मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रखुमाई रुसली” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “रखुमाई रुसली” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

☆

सावळ्या हरी,

ऐकू या तरी,

काय झाला रुसायला

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

रखुमाई म्हणते फुगवून गाल

भक्तांच्या चालीवर तुमचा ताल

या भक्ताघरी काय ठेवलाय हो?

उठसूट घुसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

कोणी ती तुमची जनी का बनी

तिची कशी केली वेणीफणी

दळणकांडण करून गेला

लुगडी धुवायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

तो एक वेडा तुकोबा वाणी

त्याने कुठे लिहिली चार-दोन गाणी

विमान धाडायची गरज होती का

फुकटचे बसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

उगाळलं चंदन हरकत नाही

एकनाथ तसा कुणी परका नाही

श्रीखंड्या बनून तिथंच राहिलात

पाणी भरायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

 चला जावू पुसायला ||

 

आणखीन तो एक सेना न्हावी

त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी

राजाची केली स्वतः हजामत

आणि बसला तासायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

भले दामाजीने धान्य वाटले

त्यासाठी तुम्ही काही करावे म्हटले

पितांबर सोडून

लंगोटीशिवाय काही नव्हतं नेसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

नाम्याचे गेला कीर्तन ऐकायला

अंगात आल्यावानी लागलात नाचायला

तरी बरं, तिथं कबीर होता

सावध करायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

चोखोबा एक तर जातीचा महार

त्याने कुठं केलं मायबाप जोहार

त्याच्या संगतीने ढोरं ओढलीत

रोहिदाच्या संग चामडी रंगवलीत

गोरीबासंग मडकी घडवलीत

आता कोण बाकी सांगा गुरुनाथ

काय झालं हसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

* * * *

कवी: अज्ञात

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०५ – नारळी पुनव…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०५ – विजय साहित्य ?

☆ नारळी पुनव…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

☆

आली श्रावण पौर्णिमा

कोळी बांधवांचा सण

शांत झाला दर्या राजा

देई रोजी रोटी धन…!

*

सुरू झाली मासेमारी

शिरे दर्यामधे होरी

बघ नटल्या सजल्या

गोड कोलियाच्या पोरी.

*

रंग रंगोटी करून

बघ सजविली नाव

पूजा करू सागराची

मिळो अंतरात ठाव…! ‌

*

दर्या राजा द्येव त्याचा

आहे नारळाचा मान

भात नारळाचा केला

सजे नैवेद्याचे पान…!

*

गंध फूल अक्षतांनी

होई सागराची पूजा

कर आमुचे रक्षण

ठेव बळकट भूजा…!

*

मासेमारी करताना

ठेव सुरक्षित धनी

तुझ्या पुजेसाठी बघ

किती जमल्या साजणी..!

*

कृपा प्रसादाने तुझ्या

राहो भरलेले घर

होरी खेळू देत माझी

तुझ्या लाटा लाटांवर…!

*

तुझ्या जीवावर करे

कोळी बांधव संसार

आली नारळी पुनव

कर पुजेचा स्विकार…!

☆

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

☆

झोपाळ्यावर झुलता झुलता

श्रावण हिंदोळे घेतो..

पर्जन्याची रिमझिम झेलत

श्रावण अंगणी येतो…

*

चाहुल देई आषाढ डुंबत

 नाचत तळ्यात मळ्यात

 धुंद होऊन फुलता श्रावण

 खेळे माझ्या अंगणात..

*

श्रावणधारा बरसून जाती

 ऊन पाऊस साजरा..

 सूर्याच्या किरणातून

 नाचत येती जलधारा..

*

 श्रावण येई घेऊन सोबत

 सणवारांच्या दिवसांना..

सृष्टी सारी आनंदून जाई

 उधळून देई गंधांना..

*

रंग गंधांच्या संगती

 श्रावण आणी मोरपिसे

कृष्ण जन्माच्या वेळेचे

 लागे सर्वांच्या मनी पिसे…

☆

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंतिम इच्छा ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अंतिम इच्छा ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

रोज येऊनी दारवठ्याला

वाट तुझी बघत बसते,

आज उद्या नक्की येशील

समजूत मनाची घालते!

*

 भूल तुला कशी पडली

 दूरच्या स्वप्न-नगरीची,

 सोडून सारी शेती वाडी

 वाट धरलीस त्या देशीची!

*

थकली सारी गात्रं आता

आला दिवस ढकलते,

नाही सोडली वेडी आशा

भरवसा उद्यावर ठेवते!

*

 डोळे माझे मिटण्या आधी

 तुला एकदाच पाहायचंय,

 डोकं ठेवून तुझ्या मांडीवर

 शांतपणे मला जायचंय!

 शांतपणे मला जायचंय!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ व्योमकेशीणी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? व्योमकेशीणी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

☆

वाढता वाढता

परिघ वाढला,

जाहला ब्रह्मांडाएवढा

तूझिया अस्तित्वाचा…

 

सारे मानव

झाले तूझीच

तूही झालीस

तयांचीच…

 

ज्ञानसूर्य होवोनी

पसरलीस किरणे बनूनी

सदगुरु ॐ आई 

विश्वाचिच झाली…

 

एकदेशी न उरली

व्यापिले व्योमकेश,

ग्रहनक्षत्रे, देवही

तव भवती रास करिती…

 

सकल आत्म्यांची

तू आत्मा झालीस,

प्रत्येकाच्या हृदयी तू

तूझिया हृदयी 

ब्रह्मांड वसे…

 

एकरुप झाली

स्व रुप नुरले

पूर्णत्वाची प्रतिमा तू

द्वैत अद्वैतात विरून गेले…

☆

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संदूक… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संदूक… ☆ सुरेखा चिखलकर ☆

☆

सारीपाटाच्या खेळामध्ये

सोंगटीच्या चालीने ती

चालत राहिली शिणलेल्या

पावलांना घेऊन. ..

काळाच्या पदराखाली

मनातील भावनांना

साठवत राहिली आयुष्यभर,

वेदनांना आवरणं घालून

भळभळत राहिली अश्वत्थामाच्या

जखमेसारखी. ..

शब्दांना सादवत राहिली

मनाच्या संदुकीत स्वतःला

बंदिस्त करून,

डोळ्याच्या बांधावर रिचवत

राहिली हळूहळू स्वतःला

गुह्य अंतरात कायमचे…

 🙏 

© सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रिकामा डबा परत द्यायचा नसतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “रिकामा डबा परत द्यायचा नसतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

☆

सकाळी दारावर टकटक झाली.

सुनिताकाकूंनी दार उघडलं.

समोर वच्छलामामी उभ्या होत्या.

हातात स्टीलचा डबा.

“अगं…

काल तुझ्याकडून उसळ घेतली होती ना…

हा डबा. “

सुनिता काकूंनी झाकण उघडलं.

आत उसळ नव्हती…

चार गरम पुरणपोळ्या होत्या.

“मामी…

हे कशाला? “

मामी हसल्या…

“रिकामा डबा परत दिला की… नातंसुद्धा रिकामं होतं गं. “

—

तेवढ्यात सुप्रियाकाकूही आल्या.

“काय गं…

आज पुन्हा डब्यांची देवाणघेवाण? “

वच्छलामामी हसल्या.

“अगं…

आपल्या गल्लीत डबा फिरत नाही…

आपुलकी फिरते. “

सगळ्या हसायला लागल्या.

—

दुपारी सीमाताई आल्या.

त्यांच्या हातात छोटासा डबा होता.

“मामी…

थोडा चिवडा केला होता. “

मामींनी डबा घेतला.

संध्याकाळी तोच डबा परत गेला…

पण यावेळी त्यात घरचा शिरा होता.

सीमाताई म्हणाल्या…

“मामी…

तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता. “

मामी म्हणाल्या…

“बाळा…

रिकामा डबा परत पाठवला…

तर समोरच्याला वाटतं…

काम संपलं.

पण काहीतरी भरून दिलं…

की नातं अजून जिवंत आहे, असं वाटतं. “

—

त्या दिवशी चारही जणी चहा पित बसल्या होत्या.

गप्पा सुरू झाल्या.

सुप्रियाकाकू म्हणाल्या…

“आठवतंय…

पूर्वी आपल्या गल्लीत एकही घर असं नव्हतं…

जिथे डबे फिरत नव्हते. “

सुनिताकाकू लगेच म्हणाल्या…

“अगं…

एखाद्या घरात भजी झाली…

की चार घरात जायची. “

सीमाताई म्हणाल्या…

“दिवाळीत तर प्रत्येक दारात डबेच डबे. “

वच्छलामामी हसल्या.

“आणि कोणाच्या घरी बाळंतपण असलं…

तर महिनाभर त्या घरात स्वयंपाक करायची गरजच नसायची.

प्रत्येक घरातून एक डबा यायचाच. “

—

क्षणभर सगळ्या शांत झाल्या.

मग मामी हळू आवाजात म्हणाल्या…

“माझे यजमान गेले तेव्हा…

पहिले पंधरा दिवस…

मी स्वयंपाकच केला नव्हता. “

सुनिताकाकूंनी त्यांच्या हातावर हात ठेवला.

मामी पुढे म्हणाल्या…

“सकाळचा डबा कुणाकडून यायचा…

दुपारचा कुणाकडून…

रात्रीचा कुणाकडून…

तेव्हा समजलं…

भूक पोळीने भागते…

पण दुःख माणसांनी हलकं होतं. “

चारही जणींचे डोळे पाणावले.

—

तेवढ्यात बाहेरून एका लहान मुलाचा आवाज आला.

“आजी…

आई म्हणाली…

थोडी कोथिंबीर आहे का? “

मामी आत गेल्या.

कोथिंबीर ठेवली.

सोबत दोन टोमॅटो…

आणि एक काकडीही ठेवली.

मुलगा म्हणाला…

“आजी…

आईने एवढं मागितलं नव्हतं. “

मामी हसल्या.

“माहितीय…

पण रिकामा डबा…

आणि रिकामी पिशवी…

दोन्ही परत पाठवायची नसते. “

—

संध्याकाळी…

सुनिताकाकूंची सून ऑफिसवरून आली.

तिने विचारलं…

“आई…

आज पुन्हा कोणाचा डबा आला होता? “

सुनिताकाकू हसल्या.

“हो. “

“हे सगळं अजूनही चालतं? “

सुनिताकाकू म्हणाल्या…

“हो बाळा…

कारण…

भाजीची चव मसाल्याने येते…

पण नात्यांची चव…

देवाणघेवाणीने येते. “

—

दुसऱ्या दिवशी…

सुनेने पहिल्यांदाच खीर केली.

तिने एक छोटा डबा भरला.

आणि म्हणाली…

“आई…

हे मामींकडे देऊन येते. “

सुनिता काकू काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या.

त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

कारण…

परंपरा सांगून टिकत नाही…

ती पाहून पुढे जाते.

—

आज…

आपल्या घरात मोठमोठे फ्रिज आहेत…

महागडी भांडी आहेत…

ऑनलाइन जेवण आहे…

पण…

शेजाऱ्याच्या दारात प्रेमाने ठेवलेला गरम डबा…

आजही कोणत्याच पैशाने विकत मिळत नाही.

कारण…

त्या डब्यात…

फक्त भाजी नसते…

‘आम्ही आहोत तुमच्यासोबत‘ हा शब्दांविना दिलेला आधार असतो.

—

आजही…

काही जुन्या घरांत…

स्टीलचा डबा कधीच रिकामा परत जात नाही.

कारण…

त्या पिढीला माहिती होतं…

रिकामा डबा परत दिला…

तर पोट भरलेलं असेल…

पण नातं उपाशी राहील.

 

☆

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हिमालयी फुलराणी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हिमालयी फुलराणी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अष्टाक्षरी) 

☆

रंग यांचा किती गोड

जणू घन आले खाली 

रिमझिम पावसात 

पहा फुले छत्री झाली

*

चिंतामणी म्हणू याला

म्हणू काय मी आकाशी

किती देखणी फुलारी 

रंगभरी मखलाशी

*

हिमालयी फुलराणी 

किती रुबाबच भारी

खसखस फुले म्हणू

नीलवंती जरतारी

*

केसाळली ह्याची पाने

मोठी मोठी छान फुले 

वसे हिमाच्या कुशीत

वाऱ्यासंगे पहा झुले 

*

पाकळ्यात नभ दिसे

कण सोनेरी दाटले

मना मोहिनी घालती 

उपवन हे भेटले

*

पावसाची रिमझिम 

बर्फ सारा फुलांवर

कधी थंडीची लहर

उमलते मनोहर

*

निळी निळी फुले सारी

माझ्या मनात भरली

त्यांच्या रूपाला भाळले 

काव्यातून चितारली

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२७ ☆ पाऊस… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२७ ?

☆ पाऊस… ☆  प्रभा सोनवणे ☆

☆

खिडकीतून बाहेरचा पाऊस पहाताना,

पुन्हा आठवले ते झिम्माड दिवस ,

शाळेतले!

 

आणि ती रंगीबेरंगी छत्री—

छोटी पावलं..लाल बूट!

त्या त्या वयातला पाऊस !!

 

सत्तर पावसाळे पाहिल्यानंतरही…

 

पाऊस तरूणच!

आपण म्हातारे होत जातो….

म्हणूनच खिडकीतून दिसणारा

पाऊस….

शिंपडून घेतला आत्ताच मनावर!

किती ताजं टवटवीत झालं मन!

 

छोटी छत्री डोक्यावर घेऊन,

पावसाच्या पाण्यात सोडलेल्या–

कागदी नावेसारखं !!!

☆

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पानगळ… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पानगळ… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

☆

गळू गळू दे

शंकेची, भ्रमाची

कुविचारांची वाळकी पाने,

गळू दे, गळू दे…

 

वृथा अहंची,

व्यष्टीची आणि

ईर्षेची पाने

गळू दे गळू दे…

 

लक्ष योनी नंतर

कर्मानुसार

प्राप्त हा देह वृक्ष

याला सत विचारांची,

नवी पालवी फुटू दे..

 

सद्गुरू कृपे

फुटतील नवी

ज्ञान पालवी

होईल वटवृक्ष

साऊली देई साऊली देई…

☆

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares