मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोकळा श्वास…☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ मोकळा श्वास ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

बंदीवान मी या संसारी

गुदमरतो जीव भारी

सदैव एवढा एकच ध्यास

फक्त घ्यायचाय मोकळा श्वास ||

*

रूढींचे हे बंध काटेरी

नात्यांचे ते गुंते भारी

एक सोडवू पहाता गुंते

दुसरा आपोआप ||

*

मालक नको सहचरी मिळो

संवादाचे सूर जुळो

माणूस म्हणुनी साथ मिळो

ही मनास वाटे आस ||

*

मी न दासी मी न भोगदासी

मी न करमणुकीचे साधन

माझी कला माझे जीवन

माझ्या श्रमा सन्मानाची आस ||

*

मला न अपेक्षित मुक्ती

माझ्यातच एक दैवी शक्ती

शिवशक्तीची जोड ईश्वरी

लाभो मजसह सकलास ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी न बोललो तुला… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ मी न बोललो तुला… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

(गझलपंचमी)

मी न बोललो तुला, ऐकलेस तू कसे

शब्द जे हवे तसे, वेचलेस तू कसे

*

आज लाजली जुई, पाहुनी पुन्हा मला

कालचेच गंध ते, माळलेस तू कसे

*

पापण्यात रोखतो, आसवे तशीच ती

दुःख या मनातले, ढाळलेस तू कसे

*

पाहतो तुला जरी, लांब राहुनी उभा

प्रेम अंतरातले, मोजलेस तू कसे

*

काल भेटलो जिथे, थांबतो तिथेच ये

सांगण्याअधी मला, शोधलेस तू कसे

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रावणमासी खेद मानसी – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ श्रावणमासी खेद मानसी – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक वास्तव

खूप छान विडंबन…….

*

श्रावणमासी खेद मानसी

हिरवळ गेली कुणीकडे?

शहरे भरली इमारतींनी

डांबर फरश्या चहुकडे।।

*

मनु बदलला अणु फोडला

निसर्गातही बदल घडे

श्रावणमासी तो मौजेचा

पाऊस आता कुठे पडे ? ।।

*

राने तुटली, कुरणे हटली

उजाड हे डोंगरमाथे

सुंदर हरणी हिरव्या कुरणी

कुठे कशी मग बागडते? ।।

*

सुवर्ण चंपक अजुनी फुलतो

रम्य केवडा दरवळतो

नगरनिवासीजन हौसेस्तव

बाजारी विकला जातो ।।

*

थकून भागून घरी परतती

ललना सायंसमयाला

हर्ष न उरतो ह्रदयी त्यांच्या

देवदर्शना निघण्याला ।।

*

प्रदुषणाने जीवन अवघे

होऊनी गेले संत्रस्त

कुठे कुणाच्या वदनी वाचू

श्रावण महिन्याचे हे गीत ।।

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #296 ☆ मुठीतली वाळू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 296 ?

मुठीतली वाळू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नशिबानं गाठ मारताना

करकचून मारायला हवी होती

पण

सरगाठ मारली

चुकून

की

जाणूनबुजून

माहित नाही

मुठीतली वाळू सुटावी

तशी सुटत गेली

कळलंच नाही

वाळू की गाठ…

 

काय चुकलं

वाळू मुठीत नको

ओंजळीत धरायला हवी होती

पण तेव्हा

कळलं नाही

आणि आता

कळून उपयोग नाही…

 

कारण आता

ती नाही

समुद्र नाही

वाळू नाही

गाठ मारायला

पदरही नाही…!

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “निसर्ग…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ निसर्गसौ. वृंदा गंभीर

(अष्टाक्षरी)

झाली आवनी हिरवी

शालू नेसली हिरवा

काळी धरणी सजली

पिकं घेती हेलकावा

*

रूप निसर्गाचं नवे

दिसे छान अतिशय

किती डोळ्याने पहावे

गीत गावे प्रेममय. ,.

*

वाहे ओढे नदी नाले

पाणी पाणी चोहीकडे

धबधबे ओसंडते

मन ओढे दृष्याकडे….

*

स्तुती करावी मनाने

हृदयी साठवावा ठेवा

दिले खूप निसर्गाने

हाती यावा रानमेवा….

*

इंद्रधनु रंग शोभे

फुले विविध रंगाने

सप्त रंगानी गवशे

मनी भाव आनंदाने

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मैत्री… ☆ श्रीशैल चौगुले ☆

अंतःकरणापासून झालो एकरुप

तुझी आठवण मित्रा येते आज खूप.

*

कधी खेळलो बागडलो धरुनी हात

जन्मभर मैत्रीची शपथ देई साथ.

*

कधी एकाच घासाचे तुकडे ते दोन

नाते मैत्रीचे भावासम कर्ण नि शोण.

*

असे घडते कधी गरिबीत तु प्राण

सुदाम्यास तो जणू कृष्ण भेटीची आण.

*

करतोस सख्याची भाषा राहूनी दूर

तुझ्याविन या जीवाला लागे हुरहुर.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – पाठी पोटी देव… – ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – पाठी पोटी देव… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

पाठी पोटी देव /

कैसा हरिदासा भेव //१//

*

करा आनंदें कीर्तन /

नका आशंकित मन //२//

*

जिथे कोठे काळ /

करील देवापाशी बळ //३//

*

तुका म्हणे धनी /

सपुरता काय वाणी //४//

  – संत तुकाराम.

तुका म्हणे

ज्या भक्ता मागे त्याला सांभाळण्यासाठी देव मागे पुढे उभा आहे त्या हरिच्यादासाला कुणाचे कसले भय असणार आहे. म्हणूनच आनंदाने देवाचे नामस्मरणकरा. कीर्तन करा. मनात कसलाही शंका बाळगू नका. काळ कितीही बलशाली असला तरी तो देवा पेक्षा बलवान नाही. आपला धनी सर्वापेक्षा बलवान असेल तर आपल्या जीवनात सगळीकडे आनंदच आनंद भरून राहील.

ज्याच्या मनात देवाविषयी सात्विक भाव, श्रद्धा, आपुलकी, आणि नितांत आदर असेल तर त्याच्या मनात फक्त देवच कायम वस्तिला असतो. त्याला कशाचीही भीती नसते. आपल्या मनात फक्त देव जपा त्याचे ध्यान करा, कीर्तन करा. मनात कसलीही शंका बाळगू नका. आत्ताचा हा काळ कितीही संकटाचा, अवघड, आणि घातपात करणारा असलातरी देवापुढे त्यांचे काहीच चालणार नाही. ज्याला तुम्ही आपला धनी मानले आहे तो बलशाली परमात्मा तुमचे संरक्षण करील. तुमच्या जीवनात तो आनंदाची सतत बरसातच करत राहील.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जिवलग मित्र सारे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जिवलग मित्र सारे ? श्री आशिष  बिवलकर ☆

जन्माला जरी आलो एकटा,

मित्रांनी नाही जाणवून दिले एकटेपण!

अनेक सुख दुःख आली,

हाक न मारता धावून आले सारेजण!

*
बालपणी खेळी एकत्र दमलो,

तारुण्यात मौजमस्तीत रमलो!

तिसरा अंक येईल तेव्हा येईल,

वर्तमानात एकमेकांसाठी जमलो!

*
कधी जरी उदास वाटे मनाला,

डोळे पाहून मनातले सारे वाचतात!

कष्ट करून यश मिळते तेव्हा,

माझ्यापेक्षा तेच आनंदाने नाचतात!

*

आर्थिक प्रगती पुढे मागे असे,

तुलना सुखाची कुणा अंतरी नसे!

एकाच कट्ट्यावर एकत्र सारे बसे,

निखळ मैत्रीचा भाव हृदयात वसे!

*

आयुष्यभर साथ दिलीत,

भावनांचा केला नाही कधी धंदा!

अमरपट्टा नाही घेऊन आलो,

जाईन तेव्हा मित्रांचाच मिळू दे खांदा!

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तख्त मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तख्त मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

शिवरायांच्या दरबारातील

कणखर बाणा वाण मराठी

अभिमानाने जपत जायचा

आपण आपला प्राण मराठी

*

सह्याद्रीच्या कडे कपारी

तेवत असतो पोत मराठी

मंदिरातल्या देव पुजेला

कायम जळते ज्योत मराठी

*

पर्वतरांगा मधल्या सगळ्या

गडकोटांवर भव्य मराठी

निशानात ही भगव्या आहे

सळसळणारी दिव्य मराठी

*

जात मराठी पात मराठी

आमचे ही गणगोत मराठी

आभाळातील विजा चमकती

देत घोषणा आज मराठी

*

मराठमोळ्या आवेशाने

झटतो आहे आज मराठी

जपण्यासाठी भविष्यातले

वैभव आपले खास मराठी

 *

आम्ही मावळे शिवरायांचे

मायबोलीचे भक्त मराठी

सज्ज आजही सावरण्याला

तख्त मराठी रक्त मराठी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाप…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? कवितेचा उत्सव ?

☆ बाप☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

बाप होण्यासाठी नुसते पुरुष होऊन चालत नाही.

बाप होण्यासाठी पदवीची अनिवार्यता नाही.

*

बाप होणे म्हणजे नुसते शुक्रदान नाही

बाप होणे म्हणजे नुसते पालनकरणे नाही.

*

बाप होण्यासाठी लागते सजग मन

असंख्य वादळे झेलणारे खंबीर मन

*

बाप होणे म्हणजे आपल्यातील बालकजिवंत ठेवणे

बालकपण जिवंत ठेवत बाळाला बापबनविणे

*

बाप असावा बापासारखा तरीही असावे मनी मृदू

निवृत्तींसारखा बाप असावा ज्ञानेश्वरू असावेहृदू

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares