रात्री आठवणीनं आणलेला केक स्वतःला भरवताना विचारचक्र सुरु झालं.
“आनंदीबाई, आतापवतो तब्येतीनं छान साथ दिलीय. डायबेटीस, बीपी हे पाहुणे अजून तरी लांबच आहेत. आज त्रेचाळीस पूर्ण, लवकरच पन्नास मग साठ
बाप रे, इतकं आयुष्य नको.
हातीपायी धड आहे तेव्हाच कारभार उरकलेला बरा. त्यातही झोपेतच झालं तर सोन्याहून पिवळं. आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही. पुढेही नको. पुन्हा एकदा हॅपी बड्डे टु मी. ”आरशात पाहत स्वतःला भरभरून शुभेच्छा दिल्या.
—
खूप वर्षापूर्वी आई-वडील गेले.
तेव्हापासून एकटीच.
भाऊ-बहीण नाही.
जबाबदारी नको म्हणून नातेवाईकांनी अंतर राखलं.
ओळखी खूप आहेत परंतु मित्र-मैत्रिणी नाहीत.
लग्नाचा योग नव्हता.
एकदोन अनुभवानंतर त्या वाटेला परत गेले नाही.
असो.. जाऊ दे.
निदान आजतरी हे रडगाणं नको.
माझं जग फार छोटं.
राहती खोली आणि छोटी टपरी,
दोन्ही आई-वडिलांकडून मिळालेलं.
टपरी म्हणजे माझा जीव की प्राण…
कमाईचे एकमेव साधन.
सकाळी नऊ ते रात्री नऊ तिथचं.
२० वर्षे एकच रुटीन.
एकटेपणाची इतकी सवय झाली की आता सोबतीची भीती वाटते.
तशी मी एककल्ली, फटकळ, तापट स्वभावाची.
कोणाचाही मुलाहिजा न राखता बोलणारी,
खडूस, भांडखोर, फाटक्या तोंडाची म्हणून कुप्रसिद्ध..
म्हणूनच सगळे चार हात अंतर राखून.
खरं सांगायचं तर मी अशी नाहीये पण एकट्या बाईला जगात टिकायचं असेल तर
काहीतरी मुखवटा घालावाच लागतो.
मी तेच केलं.
—
रोजच्याप्रमाणे दुकानात बसले होते.
वाढदिवसामुळे मन प्रसन्न अन छान मूड होता.
समोर दहा-बारा वर्षाची मुलं क्रिकेट खेळत होती.
दुकानाजवळच एकजण फिल्डिंग करत होता.
सहज मनात आलं. त्याला बोलावलं अन चॉकलेट दिलं.
अनपेक्षितपणे मिळालेल्या गिफ्टमुळे खुष झालेला पोरगा मनापासून हसला.
त्याचा खुललेला चेहरा पाहून मलाही मस्त वाटलं.
*आपल्यामुळं आनंदी झालेला चेहरा पाहणं यापेक्षा जगात सुंदर काहीही नाही. *
काही वेळानं लक्ष गेलं तेव्हा खेळ थांबलेला अन सगळे दुकानाकडे पाहत होते.
काय झालं असेल याची कल्पना आली.
सर्वांना बोलवून चॉकलेट दिलं. मुलं एकदम खुष.
‘बड्डे!!’एका पिटुकल्यानं विचारलं.
“हो, म्हणूनच चॉकलेट दिलं”
प्रत्येकानं शेकहँड करत ‘हॅप्पी बड्डे’ केलं.
फार फार भारी वाटलं. मुलं खेळायला गेली.
काही वेळानं घोळका परत आला.
“काय झालं. आता काही मिळणार नाही. ”मी विनाकारण डाफरले.
मुलं एकमेकांकडे टकमका बघायला लागली.
एकानं कुठून तरी तोडून आणलेलं पिवळं फुल पुढं केलं.
“माझ्यासाठी!!”मी हरखून विचारलं.
तेव्हा माना डोलावत सगळे म्हणाले “बड्डे गिफ्ट”
त्यावेळेस जे वाटलं ते सांगता येणार नाही.
खूप भरून आलं. मान फिरवून ओढणीनं डोळे पुसले.
प्रत्येकाला बिस्किट पुडा दिला. सगळे डबल खुष.
पुन्हा एकदा शेकहँड करत “हॅपी बड्डे”केलं अन खेळायला गेले.
मी मात्र बराच वेळ त्या फुलाकडे पाहत होते.
वाढदिवसाला मिळालेलं माझं पहिलंवहिलं गिफ्ट.
मुलांचं खूप कौतुक वाटलं. त्यांच्यामुळे माझा वाढदिवस स्पेशल झाला.
☆ “तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य??”☆ श्री संभाजी बबन गायके☆
तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य??
स्वामी सामर्थ्यावर विश्वास नाही काय?
समाज जीवनास संतांचा मोठा आधार वाटतो. मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी समर्थ म्हणतात तेंव्हा भक्तास आपण सामर्थ्यशाली आहोत अशी भावना निर्माण होते आणि त्या आत्मविश्वासाने तो संसारातील समस्यांना सामोरा जातो.
स्वतः नामस्मरण करणं आणि तसं इतरांना करायला उद्युक्त करणं ही गोष्ट पुण्यप्रद आहे, हे खरेच आहे. पण… श्री स्वामी समर्थ असं facebook post वरील comment section मध्ये type कर… म्हणजे तुझ्या समस्या दूर होतील, तुला अमुक इतक्या तासांत, दिवसांत धनलाभ होईल असं सांगणं हे कितपत योग्य आहे?
Comment मध्ये type केल्याने नामस्मरण होत असेलही पण धनलाभ मात्र page निर्मात्यास होत असावा! कारण अशी कित्येक pages दिसू लागली आहेत. येनकेन प्रकारे लोकांना comments करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. जाहिरातीमध्ये लोकांच्या मनातील विविध भावनांना हात घातला जातो. त्यात भीती, आमिष, स्वामित्व, अभिमान इत्यादी भावनांना आवाहन करून वस्तू खपवली जाते… उदाहरणार्थ हम… वाले हैं! सारखी जाहिरात! असो.
लिहा comment मध्ये स्वामी समर्थ इत्यादी इत्यादी मार्गाने स्वामींशी संबंधित संस्थांना पैसे मिळत असतील तर ते एकवेळ ठीक आहे. पण अधिकृत संस्था हा मार्ग अवलंबत असतील, असं वाटत नाही!
यातील काही pages वाल्यांचा हेतू निव्वळ स्वामी नामाचा प्रसार करणे असा शुद्ध असूही शकतो आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे!
पंढरपूर मधील एका प्रसिद्ध मठात रामनाम लिहिलेले कागद जमा करून घेतले जात. काही लोक घरी वहीत नाम लिहित असतात. देवाचे, संतांचे नाव मुखातून उच्चारले जाणे महत्वाचे आहे. मनातल्या मनात नामस्मरण सुद्धा – –
संतोषी मातेची पत्रे पाठवा, बालाजी आणि अनेक स्थानिक देवतांच्या नागांची कथा असलेली hand bills छापून वितरीत करणे इत्यादी प्रकार अजूनही प्रौढ लोकांच्या लक्षात असतील.
स्वामी अशक्य ते शक्य करतात असा विश्वास असल्यास भक्तांना कुठेही ऑनलाईन जाण्याची गरज पडणार नाही… त्यापेक्षा स्वामींच्या मंदिरात त्यांच्या दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहून नामस्मरण करीत दर्शनाची प्रतीक्षा करणे केंव्हाही श्रेयस्कर आहे, असे वाटते. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ!
☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(असे आर्थिक गणित सोडवण्यासाठी महत्त्वाची आर्थिक आणि सामाजिक संकल्पना समजून घेण्याची आवश्यकता आहे. या संकल्पनेचे निम्नलिखित मुख्य पैलू स्त्रीच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचे आहेत असे माझे मत आहे.)
इथून पुढे – –
मूल्य निर्मिती- संपत्ती फक्त एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत नाही. उद्योग, नाविन्य आणि गुंतवणुकीतून नवीन संपत्ती निर्माण होते, ज्यामुळे सर्वांचे जीवनमान सुधारू शकते. स्त्रियांचा स्वयंरोजगार म्हणजेच तिला स्वयंसिद्धा बनवण्याचा प्रयत्न वर निर्देशित तात्पुरत्या योजनांपेक्षा कित्येक पटीने महिलांचे कल्याण साधणारा आहे. म्हणजेच कुणाची भूक भागवण्यासाठी त्या व्यक्तीला एका वक्तासाठी मास्यांचे कालवण न देता त्या व्यक्तीला मासे पकडण्याकरता प्रवृत्त करा वे ही खरी व्यावहारिक दानशूर वृत्ती.
मानसिकता- श्रीमंत लोक संधी शोधतात, तर गरीब लोक केवळ कमावण्याचे साधन शोधतात. स्त्रीची सकारात्मक मानसिकता आणि आर्थिक साक्षरता तिला आपसूकच स्वःत्व शोधायला मदत करील.
शिक्षण आणि कौशल्य- महिलांना असे भाकड भत्ते देऊन परावलंबी आणि लाचार बनवण्यापेक्षा योग्य ते शिक्षण, कौशल्य प्रदान करणे आणि तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वार्थाने मदत करून स्वावलंबी बनवणे ही कायमस्वरूपी भाऊबीज देणेच योग्य नाही कां?
संधींची समानता- श्रीमंत लोक त्यांच्या पैशाचा वापर करून अधिक गुंतवणूक करतात, ज्यामुळे संपत्ती वाढते. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांना सारखी संधी दिल्यास, संपत्ती निर्माण करणे शक्य आहे. इथे पैशांचे डोंगर उभारणे हा उद्देश नसून स्त्रीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे हाच उद्देश आहे. एक उद्यमी स्त्री अनेक स्त्रियांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवू शकते.
थोडक्यात, संपत्ती वर्धमान करणे ही काळाची गरज आहे आणि संपूर्ण समाजाच्या खऱ्याखुऱ्या प्रगतीचे लक्षण आहे, कारण अमक्याच्या खिशातून निधी घेत (तो आपणच देतोय असे भासवत) तमक्याला कांही क्षणांकरता आभासी श्रीमंत बनवण्याची कला मते उकळण्यापलीकडे कांहीही साध्य न करता केवळ समस्या हस्तांतरित करण्याचे उथळ साधन आहे.
एकत्रितपणे, जमेल तसे आंगिक, कार्यिक आणि सामाजिक ‘दान’ देणे म्हणजे लिंग समानता निर्माण करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे आणि नागरिक गटाचे कर्तव्य आहे. आपल्या देशाची लोकसंख्या बघता सरकारी आणि गैरसरकारी यंत्रणा निश्चितच अपुऱ्या आहेत. एकच उदाहरण द्यायचे तर गरीब मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेणे, याला आपण खारीचा वाटा म्हणू या. पण दात्यांची संख्या असंख्य असेल तर हा स्त्री विकासाचा सेतू बांधणे शक्य आहे. मंडळी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या अवाढव्य लोकसंख्येबाबत सकारात्मक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन मांडला होता. ते म्हणत, “भारताची लोकसंख्या ही केवळ समस्या नसून ती एक शक्ती आणि संपत्ती देखील आहे. ” म्हणूनच आपल्या दात्यांचे संख्याबळ हीच आपली ताकद आहे. गरज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. आमच्या संकुलात ‘गूंज’ या संस्थेचे कार्यकर्ते वापरण्याजोगे जुने कपडे, भांडी, स्टेशनरी, पुस्तके इत्यादी सामान नेण्याकरिता ट्रक घेऊन येतात. दिवाळीच्या आधी या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि ट्रक काठोकाठ भरतो. गरजू व्यक्तींना या सामानाचे यथायोग्य वाटप केल्या जाते. हा अगदी लहानसा वाटणारा उपक्रम मुंबईतील कित्येक संकुलात राबवल्या जातो तेव्हा हा ज्ञानयज्ञ अतिव्यापक होतो.
रूढीवादी कल्पनांना छेद देत मुलीला मुलाइतकाच सकस आहार देणे, घरकामाची विभागणी करतांना किंवा आर्थिक पाठिंबा देतांना मुलांमध्ये लिंगभेद न करणे, मुलीचे लग्न ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच योग्य वयात करून देणे, या सारख्या गोष्टी स्वतःच्या कुटुंबापासून सुरु होतात. मुलगी सासरी गेल्यावर तिला योग्य ती वागणूक मिळाली नाही, हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी तिचा छळ होत असल्यास तिच्या माहेरच्यांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, यामुळे कित्येक हुंडाबळी टाळल्या जाऊ शकतील. आपल्या शेजारी किंवा जवळपासच्या कुटुंबात असे होत असेल तर “मला काय त्याचे? ” असा उपरा सवाल न करता समाजातील एक घटक या नात्याने या अन्यायाला वाचा फोडणे आपले कर्तव्य आहे.
एका मुद्द्याकडे आपले लक्ष वेधू इच्छिते. स्त्रियांची कार्यक्षेत्रे मर्यादित ठेवण्यात पारंपारिक दृष्टिकोन महत्वाची भूमिका बजावत आलेला आहे. मोजकी क्षेत्रे म्हणजे कार्यालयांतील किंवा हॉटेलातील रिसेप्शनिस्ट, दवाखान्यातील परिचारिका, विमानातील हवाईसुंदरी इत्यादी! मात्र आता ‘हे स्त्रियांचे, ते पुरुषांचे’ असा लिंगभेद नष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा कांही क्षेत्रांत स्त्रियांची अफाट गर्दी तर कांही क्षेत्रात पुरुषमंडळींची वानवा अशी परिस्थिती उद्भवू शकते. स्त्रीची कार्यक्षमता लक्षात घेता असा कुठलाच प्रांत नाही ज्यात ती आपला ठसा उमटवू शकत नाही, हे मर्यादित संख्येत कां होईना स्त्रियांनी दाखवून दिलेले आहे. यासाठी मुलींना मळलेल्या वाटा सोडून इतर क्षेत्रात शिक्षण घ्यावे लागेल. इथे ‘स्टेम’ (STEM- Science, Technology, Engineering, Maths) ही संकल्पना स्त्रियांना अफाट कार्यक्षेत्रे उपलब्ध करून देऊ शकते. ‘स्टेम’ मुख्यत्वेकरून अमेरिकेत २००० सालापासून अस्तित्वात आली, आपल्या देशात २०२० च्या “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या अंतर्गत या संकल्पनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या विषयी थोडक्यात सांगते.
या संकल्पनेचे निम्नलिखित घटक आहेत. कंसात संबंधित व्यवसायाची मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत.
विज्ञान आणि आरोग्यसेवा: नैसर्गिक जग समजून घेणे – (डेटा सायंटिस्ट, अनुवांशिक संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक.
अभियांत्रिकी: डिझाइनिंग, बांधकाम आणि संबंधित समस्या सोडवणे- (एरोस्पेस, बायोमेडिकल, सिव्हिल आणि रोबोटिक्स अभियंता)
गणित आणि वित्त: डेटाचे विश्लेषण, संगणन आणि मॉडेलिंग- (अॅक्च्युअरी {विमा उतरवणा-या कंपनीकडे असलेला संख्याशास्त्रज्ञ}, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि आर्थिक विश्लेषक)
कांही तज्ज्ञ मंडळी यांच्यासोबत कलाक्षेत्र देखील जोडून या संकल्पनेस STEAM (‘स्टीम’) असे संबोधतात. त्यात A म्हणजे आर्ट अर्थात अतिभव्य असे कलाक्षेत्र देखील समाविष्ट केले जाते. कलेचे प्रांगण अतिशय विस्तृत असून त्यात प्रामुख्याने सर्जनशीलतेस भरपूर वाव आहे. एआयच्या जगात या अभिनव सृजनाचे महत्व आपण सर्व जाणतो. किंबहुना अत्युच्य पातळीवरील सर्जन हेच मानवाचे मूल्याधारित अस्त्र आहे असे दिसते. म्हणून मला स्टेम ऐवजी स्टीम ही संकल्पना अधिक भावली. या अभिनव शैक्षणिक धोरणाचे महत्व जर समजून घ्यायचे असेल तर वर निर्देशित प्रमुख शाखांचे एकात्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. मंडळी, या योजनेतील आदर्शांनुसार अगदी केजीपासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत या संकल्पनेची व्याप्ती असायला हवी आणि त्यात प्रत्येक बालक आणि बालिकेला शिक्षणाचा समसमान अधिकार असावा. हा दृष्टिकोन केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रात्यक्षिके, समस्या निवारण आणि गंभीर विचार क्षमतेवर भर देतो. व्यावहारिक ज्ञान मिळवून देणारे हे शिक्षण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २१ व्या शतकातील व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध करून देईल अशी आशा आहे. यामुळे प्रत्येक व्यवसायात लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेच्या आधारावर मूल्यमापन होऊन स्त्रियांना आपसूकच प्रवेश घेता येईल.
नवीन कल्पनांवर काम आणि प्रयोग करण्याची संधी देणाऱ्या या पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांसाठी सक्षम बनवणे हा आहे. जेव्हा आपण कांही देतो, तेव्हा त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. स्त्री सक्षमीकरणाने निव्वळ तिचाच नव्हे तर सर्वांगाने राष्ट्राचा फायदा होणार आहे. “गिव्ह टू गेन” चा खरा आश्वासक संदेश हाच आहे. शिक्षित स्त्री ही एक सशक्त कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. यात चूल आणि मूलच्या पल्याड जाऊन ती जेथे पाऊल ठेवेल ते तिचे कार्यक्षेत्र असायला हवे. नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी तिची ऊर्जा कार्यान्वित व्हायला हवी. आधुनिक काळात विविध क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व वाढवणे आणि त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे हे लैंगिक समानता आणि शाश्वत प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
“आपल्या जगाचे रूपांतर करण्यासाठी आपल्याला जादूची गरज नाही. आपल्याला आवश्यक असलेली सर्व शक्ती आपण आधीच स्वतःमध्ये बाळगतो. “
☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
मंडळी, हुताशनी पौर्णिमा. म्हणजेच होळी. परदेशात राहत असल्यापासून माझ्यासाठी या दिवसाचं महत्व फक्त पुरणपोळी खाण्याचा दिवस इतकंच आहे. कारण इथे काही मला होलिका दहन साजरे करता येत नाही आणि फारसे भारतीय नसल्याने रंगपंचमी सुद्धा साजरी होत नाही.
तर आज मी निगुतीने पुरण शिजवून साग्रसंगीत पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळी एका पोलिश मैत्रिणीला भेटायला जायचे होते. जाताना तिच्यासाठी म्हणून तीन – चार पुरणपोळ्या डब्यात घालून नेल्या. तिने पहिला घास खाताच मस्त म्हणून दाद दिली. मग कशापासून बनवल्या, कशा बनवल्या, आणि मग शेवटचा प्रश्न का बनवल्या? आज काय विशेष असे प्रश्न एकामागून एक सुरू झाले. तिला होळी(हिंदीमधली रंगांची “होली”) याबद्दल जुजबी माहिती होती. पण मग आपली होळी, होलिका दहन, रंगपंचमी या गोष्टी तिला सांगत असतानाच ती मला म्हणाली, तू माझी मस्करी तर करीत नाहीस. मी म्हणाले, नाही गं, असं का वाटलं पण तुला? तर तिने जे काही सांगितलं ते माझ्यासाठी पण अचंबित करणारं होतं. तुम्हाला ऐकायचंय? मग ऐका तर.
आपण आपल्या भारत देशात होळी, होलिका दहन किंवा रंगपंचमी म्हणून ज्या काही प्रथा साजऱ्या करतो त्या करणारा आपण भारत एकमेव देश नसून अनेक युरोपियन देशांमध्ये थोड्या फार फरकाने तशाच प्रथा साजऱ्या केल्या जातात. आपण जसे थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली की होळी पेटवतो तसेच हे देश त्यांच्या त्यांच्या हवामानानुसार थंडी संपून वसंताची चाहूल लागताच त्यांच्या त्यांच्या होळ्या पेटवून या प्रथा साजऱ्या करतात.
पोलंड मध्ये वसंत ऋतूचा पहिला दिवस आणि हिवाळ्याचा शेवटचा दिवस म्हणजेच २१ मार्च रोजी त्यांच्या पद्धतीची होळी साजरी केली जाते. ज्याला “तोपीयेन्ने माझान्ने” म्हणजेच “माझान्ना ला बुडवणे” असे म्हणतात. माझान्ना ही मृत्यू आणि हिवाळ्याची स्लाव्हिक देवी असून, तिचे प्रतिनिधित्व करणारा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्यापासून एक पुतळा बनवला जातो. त्याला स्त्रीचा वेश परिधान केला जातो, त्याची गावातून अंत्ययात्रा काढली जाते. नंतर सर्वजण मिळून त्यास पेटवून देतात आणि तो नदी, तलाव किंवा अन्य पाणवठ्यावर फेकून देतात. पोलिश लोकांच्या श्रद्धेनुसार हा विधी मृत्यूवरील विजय, हिवाळ्यातील काळोख्या दिवसांचा शेवट आणि निसर्गाच्या पुनर्जन्माचे प्रतीक आहे.
त्या नंतर काहीच दिवसात पोलंडमधील प्रमुख सण इस्टर येतो. ईस्टरच्या पवित्र सोमवारी पोलंडमध्ये “श्मीगुस डिंग्युस” नावाची प्रथा साजरी केली जाते जी आपल्या रंगपंचमीची आठवण करून देते. मात्र यात रंग न वापरता फक्त पाणी उडवून एकमेकांना भिजवले जाते. ईस्टरच्या काही दिवस आधी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी येतात. पाणी हे जीवनाचे प्रतीक मानले जात असल्याने, अश्या पद्धतीने पोलिश लोक हास्य आणि आनंदाच्या शिडकाव्याने (आणि भरपूर पाण्याने) वसंत ऋतूचे स्वागत करतात.
हे सगळं मैत्रिणीकडून ऐकल्यानंतर मी इतरही युरोपियन देशांमध्ये अशा काही परंपरा आहेत का याचा अभ्यास केला आणि मी थक्क झाले. त्यापैकी काही देशातील पद्धतींबद्दल मी तुम्हाला सांगते.
चेक रिपब्लिक:
चेक रिपब्लिकमध्ये ३० एप्रिल रोजी ही होळीसदृश प्रथा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. या प्रथेचा मुख्य उद्देश हा वसंताचे स्वागत आणि हिवाळ्यातील चेटकीणी आणि अंधारातील दुष्ट आत्म्यांना पळवून लावणे हा आहे. चेक लोकांचं असं मानणं आहे की हिवाळा ऋतू हा चेटकिणींना (आणि इतर दुष्ट आत्म्यांना) शक्ती देतो आणि वसंत ऋतू सुरू होताच या चेटकीणी अस्वस्थ होतात आणि मग इतर दुष्ट आत्म्यांसोबत त्या मोठ्या पार्ट्या करतात ज्या थांबवाव्या लागतात.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की चेटकिणींची पार्टी थांबवायची कशी?
तर चेक लोक मोठ्या उद्यानात अथवा मोकळ्या मैदानात भल्यामोठ्या शेकोट्या पेटवतात आणि काड्या व पेंढ्यापासून बनवलेल्या एका चेटकीणीचा पुतळा त्या शेकोटीच्या टोकावर ठेवला जातो आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक म्हणून जाळला जातो.
आणि चेटकिणींना उष्णता आणि आगीचा तिटकारा असल्यामुळे त्या पुढील हिवाळ्यापर्यंत काढता पाय घेतात.
तसेच चेक लोक देखील पोलंडप्रमाणेच इस्टरच्या सोमवारी पाण्याची प्रथा साजरी करतात. मात्र येथे फक्त पुरुष त्यांच्या बायको अथवा प्रेयसीवर खेळकरपणे पाणी उडवतात. आणि त्यांना पाम झाडाच्या फांदीने हळुवार प्रतिकात्मक फटके मारतात. जे प्रजनन क्षमता, आरोग्य आणि तारुण्याचे प्रतीक आहे. ही परंपरा येत्या वर्षासाठी महिलांना सुंदर आणि निरोगी ठेवते असे मानले जाते.
जर्मनी:
जर्मनीतील होळी ज्याला “वालपुरगिसनाख्त” असे म्हणतात, दरवर्षी ३० एप्रिलच्या रात्री सुरू होऊन १ मे रोजी संपणारा उत्सव आहे.
वालपुरगिस नाईट ही आठव्या शतकातील संत वालपुरगा हिच्यामुळे ओळखली जाते. ही संत वालपुरगाबाई ख्रिश्चन धर्माचा प्रसार, तसेच जादूटोण्याला दूर ठेवण्यात आणि विविध आजार बरे करण्याच्या तिच्या कथित गुणांसाठी ओळखली जाते. तिच्या निधनानंतर, जादूटोण्याला लांब ठेवण्यासाठी लोक तिची प्रार्थना करीत असत.
पूर्वीच्या काळी लोकांचा असा विश्वास होता की चेटकिणी आणि सैतान दरवर्षी ब्रोकेन पर्वतररांगातील हार्ज पर्वतांमध्ये वसंत ऋतूच्या स्वागतार्थ एकत्र येतात. तेथे ते नृत्य करतात आणि ख्रिश्चनांना हानी पोहोचवण्यासाठी कट रचतात.
म्हणून मग लोक डोंगराच्या कडेला मोठाली शेकोटी पेटवत आणि त्यात वाळलेल्या गवतापासून बनवलेल्या चेटकिणी सारख्या दिसणाऱ्या बाहुल्या फेकून देत. आणि चेटकिणींना घाबरवण्यासाठी मोठमोठाली भांडी वाजवून, कर्कश्श आवाजात गाणी म्हणून किंवा बोंब ठोकून शक्य तितका मोठा आवाज काढीत असत.
आजही ही वालपुर्गीस नाईट जर्मनीमध्ये हिवाळ्यातील दुष्ट अंधाऱ्या शक्तींना दूर ठेवण्यासाठी, मुख्यत्वे डोंगराळ प्रदेशात साजरी केली जाते.
स्लोवाकिया, हंगेरी:
या देशातही जर्मनीप्रमाणेच ३० एप्रिल रोजी ही वालपुर्गीस नाईट साजरी केली जाते.
तसेच ईस्टरच्या पवित्र सोमवारी चेक रिपब्लिक सारखीच पाणीपंचमी खेळली जाते ज्यास “ओब्लिएवाचका” असे म्हटले जाते. मात्र यात शक्यतो बिनलग्नाच्या तरुण मुलींना तरुणांकडून थंडगार पाण्याने चिंब भिजवले जाते. असे करणे त्या मुलींसाठी चांगले आरोग्य, प्रजननशक्ती, आणि सौंदर्य घेऊन येते असे स्लोवाकियन लोक मानतात. आपल्याकडे देखील होळी अथवा रंगपंचमीला वृंदावनात गोप गोपिकांवर रंग उधळीत असत, नाही का?
स्कॅन्डिनेव्हिया:
कालांतराने जर्मनीमधून ही वालपुर्गीस नाईट ची प्रथा स्कॅन्डेनेव्हियन देशांमध्येही आली आणि आज या देशांतही मोठ्या प्रमाणावर ३० एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. स्वीडिश लोक एकत्र येऊन हिवाळ्यात वाळून पडलेल्या झाडाच्या फांद्या आणि वाळके गवत एकमेकांवर रचून खूप मोठ्या शेकोट्या पेटवतात, रात्रभर गाणी म्हणतात, शेकोटीत सॉसेजेस भाजून खातात आणि हिवाळ्यातील दुष्ट शक्तींना हाकलून लाऊन, वसंताचे जोरदार स्वागत करतात.
त्याचबरोबर २३ जून रोजी संध्याकाळी “संकथानसाफ्टेन” नावाचा एक होळीसारखाच सण नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंड मध्ये साजरा केला जातो. या दिवशी या देशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण, मोठ्या मोठ्या शेकोट्या पेटवल्या जातात. येथे अशी शेकोटी पेटवण्याची प्रथा पूर्व-ख्रिश्चन काळापासून आहे, जेव्हा लोक उन्हाळ्यातील दीर्घकाळ राहणाऱ्या सूर्याचा सन्मान करण्यासाठी ही प्रथा साजरी करीत असत. सूर्य म्हणजे जीवन, प्रजनन क्षमता आणि निसर्गाच्या शक्तीचे प्रतीक. तेव्हा अग्नीला प्रतीकात्मक आणि जादुई महत्त्व होते. अग्नी हा वाईट आत्म्यांना दूर करण्यासाठी, पिकांची भरभराट आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. स्कॅन्डेनेव्हियन लोकांचे असे म्हणणे होते की या विशिष्ट रात्री, चेटकिणी सक्रिय होतात आणि सैतानाला भेटण्यासाठी आणि वाईट कृत्य करण्यासाठी एकत्र येतात. शेकोटी पेटवणे हे या वाईट शक्तींना दूर ठेवण्याचा उपाय होता.
ग्रीस:
ग्रीसमध्ये देखील वसंतादरम्यान ग्रीक पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्याला “बर्निंग ज्यूडा” असे नाव आहे. ज्युडा म्हणजेच यहूदी.
तर ही यहूदाला जाळण्याची प्रथा प्राचीन काळापासून ग्रीसमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. ग्रीक लोकांच्या मानण्यानुसार यहूदा हा येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक होता, ज्याने त्याचा विश्वासघात केला आणि त्याला क्रूसावर चढवले. ग्रीक इतिहासात, यहूदा विश्वासघात दर्शवितो आणि त्याचा पुतळा जाळण्याची प्रथा त्याच्या कृत्यांसाठी त्याला प्रतीकात्मक शिक्षा देण्याचा एक मार्ग आहे. आपण रावणदहन करतो साधारण काहीसं तसंच.
ईस्टरच्या पवित्र शनिवारी संध्याकाळी, गावातील रस्त्यांवरून एक मिरवणूक निघते, ज्यामध्ये यहूदाचा पुतळा घोड्यावरून नेण्यात येतो. नंतर हा पुतळा खांबावर टांगला जातो आणि त्याला आग लावली जाते. या मिरवणुकीदरम्यान लोक कर्कश्श आवाज काढतात. कधीकधी न आवडणाऱ्या राजकीय नेत्यांच्या नावाने बोंब सुद्धा ठोकतात. पुतळा जाळताच, फटाक्यांची आतषबाजी होते आणि लोक टाळ्यांच्या गजरात जल्लोष करतात. ही प्रथा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक गोष्टींचे स्वागत करण्याचा एक मार्ग आहे.
इटली:
इटालियन लोक मात्र त्यांची होळी एकदम स्टायलिश पद्धतीने साजरी करतात. विशेषतः इटलीमधील फ्लॉरेन्समध्ये हा उत्सव अगदी नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येतो. दरवर्षी इस्टरच्या पवित्र रविवारी अख्खे फ्लॉरेन्स शहर “स्कॉपियो डेल कॅरो”(“कार्टचा स्फोट”) नावाचा होळी सारखाच सण साजरा करण्यासाठी एकत्र जमते. या चमकदार देखाव्यामध्ये फटाक्यांनी भरलेली 30 फूट उंच अशी प्राचीन बैलगाडी असते.
ईस्टर प्रार्थने दरम्यान, कॅथेड्रलच्या आतून एक यांत्रिक कबुतर (ज्याला ‘कोलंबिना’ म्हणतात) बाहेरील बैलगाडीकडे तारेद्वारे सोडले जाते. हे कबुतर रॉकेट्सने भरलेले असते, आणि इटालियन लोक असे मानतात की ते पवित्र अग्नी घेऊन जाते. जेव्हा हे कबुतर गाडीवर आदळते तेव्हा गाडीत भरलेले फटाके जोरात फुटतात, ज्यामुळे एक नेत्रदीपक आतषबाजीचे प्रदर्शन होते.
इटालियन लोकांची अशीही श्रद्धा आहे की जर कबुतर यशस्वीरित्या गाडीवर आदळले आणि व्यवस्थित स्फोट होऊन आतिषबाजी झाली तर तो अतिशय शुभसंकेत मानला जातो, जो चांगले पीक, शांती आणि भरभराट घेऊन येतो.
स्वित्झर्लंड:
येथील होळीसमान प्रथा थोडी मजेदार असते. त्याला “झेक्सएहलाऊतेन” असे नाव आहे. तो एप्रिल महिन्यातील तिसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. यामध्ये कापूस आणि लोकरीपासून एक मोठा बूग नावाचा स्नोमॅन बनवला जातो. आणि मोठ्या शेकोटीच्या टोकावर उभा करून तो बरोब्बर संध्याकाळी ६ च्या ठोक्याला जाळून टाकला जातो. हा स्नोमॅन हिवाळा आणि थंडीचे प्रतीक मानला जातो. आग लागल्यानंतर जितका लवकर हा स्नोमॅन पेट घेईल तितका उन्हाळा ऊबदार आणि सुखकर होईल असे मानतात. आणि हळू पेट घेणारा स्नोमॅन पावसाळी आणि गारठा असणारच उन्हाळा सूचित करतो.
आता बरोबर ६ च का? तर एरवी तिथे कामगार दररोज ५ वाजेपर्यंत काम करतात, पण एकदा डे लाईट सेव्हिंग सुरू झालं की ते रोज ६ वाजेपर्यंत काम करू लागतात.
तर मंडळी, आहे की नाही नवल? मला तर हे सगळं वाचून कुठेतरी प्रत्येक धर्मातील पाळेमुळे एकमेकांशी जोडलेली आहेत याचा पक्का विश्वास वाटतो. आपली होलिका राक्षसी असो, पोलंडची मार्झन्ना असो, हिवाळी चेटकीणी असोत, ज्युडा असो किंवा मग हिवाळ्याचे प्रतीक बूग स्नोमॅन असो, सगळ्यांचा उद्देश एकच, अंधाऱ्या कडाक्याच्या दिवसांवर मात करून, नवीन प्रकाशमय ऋतूची चाहूल माणसाला पुन्हा एकदा आयुष्य पूर्ण उत्साहाने जगण्यासाठी सज्ज करते, सकारात्मक ऊर्जा देते आणि पुन्हा एकदा निसर्ग नितांतसुंदर असण्याची प्रचिती आणते. हो की नाही?
तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या देशातील निराळी होळी माहित असल्यास मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं का.
लेखिका : अवनी दाते – पोलंडकर
प्रस्तुती – मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता. तेव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. जिवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकून त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीचं काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदलीमध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्रचंड आटापिटा करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.
दुसऱ्या दिवशी लवजम्यासहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गीमधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्याच्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकऱ्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देण्याकरता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थिकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.
त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत आला. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याकडे चौकशी केली की हा कोणत्या इयत्तेत शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं. त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.
त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंडच्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळलं की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे. त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षणदेखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.
ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता. आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणारे सर्व डॉक्टर, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसीमुळेच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.
बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धनिकाच्या त्याच मुलाचा जीव वाचवला होता. हा कुठेतरी प्रामाणिकपणाने, कृतज्ञ पणाने स्वतःच्या मुलाला वाचवल्याची परतफेड करण्याकरता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.
आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो.
तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल, तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, पेनिसिलीन.
म्हणून इतरांना मदत करा. नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी. आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातूनच नवीन काहीतरी निर्माण होत असते.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आणि राजू झाला बिझिनेसमन” – लेखक : श्री सुरेश हावरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : आणि राजू झाला बिझिनेसमन
– – नोकरीपेक्षा व्यवसाय करा!
लेखक : सुरेश हावरे
पृष्ठ: १९६
मूल्य: १९९₹
“उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा ” या बेस्टसेलरच्या लेखकाचे नवे पुस्तक!
– – – प्रत्येकाला जीवनात उपयोगी पडतील असे यशस्वी उद्योजकाचे अनुभवाचे बोल
हळूहळू मराठी तरुण उद्योग करायला लागलाय आणि त्याचप्रमाणे अनेक तरुण त्यासाठी उत्सुक असलेले दिसतायेत… अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंन मराठी माणूस उद्योग करण्यापेक्षा जास्त करून नोकरीच्या शोधात असायचा. मात्र आता मानसिकता बदलते आहे. सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी यासाठी केलेले प्रयत्न आता फळाला येत असलेले दिसत आहेत… जणू ते आता मराठी तरुणांसाठी मेंटॉरच झाले आहेत.
या पुस्तकात असलेली राजूची गोष्ट त्यांनी मेंटॉरच्या भूमिकेतूनच सांगितल आहे. डॉ. हावरे राजूला मुंबईतील फॅशन स्ट्रीट, झवेरी बाजार, धारावी, खाऊ गल्ली, पुस्तक गल्ली, फुलमार्केट अशा मोठ्या उलाढाली असलेल्या ‘मार्केट्स’ची ओळखअसलेल्या ‘मार्केट्स’ची ओळख करून देतात.
उद्योगाची सुरुवात कशी करावी याचे काही मूलमंत्र देतात…
उद्योग का करावा?
कर्ज घेण्यातील बारकावे
उद्योगाची भाषा
नेटवर्किंग
बदललेल्या विक्री व्यवस्थापनाचे मंत्र
निर्णय प्रक्रिया
व्यवसायातील चढउतार…
आणि उद्योगाच्या अशा विविध पैलूंची माहिती राजूला उपयोगी पडते आणि मग राजू होतो यशस्वी ‘बिझनेसमन’!
उद्योग सुरु करण्यासाठी, तो यशस्वी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी गोष्टीरुप मार्गदर्शन करणारं परिपूर्ण पुस्तक
… आणि राजू झाला बिझनेसमन!
या पुस्तकात
उद्योगच करावा! पण का?
उद्योगच करावा! पण कसा?
उद्योगच करावा! पण कशासाठी?
– – या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली आहेत.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम विचारणीय व्यंग्य – ‘मिलावट-प्रधान देश‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # ३२६ ☆
☆ व्यंग्य ☆ मिलावट-प्रधान देश ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆
हमारा देश धर्म-प्रधान होने के साथ-साथ मिलावट-प्रधान भी है। यह कहना मुश्किल है कि वह धर्म-प्रधान ज़्यादा है या मिलावट-प्रधान, क्योंकि यहां करीब-करीब हर चीज़ में मिलावट होती है। मिलावट का हाल यह है कि अब शुद्ध आदमी मिलना मुश्किल हो गया है। मिलावट करने वाले पूरी निष्ठा और समर्पण-भाव से अपने काम में लगे हैं। उनके काम की निपुणता और सफाई देखकर आश्चर्य होता है। मजाल है आदमी असली नकली में भेद कर पाये। मिलावट के मामले में उनके नये-नये प्रयोग देखकर बड़े-बड़े वैज्ञानिक भी हैरान हैं।
यहां मिलावट का आलम यह है कि शुद्ध चीज़ मिलना सौभाग्य की बात मानी जाती है। बाहरी उपयोग की चीज़ें छोड़ दीजिए, जो चीज़ें शरीर के भीतर जाती हैं उन्हें भी बख्शा नहीं जाता। दाल, चावल, मसाला, घी, खोया, मिठाइयां, दवाएं, फल, सब्ज़ियां, ईनो, आटा, बेसन, दूध, मक्खन, पनीर, सरसों, शराब, जीरा, हल्दी, सब में पूरे सेवा- भाव से मिलावट की जा रही है। नकली दवाओं का मतलब समाज के लिए क्या होता है यह समझा जा सकता है। कहीं पढ़ा कि अंडे भी मिलावटी हो रहे हैं, यद्यपि मेरे लिए समझ पाना मुश्किल है कि नकली अंडे कैसे होते होंगे।
चावल में कंकड़, मसाले में बुरादा, हल्दी में पीली मिट्टी मिलना आम है। नकली दवाओं का बाज़ार अरबों का है। अभी नकली कफ़ सीरप पीकर इंदौर में कई बच्चे काल-कवलित हुए। निम्न वर्ग के शराबी हर साल मिलावटी शराब पीकर मरते हैं।
फलों और सब्ज़ियों को कार्बाइड की मदद से जल्दी पकाया और तैयार किया जाता है, लेकिन कार्बाइड मनुष्य-शरीर के लिए बहुत हानिकारक है। चने भी नकली होने की ख़बर पढ़ी। मिट्टी से बनने वाले सीमेंट के बारे में भी पढ़ा।
हाल ही में राज्यसभा में एक सदस्य ने वक्तव्य दिया कि जांच में दूध के 71% नमूनों में यूरिया और 64% में न्यूट्रलाइज़र पाये गये, जबकि कुल खाद्य नमूनों में 25% मिलावटी निकले। यह भी बताया गया कि गर्म मसाले में ईंट और लकड़ी का बुरादा, चाय में सिंथेटिक रंग, शहद में शुगर सीरप और मिठाइयों में देसी घी की जगह वनस्पति की मिलावट पायी गयी।
हमारे देश में नकली डिग्री, नकली आधार कार्ड, नकली प्रमाण-पत्र उपलब्ध होना मुश्किल नहीं है, बशर्ते कि आप जोखिम लेने को तैयार हों। कई नेताओं की झूठी डिग्री पर प्रश्न उठते रहे हैं। नकली नोट छापने वालों की सक्रियता के प्रमाण जब-तब मिलते रहते हैं। ‘डिजिटल अरेस्ट’ नकल के धंधे का एक नया रूप है, जिसमें कई लोगों को करोड़ों रुपयों का चूना लग चुका है।
सबसे ताज़ा ख़बर यह पढ़ी कि जूते भी नकली बन रहे हैं। यह समझना मुश्किल है कि नकली जूतों में क्या नकली होगा। शायद ये पहनने के अलावा दूसरे काम के लिए बन रहे होंगे। शायद नकली जूतों के प्रहार से आदमी की इज़्ज़त कम ख़राब होगी।
बाबा रामदेव के गाय के घी के बारे में पढ़ा कि वह दो प्रयोगशालाओं में जांच में खाने योग्य नहीं पाया गया। उनके मिर्च पाउडर की गुणवत्ता का मामला भी संसद में उठाया गया था।
आदमी भी अब खरा नहीं रहा। मुंह पर कुछ बोलता है, मन में कुछ और रचता है।टेक्नोलॉजी के विकास के साथ स्वार्थपरता और संकीर्णता बढ़ रही है, रिश्ते कमज़ोर हो रहे हैं, सुविधाओं का मोह बढ़ रहा है। नतीजतन आदमी अपने आप में सिमटता जा रहा है, टापू होता जा रहा है। इसीलिए शायर निदा फ़ाज़ली ने लिखा— ‘हर आदमी में होते हैं दस बीस आदमी, जिसको भी देखना हो कई बार देखना।’
मैं यह सोच सोच कर परेशान हूं कि कई नेता और धर्मगुरु धार्मिक एकता की बातें करते हैं, दूसरे धर्म वालों को अपने से कमतर समझते हैं, लेकिन धार्मिक एकता में ये मिलावट के लिए समर्पित हुनरमंद लोग कहां ‘फिट’ होंगे? क्या धार्मिक एकता के लिए ये मिलावटखोर मिलावट करना छोड़ देंगे? क्या इनका हृदय-परिवर्तन हो जाएगा? क्या ये आसानी से मिल रहे बड़े मुनाफे का लालच छोड़ देंगे? फिलहाल तो ये अपने धर्म वालों का ही मुंडन कर रहे हैं।
हम गज़ा में सत्तर हज़ार निर्दोष लोगों की मौत पर सिहरते हैं, दुखी होते हैं, लेकिन हमारे देश में सीधे हत्या के बजाय धीमे ज़हर के द्वारा करोड़ों की ‘स्लो डेथ’ का इंतज़ाम है। हम बाकी मामलों में भले ही विश्वगुरु न बन पायें, मिलावट के मामले में हमारे विश्वगुरु होने में कोई संदेह नहीं हो सकता। अन्य देश आयें और हमसे उपयोगी शिक्षा ग्रहण करें।
(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे।
आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय गद्य क्षणिका “– रोग ग्रसित राजा…” ।)
~ मॉरिशस से ~
☆ कथा कहानी ☆ गद्य क्षणिका # ९७ — रोग ग्रसित राजा —☆ श्री रामदेव धुरंधर ☆
राजा के तीन रोग थे। उसने अपने रोग स्वयं में छिपाये रखा क्योंकि रोग प्रकट होने से उसका मस्तक झुकता। आश्चर्य, उसके देश के कवि ने उसके तीन रोगों से मिलती जुलती कविता लिख दी। राजा क्रोधित हुआ। उसने कवि की हत्या करवा दी। जहाँ लाश फेंकी गई वहाँ सुन्दर फूल खिले। राजा को ये फूल बहुत पसंद आए। पर उसे जब पता चला ये फूल उसके शत्रु के वक्ष पर उगे हुए हैं बिलखने पर चौथे रोग ने उसे ग्रस लिया।
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है। साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # ३२७ ☆ अंतिम नींद…
दूसरे के जागने-सोने, खाने-पीने, उठने-बैठने, हँसने-बोलने, यहाँ तक की चुप रहने में भी मीन-मेख निकालना, आदमी को एक तरह का विकृत सुख देता है।तुलनात्मक रूप से एक भयंकर प्रयोग बता रहा हूँ, विचार करना।
रात को बिस्तर पर हो, आँखों में नींद गहराने लगे तो कल्पना करना कि इस लोक की यह अंतिम नींद है। सुबह नींद नहीं खुलने वाली।…यह विचार मत करना कि तुम्हारे कंधे क्या-क्या काम हैं। तुम नहीं उठोगे तो जगत का क्रियाकलाप कैसे बाधित होगा। जगत के दृश्य-अदृश्य असंख्य सजीवों में से एक हो तुम। तुम्हारा होना, तुम्हारे लिए महत्वपूर्ण हो सकता है पर जगत में तुम्हारी हैसियत दही में न दिखाई देनेवाले बैक्टीरिया से अधिक नहीं है। तुम नहीं उठोगे तो तुम्हारे सिवा किसी पर कोई दीर्घकालिक असर नहीं पड़ेगा।
तुम तो यह विचार करना कि क्या तुम्हारे होने से तुम्हारे सगे-सम्बंधी, तुम्हारे परिजन-कुटुंबीय, मित्र-परिचित, लेनदार-देनदार आनंदी और संतुष्ट हैं या नहीं। बिस्तर पर आने तक के समय का मन-ही-मन हिसाब करना। अपने शब्दों से किसी का मन दुखाया क्या, आचरण में सम्यकता का पालन हुआ क्या, लोभवश दूसरे के अधिकार का अतिक्रमण हुआ क्या, अहंकारवश ऊँच-नीच का भाव पनपा क्या..?… आदि-आदि..। हाँ आत्मा के आगे मन और आचरण को अनावृत्त कर अपने प्रश्नों की सूची तुम स्वयं तैयार कर सकते हो।
प्रश्नों की सूची टास्क नहीं है। प्रश्न तुम्हारे, उत्तर भी तुम्हारे। असली टास्क तो निष्कर्ष है। अपने उत्तर अपने ढंग व अपनी सुविधा से प्राप्त कर क्या तुम मुदित भाव से शांत और गहरी नींद लेने के लिए प्रस्तुत हो?
यदि हाँ तो यकीन मानना कि तुम इहलोक को पार कर गए हो।
सच बताना उठकर बैठ गए हो या निद्रा माई के आँचल में बेखटके सो रहे हो?
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
☆ आपदां अपहर्तारं ☆
आशुतोष साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र ही दी जावेगी।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈