिन्न-भिन्न मनांचे रणांगण.

हेच स्वप्न का विचाराचे

गुलामगिरीतून मुक्त होताना.

समाधान उसंतीस सत्तेचे उधाण

पुन्हा एकदा स्मरावे

त्या थोर राष्ट्रपुरुषांना

ज्यांनी वेचले प्राण एकात्मतेतून

मानवतेचा ध्वज फडकविताना

याच मातृभूमीत

माणूसकी जीवंत ठेवण्यासाठी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मी पुन्हा येईन???? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मी पुन्हा येईन???? ? श्री आशिष  बिवलकर ☆

पावसाचे पाणी पिऊन पिऊन,

चातक पक्षी पाणीच ओकला आहे |

आंब्याच्या वनात नाचून नाचून,

मोर पक्षी आता पुरता थकला आहे |

*

“रिमझिम गिरे सावन”,

गाणारी युगलं पूर्ण भिजली आहेत |

सर्दीने हैराण होऊन,

शेंबुडात नाकं आता थिजली आहेत |

*

खमंग कांदा भजीचा,

घमघमाट कधीच थांबला आहे |

घरोघरी भांडणाचा,

थयथयाट गंभीर मामला आहे |

*

“येरे येरे पावसा, तुला देतो पैसा”,

या गाण्यावर शाळेत बंदी आहे |

भोलानाथाच्या साचल्या तळ्यात,

मासे पकडायला शाळेत संधी आहे |

*

छत्री दुकानदार,

स्वतः मालामाल झाले आहेत |

ए सी व्यावसायिक,

झाले कंगाल, खाण्याचे लाले आहेत |

*

लबाड ऋतूचक्राने,

पावसाला एक्स्टेंशन दिले आहे |

बिचाऱ्या हिवाळ्याचे,

संधी अभावी टेन्शन वाढले आहे |

*

मी पुन्हा येईन, पुन्हा येईन,

पाऊस गर्जून सांगत आहे |

हवामान बदलाचे धोके,

मात्र आवर्जून उमगत आहे |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धुळीतले पाय… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ धुळीतले पाय… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

धुळीतले पाय रुतले धुळीत

राबता राबता गुंतले मातीत

*

भेगाळल्या पायी रक्ताचेच पाट

चालताना वाट जन्म झाला घाट

*

दोन घास भाकरी पोटाला आधार

आसवांनो नको रहायला उधार

*

हाताला हे घट्टे बोल भाकरीला

जीवनाचे तंत्र मंत्र ओसरीला

*

चटके बिब्याचे पायाला टिपके

स्वप्नहे धुळीत डोळ्यात चमके

*

धुळीतले पाय धुळिचाच खेळ

धुळीचाच अंती अकाशाशी मेळ

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राग यमन (कल्याण)..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राग यमन (कल्याण)..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

देवघरात समईच्या शुभ्र कळ्या फुलल्या आहेत. दीप प्रज्वलित होऊन घराघराला सुवर्णकांती लाभली आहे. चंदन, आगरू, कर्पूराच्या धुपाच्या धुंद गंधाने आसमंत भरून गेलाय्, प्रसन्न झालाय्.

*

अशा समयी शांत होतं क्लांत मन.

कारण, याच वेळी…  

स्वराकार घेत असतो “राग यमन!

🌻 राग यमन 🌻

*

संध्या सरली, हुरहुर विरली, कातर मन सावरले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या “यमन” सुमन घमघमले! ।। ध्रु।।

*

काजळ ढाळुन कळ्या दिव्यांच्या पुन्हा प्रफुल्लित झाल्या

नुपूर झंकारीत स्वर्गिच्या स्वप्नसख्या अवतरल्या

तम दवडुनि प्रासाद उजळले, मंगलमय झाले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।१।।

*

अलगद शीतल वात बिलगला रजनीगंधेला

जिवापाड जपलेला शिरिचा परिमल घट डुचमळला

वातावरणी कसे अचानक गंधजाल पसरले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।२।।

*

दर्पणात निजरूप न्याहळित मुक्त केस सावरले

फुले माळली, कुंडल ल्याली, गळा हार घातले

नयनी काजळ, भाळी कुंकुम, कटी मेखला रुळे

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।३।।

*

भुरभुर कुंतल, अधीर अंतर, मंतरलेल्या दिशा

“तुझ्यासवे एकांती सखया कशा रंगतिल निशा? “

अशा चिंतनी असता परिचित पदरव कानी पडले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले! ।।४।।

*

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बंधन असेही… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बंधन असेही… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

रोप फुलाचे 

जेंव्हा लावले

चालीरितीचे

बंधन आले!

*

फुल लागता

भ्रमर येतील

भिंतीचे बंधन

उभे राहीले!

*

बंधनात ते

वाढू लागता

कळ्था फुलांचे

घोस जन्मले!

*

त्याच क्षणाला

हिरव्या तरूला

तरूपणाचे 

वरदान लाभले!

*
तारुण्यसुलभ

भावनाच ती

ओलांडती मग

बंधन आपुले!

*

बंधन भिंतीवर

घोस फुलांचे

बंधनासही

सजवीत गेले!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आत्मा मालिक… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आत्मा मालिक… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

शोधू नको कुठे

मी तर प्रत्येकाच्या

वसतो हृदयात

आत्मा मालिक..  

*

नाही आदी नाही अंत

नाही जात नाही धर्म

अमर अविनाशी आत्मा एक

आत्मा मालिक…   

*

प्रत्येकाच्या हृदयात

एकचि ज्योत,

जरी मुका प्राणी तरी

आत्म तत्व एक

आत्मा मालिक…   

*

नि:शब्द होणे, हेचि ध्यान,

सगळ्यात राहूनही अलिप्त

तोचि ज्ञानी एक,

आत्मा मालिक…   

*

शिर्डी जवळील नितांत सुंदर आश्रम. येथे आलोय. सुचलेले काव्य. आत्मा मालिक हेच नाव आहे. आश्रमाचे.

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares