मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोष कुणाचा?… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दोष कुणाचा?… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

केर मनातला

राहून गेला तसाच

मनाला मी म्हणालो

कर काही….

*

मन म्हणाले मला

दुष्ट तर ते डोळे आहेत

भुलवितात, चाळवितात

नेहमीच मला….

*

ते दोघेच नाही

तर हे नाकही कमी नाही

हुंगून मज सैरभैर करते

मी काय करू…

*

कानही तसेच आहे

नको ते ऐकोनी

मम डोक्यात साठवी कुविचार सतत….

*

हाताने स्पर्षावे

पायाने तिकडेच धावावे

संपूर्ण अवयवचि मज

हरवित आहे…

*

जिव्हा केवळ

गुरुमंत्राचा जाप करोन

मम स्थिर करू इच्छिते

तीच माझी त्राता…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २६७ – विजया दशमी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २६७  – विजय साहित्य ?

☆ विजया दशमी…!

आली विजयादशमी

करू‌ रावण दहन

वध महिषासूराचा

देवी महात्म्य गहन…! १

*

सण विजयी हसरा

कुलरीत परंपरा

सरस्वती पुजनाने

वाटू‌ सोने परस्परा…! २

*

गाव सीमा उल्लंघूनी

करू संकल्प सृजन

सण दसऱ्याचा आला

दूर ठेवूया दुर्जन…! ३

*

अष्टदल रेखाटून

शारदेची आराधना

ग्रंथ संपदा पुजन

सारस्वती उपासना…! ४

*

पाटी पुजनाची प्रथा

संस्कारांची रूपरेषा

सीमा उल्लंघुनी जाऊ

अंतरीच्या दिव्य देशा..! ५

*

पाने आंब्याची लावून

दारी तोरण सजले

झेंडू पिवळा केशरी

घर आनंदें नटले…! ६

*

अक्षरांनी अक्षरांची

वर्णियली शब्दमाला

नव कार्य शुभारंभ

सण दसऱ्याचा आला…! ७

*

आज आहे महोत्सव

कला शिक्षण शक्तीचा

धनधान्य शस्त्रपुजा

ठेवा सात्विक भक्तीचा..! ८

*

नको दुष्कर्माचा संग

घेऊ आज गळाभेट

मनामधे करू घर

राहू काळजात थेट..! ९

*

नानाविध परंपरा

सांभाळत आला सण

कुल दैवत स्मरणी

रंगे एक एक क्षण…! १०

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भुरूभुरू पावसात फिरतांना… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भुरूभुरू पावसात फिरतांना… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

या भुरुभुरु पावसातून फिरताना

किती आल्हाददायक वाटतंय.

*

ही ओली वाट दुतर्फा हिरवाळीच्या गालिच्यासारखी….

रस्त्यावरची छोटी छोटी तळी..

अन् त्यात डुंबणारी पाखरं…

तान्हुल्याच्या जावळासारखी झुलणारी शेते….

फांद्या फांद्यावर गाणारा पाखरांचा थवा…

कोवळ्या उन्हात चमचमणारे दवबिंदूंचे मोती…

फुलांचा अन् ओल्या मातीचा दरवळ…

ओठांवर येऊन थांबलेले निळे गाणे…

वाटतं

संपूच नये ही वाट अन् चालणं ही.

*

या भुरुभुरु पावसातून फिरताना

किती आल्हाददायक वाटतंय,

भर उन्हातून ‘तिच्या’ सोबत

जात असल्यासारखं…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझ्या स्वप्नात सजते… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ माझ्या स्वप्नात सजते… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

आले गेले, किती ऋतू आले गेले

पण पुरे नाही झाले कधी स्वप्नांचे झमेले…

किती गोड दिसते तू, किती गोड हासते तू

तुझे अधर भासती जणू मधू अमृताचे पेले…

*

कळी होऊन फुलते फूल होऊन झुलते

का ग येऊन स्वप्नात मज डोळे मिचकावते

फांदी फांदी बहरावी लहरते वाऱ्यावर

बंद डोळ्यांनी मारून टपली अवचित जाते..

*

जणू नशा तू चढते मनी घुटमळते घुटमळते

तोल जातो अवचित मग नशा उतरते

तू फुलते फळते मोहरते अंगोपांगी

तळहातावर जणू लाल मेहेंदी रंगते..

*

कुण्या राजाची होऊन राणी मागे वळून पाहते

आणि रोज रोज मग माझ्या स्वप्नात सजते…

© प्रा.सौ.सुमती पवार 

नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – उचित ना कळे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – उचित ना कळे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

उचित न कळे इंद्रियाचे ओढी /

मुखे बडबडी शिकलें तें //१//

*

आपण जाऊन न्यावें नरकास /

फळे बेताळीस कुळें जग //२//

*

अबोलणें बोले डोळे झांकुनियां /

बडबडी वांयां दंभासाठीं //३//

*

तुका म्हणे आम्ही तेथील पारखी /

नाचे देखोवेखी जाणों खरे //४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

माणसाला इंद्रिय सुखाची अनावर ओढ लागल्यामुळे आपल्या साठी योग्य काय आहे अयोग्य काय आहे याचे भानच उरत नाही. पण तो जे शिकलेला आहे ते मात्र तोंडाने केंव्हाही आणि काहीही बडबडत रहातो आपले डोळे झाकून भान हरपून जे बोलणे अयोग्य आहे ते ही बोलत सूटतो. तेव्हा बोलताना त्यांची होणारी केविलवाणी स्थिती बघण्या सारखी होते‌. पण जाणकारांना या सगळ्याची खरी पारख आहे. कोण वरवरचे बोलत कसा नाचत आहे तो मनोमन जाणत़ो.

माणूस इंद्रिय सुखाच्या आधीन होतो. आहारी जातो, तेव्हा तो आंधळा झालेला असतो. आपण जे करतोय ते आपल्या हिताचे आहे की अहितकारक आहे हे त्याला कळतच नाही. हे सर्व जाणून घेवून ही माणूस वायफळ बडबड करत सुटतो. कारण आपण चारबुके शिकलेलो आहोत याचा त्याला इतरांपढे टेंभा मिरवायचा असतो. म्हणूनच तो जे बोलणे योग्य नाही ते ही बोलत रहातो. आणि आपल्या इंद्रियसुखाची नको तितकी भलावण करून घेतो. पण खरोखरचा ज्ञानी माणूस हे सर्व सहजपणे ओळखतो. त्याला ख-याखोट्याची पूर्ण जाणीव होते. समोरचा माणूस फक्त वरवरच्या कोलांट्या मारत आहे हे त्याला कळते. पण अशा बेजबाबदार वागण्याने आपणच आपली इज्जत घालवून घेत आहोत हे मात्र बडबडनाराला कसे कळत नाही बरे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संक्रांतवेल मनोहर… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संक्रांतवेल मनोहर …  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

बहरून आली पानोपानी

कांती केशरलेली

संक्रांतवेलही दवबिंदूसह 

गगनाला भिडण्या गेली

*
झिरमिर झिरमिर झिरमाळ्यांचे

गुच्छ लगडले सारे

झोके देती हलके छेडत

पवनाचे धुंद इशारे

*

थडथडणारी थंडी त्यातच 

बहरून बहरून जाते

केशरी शेला अहा लपेटून 

मनात माझ्या गाते

*

गंध नसे पण रंग देखणा

नजर सुखावून जाते 

स्वागत करती गुच्छ साजरे

गगनाशी यांचे नाते

*
चिवचिवणारे पक्षी येऊन

घरटी त्यावर विणती

महावेल म्हणुनी होते 

संक्रांतवेलीची गणती

*

दुरून वाटते आग लागली 

वेलीवरती सारी 

उत्तरायण आले आले 

शुभपर्वाची नांदी न्यारी

*
थंडी मधला शेला झाला

शब्दांचा माझ्या सुंदर

मम काव्यात बहरून आली

संक्रांतवेल मनोहर…

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “घाणेरी“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – घाणेरी – ? ☆ श्री सुहास सोहोनी

हो मी घाणेरी, घाणेरी, कुणी हसा वा चिडवा;

नाही करणार कधी, बागेतल्यांचा मी हेवा… 

*
शालू हिरव्या पानांचा, त्याला कातरी किनार;

रंगरुपाने देखणी, बहुगुणी अशी नार… 

*

काया काटेरी तरीही, फळे असती मधूर;

श्रावणातल्या पाण्याचे, मला सुखावती सूर… 

*
चार कौतुकाच्या ओळी, लिहिल्या ना माझ्यावर;

दुर्लक्षिती सारे तरी, नाही घेत मनावर… 

*

कुणी घेईल जवळ, किती वाट मी पाहते;

खंत उरातली माझ्या, कवीमनाला कळते..

*

वईदांड्यातून आता, आले आहे मी बागेत;

कधीतरी मिळेलच, स्थान फुलांना पुजेत… 

*

छान दिसणे असणे, फार फरक दोन्हीत;

दु:ख पचवून सारे, द्यावा आनंद हसत… 

*

ऋतू येतील जातील, खंत कशाला करावी;

जिद्द आणिक उमेद, जगण्याची ना सोडावी… 

*

गूज सांगून मनीचे, झाले मोकळी मोकळी;

आता बहरेल पुन्हा, माझी डहाळी डहाळी……

आता बहरेल पुन्हा, माझी डहाळी डहाळी……

🌹

कवी : मेधानुज

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८६ ☆ गझल…  ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८६ ?

☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(भुजंगप्रयात वृत्त)

 जुईच्या फुलांचे बहर मागते मी

सुगंधी सुखाचा कहर मागते मी

 *

कधी शांत वारा कधी वादळी तू

तुझी जीवघेणी लहर मागते मी

 *

मुसाफीर तू मी तुझी वाट आहे

नवे आणखी ते शहर मागते मी

 *

नको दूर जाऊ जवळ तू रहा ना

तुझे मोरपंखी प्रहर मागते मी

 *

सदा भंगते का इथे स्वप्न माझे

पुन्हा वास्तवाचे जहर मागते मी

 *

जुने धाम माझे कुणी ध्वस्त केले?

पुराणे अता खंडहर मागते मी

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस मनातला… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस मनातला ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

तो पाऊस तुझ्या मनातला

सखे हवा हवासा वाटला

*

पण नेमकाच त्या वळणावरती

माझा येण्याचा अंदाज चूकला

*

कातरकाळी विरहात झुरणारा

तो  श्वास रोखून थांबला

*

नेमकाच येण्याच्या वाटांवरती

सखे पावलांचा अंदाज चुकला

*

तू अथक सरींचा पावसाळा

मी श्रावण होऊन झेलला

*

सखे तू पाऊस झाल्यावरती

नेमका ऋतूंचा अंदाज चूकला

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ “काटेकरांची मुले…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

☆ क्षण सृजनाचा ☆ “काटेकरांची मुले…” ☆ सुश्री शीला पतकी 

मैत्रिणीचा फोन आला,” अगं शीला आपण अगदी चुकीचं शिकवलं बघ आपल्या विद्यार्थ्यांना. आपण सांगितलं सोलापुरात खूप झाडं लावा तरच पाऊस चांगला पडेल अन्यथा आपल्याकडे दुष्काळच… पण काय ग कसला पाऊस आपण चुकीचं सांगितलं बाई…!” या विनोदावर आम्ही खूप हसलो खरंच विनोदच म्हणायचे याला सोलापुरात आम्ही कधीच एवढा पाऊस पाहिला नव्हता पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून जो पाऊस पडतोय तो मला वाटतं थंडी सुरू झाली तरी पडत राहणार आहे असं दिसते. मग काय घरात निवांत बसणे सोलापुरातल्या माणसाला पावसाची सवय नाही त्यामुळे त्याच्याकडे रेनकोट छत्री इत्यादी साहित्य नसते पाय पाण्यात बुडाले तर त्याला सर्दी होते अशी जडणघडण झालेले आमचे शरीर मग आता या वयात तरी निवांत घरी बसलो. 45 बंगल्यांच्या आमच्या सोसायटीत पूर्ण शुकशुकाट 45 घरात मोजून 50 माणस आहेत त्यातली 25 व्यवसायाला गेलेली… काही घरे कुलूप बंद . .प्रचंड शांतता….! मोबाईल आणि टीव्हीचा कंटाळा आलेला… मी शांत पडून राहिले भिंतीवरच्या घड्याळाकडे मात्र सतत लक्ष होतं…. एकेक काटा गतीने फिरत होता…. सेकंदाचा फिरणं 60 घर… तेव्हा मिनिट काटा एक घरावर हलायचा… मग 60 मिनिटे झाल्यावर तास काटा पाच घर चालायचा… हा खेळ मी तासभर बघत होते आणि लक्षात आले याना कंटाळा कसा येत नाही तेवढ्याच गोलात चालायचा…! हे कधी थांबत नाहीत…. बरोबर आहे त्याच्या मागे त्याचा बाप बसलाय ना.. बॅटरी ….आणि मग असेच काही काही विचार येत राहिले आणि  माझ्या तोंडून सहजच निघाले ,”ओ काटेकर थांबा की तुम्हाला चालताना बघून  कंटाळा आलाय… आम्हाला मात्र चालता येत नाही आणि तुम्ही पळत आहात”. आणि पटकन क्लिक झाल..” काटेकरांची मुलं”…. मग भराभर कल्पना येत राहिल्या बारा वाड्या .  साठ घर …आणि खूप काही जे कवितेत मांडलेल आहे ..!मग काय समोर एक पावतीचा कागद पडला होता अगदी हाताएवढा… पेन घेतला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली भराभर ओळी उतरत गेल्या सहजच स्फुरलेले  काव्य, ते काही कष्ट काव्य नव्हतं पंधरा मिनिटात कविता झाली. मला चांगल्या कागदावर आणि चांगल्या अक्षरात कविता करता येत नाही कागद पाठ कोरा, पावत्या, रद्दी  इत्यादी मधला असेल तर कवितेला स्फुरण चढते .. !कविता तर झाली पहिला श्रोता हवा ना…? शेजारी पेइंग गेस्ट म्हणून एक एमबीबीएस ची मुलगी राहते… नीरजा तिच्या परीक्षेच्या अभ्यासातून तीला पाच मिनिट ब्रेक दिला…  म्हटलं चल कविता ऐकवते… कविता ऐकून ती खुश झाली आणि फ्रेश सुद्धा झाली म्हणाली,” क्या बात है आत्या मस्त” बास एवढ्या प्रतिक्रियेवर कविता पटापट पाठवली .आता ही कविता वाचून काहींनी विचारले कसं काय सुचत हो तुम्हाला? मनात म्हणलं बाई एकटेपणाचे दुःख तुम्हाला काय माहिती आहे घरात माणसं नसली की कविता सुचतात… ही थोडी गंमत बरं मला खात्री आहे तुम्हाला ही कविता आवडेल . .चला तर मग पाहूया काटेकरांची मुलं काय म्हणतात….!!!

☆ काटेकरांची मुलं

*

बारावाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव

घड्याळ त्याचे नाव//

*

काटेकरांचे वेडे तीन  भाऊ होते गावभर फिरणारे

मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ

*

तोच मोठा होता चपळ  पळ पळ सतत पळायचा

बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा

मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा

*

पण फिरून नाही हं दमायचे

रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा

बारा घरांचा त्यांना लागला होता लळा

*

यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ

आणि शिस्त म्हणजे शिस्त

पाळायलाच  पाहिजे ना

साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त

*

सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा

रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा

आई-बाबांना यांचाच धाक

लोकलचतर चालते यांच्यावरच चाक

*

यांचा दर्जा कायम वरचा

भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही  स्क्रीनवर

*

ग्रहावरही यांचीच हुकूमत

सूर्य ही उठतो वेळेवर

दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात

ग्रह तारे बिनदिक्कत

*

जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित

अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित

*

पण ठाऊक आहे का काय यांची गंमत

यांचे बाबा  मागे बसूनपाहतअसतात जम्मत

बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा

म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा

*

धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप

तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप

*

मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं

एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं

*

आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप

काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//

*

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares