मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 276 ☆ वारी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 276 ?

☆ वारी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

पंढरीच्या वाटे॥निघे वारकरी

भक्ती त्याची खरी ॥ पांडुरंगा॥

*

पाऊले थकली ॥ जड झाला जीव

 दैना ही थांबव ॥ देवा त्याची॥

*

“तुझ्या दारी आलो” ॥ म्हणे वारकरी

भिस्त त्याची सारी ॥ तुझ्यावरी ॥

*

जरी दुःखी कष्टी ॥ गरीब बिचारा

घाली येरझारा ॥ पंढरीला ॥

*

भोळा शेतकरी ॥ असे वारकरी

करतो चाकरी ॥ जमीनीची ॥

*

शेतमळा त्याचा ॥ राखी विठूराया

कर तू किमया ॥ वावरात ॥

*

याच साठी वारी ॥ कर त्याची मान्य

शेतातले धान्य ॥ टिको आता ॥

*

अवेळी पाऊस ॥ करी दाणादाण

जीणे हे भयाण ॥ विठ्ठला रे  ॥

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहिला पाऊस… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ पहिला पाऊस… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

(अष्टाक्षरी)

धुंद मंद गारा वारा

कडाडल्या त्या चपला

झाला अधर अधीर

घननीळ बरसला

*

माती माती कण कण

आलिंगन क्षणक्षण

सौभाग्याचे ते औक्षण

घेत हाती निरांजन

*

शांत झाली प्रेम सृष्टी

होता अनावर वृष्टी

बळीराजा झाला तुष्टी

प्रेमे भरे बीज ओटी

*

प्रेम क्षेम राधा धारा

मोर सृजन पिसारा

देई हाक राधा राधा

झाला कृष्ण का बावरा

*

नवं विध नवं धारा

सप्तरंगी त्याचा तोरा

नवं वधुस भेटता

चिंब चिंब गोरा मोरा

*

नवं रस नवं रूप

आज सृष्टीस लाभले

साता जन्माचे पुण्य

राती रतीस भेटले

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळजाची सावली… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ काळजाची सावली… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

(गझल)

तू दिलेल्या वचनांपुढे फिके पडतात ओठही

काळजाच्या सावलीत निर्धास्त होतो जीवही

 *

वाट पाहून कंटाळली पाखरे दोन डोळ्यांची

जीव आसावला मग भांबावला काहिली मनाची

 *

काळजाची सावली ती लुप्त झाली हृदयातली

सुरु झाली म्हणे अन् संपली माझ्या बहरातली

 *

जीव गमाया लागते सुंदर सुशील गाणे म्हणे

रानटी ऐश्वर्य माझे मी जपते जीवापाड म्हणे

 *

मी निखारे सर्व ॠतुंचे झेलले पदरात माझ्या

अजूनही धूसर वाट धूर करतो पदरात माझ्या

 *

तू नको अगतिक होऊ वैभवाच्या वर्तमानी

जाऊ दे पेटते निखारे सोड तू पदरात माझ्या.

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विठुरायाचे नामामृत… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

सुश्री प्राची जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ विठुरायाचे नामामृत… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

जन्मोजन्मी व्हावे वाटे

तुझिया चरणांचा दास

तुझ्याच दर्शनाची ओढ

हीच एक मनी आस

*

उभी ठाकलेली मूर्ती

रूप तिचे अती सुंदर

कर ठेऊनीया कटेवरी

पाय ठाकले विटेवरी

*

वाट पाही हा भक्तांची

असा हा सावळा सुंदर

भक्त असे धावती प्रेमात

आषाढवारीच्या मेळ्यात

*

वाटे असे भक्ताना

वारी घडावी निरंतर

दर्शन व्हावे डोळ्यांना

सुंदर आणि मनोहर

*

वारीची ओढ विलक्षण

भक्त अन देवालाही

भेटणे हे आसुसलेले

माया ही जीवाशिवाची

*

गळाभेट ही विठुरायाशी

द्वैत दोघांमधील संपवी

विठुरायाच्या अंतरीही

विट हलते प्रेमभावाची

*

मनामनात वाजे गजर

विठुरायाचा नामघोष

भक्त असे डोलत राहती

विठूरायाच्या नाममृतात….

विठूरायाच्या नाममृतात….

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे… ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे… ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

बळे बाह्यत्कारे संपादिले सोंग /

नाही झाला त्याग अंरीचा//१//

*

ऐसे येते नित्य माझ्या अनुभवा /

मनासी हा नवा समाचार//२//

*

जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी/

जातो विसरूनी सकळही//३//

*

प्रपंच्या बाहेरी नाही आले चित्त /

केले करी नित्य वेवसाव //४//

*

तुका म्हणे मज बहुरुप्याचेपरी /

जाले सोंग आता तैसे //५//

 – संत तुकाराम.

 *

रसास्वाद:

उसने अवसान आणून बाहेरून रूप बदलले. पण मनाकडून मनातली कुठलीच बाब त्यागली गेली नाही. हा मला आलेला नेहमीचा अनुभव आहे. माझ्या मनाला काही जागृती आली आहे हे माझ्या स्वप्नात ही येत नाही. मी सगळेच सोईस्करपणे विसरून जातो. माझ्या संसारात रमलेले माझे मन संसारातून, प्रपंचातून कधीच बाहेर निघत नाही. ते नेहमीच मी चालवलेल्या व्यवसायात गुंतून पडते, तेथेच रमते. पण मी जगाला दाखवण्यासाठी चांगुलपणाचे छानसे सोंग मात्र घेतलेले आहे.

तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे माझी स्थिती वरून किर्तन आतून तमाशा अशी झाली आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 181 – मनोज के दोहे ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपके “मनोज के दोहे। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 181 – सजल – एक-एक कर बिछुड़े अपने ☆

बेलन से रोटी बने, सदियों का औजार।

भूखे को भोजन मिले, किया बड़ा उपकार।।

 *

तन-निरोग मट्ठा करे, पिएँ सदा ही रोज।

नित प्रातः ही घूमिए, जी भर खाएँ भोज।।

 *

वर्षा ऋतु में ऊगती, हरियाली जब घास।

प्रकृति बिखेरे हरितिमा, स्वागत करती खास।।

 *

सत्ता की रबड़ी चखें, नेतागण बैचेन।

जनता स्वप्नों में जिए, तरसें उसके नैन।।

जिसके हाथों लग गई, रूठी गुमी बटेर।

किस्मत उसकी खुल गई, कभी न लगती देर।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #291 ☆ घरास जखमा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 291 ?

☆ घरास जखमा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आता पुन्हा नव्या तू देतो कशास जखमा

आधीच ठणकणाऱ्या होती चिरास जखमा

 

तू ठोकले घराला होते अनेक पाचर

केलेस वार इतके झाल्या घरास जखमा

 

पाण्यास वीज देते झटके अनेक वेळा

ही वीज कडकली अन केल्या ढगास जखमा

 

त्या आळ तर स्वतःवर घेण्या तयार नाही

शस्त्रा मधून कायम देतात त्रास जखमा

 

का वाटतात जखमा कोणा हव्या हव्याशा

काही इथे गुलाबी असतात खास जखमा

 

निर्जीव जे जगी या नाही म्हणे छळत हा

नव्हता जिवंत तो तर तरिही शवास जखमा

 

निर्भेळ दूध होते झाले असे कसे हे

हे दूध फाटले का झाल्या दुधास जखमा

 

शुल्लक जरी किटक हा देहास फार डसतो

छोट्या अनेक येथे देतोय डास जखमा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

पाऊस – – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सांगेल मला का कोणी आता पाउस येतो का खाली

काय घडूनी आकाशी या सर जोमाने सरसरली||

 *

भगिरथ यत्ने करता आली स्वर्गाची गंगा खाली

देवांनाही पाणी नुरले तृष्णा त्यांची ना शमली

भू मातेला विनवूनी मग पाणी नेले आकाशी

देवांसाठी भू माता आनंदे उधळे जलराशी||

 *

देवांचीही झाली सुविधा नुरली पाणी कमतरता

ऋण धात्रीचे देण्या त्यांच्या कंठी दाटे भावुकता

धात्रीचे देणे धात्रीला देण्या अर्घ्य तिला दिधले

कलशामधले पाणी भूवर पाउस होउन बघ आले||

देवांची ही करणी सुंदर भूलोकी शिकवण ठरली

तेव्हा पासुन भूलोकी पण अर्घ्य रूढी ही आली||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शाळा… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ शाळा… ☆ सुश्री त्रिशला शहा

निशब्द शांतता भरुन होती

वास्तु कशी ती स्तब्ध होती

नव्हता कसला दंगा नी गोंधळ

शाळेत नव्हती कसली लगबग

 *

जून महिना दारी आला

शाळेला नवा हुरुप आला

पाखरांचा किलबिलाट चालला

पटांगणावर खेळही रंगला

 *

नवी इयत्ता, नविन गणवेश

नविन पुस्तक, नविन दफ्तर

उत्साहाच जणू बांध फुटला

सुरू झाली ती शाळा आता

 *

बाकांचा आवाज चालला

टेबल खुर्चीचा नाद उमटला

भिंतींनाही आवाज फुटला

घंटेमधूनी आवाज निनादला

लगबग लगबग चालू झाली

शिक्षक, मुले गट्टी जमली

पुस्तकांची पाने उलटली

शाळा आता सुरू झाली

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिंडी… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ दिंडी ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(पंचाक्षरी)

 दिंडी चालली,

 दिंडी चालली,

 पंढरपुरी,

 दिंडी चालली!… १

 *

 वारकरी हे,

 धावच घेती!

विठू राउळी,

 वेगे पळती !… २

 *

 दिंड्या पताका,

 पालख्या किती!

 नाचत जाती,

 तीरावरती !… ३

 *

 वैष्णव मेळा,

 नाचतो, गातो!

 विठू चरणी,

 तल्लीन होतो!.. ४

 *

 राही विठ्ठल,

 खूश मंदिरी!

 आनंदे नाचे,

 सारी पंढरी!… ५

 *

 आनंद डोही,

 मनी माईना!

 वारीचे सुख,

 ‌देई जनांना !… ६

 *

 दिंडी चालली.. दिंडी चालली…

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares