मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “दीपपूजन…“☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपपूजन☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

 दिवस सरता आषाढाचे,

 सांगता असे अमावस्येने,

 निमित्त हेची दीपपूजेचे,

 कृतज्ञतेचे मनी भाव हे!

*

 घरोघरी पूजन दीपांचे,

 दीप प्रतीक हो, हे ज्ञानाचे,

 अज्ञानाचा नाश होऊ दे,

 उजळू दे जीवन पतितांचे!

 *

 तेजाचे अन् सात्त्विकतेचे,

 पूजन करूया पावित्र्याचे,

 परंपरेचे जतन करावे,

 भान हे ठेवू, संस्कृतीचे!

*

 उणे होऊनी दोष आमुचे,

 सद्गुण आम्हां ठायी यावे,

 आरोग्याचे दान मिळावे,

 ज्ञानामृत जीवनी बरसावे!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विठू गालात हसला… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ विठू गालात हसला सुश्री नीलांबरी शिर्के 

पंढरीला निघताना

ओढ लागली पदरा

 हळू वळून पहाता

 शेवं अडके उंबरा

*

 शेवं सोडवून घेता

 दृष्टी आतमधे गेली

 नातवाची कासाविशी

 डोळ्यात दिसली

*

 कासाविशी बोलली

 आजी नको ग जाऊस

 गोष्ट ऐकुन झोपाया

 मज हवी तव कूस

*

 मला घे ना म्हणूनिया

 नातु पसरीता हात

 माझा विठ्ठलच मला

 जणू होता बोलशीत

*

 शेव उंबरी काढला

 पाय घरात टाकला

 नातवा कुरवाळीता

 विठू गालात हसला

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अशी दिसे कळलावी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अशी दिसे कळलावी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

उत्सवाचा हा श्रावण 

निसर्गात ज्योत लावी 

समईतल्या त्या ज्योती 

अशी दिसे कळलावी 

*
 घाटमाथ्यावर पहा 

 हिचे देखणेसे रूप

 पंचारती ओवाळते 

 वल्लरीही सुस्वरूप 

*

 अग्निमुखी म्हणतात

 अग्निशिखा, कलहारी 

 खड्यानाग, बचनाग

 नावे हिची किती सारी

*

 आधी हिरवी, पिवळी

 नारंगी नी, लाले लाल

 फुले दिसती साजरी 

 जणू तेजाळे मशाल

*

 गौरी गणपतीसाठी 

 हात गौरीचे म्हणती 

 बहु गुणकारी आहे 

 झाली औषधी गणती

*

 नामशेष होत आहे 

 बहुगुणी कळलावी 

 करू तिचे संवर्धन 

 आणि काळजीही घ्यावी 

*

 सातपुड्याच्या घाटात 

 होते मी पाहिले हिला 

 आज शब्दातून माझ्या 

 काव्य बहारही दिला 

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मा हो ल! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मा हो ल! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

भिंती माती लिंपलेल्या

चंद्रमौळी घराचा आधार 

पडे छपरातून कवडसा 

उजळण्या स्वयंपाकघर

*
चाले लगबग चुलीसमोर 

घरातल्या कर्त्या बाईची 

न्याहारी करण्याच्या नादात 

पर्वा ना चुलीच्या धगीची

*

गडबड तिची कामाची 

बारीक सारीक टिपली

जलद होण्या हालचाल 

बघा उकिडवी बसली

*

माहोल घरचा सकाळचा

छान टिपला कॅमेऱ्यात

करून कविता त्यावर 

दाद द्यावी आले मनांत

दाद द्यावी आले मनांत

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 277 ☆ ज्ञान… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 277 ?

☆ ज्ञान… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

असं म्हटलंय कुणीतरी,

“अज्ञानात सुख असतं”

खरचं आपल्याला काही गोष्टी—

माहित नसलेलंच खूप बरं असतं !

 

शाळा, कॉलेजात मिळवलेलं ज्ञान,

व्यवहारी जगात किती उपयोगी पडतं ?

केला अभ्यास, दिल्या परिक्षा—

डिग्रीत थोडीच मोजता येते हुशारी ?

 

किती हातोहात फसवतात,

लोक आपल्याला !

 फसवणारे ज्ञानी थोडेच असतात?

ते असतात चतुर,

त्यांच्या संमोहनाने,

येते तुमच्या बुद्धीला,

अधून मधून मंदत्व!

 

ज्ञान कधीच बनवत नाही ,

लोभी ,लालची,

आत्मलुब्ध!

ज्ञान शिकवते स्वतःच्या ,

पलिकडचा विचार करायला !

जगाच्या कल्याणाचा,

जनोद्धाराचा—

सत्यम् शिवम् सुंदरम् चा विचार!

 

‘ज्ञान’ खूप गहन,

ते देणारा आणि घेणारा,

दोघेही होत असतात, कृतकृत्य!

जर नाहीच ग्रहण शकलो,

त्या उच्च पातळीवरचे ज्ञान तर—

अज्ञातच सुख मानलेले बरे !

असेच वाटते आताशा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पावसाचे गाणे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ पावसाचे गाणे☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

(वृत्त:पादाकुलक)

वाट बघत मी चातक झाले

वर्षा म्हणे मी आले आले

*

ऋणुझुणु पैंजण पहा वाजले

पदरव माझा मीच नाचले

*

कुहू कुहू स्वर गात कोकिळा

तिने गायला अभंग सगळा

*

कळ्या उमलल्या प्राजक्ताच्या

चांदण्या जणू आकाशीच्या

*

अवघी सृष्टी मोहरलेली

नवसृजनाने सुंदर सजली

*

वृंदावनचा कृष्ण मुरारी

अशाच वेळी इथे अवतरी

*

नको नको रे अती बरसणे

पुरासवे का तुझे धावणे

*

उगाच का रे दूषण मजला

जबाबदारी तू न समजला

*

पर्यावरणा राख मानवा

हवा तिथे मग सदा पडावा

*

तुझीच करणी तुझीच भरणी

तूच झटावे रे उद्धरणी

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सागरा ! ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

सागरा ! ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

घर बांधले मी माझे तुझ्या तीराशी खेटून

पडे रोज कानी माझ्या तुझ्या अथांगाची धून

*

तुझ्या रेतीवर रोज खरडतो काहीबाही

लिहायची मला आणि पुसायची तुला घाई

*

भक्त तुझ्या उधाणाचा ओहोटीत तुझ्या संगे

तुझ्या शांततेत आणि तुझ्या झंझावाता संगे

*

तुझ्यासाठी माझे दार बंद केले ना कधीही

तुझ्या लाटा बारा वाटा अंगावर आल्या तरी

*

फंदफितूरशी लाट गूज काही सांगे कानी

म्हणे तुझ्या अंतर्यामी पेटलेला नित्य वन्ही

*

मावळत्या सूर्याचाही अस्त तुझ्यातच होणे

आप तेजाचा संगम रोज येथून पाहणे

*

आपापल्या स्वप्नदेशी नावा, नाविक रवाना

तेथे लाभला किनारा तूच सांग.. कोणा कोणा

*

धन्य तुझे मोठेपण खंत माझी तुझे न्यून

तुझ्या पाण्याने शमेना खुद्द तुझीच तहान !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घन बरसला सावळा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ घन बरसला सावळा... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

घन बरसला सावळा

आषाढीच्या प्रभातकाली मोहून मज गेला

घन बरसला सावळा

*

नभात होता घन भरलेला हवेत होता सुखद गारवा

मृद्गगंधाचा गंध लेऊनी झाला गंधीत वारा

घन बरसला सावळा

*

लावून मुजरा करीती झाडे, स्वागत गीता गाती पाने

प्राजक्ताने पसरुन सुमने, पायघड्या घातल्या

घन बरसला सावळा

*

शतधारांनी मेघ बरसला तप्त धरित्री शमवून गेला

चैतन्याची करून पैठणी अवघी अवनी सजवून गेला

घन बरसला सावळा

*

क्षणात घडली सारी किमया, क्षणात चढले तेज धरेला

वसुंधरेच्या गात्रामधुनी नवजीवन रस शिंपून गेला

घन बरसला सावळा

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #293 ☆ घरास जखमा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 293 ?

☆ बापाचं हृदय… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आता पुन्हा नव्या तू देतो कशास जखमा

आधीच ठणकणाऱ्या होती चिरास जखमा

*

तू ठोकले घराला होते अनेक पाचर

केलेस वार इतके झाल्या घरास जखमा

*

पाण्यास वीज देते झटके अनेक वेळा

ही वीज कडकली अन केल्या ढगास जखमा

*

त्या आळ तर स्वतःवर घेण्या तयार नाही

शस्त्रा मधून कायम देतात त्रास जखमा

*

का वाटतात जखमा कोणा हव्या हव्याशा

काही इथे गुलाबी असतात खास जखमा

*

निर्जीव जे जगी या नाही म्हणे छळत हा

नव्हता जिवंत तो तर तरिही शवास जखमा

*

निर्भेळ दूध होते झाले असे कसे हे

हे दूध फाटले का झाल्या दुधास जखमा

*

शुल्लक जरी किटक हा देहास फार डसतो

छोट्या अनेक येथे देतोय डास जखमा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुळस म्हणे… ☆ सौ. सुनिता जोशी ☆

सौ. सुनिता जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ तुळस म्हणे… ☆ सौ. सुनिता जोशी ☆

तुळस एकदा कधीतरी, नक्कीच रुसली असेल

म्हणूनच विठोबाने तिला, वारी घडवली असेल. . .

शोभा होऊन वृंदावनाची, सोसला ऊन-पाऊस, वारा

सोबत देऊन सुखदुःखाची, झिजवला हा देह सारा. . .

हितगुजाची भेट एकची, घरची स्त्री हा वसे वारसा

ओढ सदैव प्रपंचाची, मनाचा दिसे मंजिरी आरसा. . .

बंडखोरी त्या तनामनाची, मिळावा हा क्षणिक विसावा

साथ घेऊनी तुळशीची, पंढरीचा तो कळस दिसावा. . .

चालता वाट मग वारीची, आत्मसुखाचा शोध लागावा

आस लागता अशी भेटीची, जागोजागी विठ्ठल भेटावा. . .

सोडुनी चिंता घरादाराची, भक्तीचा हा सोहळा पहावा

पाहून नयनी विठू सावळा, संसाराचा विसर पडावा. . .

तुळशीला मिरवत अंगावरी, विठ्ठल मनीच सुखावला

जरा विसावा घे पंढरी, राजा कानडा म्हणू लागला. . .

भेट होता उठाउठी अशी, परत पावलं वळू लागली

तुळशी म्हणे, बा विठ्ठला घरची ओढ या मनी दाटली. . .

रमावे मी असेच संसारी, परी आठव तुझा सदैव चित्ती

पुन्हा भेटण्या तुजला पंढरी, विरहातून जडावी प्रिती. . .

© सौ. सुनिता जोशी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares