मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ असाध्य ते साध्य ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🚩🛕 असाध्य ते साध्य ! 🚩🛕 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

(वारी पुर्ण केलेल्या वारकऱ्याचे मनोगत खालील रचनेत मांडायचा प्रयत्न केला आहे!)

होतो व्याकुळ दर्शनाला

जीव होई वर खाली

दिसे मज जळीस्थळी

तुझीच रे मूर्ती सावळी

*

विरह तव दर्शनाचा

सांग कसा साहिला

मासा जसा जळाबाहेरी

जलाविना तडफडला

*

होता दर्शन कळसाचे

वाटे सफल झाली वारी

आज जणू प्रत्यक्ष भेटे

मज सावळ्या उराउरी

*

लागले सार्थकी जीवन

नाही उरले काही साध्य

तुझा असता आशीर्वाद

नाही जगी काही असाध्य

नाही जगी काही असाध्य

© श्री प्रमोद वामन वर्तक

१०-०७-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुरू पौर्णिमा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ गुरू पौर्णिमा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

 गुरुदेव दत्त

 

धन्य मी तो पामर

झालो सुखी

तुझे नाम घेता दत्ता

रोज मुखी

 

कष्ट कष्ट होती बहु ह्या संसारी

म्हणूनी धावत आलो तूझ्या मंदिरी

दे तुझे आशीर्वाद

 घे पदरी

करीन सेवा तुझी

करीन वारी

तूझ्या दारी न राहो

कोणी दुःखी

तुझे नाम घेता दत्ता

रोज मुखी

 

धन्य नृसिंहवाडी धन्य औदुंबर

सर्वांच्या ठायी विसावे गाणगापूर

चढत जाईन पायी

शिखर गिरीनार

करीन मी उपवास नित्य गुरुवार

तूझ्याविण नाही

मोक्ष ही आता

तूझ्या विण सर नाही

दुजा सारखी

दत्त दत्त राहो नाम माझ्या मुखी

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी? – कवी : वसंत बापट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी? – कवी : वसंत बापट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी?

याचं एक उत्तम उदाहरण 

 

बाभुळझाड “

*

अस्सल लाकूड, भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे

*

देहा फुटले बारा फाटे

अंगावरचे पिकले काटे

आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे

*

अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे

*

जगले आहे, जगते आहे

काकुळतीने बघते आहे

खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे

*

टक… ट्क… टक… ट्क…

चिटर फट्क… चिटर फट्क…

सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलतो आहे, शोषत आहे

*

आठवते ते भलते आहे

उरात माझ्या सलते आहे

आत काही कळते आहे, आत फार जळते आहे

कवी – वसंत बापट 

कविता मना-मनातली”

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महत्व तुळशीचे… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ महत्व तुळशीचे… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(काव्यप्रकार:-अष्टाक्षरी)

 महत्व तुळशीचे

तुळशीचा असे मान

मंजिर्यां सजे छान!

शोभे तिला वृंदावन

जपू सारे,थोर-सान!||१||

*

रुक्मिणीला मिळे मान

भक्ती तिची हो महान!

कृष्ण तुला करतसे

तुळशीचे एक पान!||२||

*

आरोग्याचे ते निधान

तुळशीचा काढा छान!

ज्वर असो,त्वचा दाह

शांत करी,गाऊ गान!||३||

*

दीप पुढे तेवतांना

शांती देई,मना-मना!

शुभंकर ठरे सदा

पवित्रता ती अंगणा!||४||

*

तुळशीचे रोप देई

प्राणवायु मुक्त दान!

शांत, स्निग्ध, हिरवाई

वंदु तिला,देऊ मान!||५||

 

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावळे सुख…☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

🙏 सावळे सुख 🙏 सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सावळ्या सुखाचा | ध्यास हा मनाचा |

लाभ दर्शनाचा | विठ्ठलाच्या ||१||

ओढ ही अंतरी | गाठली पंढरी |

माऊलीच दारी | दिसू लागे ||२||

*

पाहता माऊली | वाचा मूक झाली |

तार छेडियली | अंतरात ||३||

*

माऊलीचा लळा | तैसा बा सावळा |

अंतरीच्या कळा | जाणतसे ||४||

*

घडो तुझी भक्ती | सरावी आसक्ती |

जन्माची निवृत्ती | लाभो मज ||५||

*

तुझ्या भजनात | मन राहो नित्य |

सरावे हे द्वैत | पांडुरंगा ||६||

*

एकत्वाची जाण | सरो मी-तू पण |

अंतरीची खूण | द्यावी मज ||७

*

🙏 श्री विठ्ठल चरणी अनन्य शरण ! 🙏

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुरु शिष्य… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ गुरु शिष्य ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गुरु शिष्य नाते l माय लेकराचे l

उदंड प्रेमाचे l निर्हेतुक ll…..१

*

गुरूसाठी शिष्य lआटापिटा करीl

करतो चाकरी lगुरु पायीं ll…२

*

गुरुला शिष्याचीlजाण असे भारीl

 संकटात तारी lगुरु राया ll….३

*

गुरुविना शिष्यlजळावीण मासा l

तळमळे असा l प्रेमा साठी l l..४

*

रामदास स्वामीlभक्त तो कल्याण l

गुरु शिष्य जाण l नामांकित ll…५

*

श्रीरामाची सेवा l मारुती ने केली l

दास्य भक्ती झाली l निरंतर ll…६

*

गुरु पौर्णिमेला l गुरुसी भजावे l

 प्रेमे आळवावे lगुरु राया ll…७

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मौनातला पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ मौनातला पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

कसे म्हणावे तू सांग,

ह्या पावसास अर्थहीन.

एकटाच बरसतो जो,

तुझ्यामाझ्या विन.

नाही मेघ वारा वीज,

नाही मयूर नर्तन.

नाही आकांत आक्रोश,

आत्ममग्नी आत्मधून.

कसे सांगू मी तुला,

नको आकाशी पाहूस.

तुझ्या माैनी मनातला,

माझ्या डोळ्यात पाऊस.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तुझ्याविना…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “तुझ्याविना... ” ☆ सौ राधिका भांडारकर 

(षोडशाक्षरी)

आठवते सदा मला भेट आपुली पहिली

फुललेल्या वृक्षाखाली चिंबल्या पावसातली

चमकल्या वीजा नभी बेभान होता तो वारा

धरलास हात माझा नजर तेव्हा भिडली१

*

नव्हते शब्द अधरी केवळ भाषा स्पर्शाची

अंतरी थरथरता क्षण एक तो थिजला

ओसरल्या जलधारा वृक्षही सळसळला

कळलेच नाही मला पाऊस केव्हा थांबला २

*

पाऊस तोच असतो वळतात ती पावले

वाटते कधी जावे वृक्षास पुन्हा भेटावे

असतील आठवणी जपलेल्या त्या पानांनी

टपटपत्या थेंबाना या ओंजळीत वेचावे ३

*

धारा धारा बरसती ओलावती पापण्या

वाऱ्यासवे गंध येतो घेऊनी तव स्पर्शाला

कोरड्या या देहावरी मोरपीस लहरते

पण भान येता कळे बिलगणे दुराव्याला४

*

नसतोस जेव्हा तिथे पाऊस होतो वांझोटा

वारा वाहतो एकाकी शुष्क तुझ्या गंधाविना

ओघळती पागोळ्या उदास करी पानांना

चांदण्याशी काय बोलू सांग सख्या तुझ्याविना ५

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे… – विश्वव्यापी माया ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे…   – विश्वव्यापी माया ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

विश्वव्यापी माया /

तिने झाकोळली छाया //१//

 

सत्य गेले भोळ्यावरी/

अविद्येची चाली थोरी //२//

 

आपुलेची मन /

करी आपना बंधन //३//

 

तुका म्हणे देवा /

तुम्ही कोंडी ही उगवा //४//

  – संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपल्या भोवती असणारे सगळे जग मायेने व्यापलेले आहे. त्याच मायेने सत्यरूपी सूर्यालाही झाकोळून टाकले आहे. सत्य आता फक्त भोळ्याभाबड्यांकडे शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सुविद्येला वाईट दिवस आलेत व कुविद्येला चांगले दिवस आले आहेत. पण हे ओळखायला आपले ओढाळ मनच आपल्याला आडकाठी करत आहे. हे असे का होत आहे हे एक न उलगडणारे कोडे होऊन बसले आहे. ते कोडे देवा आता तुम्हीच उलगडून दाखवा.

अलौकिक सुख व आनंद यांनाच आपण माया म्हणतो. या मायेतच सगळे जग बुडून गेले आहे. त्यामुळे नेमके सत्य म्हणजे काय याकडे आपले लक्षच जात नाही. पण ज्याचे लक्ष त्याकडे आहे त्याचा समाजात मोठा प्रभाव आहे असेही दिसत नाही. म्हणूनच या जगावर प्रभाव आहे तो खोट्या विद्येचा. हे ओळखण्यासाठी सक्षम असणारे आपले मन व बुद्धी आपल्याला हे समजून घेऊ देत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज देवाला हे कोडे सोडवण्याची विनंती करतात.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वैशाखात बहावा तू… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वैशाखात बहावा तू … ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

चैत्र घेऊन रे आला तुझ्या सुवर्ण रुपाला 

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला 

*

पोपटल्या पानामध्ये किरमीजी रे फुलोरा

नववधू भासतो रे हळदुला तुझा तोरा

राजवृक्ष म्हणती रे सोनवर्खिल्या तनाला 

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला 

*

कधी किरीट सोनेरी कधी वाटे कानडुला

तुझ्या संगती सजला चैत्रगौरीचा रे झुला 

पखरण झाडाखाली वसंत वैभव ल्याला

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला

*

किरणात कोवळ्याश्या तव् रुपाचा बहर 

सोन पिवळे झुंबर किती देखणे सुंदर

टपटप फुलवंती माझ्या खुलवते गाला

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला 

*

कर्णिकार झाला तू रे राम सीतेचा सांगाती 

आरग्वध, आरेवत, व्याधीवत तुझी ख्याती

सुवर्णक नी स्वर्णांग म्हणती तुझ्या वृक्षाला 

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला 

*

तुझ्या फुलमाळा मला शब्द सुर साथ देती

मंद सुगंधी झुळूक फुले कवेत रे घेती

गीत ओठावर येते संगीताचा नाद त्याला 

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares