माणसाचं मन जीवसृष्टीतल एक अजब रसायन आहे ते कधी कुणात एकजिनसी होऊन मिसळून एकरूप होऊन जाईल आणि कुणाशी बेइमानी करून कुणापासून कशासाठी फारकत घेऊन विभक्त होईल याचा काही नेम नाही. कारण ते चंचल अस्थिर, चपळ, चालाख आहे. याचा सर्वानी अनुभव घेतलेला असेलच. मना मुळेच मानवजातितील विवीधता, मतभिन्नता आवडीनिवडी, नितीमानता, आणि संतानी सांगितलेल्या शड्ररिपुंची देहावरची मजबूत पकड ठेवण्याच्या मनाच्या अफाट शक्तीचे धोरण सूक्ष्म निरीक्षणाने ध्यानात येते. मग माणूस आपल्यातला खरा माणूस शोधू लागतो. तो कोणाला किती सापडतो हे शोधणारालाच माहिती पडतं. पण ते सापडणं इतरांना सविस्तरपेणे सांगता येईल ही बाबही तशी अवघडच.
कारण जो तो मनाच्या या फाजील पणामुळेच आपल्याला राज समजून वागताना दिसतो राजासारखा पण जगतो चिंताग्रस्त माणसा सारखा. कारण त्याच मन त्याची कशी कधी फसगत करील हे त्यालाच माहीत नसतं. असलं हे लबाड, ढोंगी, आपमतलबी. निगरगटृठ, दिलदार, कपटी, रानटी, अडेलतट्टू, अशी बिरुदावली मिरवणार मन महा डांबीस असतं. ते ओढाळपणा करत माणसाला समाधनान निवांतपणे जगूच देत नाही. आणि स्वतःही मरत नाही. ते आपलं अधाशी बुभुक्षित स्वरूप एकवटून चिकाटीन जगतच रहातं. म्हणुनच माणसाला देवाने दिलेला शाप म्हणजे मनच आहे असं वाटू लागतं. तो शाप तहहयात सोसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माणसा पुढं. याच्या कचाट्यातून सुटण्याची बुद्धी माणसाला फारफार उशीरा सुचते तेव्हा सुटण्याची वेळ निघून गेलेली असते. मग आपली हतबलता लपवत माणूस आपल्याला आल़ेला अनुभव आपलं तत्वज्ञान म्हणून दुसऱ्यांना आग्रहान सांगत बसतो. ते ऐकणाराही तेव्हा त्याचं आवर्तनातून जात असतो. हीच खरी तर गंमत आसते जगण्यातली
किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या, फेसाळणाऱ्या लाटा पाहत मृणाल निवांत बसली होती. समोरच्या क्षितिजकडेवर मावळणाऱ्या सूर्यदेवांची लाल सोनेरी आभा तरंगत होती. आज कितीतरी वर्षांनी मृणालला तिच्या माहेरच्या व्याडेश्वर दैवताचं दर्शन घडलं होतं. धूप- उदबत्त्यांच्या सुवासात, समयांच्या शांत, मंद प्रकाशात त्या अनादी- अनंतापुढे नतमस्तक होताना तिचे डोळे आपोआप पाझरू लागले होते.
मृणालच्या थोडा बाजूला बसलेला फिरोज, छोट्या झरीनबरोबर वाळूचा किल्ला करण्यात रमून गेला होता. झरीनसारखाच निरागस, आनंदी दिसत होता तो.
‘बरं असतं बाबा या पारशी लोकांचं! मनमोकळी, साधी, स्वच्छ विचारसरणी आणि आयुष्याचा भरभरून आनंद घेण्याची वृत्ती’. मनातल्या या विचारांनी मृणालच्या ओठांवर हसू उमटलं.
‘ फिरोज पारशी. मग आपण कोण? फिरोजशी लग्न केल्याला आता तीस वर्ष होऊन गेली. ही आपली नात झरीन आता चार वर्षांची होईल. हातातल्या वाळूबरोबर गतकाळातल्या अनेक आठवणी मृणालच्या मुठीतून ओघळू लागल्या.
‘गोऱ्या-घाऱ्या, नाकेल्या, सुशिक्षित कुटुंबात आपला जन्म झाला. नऊवारी साडीतली, कपाळावर चंद्रकोर रेखणारी आई अजूनही त्याच रूपात आठवते. बाकी सारी भावंड आई-वडिलांना शोभेशी. आपल्यावर मात्र निसर्गाने अन्याय केला. कसं कोण जाणे, पण नाकावर म्हशीने पाय द्यावा तसं नकट्यापेक्षाही नकटं नाक जन्मतःच आपल्या वाट्याला आलं. श्वास घेण्याची दोन भोकं तेवढी चेहऱ्यावर दिसायची. लहानपणापासून लोकांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि कीव पाहत आपण मोठे झालो. कित्येकदा आईच्या ओच्या- पदराचा तोंड लपवायला आणि मनसोक्त रडायला उपयोग केला. घरात कुणीच आपल्याला दुखावत नसे पण आरसा म्हणजे वैरी झाला होता.
नशिबाने शाळेत चित्रेबाई भेटल्या. त्यांनी आपल्याला खूप समजावलं. वाचनाची गोडी लावली. स्वतःतल्या चांगल्या गुणांकडे बघायला शिकवलं. हळूहळू मनावर दाटलेलं मळभ नाहीसं झालं. समाजात आत्मविश्वासानं वावरता येऊ लागलं. आजूबाजूला आपल्यापेक्षा अधिक व्यंग असलेली माणसं दिसायला लागली आणि दैवदत्त दान शांतपणे स्वीकारण्याचा शहाणपणा आला. स्वभाव आपोआप सहनशील झाला. बी. कॉम. झाल्यावर चांगल्या बँकेत नोकरी लागली, पण लग्नाच्या बाजारात घोडं अडलेलंंच राहिलं. लहान- मोठ्या सगळ्या भावंडांची लग्न झाली. वयानं तिशी ओलांडली. आई- बाबांची खंत आणि आपल्या लग्नाचे प्रयत्न संपत नव्हते.
एक दिवस आपण नेहमीप्रमाणे फिरोजच्या केबिनमध्ये कामासाठी गेलो होतो. हा अविवाहित, सज्जन, पारशी बॉस त्याच्या हसतखेळत काम करण्याच्या वृत्तीमुळे सगळ्यांचा आवडता होता. ‘टेन्शन नई लेवानू. काम थई जसे. ‘ असा त्याचा सर्वांना आश्वस्त करणारा मंत्र होता. आपल्याला बसायला सांगून फिरोजने आपण पुढे केलेलं रजिस्टर बाजूला सारलं आणि म्हणाला, ‘घणा दिवसथी तने एक वात पुछवी हती, पुछूं के? ‘ प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिल्यावर तो पटकन म्हणाला, ‘मृणाल, विल यू मॅरी मी? ‘
फिरोजच्या या अनपेक्षित प्रश्नाने आपण एकदम दचकलो. फिरोज म्हणाला, ‘ टेक इट इझी. तू विचार कर. मला घाई नाही. तुझा शांत, समंजस स्वभाव, कामातलं कौशल्य कौतुक करण्यासारखं आहे. तू मला मनापासून आवडली आहेस, म्हणून मी तुला प्रपोज केलं आहे. काही कारणाने तू माझं प्रपोजल नाकारलंस, तरी माझी ही ऑफर मी कुणालाही कळू देणार नाही याबद्दल खात्री बाळग. थिंक इट ओव्हर अँड लेट मी नो, आय विल वेट फॉर युवर रिप्लाय. ‘
अंतर्बाह्य थरथरत आपण फिरोजच्या केबिनमधून बाहेर आलो. या दृष्टीने आपण कधी फिरोजचा विचारच केला नव्हता. मनात प्रचंड उलघाल सुरू झाली. फिरोज सर्वार्थाने चांगला होता, पण… पारशी. मनाचा हिय्या करून आपण ही गोष्ट रेखा आणि अनघाच्या- आपल्या खास मैत्रिणींच्या- कानावर घातली.
‘अरे वा! छान! अभिनंदन! चांगला आहे फिरोज. एक लक्षात घे, तुझ्या घरच्यांसाठी आणि बाकीच्यांसाठी ही शॉकिंग न्यूज असेल. तरी पण तू तुझ्या आयुष्याचा विचार करावा. फिरोजची ऑफर म्हणजे तुझ्यासाठी एक चांगली संधी आहे. तुझं आयुष्य मार्गी लागेल. लग्नानंतर माहेरची माणसं तर तुला दुरावतीलंच पण फिरोजच्या घरीही तुझा स्वीकार व्हायला वेळ लागेल. या साऱ्या परिणामांची मानसिक तयारी ठेव. ‘ रेखाने हे अवघड गणित सोडविण्यासाठी आपल्याला मदतीचा हात दिला.
॓आणि हे बघ लोकं काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नकोस. एक वेगळी घटना म्हणून काही दिवस त्यावर चर्चा होईल मग दुसरी वेगळी बातमी आली की लोक ती बातमी चघळंत बसतील. तुला माहित आहे की मी जॉर्जशी लग्न करायचं ठरवल्यावर सगळ्या नातेवाईकात मित्र मैत्रिणी खळबळ उडाली होती. आमच्या वाडीत राहणारा, लहानपणापासून आमच्याबरोबर खेळणारा जॉर्ज सर्वांना माहीत होता. पण मराठी मुलीचे ख्रिश्चन मुलाशी लग्न ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. माझ्या घरच्यांच्या मला पूर्ण पाठिंबा होता म्हणून सारं निभावलं. कालांतराने बाकीच्यांचा विरोधी मावळत गेला.
‘फिरोजचं प्रपोजल चांगलं आहे. गो अहेड. फक्त तुला घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं लागेल आणि मन घट्ट करावं लागेल. ही पारशी माणसं बाकी उदार, प्रेमळ असली तरी धार्मिक बाबतीत अगदी कर्मठ असतात. त्यांच्या अग्यारीत तुला प्रवेश मिळणार नाही. तसं बघितलं तर आपणही देवळात किती वेळा जातो? आता तुझी तिशी होऊन गेली. एकटीने आयुष्य काढण्यापेक्षा तुलाही तुझं हक्काचं माणूस, घरदार मिळेल. धाकट्या भावाला विश्वासात घे. आम्हाला वाटतं की तू या प्रपोजलचा जरूर विचार करावा. ‘अनघानेही आपल्याला ग्रीन सिग्नल दिला.
मैत्रिणींच्या सल्ल्याने आपल्याला धीर आला. मार्ग सापडला. फिरोजबरोबरच्या रजिस्टर्ड लग्नाला या दोघी मैत्रिणी आणि धाकटा भाऊ हजर होते. आई-बाबांनी नाईलाजाने मूक संमती दिली होती. लग्नानंतर दोन्हीकडचा समाज काही काळ ढवळून निघाला. मग परवेजच्या जन्मानंतर सारं स्थिरस्थावर झालं. परवेजच्या ‘नवजोत’ समारंभाला तर माहेरची खूप माणसं आली होती. सगळ्यांनी त्या समारंभात परवेजच्या टिपिकल पारशी दिसण्याचं आणि आपलं खूप कौतुक केलं. सकाळी अग्यारीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी आपण अग्यारीच्या पायऱ्यांवर बसून डोळ्यात दाटलेले ढग अडवून ठेवले होते. संध्याकाळी माहेरच्या प्रेमळ गराड्यात डोळ्यात दाटलेले ढग आनंदाश्रूंमध्ये विरघळून गेले.
झरीनच्या आवाजाने मृणाल तंद्रीतून बाहेर आली. समुद्रावर फिरायला गेलेले परवेज आणि शिरीन परत येताना पाहून झरीन आनंदाने त्यांच्याकडे पळत गेली आणि हात धरून आई-बाबांना किल्ला दाखवायला घेऊन आली. हॉटेल मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परवेज फ्रान्सला गेला होता. तिथे त्याला शिरीन भेटली. लग्न झाल्यावर पाच वर्षांसाठी त्यांनी फ्रान्समध्येच जॉब करायचं ठरवलं आहे. थोडी सुट्टी घेऊन दोघं आली आहेत म्हणून तर हा कोकण ट्रिपचा कार्यक्रम आपण जमवला.
दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला जाताना, दोन्ही बाजूंच्या मागे पळणाऱ्या झाडांसारखं मृणालचं मन मागे पळालं. परवेजच्या जन्मानंतर आपण नोकरी सोडली तरी अनघा, रेखा आणि आपण महिन्यातून एकदा तरी गप्पांची मैफिल जमवतो. अशाच एका मैफलीत बोलता बोलता अनघा म्हणाली, ‘मृणाल तुझ्या मैत्रीचा खरंच अभिमान वाटतो आम्हाला. किती शांतपणे, सहज निभावतेस तू आयुष्यातले सारे प्रसंग! ‘
‘आजचं हॉटेलचं बिल मी द्यायचं आहे का? ‘ या आपल्या मिश्किल प्रश्नावर हास्यलहरी उठल्या. रेखा म्हणाली, ‘ एक छोटसं वादळ आलंय आमच्याकडे. त्याला तुझ्या पद्धतीने तोंड द्यायचं ठरवलंय. आमचा संदेश जर्मनीत राहतो हे तुम्हाला माहित आहे. त्याने त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीशी लग्न करायचं ठरवलं आहे. ही मुलगी आहे भारतीय, पण एका अनाथाश्रमात वाढलेली आहे. अर्थातच आमच्या साने कुटुंबात हे लग्न कुणालाच पसंत नाही.
‘अगं, काळ कितीही पुढे गेला तरी समाजमन बदलायला खूप वेळ लागतो. आपली तरुण पिढी प्रॉमिसिंग आहे. त्यांचं वागणं आणि विचार अगदी प्रॅक्टिकल असतात. भूतकाळात रेंगाळायला त्यांना आवडत नाही. आपण त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि असं वेगळ्या वाटेवरून जाताना त्या मुलांनाही टेन्शन असतं. अशावेळी आई-वडिलांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं की समाजातल्या अर्ध्या लोकांची वायफळ बडबड थांबते आणि मुलांनाही आधार वाटतो. ‘आपण रेखाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
”हो. असाच विचार करून आम्ही दोघांनीही घरच्यांची नाराजी पत्करून संदेशच्या लग्नासाठी जर्मनीला जायचं ठरवलं आहे. ‘
॓ ‘॓व्हेरी गुड. अभिनंदन. ‘अनघानेही दुजोरा दिला.॔
॓बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि आज हॉटेलचं बिल मी देणार बरं का! सुनबाईंचे स्वागत म्हणून! रेखा म्हणाली.॔ त्यावर आपण आणि अनघाने हसून दाद दिली.
मुक्कामाचं हॉटेल आलं आणि मृणाल तिच्या आठवणीतून बाहेर आली. हॉटेलमधलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण सर्वांना आवडलं. मनपसंत जेवून गाढ झोपलेल्या मृणालला मोबाईलच्या आवाजाने जाग आली. डोळे उघडून तिनं पाहिलं तर, फिरोज रूमच्या बाल्कनीत असलेल्या छोट्या झोपाळ्यावर बसून ‘टाइम्स’ वाचत होता. फोनवर अनघा होती. अनघाला ॓हॅलो॔ ॔म्हणताना मृणालच्या मनात आलं, ॓आपल्या कोकण ट्रिपचे फोटो कालच आपण व्हाट्सॲप वर टाकले आहेत.. काय बरं अर्जंट काम असावं अनघाचं?
॓अगं रिटायरमेंटनंतर काहीतरी चांगले कार्यक्रम बघावेत, नवीन ओळखी व्हाव्या म्हणून आत्ता दुपारी मी आमच्या जवळच्या एका नावाजलेल्या महिला मंडळात सभासद होण्यासाठी गेले होते तर त्यांनी माझी मेंबरशिप चक्क नाकारली. कारण माझं आडनाव फर्नांडिस आहे ना, म्हणून! माझ्याबरोबर आलेल्या मैत्रिणीनं त्यांना माझं लव्ह मॅरेज, माझी मराठी कार्यक्रम बघण्याची आवड, मराठी वाचन सारं सांगितलं. त्यांना माझी बाजू पटत होती पण त्यांचे नियम आड येत होते. तू नेहमी म्हणतेस ना की समाजामध्ये आधीच खूप ताणतणाव आहेत. त्यात आपण भर घालू नये. तडजोडीचा मार्ग स्वीकारावा. ते आठवून मी अगदी शांतपणे त्यांच्याशी बोलत होते. नियमाप्रमाणे त्यांचं बरोबर होतं. आणि कालबाह्य नियम बदलायला हवेत हेही त्यांना पटत होतं. मी त्यांना माझ्या माहेरच्या नावानं सभासदत्व दिलं तरी चालेल असे सांगितलं. बघूया त्यांच्या पुढील मीटिंगमध्ये काय ठरते ते. मी एकदम खूप अस्वस्थ झाले म्हणून तुला फोन केला. तू आल्यावर बोलूया परत. एन्जॉय युवर ट्रिप.॔
फोन बंद केल्यावर मृणालच्या मनात उलट सुलट विचारांनी गर्दी केली ज्ञानविज्ञानाने माणसाची भौतिक प्रगती झाली पण माणूस म्हणून त्याची वाटचाल उलट दिशेने होते आहे का? काळ कोणताही असो, स्त्रीपुढचे प्रश्न संपत नाहीत. त्यांचं स्वरूप बदलतं एवढंच. या अफाट विश्वात प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग कोण ठरवत असेल? प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, समस्या वेगळ्या. आपल्या शेजारच्या झोपाळ्यावर जोडीदार म्हणून कोण असेल? की मनासारख्या जोडीदाराची वाट पाहात राहावी लागेल? आपलं फिरोजबरोबरच लग्न ही घटना अतर्क्यच नाही का? सारे देव सारखेच असं आपण म्हटलं तरी आपल्यालाही व्याडेश्वर दर्शनाचीच आस का लागली होती? अनपेक्षित घटना आणि अनुत्तरित प्रश्न यांना गृहीत धरून एकदाच मिळालेल्या या मनुष्यजन्माचा आनंद घेणं श्रेयस्कर नाही का?॔ मृणालच्या मनात विचारांचे आवर्तन उठले होते.
मृणालला उठलेली पाहून फिरोज बाल्कनीतून रूममध्ये आला. गंभीर चेहऱ्याने हातात मोबाईल धरून बसलेल्या मृणालकडे पाहून म्हणाला,
“एनी प्रॉब्लेम? ”
“नाही रे. नेहमीचंच. चहाच्या पेल्यातलं वादळ. चल,! चहा पिता पिताच सांगते तुला काय झालं ते. ”
“ओके! नो प्रॉब्लेम….. ” फिरोज हसत हसत म्हणाला. त्याला हसून साथ देत मृणालही उठली.
☆ “एक अस्वस्थ करणारे वास्तव…” – लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆
एक अस्वस्थ करणारे वास्तव
– – – डॉक्टरांचे अकाली मृत्यू आणि आधुनिक वैद्यकीय क्षेत्रापुढील यक्षप्रश्न…
“डॉक्टर, तुम्ही तर आमचे प्राण वाचवले! ” असे म्हणत रुग्ण जेव्हा डॉक्टरांचे आभार मानतो, तेव्हा त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य असते. पण, दुर्दैवाने आज चित्र बदलत आहे. दुसऱ्याचे आयुष्य वाढवणारा, समाजाला आरोग्याचा मंत्र देणारा ‘आरोग्य रक्षक’च आज अकाली मृत्यूच्या जाळ्यात ओढला जात आहे. सध्या वैद्यकीय वर्तुळात एक अतिशय वेदनादायक घटना वारंवार घडताना दिसते—एखादा तरुण, तडफदार डॉक्टर, जो कालपर्यंत परिषदांमध्ये उत्साहाने सहभागी होत होता, हसत-खेळत होता, तो अचानक एका रात्रीत हे जग सोडून जातो. ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (Sudden Cardiac arrest) किंवा हृदयविकाराचा तीव्र झटका हे आज वैद्यकीय क्षेत्रातील मृत्यूंचे सर्वात मोठे कारण बनले आहे. ज्या वेगाने आपण आपले सहकारी आणि मित्र गमावत आहोत, ते पाहता आता यावर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर गंभीर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. धक्कादायक आकडेवारी व वास्तव: काय सांगते?
समाजातील सामान्य व्यक्तीपेक्षा डॉक्टरांचे आयुष्य अधिक असावे, असा आपला एक समज असतो. कारण त्यांना रोगांचे ज्ञान असते. पण, संशोधनातून समोर आलेले सत्य अत्यंत धक्कादायक आहे.
१) केरळमधील संशोधन: केरळमध्ये डॉक्टरांच्या मृत्यूदराचा तब्बल १० वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यातून असे सिद्ध झाले की, सामान्य जनतेच्या तुलनेत डॉक्टरांचे आयुष्य सरासरी १३ वर्षांनी कमी आहे.
२) आयएमए (IMA) पुणे अहवाल: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने सुमारे १५, ००० डॉक्टरांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्यांचा निष्कर्षही असाच भयावह होता—डॉक्टरांचे आयुष्य सर्वसामान्यांपेक्षा १० ते १५ वर्षांनी कमी होत चालले आहे. प्रश्न हा उरतो की, असे का घडतेय? रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल का लागत नाही?
डॉक्टरांचे आयुष्य कमी होण्यामागे केवळ एकच कारण नाही, तर तो अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम (Cumulative Effect) आहे.
डॉक्टरांच्या अकाली मृत्यूची ५ प्रमुख कारणे
१. निसर्गाच्या विरोधात काम – (Biological Clock Disruption) निसर्गाने मानवी शरीराचे एक घड्याळ (Circadian Rhythm) निश्चित केले आहे. दिवसा काम आणि रात्री विश्रांती हे त्याचे सूत्र आहे. मात्र, वैद्यकीय पेशात या सूत्राचा बळी जातो.
* डॉक्टरांना आठवड्याला ५०, ६० किंवा अनेकदा ७० तासांपेक्षा जास्त काम करावे लागते.
* प्रशिक्षण काळात आणि त्यानंतरही सलग २४-२४ तास ड्युटी करावी लागते.
* रात्रपाळी (Night Shifts) आणि अपुरी झोप यामुळे शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) बिघडते. यामुळे शरीरात ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ तयार होतो, जे पुढे जाऊन मधुमेह आणि हृदयविकाराचे मूळ कारण बनते.
२. तणावाचा स्फोट (High Stress Levels)आज डॉक्टर केवळ रुग्ण तपासत नाहीत, तर ते एका प्रचंड मानसिक दबावाखाली असतात.
* निर्णय घेण्याचा ताण: आपत्कालीन स्थितीत एका सेकंदात घेतलेला निर्णय रुग्णाचा जीव वाचवू शकतो किंवा गमावू शकतो. हा तणाव सतत मनावर असतो.
* कायदेशीर आणि सामाजिक दबाव: “रुग्णाला काही झाले तर डॉक्टर जबाबदार, ” ही समाजाची मानसिकता आणि त्यातून उद्भवणारे कायदेशीर खटले (Consumer Protection Act) यामुळे डॉक्टर सतत दहशतीखाली असतात.
* या तणावामुळे शरीरात अडरिणालीन(adrenalin) व कार्टीसोल (cortisol)ही हार्मोन्स शरीरात सतत वाढलेली राहतात. त्याचा हृदयावर प्रचंड ताण येतो व तो घातक असतो. आपत्कालीन परिस्थितीत असे होते पण जेव्हा तसे वारंवार होते, तेव्हा रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके खूप वाढून अनियमित आणि अनियंत्रित होतात(ventricular fibrilation) व अचानक हृदयाचे स्पंदन थांबते, आणि कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest)होतो, त्यामुळे मेंदूचा रक्त प्रवाह थांबतो व मृत्यू ओढवतो.
वास्तव असे आहे की, डॉक्टर स्वतः सर्वात वाईट रुग्ण असतात.
* छातीत दुखले तरी “अॅरसिडिटी असेल” म्हणून दुर्लक्ष करणे.
* स्वतःची नियमित तपासणी (Check-up) टाळणे.
* “मला काही होणार नाही, ” हा फाजील आत्मविश्वास बाळगणे.
३) बिघडलेली जीवनशैली आणि आहार – कामाच्या व्यापात डॉक्टरांच्या जेवणाच्या वेळा निश्चित नसतात.
* दुपारचे जेवण संध्याकाळी आणि रात्रीचे जेवण मध्यरात्री घेणे.
* ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर पटकन भूक भागवण्यासाठी वडापाव, समोसा किंवा जंक फूड खाणे.
* व्यायामाचा पूर्ण अभाव.
या दुर्लक्षामुळे जेव्हा आजार समजतो, तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. या सवयींमुळे ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ (Metabolic Syndrome) जडतो—ज्यात उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि लठ्ठपणा हे चारही शत्रू एकत्र येतात.
४) व्यसनाधीनता हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे की, काही प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रातही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. तणाव कमी करण्यासाठी (Stress Buster) म्हणून सुरू झालेले व्यसन शेवटी हृदयाचा घात करते.
५) आता वेळ आली आहे बदलाची! जर आपल्याला समाजाचे आरोग्य टिकवायचे असेल, तर आधी डॉक्टरांना जगावे लागेल. यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे:
* नियमित ‘फिटनेस ऑडिट’: वयाच्या पस्तीशीनंतर किंवा चाळीशीनंतर प्रत्येक डॉक्टरने स्वतःची सखोल आरोग्य तपासणी (Cardiac Profile, TMT, Lipid Profile) वर्षातून एकदा करणे बंधनकारक करावे.
* ‘नो’ म्हणायला शिका: कामाचा अतिरेक होत असेल तर त्याला नकार देण्याची हिंमत ठेवा. कामाचे तास मर्यादित करा आणि विश्रांतीला प्राधान्य द्या.
* कुटुंबाला वेळ द्या: रुग्णालयाच्या बाहेरही एक जग आहे. आपले कुटुंब, मित्र आणि छंद यांच्यासाठी वेळ काढा. हा ‘क्वॉलिटी टाइम’ तुमचा मानसिक तणाव निम्म्याने कमी करतो.
* व्यायाम हाच धर्म: दिवसातील किमान ४५ मिनिटे स्वतःच्या शरीरासाठी द्या. चालणे, योगासने किंवा ध्यानधारणा (Meditation) याला पर्याय नाही.
निष्कर्ष आयुष्य किती अनिश्चित आहे, हे आपण दररोज आपल्या रुग्णांच्या रूपाने पाहतो. तरीही आपण स्वतःला अमर समजण्याची चूक करतो.
आपण १०० वर्षांचे नियोजन करतो, घरांचे हप्ते भरतो, मुलांच्या भविष्याची चिंता करतो; पण पुढच्या क्षणी श्वास सुरू राहील की नाही, याची कुणालाच खबर नसते.
म्हणूनच, सर्व डॉक्टर मित्रांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना माझे कळकळीचे आवाहन आहे— दुसऱ्यांची हृदये सांभाळताना, स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकायला विसरू नका. डॉक्टर निरोगी राहिला, तरच समाज निरोगी राहील!
एका प्रसिद्ध शायरने म्हटले आहे:
“आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं,
सामान सौ बरस का है, पल की खबर नहीं… “
लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
टागोरांच्या कुटुंबात अनेक सुप्रसिद्ध चित्रकार होते. मात्र रविंद्रनाथांनी वयाच्या पन्नाशीनंतर चित्रं काढायला सुरवात केली. तरीही त्यांनी जवळ जवळ १५ वर्षांच्या कालावधीत अंदाजे २३०० कलाकृती निर्माण केल्या होत्या. त्यांचे कथासंग्रहदेखिल समर्पक चित्रांनी सजवलेले असत.
कलेच्या अभ्यासकांच्या मते टागोरांची चित्रं Art Nouveau या कलाप्रकारामुळे जगापर्यंत पोहोचली. Art Nouveau ही एक कला चळवळ होती. त्यात लोककलेचं मोठ्या प्रमाणात चित्रण असायचं.
१९३० मध्ये टागोरांची ३०० चित्रं असलेली प्रदर्शने युरोपात लंडन, पॅरिस व बर्लिन मधे भरवण्यात आली होती.
त्यांनी आपली अनेक चित्रं निरनिराळ्या कलासंग्रहालयांना भेट दिली होती. बर्लिनच्या नॅशनल गॅलरीला १०० एक पेंटिंग्ज त्यांनी भेट दिली होती. त्यातील अनेक पेंटिंग्स नंतर लंडनमधील संग्रहालयात गेली. जी पाच चित्रं बर्लिनच्या संग्रहालयात शिल्लक होती, त्यात पक्ष्यांची आणि माणसांची चित्रं होती, पैकी एक लाल रोबमध्ये असलेल्या मुलीचंही चित्र होतं. ही चित्रं त्यांनी शाई आणि पाण्याच्या रंगाने काढली होती. असं म्हणतात की नाझींनी ही चित्रं तिथून काढून टाकली. कांही लिलावात खाजगी संग्राहकांना दिली असावीत. कांही चित्रं टागोरांना परत पाठवली असावीत. शेवटी त्यांचं फक्त एकच चित्र बर्लिन येथील संग्रहालयात शिल्लक राहिलंय, हे मात्र खरं!
—–
☆ गीत ४० ☆
THE rain has held back for days and days, my God, in my arid heart. The horizon is fiercely naked ⎯ not the thinnest cover of a soft cloud, not the vaguest hint of a distant cool shower.
Send thy angry storm, dark with death, if it is thy wish, and with lashes of lightning startle the sky from end to end.
But call back, my lord, call back this pervading silent heat, still and keen and cruel, burning the heart with dire despair.
Let the cloud of grace bend low from above like the tearful look of the mother on the day
WHERE dost thou stand behind them all, my lover, hiding thyself in the shadows? They push thee and pass thee by on the dusty road, taking thee for naught. I wait here weary hours spreading my offerings for thee, while passers by come and take my flowers, one by one, and my basket is nearly empty.
The morning time is past, and the noon. In the shade of evening my eyes are drowsy with sleep. Men going home glance at me and smile and fill me with shame. I sit like a beggar maid, drawing my skirt over my face, and when they ask me, what it is I want, I drop my eyes and answer them not.
Oh, how, indeed, could I tell them that for thee I wait, and that thou hast promised to come. How could I utter for shame that I keep for my dowry this poverty. Ah, I hug this pride in the secret of my heart.
I sit on the grass and gaze upon the sky and dream of the sudden splendour of thy coming ⎯ all the lights ablaze, golden pennons flying over thy car, and they at the roadside standing agape, when they see thee come down from thy seat to raise me from the dust, and set at thy side this ragged beggar girl a-tremble with shame and pride, like a creeper in a summer breeze.
But time glides on and still no sound of the wheels of thy chariot. Many a procession passes by with noise and shouts and glamour of glory. Is it only thou who wouldst stand in the shadow silent and behind them all? And only I who would wait and weep and wear out my heart in vain longing?
EARLY in the day it was whispered that we should sail in a boat, only thou and I, and never a soul in the world would know of this our pilgrimage to no country and to no end.
In that shoreless ocean, at thy silently listening smile my songs would swell in melodies, free as waves, free from all bondage of words.
Is the time not come yet? Are there works still to do? Lo, the evening has come down upon the shore and in the fading light the seabirds come flying to their nests.
Who knows when the chains will be off, and the boat, like the last glimmer of sunset, vanish into the night?
“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे की चिंटूच्या समोर तुझी ती गावंढळ भाषा बोलू नकोस. उद्या त्याचा ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस ’, ‘बारा हाय न्हवं ’ किंवा ‘राम-राम’ म्हटलं ना, तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही, स्टेटस आणि क्लास बघतात! ”
समीरने आपल्या आई कावेरीवर चिडत म्हटलं. गावाहून आलेल्या कावेरीदेवी शुद्ध देशी बोली बोलत होत्या. मुलाच्या शब्दांनी त्या शांत झाल्या. त्यांनी पोटलीतून काढलेले लाडू परत आत ठेवले.
पोऱ्याला आपल्या हातचे लाडू खाऊ घालावेत, भरभरून आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती, पण मुलाच्या ‘स्टेटस’पुढे त्यांची माया दडपली गेली…
समीर आणि त्याची पत्नी रिया मागच्या महिनाभरापासून आरव (चिंटू) कडून पोपटासारखं पाठ करून घेत होते –
“Say Hello”, “Say Good Morning”, “My name is Aarav. ”
घराचं वातावरण एखाद्या मिलिट्री ट्रेनिंगसारखं झालं होतं. कावेरीदेवींना कडक सूचना होती – इंटरव्ह्यू होईपर्यंत आरवपासून दूर राहायचं!
इंटरव्ह्यूचा दिवस :
शहरातील सर्वात प्रतिष्ठित शाळा. सगळीकडे इंग्रजीत संवाद. समीर-रिया तणावात.
प्रिन्सिपल मिस्टर डिसूझा यांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यू सुरू झाला.
आरवने रटलेली उत्तरे व्यवस्थित दिली. समीरच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.
अचानक प्रिन्सिपलने विचारलं,
“बेटा, घरी एखादा मोठा पाहुणा आला किंवा आजी-आजोबांना भेटलास तर काय करतोस? ”
समीरचं हृदय धडधडलं. हे तर शिकवलंच नव्हतं!
आरव शांतपणे खुर्चीवरून उतरला… प्रिन्सिपलकडे गेला… वाकून त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला—
“परनाम गुरुजी! राम-राम! ”
क्षणभर संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली…
प्रिन्सिपल जोरात हसले आणि आरवला मांडीवर बसवलं.
“मिस्टर समीर, ” ते म्हणाले,
“आज सकाळपासून पन्नास मुलं आली. सगळे रोबोटसारखे ‘हाय-हॅलो’ म्हणत होते. पण तुमच्या मुलाने जे केलं, ती आपली संस्कृती आहे. हे संस्कार पुस्तकात मिळत नाहीत. ”
आरव आनंदाने म्हणाला,
“माझी आजी शिकवते! ती म्हणते – विद्या विनय देते, आणि सर्वात मोठं शिक्षण म्हणजे नम्रता. ”
प्रिन्सिपल म्हणाले,
“भाषा संवादाचं साधन आहे, लाजेचं कारण नाही. तुमच्या आईंना माझा नमस्कार सांगा. तुमचा मुलगा त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे निवडला गेला आहे. ”
घरी पोहोचताच समीर आईजवळ गेला. कावेरीदेवी तुळशीपाशी बसल्या होत्या.
समीर त्यांच्या चरणी नतमस्तक झाला.
“आई, मला माफ कर. झाड कितीही उंच झालं तरी मुळांपासून तुटलं तर सुकतंच. ”
त्या दिवशी समीरला उमगलं—
सूट-बूट आणि इंग्रजीने आपण ‘मॉडर्न’ होऊ शकतो, पण ‘माणूस’ संस्कारांनीच बनतो.
त्या संध्याकाळी समीर घरात येताना म्हणाला—
“राम-राम, आई. ”
कावेरीदेवींच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित कोणत्याही डिग्रीपेक्षा मौल्यवान होतं.
कथासार:
आधुनिक होणं चुकीचं नाही, पण आपल्या मुलांना, भाषेला आणि वडीलधाऱ्यांना विसरणं ही सर्वात मोठी चूक आहे.
इंग्रजी एक भाषा आहे, कौशल्य आहे. पण मातृभाषा आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहेत.
तुमच्यासाठी प्रश्न:
आजची पिढी इंग्रजीच्या मागे लागून आपल्या संस्कारांपासून दूर जात आहे, असं तुम्हाला वाटतं का?
घरात मातृभाषा बोलण्यावर भर द्यायला हवा का?
* * * *
लेखिका : ज्योति निंबाळकर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ “द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन” – लेखक : थॉमस एम. स्टर्नर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन
लेखक : थॉमस एम. स्टर्नर
मूल्य: २५०₹
मन भटकतंय? लक्ष लागत नाही? काम अर्धवट राहतात?
– – यश मिळत नाही कारण मेहनत कमी आहे… असं नाही!
खरं कारण आहे — सरावाची चुकीची मानसिकता.
द प्रॅक्टिसिंग माइंड हे पुस्तक यश, एकाग्रता आणि कौशल्य विकास यामागील सर्वात महत्त्वाचा घटक — सातत्यपूर्ण सराव (Practice) — यावर आधारित आहे. लेखक सांगतो की आपण बहुतेक वेळा अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे ताण, अधीरता आणि अपयशाची भीती वाढते. पण जर आपण प्रक्रियेवर प्रेम करायला शिकलो, तर यश आपोआप मिळते.
हे पुस्तक “परिणामाऐवजी प्रक्रियेचा आनंद घ्या” हा साधा पण प्रभावी जीवनमंत्र शिकवते.
मुख्य संकल्पना
Present Moment Awareness — वर्तमान क्षणात काम करण्याची सवय.
Process over Result — परिणामापेक्षा सराव महत्त्वाचा.
Patience Development — संयम ही शिकता येणारी कौशल्य आहे.
Mental Discipline — मनाला प्रशिक्षित करता येते.
Small Consistent Steps — छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मोठं यश.
पुस्तकाची वैशिष्ट्ये ––
– – भाषा अतिशय सोपी व समजण्यासारखी.
– – दैनंदिन जीवनातील उदाहरणांमुळे संकल्पना लगेच समजतात.
– – विद्यार्थ्यांपासून कलाकार, खेळाडू, व्यावसायिक — सर्वांसाठी उपयुक्त.
– – आत्मविकासाकडे शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन.
हे पुस्तक “Hard Work” पेक्षा “Right Mindset” कसं महत्त्वाचं आहे हे शिकवतं. यश हे एका मोठ्या उडीने नाही तर दररोजच्या छोट्या सरावातून तयार होतं — ही जाणीव हे पुस्तक प्रभावीपणे करून देते.
– – स्वतःला घडवायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे।
आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – “बे गुस्सा सें हेरत जा रय“।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १४० – बुन्देली कविता – “बे गुस्सा सें हेरत जा रय“☆ आचार्य भगवत दुबे