सूचनाएँ/Information ☆ – भोपाल के लेखक सुरेश पटवा लेखक गाँव देहरादून में सम्मानित – ☆ संयोजक – अंतराष्ट्रीय विश्व मैत्री मंच ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹– भोपाल के लेखक सुरेश पटवा लेखक गाँव देहरादून में सम्मानित –🌹

अंतराष्ट्रीय विश्व मैत्री मंच का 13 वां अधिवेशन दिनांक 26 सितंबर 2026 को देहरादून की वरिष्ठ साहित्यकार विद्या सिंह की अध्यक्षता में, पूर्व केंद्रीय शिक्षा मंत्री तथा पूर्व मुख्य मंत्री, उत्तराखंड डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ के मुख्य आतिथ्य, सुरेश पटवा और जया आनंद के विशिष्ट आतिथ्य में देहरादून के निकट सुरम्य धुंध भरी हिमालयी पहाड़ियों से घिरी थानों घाटी स्थित लेखक गांव में आयोजित किया गया। मंच की अध्यक्ष संतोष श्रीवास्तव और प्रमिला वर्मा भी मंचासीन रहीं।

सर्वप्रथम सरस्वती वंदना उपरांत सम्मिलित साहित्यकारों के परिचय से सत्र आरम्भ हुआ। प्रमिला वर्मा ने विश्व मैत्री मंच की स्थापना और विभिन्न कार्यक्रमों की जानकारी प्रस्तुत की।

विभिन्न साहित्यकारों सहित सुरेश पटवा ने अपनी “सृजन यात्रा” पर बोलते हुए कहा कि “उन्हें बचपन से किताबें पढ़ने का चाव था। वे 38 साल स्टेट बैंक में विभिन्न प्रशासकीय पदों पर तैनाती के दौरान भी निरंतर विश्व स्तरीय कालजयी साहित्य के साथ, इतिहास, दर्शन और वांग्यम साहित्य का अध्ययन करते रहे हैं।

बैंक सेवा के अंतिम दौर में जब प्रसिद्ध इतिहासकार रमेश चंद मजूमदार का बारह खण्डों में लिखा “भारत का इतिहास” पढ़ रहे थे तब उन्हें यह अहसास हुआ कि उन्हें इतिहास की गलियों से भारत की ग़ुलामी की पड़ताल करनी चाहिए। लेकिन इस विषय ओर कोई एक किताब उन्हें ढूँढने ओर भी नहीं मिली तो उन्होंने मुग़लों का पतनोन्मुख इतिहास के साथ मराठों का इतिहास, सिक्खों का इतिहास, कर्नाटक युद्धों का इतिहास, ब्रिटिश इतिहास सहित दक्षिण भारत के इतिहास का गहन अध्ययन किया। तत्पश्चात 2018 में पहली किताब “गुलामी की कहानी” प्रकाशित हुए।

सुरेश पटवा बचपन से ही पचमढ़ी के चप्पे-चप्पे से वाक़िफ़ थे। उन्होंने जेम्स फ़ोर्सिथ की “हाईलैंड ऑफ़ सेंट्रल इंडिया” को आधार बना कर “पचमढ़ी की खोज” किताब लिखी।

स्त्री-पुरुष के रिश्तों की मनोवैज्ञानिक पड़ताल करते हुए “स्त्री-पुरुष” किताब लिखी।

नर्मदा घाटी के निवासी होने के नाते, नर्मदा उन्हें सहज ही बुलाती थी। उन्होंने नर्मदा परिक्रमा कर तीसरी किताब “समृद्धि और सौंदर्य की नदी- नर्मदा” लिखी।

उन्होंने सम्पूर्ण सतपुड़ा पर्वत की सघन यात्रा के बाद “सुरम्य सतपुड़ा” किताब लिखी। मिर्ज़ा ग़ालिब की जीवनी ओर आधारित “दास्तान-ए-मिर्ज़ा ग़ालिब” बहुत सराही जा रही है। वे आदि शंकराचार्य की जीवनी पर आधारित उपन्यास लिख रहे हैं। इसी तारतम्य में उन्होंने “वेदों से वेदांत” और वेदांत से वैराग्य” के साथ “मैं की यात्रा का पथिक” तीन किताबें लिखीं। उनके दो व्यंग्य संग्रह, दो लघुकथा संग्रह और हिंदी सिनेमा के से स्वर्णयुग के इतिहास पर पाँच किताबें प्रकाशित हैं। इस तरह उनकी ग़ज़ल और काव्य संग्रह सहित कुल 37 पुस्तकें प्रकाशित हुई हैं। उनकी इस अनोखी साहित्य साधना हेतु उन्हें 17 राष्ट्रीय स्तर के सम्मान से विभूषित किया जा चुका है। सम्मेलन में अध्यक्ष और मुख्य अतिथि द्वारा सुरेश पटवा को सम्मानित कर प्रमाणपत्र प्रदान किया गया। कार्यक्रम के अंत में रचनाकारों ने काव्यपाठ किया। सभा दुबे ने आभार प्रदर्शन किया।

(पूर्व केंद्रीय शिक्षा मंत्री तथा पूर्व मुख्य मंत्री, उत्तराखंड डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ से सम्मान पत्र ग्रहण करते हुए श्री सुरेश पटवा)

संयोजक – अंतराष्ट्रीय विश्व मैत्री मंच, देहरादून

—

≈संस्थापक संपादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३३२ ☆ गझल – आपले नसते कुणीही… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३३२ ?

☆ गझल – आपले नसते कुणीही… ☆  प्रभा सोनवणे ☆

☆

समजला नाही कधी तो आगळा अनुनय मला

या कहाणीचा कधी कळलाच ना आशय मला

*

 चारचौघा सारखा नव्हतास तू सामान्यही

 भव्यतेचा नेहमी आलाय की प्रत्यय मला

*

 माणसे जातात का, सहचर्य अर्धे सोडुनी

तू असा जाशील, नव्हता हा कधी  संशय मला

*

 कोणत्या पक्षात जाता लाभते खुर्ची इथे

 धूर्त नेते सांगती, दावून खोटे भय मला

*

 आपले नसते कुणीही वेळ येता समजले

पात्र आता द्रौपदीचे लाभले अक्षय मला

☆

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दुष्काळ ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ दुष्काळ… ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

☆

दिली पावसानं वड

पिकं गेलं करपून

हाता तोंडाचा घास

गेला मातीत मिटून

* 

ये गं ये गं सरी धावून

टाक शिवार भिजवून

माझ्या अंतरीची धग

टाक पावसात विझवून

 *

मरगळला हिरवा जीव

वाट रानाची चालवेना

करपल्या पिकाचं दुःख

आता काळजाला सोसेना

 *

दडी मारली पावसानं

तापलं भादव्याचं उन

मोहरून आलेलं शिवार

टाकील दुष्काळ गिळून

 *

करपल्या पिकाची व्यथा

आता कुणाकडं मांडावी

देवा तुझ्या कृपेची धार

आभाळातनं सांडावी

 ☆

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नशीब आणि कर्तृत्व…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नशीब आणि कर्तृत्व…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

 मिळणं आणि मिळवणं या गोष्टी नशीब आणि कर्तृत्व यावर अवलंबून असतात. पण आम्ही (म्हणजे मी. हल्ली आदराने कोणी बोलतच नाही. एकेरी नावानं बोलण्यातच आदर आहे अस समजून घ्याव लागत. त्यामुळे स्वत: बद्दल बोलतांना तरी अनादर नको म्हणून आम्ही.) आम्ही जे काही मिळवलं त्यात आमचं कर्तृत्व काय? हाच प्रश्न समोरच्याच्या चेहर्‍यावर दिसला. आणि आम्हाला जे काही मिळालं त्यात याचं कर्तृत्व काय! हाच विचार समोरच्याच्या चेहर्‍यावर होता. (वाचाल तर वाचाल हे फक्त लिहिलेलं वाचण्यासाठी नसून चेहरा सुध्दा वाचता यायला पाहिजे याचसाठी लिहीलं असाव असा माझा विचार आहे.) म्हणजे मोठेपणी आम्हाला जे मिळालं किंवा जे मिळवलं त्यात आमचं कर्तृत्व शून्य होत. (आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांच्यामुळे कर्तृत्व याच्यापुढे शून्य तरी होतं. नाहीतर नशीबात काय काय ऐकाव लागल असत काय माहीत.) इतरांंच्यामते आमच्या पदरात जे काही पडलं त्यात नशीबच जास्त होत हा समज अगदी सर्वत्र व्यवस्थित पसरला आहे. नशीब आपलं, दुसर काय…

 मिळणं आणि मिळवणं या गोष्टी नशीब आणि कर्तृत्व यावर अवलंबून असल्या, व आमच्या बाबतीत हे दोघेही काही प्रमाणात खो खो सारखा खेळ एकाच संघाकडून खेळत होत्या. म्हणजे एका जागेवर एक बसला कि दुसरा ऊभा रहायचा. तरी, आम्हाला काहीच मिळालं नाही अस अजिबात नाही. मिळालं भरपूर. पण मिळवलं काय… तर ते काही जास्त नसलं तरी कमीही नाही.

 लहानपणी आम्हाला जे मिळालं ते नशीबाने नाही तर ते आमचं कर्तृत्व होत. मिळणारा मार, खावी लागणारी किंवा ऐकावी लागणारी बोलणी, भोगलेली शिक्षा यासाठी आम्ही दिलेला त्रास, केलेली भांडणं, मस्ती, दंगा हेच कारणीभूत होत. (भोग आपले.)

 आमच्या वर्गशिक्षकांनी दिलेले किंवा मारलेले शेरे हा नेमका कोणाच्या नशीबाचा भाग होता सांगता येत नाही. कारण नशीबाने ते आमचे वर्गशिक्षक होते, आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी. अस म्हंटल तरी त्या शे-यावर प्रतिक्रिया देण्याबाबत आमच्या पालकांनी त्यांच्या कर्तृत्वात कसूर दाखवल्याच आठवत नाही. कधी कधी तर शेरा मिळण्याआधीच पालक तोंडी समज देऊन त्यांच कर्तृत्व पार पाडायचे. यावेळी वक्तृत्व आणि कर्तृत्व यांची जुगलबंदी चालायची आणि ती जुगलबंदी आपल्या नशीबात आहे अस समजत होतो.

 आम्ही जे काही कर्तृत्वाने मिळवणार होतो त्याला दरवेेळी नशीबाची साथ नव्हती. आणि नशीबाने काही मिळेल इतक कर्तृत्व आमच सतत कधीच नव्हत. त्यामुळेच मिळणं आणि मिळवणं या गोष्टींसाठी कुंडलीत आमचा गुरू तेवढा प्रबळ वाटला नाही तरी त्यात शनीची बाधाही नव्हती. सगळ अगदी सौम्य मंगळासारख मंगल होत. त्यावरचे उपाय आणि अपाय दोघांनी आपले पाय घट्ट रोवले होते.

 नशीबाने मित्रही चांगलेच मिळाले. पण या बाबतीत मी त्यांच्या नशीबाचा विचार कटाक्षाने टाळतो. सगळ्यांच नशीब सारखं नसत हे मला त्यांच्याकडे पाहिलं की जाणवतं. काहींनी मला टिकवून ठेवण्यात धन्यता मानली, तर काहींनी माझ्यासोबत टिकून राहण्यात. यात मात्र नशीब आणि कर्तृत्व माझं का त्यांच यात गोंधळ होतो.

 मिळणं आणि नशीब या बाबतीत नवरा आणि बायको यांचापण विचार मनात डोकावलाच. पण तो फक्त डोकावला. काहीही काम किंवा गरज नसतांना इतरांच्या बाबतीत आपण डोकावतो तस्साच, किंवा प्रवासात शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या वर्तमानपत्रात आपण डोकावतो तसा, आणि तेवढाच. कारण आता त्या बाबतीत दोघांपैकी कोणाचही नशीब बदलेल अस वाटत नाही. आणि आम्ही नशीब बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वत:च बदललो आहे हा दावा दोघांचाही तेवढ्याच ठामपणे असतो. अर्थात नवरा किंवा बायको नशीबाने कसेही मिळाले असले तरी त्यांच्याकडून आपल्याला हवं ते, हवं तस, आणि हवं तेव्हा मिळवून (करुन) घ्यायला मात्र कर्तृत्व लागत हे नक्की. यात बर्‍याचदा आपल्या कर्तृत्वाला नशीबाची साथ मिळत नाही. आणि त्यांच नशीब जोरात असत, त्यामुळे त्यांच कर्तृत्व सिध्द होत. अनेकवेळा या बाबतीत आम्हाला घरचा आहेरच नशीबात असतो असा दोघांचाही समज. आजकाल लग्नपत्रिकेत आहेर किंवा पुष्पगुच्छ आणूनये अस लिहील्यावर सुध्दा काही थेट घरी येऊन आहेर देतात आणि काहीवेेळा तो टाळता येत नाही. तसाच हा घरचा आहेर. स्विकारावाच लागतो. तो मिळतोच.

 नशीब आणि कर्तृत्व एकमेकांच्या सोबत असले तर काय विचारता… पण आमच्या बाबतीत या नाण्याच्या दोन बाजू वाटल्या. दोन्ही एकाच वेळी कमीवेळा दिसल्या. पण तरीही नशीबाने कर्तृत्वाला, आणि कर्तृत्वाने नशीबाला साथ दिलेली समजतं.

 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सारे प्रवासी घडीचे!” अनुवादित हिन्दी संग्राहक : कमांडर शरण अहुजा ☆ मराठी अनुवाद : श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “सारे प्रवासी घडीचे!” अनुवादित हिन्दी संग्राहक : कमांडर शरण अहुजा ☆ मराठी अनुवाद : श्री संभाजी बबन गायके ☆

हल्ली मी बहुतेक वेळा रात्रीच माझी भाड्याची taxi चालवतो. मागच्या आठवड्यात रात्री अकराच्या सुमारास सरकारी रुग्णालयाच्या गेटवरून मी एक भाडे उचलले. एक वृद्ध गृहस्थ होते, पांढरा शर्ट आणि पांढरे शुभ्र धोतर… वयाने थकलेले… पण त्यांचा आवाज मात्र खणखणीत होता.

माझ्या कारमध्ये बसतानाच त्या आजोबांनी मला सांगितलं… ”. मला पाच ठिकाणी जायचं आहे… पाच हजार रुपये रोख देईन… पण मला पाच ठिकाणी का जायचं आहे हे विचारू नका… फार तर शेवटच्या ठिकाणावर पोहोचलो की सांगेन हवंतर! ” आणि आजोबांनी ठिकाणांची नांवे लिहिलेला कागद माझ्याकडे दिला.

पहिलं ठिकाण… दक्षिण कोलकात्यातील एक जुनं घर. तिथं पोहोचल्यावर मी कार थांबवली… पण आजोबा कारमधून खाली उतरले नाहीत… त्यांनी दरवाजाची काच खाली घेतली आणि त्या घराकडे नुसते पहात राहिले… जवळजवळ दहा मिनिटे! I त्यांच्या डोळ्यांत आसवे होती… ”चला, निघुयात आपण दुस-या जागेकडे! ” ते म्हणाले.

दुसरी जागा:- एक प्राथमिक शाळा तिथलीच जवळची. शाळेचे गेट अर्थातच बंद होते रात्र असल्याने. शाळेतल्या मैदानावर अंधार होता. आजोबा कारमधून खाली उतरले. मैदानातल्या झोक्यावर बसले… झोके घेऊ लागले… हळूहळू. वीस मिनिटांनी ते परत आले आणि मला म्हणाले, ”या शाळेत मी ४३ वर्षे शिकवले आहे! ही ४३ वर्षे माझ्या आयुष्यातली सर्वांत सुंदर वर्षे होती! ”

तिसरे स्थळ. एक जुनं कॉफी हाऊस. रात्री उशीरापर्यंत सुरु असणारं. आजोबांनी तिथं गाडी थांबवायला सांगितली. ते आत गेले… कोप-यातील एका टेबलशी बसले… एक चहा मागवला… पण एकही घोट नाही घेतला… फक्त इकडेतिकडे पहात राहिले काहीवेळा. चहा थंड झाला. आजोबा पैसे देऊन बाहेर आले.

मला म्हणाले, ”१९६९ मध्ये मिताली इथंच भेटली होती पहिल्यांदा मला… माझी बायको! ”

आम्ही पुढे निघालो… निमताला स्मशानभूमी! आजोबा खाली उतरले. स्मशानातल्या एका थडग्याजवळ जाऊन हात जोडून उभे राहिले… ओठांची अस्फुट हालचाल होत होती… काहीतरी बोलत होते… ऐकणारं कुणी दिसत नव्हतं… बहुदा मितालीशी बोलत असावेत… मनातलं. अर्ध्या तासाने कारपाशी येऊन म्हणाले, ”चलायचं? तीन वर्षे झालीत मितालीला जाऊन! ”

यादीतील पाचवं आणि शेवटचं ठिकाण आलं… स्थानिक शासकीय रुग्णालय… भलं मोठं. आजोबांनी मला कार पार्किंगमध्ये लावायला सांगितली. आणि म्हणाले, ”आता मी तुम्हांला आपल्या या पाच ठिकाणच्या प्रवासाचं कारण सांगतो… माझ्याकडे आता फार वेळ उरला नाही आयुष्यात… डॉक्टर म्हणालेत… आणखी फारतर काही आठवडे आहेत तुमच्या हातात. चौथ्या स्टेजचा कॅन्सर आहे म्हणतात. आज मला माझं सर्व आयुष्य एकाच वेळी पहायचं होतं… अनुभवायचं होतं.. म्हणून पाच जागी नेलं तुम्हांला! ”

 हे ऐकताच माझ्याही डोळयांनी पाझरायला सुरुवात केली… मी माझं डोकं स्टीअरींग व्हीलवर टेकवलं…!

आजोबा सांगत होते… ”पहिले ठिकाण… जुनं घर. हो, तेच घर जिथं मी माझ्या मुलांना वाढवलं… संसार केला. पुढे शाळेत गेलो होतो आपण… तिथंच मला माझ्या जीवनाचं ध्येय गवसलं… आणि ते कॉफी हाऊस… मिताली… माझी प्रेम… तिथंच तिची आणि माझी नजरानजर झाली… प्रेम झालं आणि पुढे लग्न… मुलंबाळं… संसार… तिच्याच हातात हात घालून फिरलो जगाचा हा बाजार! आणि एवढ्या रात्री त्या स्मशानात गेलो होतो… कारण तिथंच मी मितालीला शेवटचं पाहिलं होतं… निरोप दिला होता जड अंत:करणाने…! ”

“आणि आता… ही शेवटची जागा… इस्पितळ… इथंच दाखल आहे मी… सर्वांची नजर चुकवून बाहेर पडलो होत… सारे मला शोधत असतील… रागावलेही असतील. पण आता इथून बाहेर येणं होणार नाही माझं! ” एवढं बोलून आजोबांनी माझ्या हातावर पाच हजार रुपये ठेवले… ”घ्या… ठरल्यानुसार आहेत पैसे! … खूप खूप आभारी आहे मी तुमचा… मला आयुष्याची सफर घडवलीत तुम्ही… फार उपकार झाले या म्हाता-यावर! ”

मी ते पैसे त्यांच्या हातांत कोंबले आणि म्हणालो, ”साहेब, मी हे पैसे नाही घेणार! ” त्यावर आजोबा म्हणाले, ”मुला, मी पैसे द्यावेत असं माझं कुणी उरलं नाहीये या जगात. मुलं मोठी झाली आणि देश सोडून गेलीत… आताशा संपर्कही नाही ठेवत फारसा. बहुतेक मित्रांनी जगाला आधीच रामराम ठोकलाय.. आता माझी वाट बघत बसले असतील…! तू मला तुझ्या आयुष्यातले तीन तास दिले आहेस… या माणुसकीची किंमत मी नाही करू शकणार… घे… ठेव हे पैसे! ” असं म्हणत आजोबा कारमधून उतरले… आणि त्यांच्या wardकडे चालत निघाले… हळूहळू… व्हरांड्यातले दिवे अंधुक होतेच…!

मी सकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि विचारलं, ”अनिरुद्ध मुखर्जी… खोली नंबर ४१२? ’ मला त्यांची खोली दाखवण्यात आली. मी फुलांचा गुच्छ नेला होता सोबत… ”अरे, तुम्ही आलात? ” मला पाहताच आजोबा हसून म्हणाले. मी म्हणालो, ”आजोबा, तुम्हांला मी असं एकटं कसं सोडेन! ? ”

पुढे आम्ही दोन तास गप्पा मारत बसलो होत. मिताली, त्यांचे विद्यार्थी आणि सोडून गेलेली मुलं.. असं बरंच काही.

मग मी रोजच त्यांच्या भेटीस जाऊ लागलो… कधी चहा घेऊन, तर कधी फळं. मी त्यांना वर्तमानपत्रे वाचून दाखवायचो किंवा कधीकधी नुसतंच जाऊन शांत बसायचो… आजोबांना वेदना होत होत्या… पण ते तसं मला जाणवू द्यायचे नाहीत…!

अशाच एके दिवशी ते मला म्हणाले, ” मला वाटलं होतं की मी असाच एकाकी मरून जाईन. पण माझ्या शेवटच्या दिवसांत तुझ्यासारखा एक अनोळखी माणूस माझं कुटुंब बनला… मुलगा, मित्र, सहकारी सर्वकाही. माझे आशीर्वाद आहेत मुला! ” मी त्यांचा हात हातात घेतला… ”आजोबा, तुम्ही एकटे नाही आहात. ” 

मंगळवार… पहाटेचे सव्वा तीन वाजलेले असतील… आजोबा गेले! मी तिथंच त्यांच्यापाशीच बसून होतो… त्या रात्री मला तिथं थांबावं असं का कुणास ठाऊक खूप वाटत होतं… म्हणून मी कारवर न जाता तिथंच थांबून राहिलो होतो… आजोबा जाईपर्यंत! ” 

जाण्याआधी आजोबा म्हणाले होते, ” सर्वांना माझा निरोप देशील? अनोळखी लोकांकडे बघ… नीट बघ. आपण सर्वच कुठं तरी निघालेलो आहोत… काहीजण घाईने तर काहीजण निवांत चालताहेत… पण पुढे जात मात्र आहेत… मग या वाटेवर थोडंसं दयाळू व्हायला काय हरकत आहे? तू दयाळू झालास माझ्याबाबतीत… माझे शेवटचे क्षण तू अर्थपूर्ण केलेस… मुला”

काही वेळातच श्वासांचे येणेजाणे दाखवणारे यंत्र सलग लाल रेषा दाखवीत… बीप असा दीर्घ आवाज करून बंद झाले…!

आजोबांच्या अंत्यविधीप्रसंगी केवळ सहाच लोक उपस्थित होते… एक मी, तीन नर्सेस, एक वकील आणि एक माजी विद्यार्थी. ४३ वर्षांची अध्यापकीय कारकीर्द, ५२ वर्षांचा संसार, ८१ वर्षांचे आयुष्य… आणि शेवटी सहाच माणसं?

मी म्हणालो, ”आजोबा मला काही गोष्टी शिकवून गेलेत… आपल्याला अनोळखी असलेली एखादी व्यक्ती दुस-या एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण जगही असू शकते… प्रत्येकाची स्वत:ची एक अशी कथा असते… माणूस जगत, मरतो आणि आयुष्यभर वाट पहात राहतो… ते केवळ त्याला कुणीतरी समजून घ्यावं म्हणून! त्यांनी मला माझ्या संसारासाठी पाच हजार रुपये दिले त्यापेक्षा जास्त मूल्य त्यांनी दिलेल्या शिकवणीचे आहे. माणुसकी ही काही स्वतंत्र गोष्ट नसते… माणुसकीच सर्वकाही असते. ते पाच हजार रुपये मी अजूनही जपून ठेवले आहेत…!

कुणी सांगावं… कोणताही प्रवासी कदाचित त्याच्या आयुष्यातील हा शेवटचा प्रवास करीत असेल… आप्त-स्वकीयांचा शेवटचा निरोप घेत असेल… म्हणून मी हल्ली माझी कार अत्यंत वेगळ्या पद्धतीने चालवत असतो… मी विचारपूस करतो, त्यांचं ऐकत असतो… मी माणूस पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण एका वृद्ध शिक्षकाने मला फक्त एक रात्र मागितली होती… आणि एका अनोळखी माणसाने ती दिलीही होती…!

संग्राहक : कमांडर शरण आहुजा साहेब..

भारतीय नौसेनेतून सेवानिवृत्त.. यांनी वरील कथा उपलब्ध करून दिली आहे.

मराठी अनुवाद – श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मौनाचे सामर्थ्य… ☆ शुभा रुद्र ☆

शुभा रूद्र 

? मनमंजुषेतून ?

☆ मौनाचे सामर्थ्य… ☆ शुभा रूद्र  ☆

☆

मौनाचे सामर्थ्य आणि निसर्गाचे मूक तत्त्वज्ञान – – 

‘मौन’ ही केवळ शांत बसण्याची क्रिया नाही, तर ती अंतर्मनाचा सुसंवाद साधणारी एक अत्यंत प्रभावी भाषा आहे. जेव्हा आपण बाह्य जगाचा कोलाहल थांबवून निसर्गाशी एकरूप होतो, तेव्हा निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला जीवनाचा एक अमूल्य धडा देत असतो. सूर्य, चंद्र, झाडे, माती आणि दगड हे सगळे शांत राहूनही विश्वातील सर्वात मोठा संदेश आपल्याला देत असतात. या मूक संवादातूनच मौनाचे खरे सामर्थ्य प्रकट होते.

निसर्गाच्या कुशीत शांतपणे निरीक्षण केले, तर साध्या-साध्या गोष्टींमधून मानवी जीवनाचे मर्म उलगडते. झाडावरील किड्यांच्या सहज प्रवृत्तीतून आपल्याला आपल्या आहाराच्या आणि जगण्याच्या पद्धतीवर विचार करण्याची प्रेरणा मिळते. “अन्न हे प्यायचे असते आणि पाणी हे खायचे असते, ” म्हणजेच प्रत्येक घास ३२ वेळा चघळून खाण्याचा निसर्गदत्त नियम आपल्याला आरोग्याची गुरुकिल्ली शिकवतो.

त्याचप्रमाणे, मंदिराच्या पायरीशी असणारे कासव आपल्याला संयम आणि इंद्रियनिग्रहाचा संदेश देते. आपले चार पाय, तोंड आणि शेपूट या सहा अवयवांना संकुचित करणाऱ्या कासवाकडून आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंना नियंत्रणात ठेवून, अहंकार बाजूला सारून जगण्याची शिकवण मिळते.

निसर्गातील सर्वात सुंदर आविष्कार म्हणजे फूल! फूल कधीही गाजावाजा करत उमलत नाही, पण त्याचा सुगंध संपूर्ण आसमंतात पसरतो. माणसाच्या सद्गुणांचेही तसेच असते. संतांप्रमाणेच सुगंधी फुलेही केवळ आनंद वाटण्याचे काम करतात. नदी, सूर्य, आणि माती कधीही कुणामध्ये भेदभाव करत नाहीत.

एका ठराविक वयापर्यंत निसर्गाकडून केवळ ‘घेणारा’ माणूस जेव्हा ‘देण्याची’ कला शिकतो, तेव्हाच त्याचे जीवन सार्थकी लागते.

“नको असलेला भाग काढून टाकला की शिल्प तयार होते… “

हाच नियम मानवी आयुष्यालाही लागू होतो. दगडाच्या पोटात मूर्ती दडलेली असते, फक्त छिन्नीचे घाव घालून नको असलेला दगड काढून टाकावा लागतो. माणसानेही आपल्यातील दुर्गुण, संकुचित विचार आणि अहंकार बाजूला सारला, तर तो स्वतःच्या आयुष्याचा एक उत्कृष्ट शिल्पकार बनू शकतो. मौनाच्या या सामर्थ्याला ओळखून, निसर्गाच्या मूक पाऊलखुणांवर चालणे, हेच खऱ्या समृद्ध जीवनाचे लक्षण आहे.

 ☆

© शुभा रूद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? मनमंजुषेतून ?

☆ “चव…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो… बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.

कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम? बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?

उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो? नाही ना? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.

एरवी बघताक्षणीच फस्त होणारा पिठलं भात घरात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतो सांगा बरं! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत ‘अन्न गोड लागत नाही’ असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.

कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते.

कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत ‘घोटभर’ प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.

*भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. * खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.

चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते!

Let’s adjust the taste of life to make life more meaningful and joyful.

 ☆

लेखक  : अज्ञात 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पायातून बूटसुद्धा निघत नाहीये” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “पायातून बूटसुद्धा निघत नाहीये” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

 – – इतके पाय सुजलेले!!

नेहमीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक विविध रस्त्याने जाते तशीच आमच्या टिळकरोडवरून गेली. (म्हणजे अजूनही चालूच आहे. आणि रांगेत अजून मागे इतके गणपती आहेत की कदाचित संध्याकाळ होईल संपायला!

तर दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांसाठी आमच्या ऑफिसची वॉशरूम खुली केली होती आणि आता पोलिसांनाही ते माहित झालं असल्याने ते स्वतःहून त्यांच्या महिला पोलिसांना आमच्या ऑफिसकडे पाठवतात.

आता ज्यांना माहीतच नाही की हे काय आहे? त्यांच्यासाठी सांगतो. विसर्जन मिरवणूक सुमारे तीस ते चाळीस तास चालते. आणि यासाठी पोलीस बंदोबस्त बाहेरच्या शहरातून पण मागवला जातो. मात्र त्यांना पुण्यातील तितकी माहिती नसते. विशेषतः महिला पोलिसांची “वॉशरूम” संबंधात मोठी कुचंबणा होते हे लक्षात घेऊन गेली काही वर्ष “मला जमेल तितकं मी करेल” यानुसार टिळक रोडवर अगदी फ्रण्टेजलाच ऑफिस असल्याने महिला पोलिसांसाठी ऑफिसची वॉशरूम तर ओपन करतोच पण शिवाय चहा बिस्किटे पाणी पण व्यवस्था केली जाते.

यंदा तब्येतीच्या काही कारणाने हे सगळं करावं की थांबवावं असं वाटलेलं.

मात्र हे पोलिसांना माहित नव्हतं त्यामुळे त्यांनी काल; संध्याकाळी दोन तीन महिला पोलिसांना ऑफिसवर पाठवलं. त्या बिचकत बिचकत आलेल्या कारण पुण्यात नवीनच होत्या.

मीही त्यांना आत यायला सांगितलं. आणि मनात म्हटलं की माझी ताकद, इच्छा असो नसो… हि सेवा बाप्पा करून घेतोय तर! त्यामुळे तयारीला लागलो. तिघीसाठी मस्त कॉफी तयार केली आणि म्हणालो

बसा हो थोडा वेळ! काय फरक पडत नाही. मी सांगतो वाटलं तर तुमच्या साहेबांना…

आणि त्यांना बसवून कॉफी बिस्कीट देऊन फ्रेश केलं

त्यातल्या एक म्हणाल्या, “दादा आजकाल कोण करत हो इतकं? गणेश मंडळाच्या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्याची फक्त काळजी… पण त्यांच्यासाठी आम्ही दोन दोन दिवस उभे… आमच्यासाठी फारसे कुणी काही करत नाही!

आपल्या व्यवस्थेवर मार्मिक बोट त्या भगिनेने ठेवलेले. मी तरी काय बोलणार?

म्हणालो की,,,,. जाऊ द्या… अडचणीत बाप्पाच उभा असतो तुमच्यासाठी म्हटलं!

आणि मग त्यांना सोडायला खाली फुटपाथवर गेलो तर तिथं एक महिला पायातून बूट काढण्याचा प्रयत्न करत होती पण कदाचित दीड दिवस बंदोबस्तवर असल्याने पाय सुजले होते. आणि त्यामुळे बूट काढताना त्रास होत असावा.

खरं सांगतो मंडळी माझ्याच डोळ्यात टचकन पाणी आलं.

त्यांना जवळ जाऊन म्हणालो,

ताई, वरतीच इथं माझं ऑफिस आहे. पाच मिनिट या. फ्रेश व्हा. पायाला थोडा आराम मिळू द्या!

त्याच्याशेजारी असलेला इन्स्पेक्टर बहुतेक मला ओळखत असावा. (सायबर क्राईम मध्ये काम करण्याचा फायदा)

तो तिला म्हणाला, “जा मॅडम… दहा मिनिट ब्रेक घ्या… हे (म्हणजे मी) आपलेच आहेत… ”

मग त्या मॅडम ऑफिसवर आल्या. एक पाय अनवाणी एका पायात बूट अन एका हातात बूट असं घेतलेल्या!!

त्यांना आधी बसायला सांगितलं. आणि माझ्याकडे स्वेलिंग स्प्रे (सूज आली तर त्यावर तो स्प्रे मारला तर सूज थोडी कमी होते) तो स्प्रे त्यांना दिला आणि सांगितलं की दोन मिनिट स्प्रे मारा पायावर! फरक पडेल!

त्याप्रमाणे त्यांनी केलं! दुसराही बूट त्यांनी काढला. दोन्ही पायावर स्प्रे मारला!

तोवर माझी कॉफी तयारच होती! त्यांना दिली.

त्यावेळी त्या माऊलीच्या डोळ्यात जे काही भाव उमटले ते सांगायला शब्द नाहीत माझ्याकडे…

मी फक्त नमस्कार केला! दुसरं काय करू शकतो?

पाच मिनिटांनी त्या उठल्या आणि म्हणाल्या, “घरी गेल्यावर मुलाला तुमच्याबद्दल नक्की सांगेल”

आणि शांतपणे ऑफिसवरून बाहेर निघाल्या!

त्यांनाही सोडायला खाली फुटपाथवर गेलो तेव्हा ते इन्स्पेक्टर पण तिथं होते! त्यांच्यासाठी ऑफिसातूनच एक पाण्याची बाटली नेलेली ती दिली!

त्यांनीही थँक्स म्हणत घेतली!

*

एक गाणं आठवलं

हीच आमुची पार्थना 

अन हेच आमुचे मागणे 

माणसाने माणसांशी 

माणसासम वागणे!

*

बास इतकं केलं तरी वेगळी पूजा अर्चा अभिषेक करण्याची गरज नसते. बाप्पा सगळं पाहत असतोच.

यंदा एक जाणवलं म्हणजे “बापट इफेक्ट” नक्की झालाय

नाहीतर ऑफिसच्या खिडकीच्या काचा सुद्धा डीजे मुळे रात्रभर थरथरत असायच्या

यंदा तितक्या नाही थरथरल्या… आवाजावर बरेच नियंत्रण दिसले.

आणि अजून एक म्हणजे

आमचे समाजसेवी मित्र साहिल राणा याचा कालच निरोप आला की

“डीडी, ते महिला पोलिसांसाठी तुम्ही करता न ते मी पण यंदा कुमठेकर रस्त्यावर करतोय. वॉशरूमची सोय. तर कुणाला गरज लागली मला कॉल करा. मी करतो व्यवस्था सगळी! ”

त्याला म्हटलं अरेच्या, तुझ्या लक्षात आहे ते सगळं?

तो म्हणाला, अहो पक्के लक्षात आहे. दरवर्षी तुम्ही गेटवर बोर्ड लावता ते पण माहित आहे आणि गेल्यावर्षी कुणीतरी हुल्लड मुलाने बोर्ड फाडून टाकला होता त्यावर तुम्ही पोस्ट केलेली, ते पण माहित आहे!

*

मी चकित!! मनात म्हटलं, पेरत राहावं… कुठं तरी उगवत राहत असे माझे वडील सांगायचे ते खरं आहे तर!

टिळकरोडचा आमचा हा उपक्रम पाहून दोन वर्ष झाली सुभाषनगर (अभिनव कॉलेज चौक) येथील विनायक धारणे यांचे मंडळ तिथेही महिलांसाठी वॉशरूम सोय करत आहे

आणि आता यंदा कुमठेकर रोड पण सहभागी झाला!

बास… जीने को और चाहिये?

माझीच एक जुनी पोस्ट आठवली!!

ते उभे आहेत वर्दीत… म्हणून आपले सण साजरे होतात गर्दीत!

बाप्पा मोरया!! पुढच्या वर्षी नक्की या!

 (फोटो सोर्स : जेमिनी एआय)

©️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor : transcendental-technologies, Asso. with Pune University (SPPU)

5) Mentor : Canadian Asso. for Security and Intelligence Studies – CANADA

6) Mentor : Direct Action International – UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हरिश्चंद्राची नव्हे, सारंगची फॅक्टरी! ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ हरिश्चंद्राची नव्हे, सारंगची फॅक्टरी! ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काही वर्षांपूर्वी ‘ हरिश्चंद्राची फॅक्टरी ‘ या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारतीय चित्रपटाच्या जन्माची कथा सांगणारा हा चित्रपट! भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यापासून अगदी अलीकडच्या काळातील चित्रपटापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवणारा एक माहितीपट पाहण्याचे भाग्य सध्या सांगलीकरांना लाभत आहे. निमित्त गणेशोत्सवाचे!

लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. प्रबोधनाच्या मूळ उद्देशापासून भरकटत चाललेल्या गणेशोत्सवाचे सध्याचे रुप पाहून हळहळणे, टिका करणे फक्त एवढेच केले जाते. अशा काळात सार्वजनिक नाही तर वैयक्तिक, घरातील गणेशा समोर उद्बोधक आरास मांडावी व लोकांसमोर काही चांगले ठेवावे असा उपक्रम सांगली येथील श्री. संजय पाटील व त्यांचे चिरंजीव श्री. सारंग पाटील यांनी गेली काही वर्षे चालू ठेवला आहे.

श्री. सारंग पाटील यांनी आपल्या कल्पकतेतून या वर्षी मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास प्रतिकृतीच्या स्वरूपात मांडला आहे. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने अत्यंत धाडसाने टाकलेले हे पाऊल आज किती अंतर कापून पुढे गेले आहे याची प्रचिती ‘ मराठी पाऊल पडते पुढे ‘ या अर्ध्या तासाच्या दृश्य कार्यक्रमातून दिसून येते. मराठी चित्रपट सृष्टीतील महत्वाचे टप्पे व झालेल्या नेत्रदीपक प्रगतीमध्ये ज्यांनी योगदान दिले त्यांचे स्मरण करून चित्रफिती व आकर्षक प्रतिकृती यांच्या सहाय्याने हा इतिहास मांडण्याचे कठीण काम श्री. सारंग पाटील यांनी करुन दाखवले आहे. आईवडिलांचे प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन असेल तर कल्पकता काय साकारु शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मराठी चलत् चित्रपटाच्या इतिहासाचा चलत् चित्रपट असेच याचे वर्णन करावे लागेल. मराठी माणसाची पाऊले आवर्जून इकडे पडावीत एवढीच अपेक्षा!

┉❀꧁꧂❀┉

©  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विसर्जन… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ विसर्जन… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

☆

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात. जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते. पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं.आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी,’ असं म्हणायची. मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? तिला विचारलं, तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नाव माझं मेलीचं होतं’. आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी. वेडेपणा नुसता सगळा.  

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची. आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतींची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ‘ये इकडे, तिचं संपायचं नाही’. सात दिवस हा हा म्हणता सरायचे. विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे. लहानपणी वाटायचं, त्यात काय रडण्यासारखं आहे?

आता कळतं. आपलाही काळ आता सरत चाललाय.एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असं वाटत असावं का? आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या’. मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं.

दुस-या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची. आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करूनसुद्धा खूप काळ लोटलाय आता. त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं. आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता. पाटावर बसून मी तयार आहे. पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवालासुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही, तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!  प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे, ‘कधी?’ एवढाच काय तो जीवघेणा प्रश्न. चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय नाहीतर …

 ☆

लेखक:जयंत विद्वांस

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares