मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहवास…- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ सहवास… – भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

(नंदा आठवीत होती म्हणजे बारातेरा वर्षाची. मी तिला पाहिले तेंव्हा माझ्या लक्षात आले ती चुणचुणीत मुलगी आहे, काळीसावळी असली तरी बोलघेवडी आहे.. सतत हसत राहायची. आता हिचे घरात रहाणे मावशीला किती रुचते हे पाहायचे, कारण ती दोन महिने रहाण्याच्या दृष्टीने आली होती.)

इथून पुढे – – 

नंदा तिच्या आईसोबत आली त्या रविवारी आम्ही दोघ मावशीकडे गेलो. मावशी तिच्या खोलीत टीव्ही पहात होती आणि उषा आणि नंदा खाली बसल्या होत्या आणि टीव्ही पहात होत्या, मला थोडे आश्यर्य वाटले कारण आपल्या खोलीत कुणालाही न घेणारी मावशी या दोघींसमवेत टीव्ही पहात होती.

आम्हाला पहाताच उषा उठली आणि पाणी आणायला गेली, तिच्यापाठोपाठ नंदा पण उठली. नंदाने दोन ग्लासातून पाणी आणुन दिले, पाणी पिऊन होतं न होतं तोपर्यत चहा आणि बिस्किटे घेऊन उषा आली.

समिधा सर्व पहात होती, मग मावशी तिच्या तब्येतीविषयी सांगू लागली. ऐकंदरीत नंदाचे घरात येणे मावशीला रुचलेले दिसलें.

तीन चार दिवस झाले असतील, अचानक मावशीचा फोन आला 

“अरुण, उषा पाच हजार मागते आहे ऍडव्हान्स, तिला काही नंदासाठी खरेदी करायची आहे म्हणे, मी तिला नाही म्हंटल, तिचे मागील महिन्यांचे पैसे पोच आहेत, आता तिला पैसे कसे देणार?  तिने बुडवले तर?

मी तिला म्हंटले “द्यायला लाग पैसे, ती नाही बुडवायची आणि तिने नाही दिले तर मी देईन तुझे पैसे ‘.

मावशीचे समाधान झाले असावे. तिने उषाला पाच हजार दिले बहुतेक कारण दुसऱ्या दिवशीच तिचा परत फोन आला “अरे अरुण, काल मी उषाला पाच हजार दिले मग दोघी बाहेर गेल्या, तिने नंदासाठी ड्रेस घेतले, चप्पल घेतले पण मला कमाल वाटली तिने माझ्यासाठी कॉटनचे मस्त गाऊन आणले, घरात चालायला मऊ स्लीपर आणले, फ्रीझला कव्हर आणले, मिक्सरला कव्हर आणले, बघ.. या गोष्टी हव्याच होत्या.. माझ्या लक्षातच आले नव्हते.. मऊ स्लीपर मुळे मला घरात फिरायला बरे जाते ‘.

 एकांदरीत मावशी समाधानी होती हे बरे, नाहीतर माझी धावपळ होणार होती.

पुढील रविवारी मी गेलो तेंव्हा मावशी, उषा आणि नंदा पत्ते खेळत होती, त्त्यांचा पाच तीन दोन खेळ रंगात आला होता. मला पहाताच मावशी म्हणाली “अरुण, खुप दिवसांनी पत्ते खेळतेय मी, या नंदाने हे पत्ते शोधून काढले बघ, आता नंदा मला हरवते आहे एकसारखे.

मावशी कृतकोपाने नंदाकडे पहात म्हणाली.

मला मावशीचे हे रूप नवीन होते. मग मी थोडावेळ त्यान्च्या खेळात सामील झालो, माझ्या लक्षात आले मावशी आणि नंदा यांचे सूत कमालीचे जुळले होते.

मावशी आता हळूहळू चालू लागली, आता फिजिओ येणे बंद झाले पण उषा आणि नंदा तिच्या पायाला मालिश करू लागल्या आणि मावशीला ते आवडू लागले.

एकदा मावशीने मला फोन केला “अरे अरुण, येताना बुद्धिबळसेट घेऊन ये बाबा, ही नंदा मला बुद्धिबळ शिकवते म्हणते ‘… मला कमाल वाटली.. मावशी या वयात बुद्धिबळ शिकणार आणि ते पण खेड्यातल्या मुलीकडून.. मी रविवारी बुद्धिबळसेट नेऊन दिला आणि नंदा मावशीला बुद्धिबळ शिकऊ लागली. मग मावशी सांगायची “काल उषा आणि नंदाने मला खाली बागेत नेलं.. कधी उषाने भाजी आणायला गेली असताना भेळ घेऊन आली, कधी उसाचा रस आणला.. मी समाधानी होतो. नाहीतर माझी धावपळ झाली असती.

 आता मावशी उषाच्या जेवणाची तारिफ करायची, तिच्या हातचे माश्याचे कालवण तिला फार आवडायचे. एकदा मला म्हणाली “अरे या नंदाचा आवाज चांगला आहे, सतत गुणगुणत असते… काल ही काय गुणगुणते म्हणून हळूच दाराला कान लावला तर स्वातंत्रविरांचे गाणे “, ने मजसी ने मात्रभूमिला.. सागरा प्राण तळमळला ‘…

मला एवढा अभिमान वाटला या पोरीचा, नाहीतर मुंबईतील पोरी कसल्या कसल्या जिंगल्स ऐकत असतांत ‘.

आता मावशी, उषा आणि नंदा यांचे त्रिकुट जमले होते, आयुष्यात कधीही कुणालाही जवळ न करणारी मावशी या दोघी मायलेकीच्या अगदी जवळ गेली होती.

म्हणेपर्यत मे महिना संपत आला आणि उषाला गावी जायचे वेध लागले, तिची कोण वाट पहात होते म्हणून नव्हे तर नंदाची शाळा सुरु होणार होती आणि मावशीकडे सहा महिन्यासाठीच ती आली होती. मी उषाचे आणि नंदाचे रेल्वे तिकीट काढले आणि मावशीला फोन करून सांगितले, मावशी काही बोलली नाही.

 उषा आणि नंदाने गावी जायची तयारी केली. आपली बॅग त्या आवरू लागल्या. नंदाला मुंबई फार आवडली म्हणे पण आता तिची शाळा सुरु होणार होती आणि मुंबईत तसे तिचे कुणीच नव्हते.

मी चार जून रोजी या दोघीना रेल्वेत बसवायला म्हणून मावशीच्या घरी गेलो. मावशी एकटी हॉलमध्ये बसुन होती. माझ्याशी बोलली नाही. मी आतल्या खोलीत जाऊन उषाला मी आल्याचं सांगितलं. त्या दोघी तयारीत होत्या. त्या दोघी ब्यागा घेऊन बाहेर आल्या. दोघीनी मावशीला नमस्कार केला. मावशी गप्प होती. दोघींच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.

 उषा आणि नंदा शेवटचे हे घर पहात होत्या. उषा या घरात सहा महिने राहिली आणि नंदा दोन महिने. दोघीनी आपआपल्या ब्याग उचलल्या आणि मावशीला “येतो ‘, म्हणत डोळ्यातील अश्रू थोपवत बाहेर पडल्या. मी पण मावशीला “, , येतो ग यांना गाडीत बसवून ‘असे म्हणून बाहेर पडलो.

टॅक्सी स्टेशनकडे धावत होती. मी पुढे बसलो होतो, माझं लक्ष होतं दोघी रुमालाने डोळे पुसत होत्या.

मी दोघीना डब्यात बसवलं, अजून पाच मिनिटे होती गाडी सुटायला. एवढ्यात माझा फोन वाजू लागला. मावशीचा फोन होता 

“अरुण, त्या दोघीना घेऊन ताबडतोब घरी ये, मी त्यान्च्याशिवाय राहू शकत नाही रे ‘…

“अग मावशी, असं काय करतेस?  उषा सहा महिन्यासाठीच आली होती आणि नंदाची शाळा नाही का?

“ते सर्व माहित आहे मला, मी तुझी मावशी म्हणून सांगते आहे, तू त्याना गाडीतून उतरव आणि टॅक्सीने घरी आण, जास्त बोलू नकोस.. मी सांगते तसे कर.. नाहीतर गाडी सुटेल..

 मी त्या दोघीना ब्यागा घेऊन उतरायला सांगितले. त्याना कळेना काय झाले?

मी स्टेशनबाहेर येत होतो, माझ्या मागून त्या दोघी.

मी परत टॅक्सी पकडली आणि मावशीच्या घरी आलो. उषा परत परत “काय झाला.. कित्याक परत आणलास ‘, असं विचारत होती. मी कसलेच उत्तर दिले नाही.

 मावशीच्या घराच्या दारात मावशी दार उघडून वाट पहात होती. त्या दोघीना पहाताच ती पुढे झाली आणि दोघीना मिठीत घेऊन रडू लागली.

“, अरुण, मी नाही राहू शकत या दोघी शिवाय, एवढी वर्षे मी माणुसघाणी होते, कुणाचा सहवास मला नको असायचा पण माणसाची साथसोबत किती महत्वाची हे या दोघींच्या सहवासाने कळलं. खरंच गेले सहा महिने मी आंनदात घालवले कारण उषा होती घरात, मग ही नंदा आली.. मला बुद्धिबळ शिकवणारी.. कुणीतरी घरात लहान पण हवंच… आम्हला मुलं नाहीत त्यामुळे हे घर कस उजाड झालं होतं.. पैसे खुप असले म्हणून काय झाले.. माणसे सहवासाला नसतील तर.. काय करायचे त्या पैशाचे?

उषा, तू इथेच राहा.. माझी बहीण म्हणूंन.. नाही म्हणू नकोस उषा… तुला काही कमी पडणार नाही..

या नंदाला येथेच उत्तम शाळेत घालूया, गाण्याच्या क्लासला घालूया.. काय आवाज आहे तिचा.. तीच गाणं जपायला हवं.

उषा, नंदा तुम्ही माझ्याजवळ हव्यात.. नाही म्हणू नका.. आपण आंनदात राहू.. होय म्हण उषा..

होय म्हण ‘.

मावशीचे अश्रू पुसत उषा मान हलवून “होय.. होय ‘म्हणत होती.. नंदा केंव्हाच मावशीला बिलगली होती.

 मी कोपऱ्यात उभा राहून डोळे पुसत पुसत ही साथसोबत पहात होतो.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भिंतीच्या पलीकडचं नातं… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ भिंतीच्या पलीकडचं नातं…  ☆ तृप्ती देव ☆

कधी कधी आयुष्यात एखादा साधा दिवसही मोठा धडा देऊन जातो. त्या दिवशीही तसंच झालं.

मी सकाळी अंगणात झाडांना पाणी घालत होते. हातात पाइप होता, मन मात्र नेहमीच्या कामात गुंतलेलं. तेवढ्यात समोरच्या वर्षाताईंचा आवाज आला- “तृप्ती… ऐकलंस का गं? “

मी वर पाहिलं. “काय हो ताई? “

त्या थोडं जवळ येत म्हणाल्या, “जोशीकाकूंचं घर विकलं म्हणे. “

माझ्या हातातला पाइप तसाच थांबला. पाणी मात्र वाहत राहिलं. “काय?  खरंच? “

“हो गं. मुलगा पुण्यात आहे ना… आता त्यांना कायमचं तिकडे घेऊन जातोय. “

मी नकळत समोरच्या घराकडे पाहिलं. दार उघडं होतं. आत कुणीतरी कपाट हलवत असल्याचा आवाज येत होता.

जोशीकाकू… वीस वर्षांच्या शेजारी. माझ्या लग्नानंतर मी या घरात आले, तेव्हा पहिल्यांदा साखर मागायला मी त्यांच्या दारात गेले होते. मुलांना ताप आला की काकू रात्री येऊन विचारायच्या, “औषध दिलंस का? ” दिवाळीत त्यांच्या घरी फराळ, आमच्याकडे पुरणपोळी. एखादा दिवस असा नव्हता की एकमेकींची चौकशी झाली नाही.

पण मग काहीतरी बदललं. गेली तीन वर्षं आम्ही एकमेकींशी बोललोच नव्हतो. कारण आठवलं, तर आज हसू येईल इतकं छोटं. त्यांच्या जांभळाच्या झाडाच्या फांद्या आमच्या अंगणात खूप वाढल्या होत्या. रोज पानं पडायची. एक दिवस मी सहज म्हणाले होते, “काकू, वेळ मिळाला की फांद्या जरा छाटून घ्या ना. ” 

माझा हेतू तक्रार करण्याचा नव्हता. पण त्यांना तसं वाटलं असावं. त्या म्हणाल्या, “झाड आहे तर पानं पडणारच. “

मलाही राग आला. मीही दोन शब्द जास्त बोलले. त्यातून आवाज चढला. घरातले बाहेर आले. शेजारी जमले. आणि त्या दिवसानंतर दोघींनीही एकमेकींकडे न पाहण्याचा जणू निश्चयच केला.

सुरुवातीला वाटलं, दोन दिवसांत सगळं सुरळीत होईल. पण दोन दिवस आठवड्यात गेले, आठवडे महिन्यात गेले. दिवाळी आली- फराळाचं ताट गेलं नाही. संक्रांत आली- तिळगूळ दिला गेला नाही. गणपतीत आरतीचं निमंत्रण दिलं नाही.

दोघींनाही बहुतेक बोलायचं होतं. पण मनात एकच प्रश्न- “आधी मी का? ” अहंकाराने नात्याच्या मध्ये भिंत उभी केली होती.

त्या संध्याकाळी त्यांच्या घरासमोर ट्रक उभा राहिला. कामगार सामान भरत होते. मी गॅलरीत उभी राहून बघत होते. जोशीकाकू गेटजवळच्या खुर्चीवर शांत बसल्या होत्या. पूर्वीचा त्यांचा हसरा चेहरा आज फार थकलेला दिसत होता.

अचानक त्यांनी वर पाहिलं. आमची नजरानजर झाली. क्षणभर वाटलं, हात हलवावा. पण हात हलला नाही. त्यांनीही नजर वळवली. मीही आत आले.

त्या रात्री जेवताना मिस्टर म्हणाले, “उद्या जाऊन भेटून ये. “

“आता?  तीन वर्षांनी? ” मी विचारलं.

ते शांतपणे म्हणाले, “नाती जपायला उशीर होतो… उपयोग नसतो. “

रात्रभर झोप लागली नाही. डोक्यात सतत एकच विचार. भांडण आठवत होतं, पण कारण क्षुल्लक वाटत होतं. मग आपण इतकी वर्षं नेमकं काय जपलं?  अहंकार?

सकाळी चहा झाला. घरातली कामं उरकली. आणि अचानक मी उठले. स्वतःलाच म्हटलं, “चल, जाऊन येऊया. “

त्यांच्या दारापाशी गेले, तेव्हा हात थोडा थरथरत होता. बेल वाजवली. दार उघडलं. जोशीकाकू समोर उभ्या होत्या.

क्षणभर दोघींनाही शब्द सापडले नाहीत. मी हळूच म्हणाले, “काकू… निघताय म्हणे? “

त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. “हो गं… “

एवढंच.

मग त्यांनी माझा हात धरला. हात अजूनही तसाच उबदार होता. “तृप्ती, ” त्या म्हणाल्या, “आपण इतकी वर्षं का नाही बोललो गं? “

माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी फक्त म्हणाले, “दोघींनीही हट्ट धरला. “

त्या हसल्या. “वयाने मोठी मी… पाऊल आधी मीच टाकायला हवं होतं. “

“नाही काकू, ” मी म्हणाले, “मीही येऊ शकले असते. “

त्या घरभर नजर फिरवत म्हणाल्या, “हे घर सोडताना सामानाची खंत नाही वाटत. पण तुझ्याशी बोलणं राहिलं, याची जास्त खंत वाटते. “

माझे डोळे भरून आले.

त्या आत गेल्या आणि एक छोटी तुळशीची कुंडी घेऊन आल्या. “ही ठेव, ” त्या म्हणाल्या. “दररोज पाणी घालशील… तेव्हा मला एकदा आठव. “

मी कुंडी घेतली. त्या क्षणी मला जाणवलं- ती फक्त तुळस नव्हती, ते पुन्हा जोडलेलं नातं होतं.

निघताना मी त्यांना मिठी मारली. ती मिठी निरोपाची कमी, आणि तीन वर्षांच्या अबोल्याची माफी जास्त होती.

थोड्याच वेळात ट्रक निघाला. जोशीकाकूंनी हात हलवला. मीही हात हलवला. ट्रक वळणावर दिसेनासा झाला.

समोरचं घर रिकामं झालं. पण त्या रिकाम्या घराने मला एक गोष्ट शिकवली – नाती मोठ्या कारणांनी तुटत नाहीत. ती तुटतात छोट्या गैरसमजामुळे, एका हट्टामुळे, आणि “आधी मी का? ” या चार शब्दांमुळे.

रक्ताची नाती जन्माने मिळतात. पण शेजारची नाती आपण आपल्या वागण्यातून कमावतो. म्हणून मतभेद झाले तरी चालतील… अबोला नको. कारण संकटात सर्वात आधी दार ठोठावणारा माणूस अनेकदा नातेवाईक नसतो… तो आपल्या भिंतीच्या पलीकडे राहणारा शेजारीच असतो.

 ┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
3

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हिऱ्याची अंगठी आणि मी…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हिऱ्याची अंगठी आणि मी…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन किंवा त्यांच्यासाठी इतर काही गोष्टी करता करता अनेक भले बुरे अनुभव येतात. तळागाळातल्या या लोकांकडून खूप काही शिकायला मिळतं, माणुसकी म्हणजे नेमकं काय हे समजतं, सकारात्मक बाबी दिसतात, पूर्णतः अडाणी असून सुद्धा जीवनाकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन भारावून टाकणारा असतो, मी मग याच चांगल्या बाबींवर लिहितो.

वाचल्यानंतर बऱ्याच वेळा अनेक जण मला असं विचारतात, ‘हि अशी चांगली लोकं तुम्हालाच कशी भेटतात, आम्हाला का नाही भेटत असं कुणी? ‘ 

‘तुम्हालाच सगळे चांगले अनुभव कसे येतात?  आम्हाला का नाहीत येत? ‘

‘या इतक्या अडाणी, अंगावर धड कपडे नसलेले लोक, जगण्याची आशा नसलेले लोक, यांच्याकडे इतके चांगले विचार कुठून येतात? ‘

‘तुमच्या बाबतीत खूप छान छान घटना घडतात, एकही वाईट घटना तुमच्या बाबतीत घडत नाही दिवसभरात… मग आमच्याच बाबतीत का नाही असं घडत? ‘

अरे हो.. हो… ऐका तर खरं…

माझ्याबाबतीत सर्व काही चांगलं घडायला मी काय आभाळातून पडलोय का?  की मला कोणता वर मिळाला आहे…?  

तर… दिवसभरातून शंभर पैकी 99 घटना, या चिड आणि राग आणणाऱ्या, काम सोडून द्यावं की काय असं क्षणभर वाटायला लावणाऱ्या इतक्या टोकाच्या असतात. माझ्या बाबतीत काय, किती आणि कसं वाईट घडलंय हे मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलंच आहे. तरीही त्यातल्या काही सांगतो…

आयुष्याच्या सुरुवातीला हे माझं काम सुरू करण्यापूर्वी मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेत काम करत होतो (माझ्या आणि कुटुंबाच्या पोटासाठी केलेली नोकरी होती ती, याला मी समाजसेवा म्हणणार नाही). दरवेळी मी पुण्यातल्या बुधवार पेठ या रेड लाईट एरिया मध्ये कामानिमित्त फिरत असायचो, तिथल्या महिलांशी बोलायचो, प्रसंगी जिथे हा व्यवसाय चालतो त्या घरात (याला Brothel म्हणतात) सुद्धा जायचो. यावेळी दुरून पाहणारे लोक मला “बायका पुरवणारा एजंट” समजायचे.

भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केलं, तेव्हा भीक मागणाऱ्या या लोकांना कोणीतरी सांगितलं, ‘तुमच्यातल्या चांगल्या बाया “हेरायला” हा एजंट तुमच्यात घुसला आहे, हा तुमच्या बायांना “धंद्याला” लावेल, याला दूर ठेवा. ‘ 

भीक मागणाऱ्या लोकांना मेडिसिन देण्यासाठी सुरुवातीला जेव्हा यांच्यात अगदी प्रेमाने मी यांच्या जवळ जायचो, पण “एजन्ट” समजून भीक मागणाऱ्या लोकांनी मला चपला फेकून मारल्या आहेत, गुटखा खाऊन अंगावर थुंकले आहेत, काठ्या घेऊन अंगावर आले आहेत…

रॅकेट चालवणाऱ्या लोकांना वाटायचं, माझ्यामुळे यांचा “बिझनेस” कमी होईल म्हणून कित्येक वेळा गळ्याला सुरे सुद्धा लावले आहेत… आई बहिणी वरून शिव्या देऊन ते मला म्हणायचे, ‘आज आत्ता इथे दिसलास, पुन्हा दिसू नकोस, दिसलास तर नागडा करून मारू, इथेच खल्लास करून टाकू… कुणाला पत्ता सुद्धा लागणार नाही…! ‘

असो, तर सांगायचा मुद्दा हा, की दिवसातून 99 वेळा माझ्या बाबतीत वाईट घटना घडतातच, क्षणभर वाटतं कशासाठी करायचं हे मी…?  पण दिवसभरातून एक तरी माणुसकीचे दर्शन घडवणारी, जन्माला येऊन सार्थक झालं असं वाटायला लावणारी, एक तरी घटना घडतेच. या एकाच घटनेचे वजन 99 वाईट घटनांपेक्षा जास्त भरतं… या चांगल्या घडलेल्या एका गोष्टीच्या फुंकरीमुळे बाकीच्या 99 गोष्टी धुरळ्यागत उडून जातात…! हिच मला मिळणारी ऊर्जा आणि शक्ती! ! !

याच ऊर्जा आणि शक्तीच्या बळावर, गेली अकरा वर्षे रोज भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून त्यांच्या पुनर्वसनाचे, शिक्षणाचे, फुटपाथ वर पडलेल्या लोकांना उचलून सुरक्षित ठेवण्याचे काम सुरु आहे, अर्थात आपल्या सर्वांच्या साथीने…!

ती दिवसभरातून घडलेली एकच चांगली घटना, मग मी शब्दरूपात मांडतो, जेणेकरून समाजापर्यंत एक चांगला संदेश पोहोचेल, आपणही असं काहीतरी करावं हे तरुण मंडळींना सुद्धा वाटेल, निराश झालेले लोक हे वाचून नैराश्यातून कदाचित बाहेर पडतील, सगळंच वाईट नाही, काहीतरी चांगलं सुद्धा आजूबाजूला घडतंय, हे लोकांना कळेल, एरव्ही न दिसणाऱ्या माणुसकीचे दर्शन घडेल, इतकाच माझ्या लिखाणाचा हेतू असतो…!

खूप लोक म्हणतात, ‘तुम्हाला येणाऱ्या वाईट अनुभवांवर सुद्धा काहीतरी लिहीत जा की… ‘ पण पेपर उघडला, टीव्ही लावला, आजूबाजूला पाहिले तर अनंत नकारात्मक आणि वाईट वाटेल अशा घटना घडतच असतात, आपण त्या वाचतो पाहतो… मग पुन्हा माझ्या बाबतीत घडलेल्या नकारात्मक गोष्टी सांगून मी त्यात आणखी कशाला भर घालू…???

‘तुम्हालाच सगळे चांगले अनुभव कसे येतात?  आम्हाला का नाहीत येत? ‘, ‘वाईट आलेल्या अनुभवांवर का लिहीत नाही? ‘ हे मला विचारणाऱ्या त्या सर्वांसाठी हे उत्तर आहे…! असो… अगदी साधी गोष्ट… एखाद्याने आपल्याला विचारलं – तुला मी पाचशे किलो गहू देऊ?  की एक किलो गहू?  दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल?  पाचशे किलो गहू… कारण इथे *वजन* महत्त्वाचं ठरतं.

एखाद्याने विचारलं – तुला मी चांगल्या सोसायटीतला पाच रूम असलेला 3000 स्क्वेअर फुटचा पॉश फ्लॅट देऊ?  की चाळीतलं 100 स्क्वेअर फुटाचं पत्र्याचं एक घर देऊ?  दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल?  अर्थातच पॉश फ्लॅट… कारण इथे महत्त्वाची ठरते *आकारमान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची किंमत. *

पण…

एखाद्याने विचारलं – तुला मी पाचशे किलो लोखंड देऊ?  की 50 तोळे सोनं… काय देऊ?  दोन्हीतलं एक काहीतरी निवड… आता कुणीही काय निवडेल?  50 तोळे सोनं…!

बघा क्षणामध्ये संदर्भ बदलले…

“वजन” महत्त्वाचं म्हटलं तर 500 किलो लोखंडाचे वजन खूप जास्त आहे… तरीही निवड झाली कमी वजनाच्या सोन्याची!

“आकारमान” महत्त्वाचं मानलं, तर 500 किलो लोखंडाचं आकारमान खूप जास्त आहे… तरीही निवड झाली कमी आकारमानाच्या सोन्याचीच!

एखाद्याने विचारलं – तुला मी अब्जावधी रुपयाची एक छोटी हिऱ्याची अंगठी देऊ?  की पॉश सोसायटीतल्या दहा खोल्या भरतील इतके जुने भंगार सामान देऊ?  दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल?  अर्थातच हिऱ्याची अंगठी…!

बघा इथेही वजन, आकारमान, असं सर्व काही असूनही, निवड झाली कमी वजनाच्या, कमी आकारमानाच्या हिऱ्याच्या अंगठीचीच…!

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जीथे “वजनाला” किंमत नसते आणि “किमतीला” वजन नसतं…! रुपयात होणारी किंमत हि फक्त व्यवहारासाठी आहे…!

“किंमत” आणि “मूल्य” यात खूप फरक आहे…! “किंमत” ही कायम खर्च होते… “मूल्य” आयुष्यभर जपले जाते…!

हॉटेलमध्ये स्वतः दोन हजार रुपयांचं खाणं… आणि एखाद्या भुकेल्या माणसाला दहा रुपयाचा वडापाव घेऊन देणं… दोन हजार रुपयांना किंमत जास्त आहे, परंतु या किमतीला वजन नाही… दहा रुपयांना विशेष किंमत नाही, तरीही याचे “मूल्य” आणि “वजन” खूप जास्त आहे…! दोन हजार रुपये खर्च झाले… दहा रुपये अमूल्य होऊन जमेच्या रकान्यात जमा झाले…

तर… मला रोज मोठ्या “आकाराचे” अपमान मिळतात… खूप जास्त “वजनाचे” तिरस्कार मिळतात…

पेशंट तपासायला रस्त्यावर मी एखादी “मोक्याची जागा” बघून मेडिसिन चे डबे मांडून बसतो, परंतु चालायला अडथळा होतो म्हणून लोक माझ्या या डब्यांना मुद्दाम लाथा मारून जातात, दुकानदारांना गिऱ्हाईक आत यायला अडथळा येतो म्हणून मला ते तिथून हाकलून लावतात… या नंतर, दहा खोल्या भरतील इतक्या शिव्या मिळतात…! ! ! पण मी हे मुद्दाम लिहीत नाही, गरजच काय…?  

पण हे सर्व करत असताना उकिरड्यात काहीतरी चकाकताना दिसतं, मी जवळ जाऊन पाहतो ती बहुधा हिऱ्याची अंगठी असते, वेगवेगळे घाव बसले असावेत म्हणून अंगठीचा आकार बदललेला असतो, हिरा मात्र तस्साच लखलखणारा…! हां, थोडी धूळ बसलेली असते इतकंच…

मी माझ्या रुमालाने धूळ साफ करतो, एक सुरकुतलेला पण डोळ्यात चकाकी असणारा साधारण सत्तरीच्या आजीचा चेहरा मग हिऱ्याच्या रूपात समोर येतो…!

मी तिला बोलतं करतो… , ‘मुलगा चांगल्या खात्यात हाय, मला कसला त्यो टीबी का फीबी रोग झालाय म्हणत्यात, सतत खोकणाऱ्या म्हातारीमुळं आपल्या पोरास्नी काय तरास नगो म्हणून हितं आनून पोरानं बशीवली, परत घ्यायाला येतो म्हनला पण धा दिस झालं तरी आला न्हायी…! ‘

‘आजी तुम्हाला मुलाचा फोन नंबर माहित आहे का, पत्ता माहित आहे का?  मी तुम्हाला सोडतो, ते वाट बघत असतील तुमची. ‘

‘मला समदं म्हाईत हाय बाळा, पन वाट चुकलेल्याची बघत्यात, सोडून दिलेल्याची न्हायी. माजी वाट बघणारं आता तिथं कुणी न्हायी’ तिने डोळ्याला पदर लावला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आज का सगळेच बदललेले ??  ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? इंद्रधनुष्य ?

☆  आज का सगळेच बदललेले ??  ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

“आज सगळेच वेगळे दिसत होते. 

कां ? ते समजत नव्हते, 

मग लक्षात आलं गणपती उत्सवामुळे – – “

सकाळी मी रोजच फिरायला बाहेर पडतो. गणपती उत्सवाचा पहिला दिवस होता. नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. दार उघडून बाहेर आलो आणि समोरच गेटवर भारद्वाज पक्षी बसलेला दिसला आणि आज काहीतरी शुभ घडणार असा संकेत मिळाला. त्याला हात जोडून मी नमस्कार केला आणि फिरायला बाहेर पडलो.

मेन रोड लागल्यावर, नेहमीचे दृश्य असते, की रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात / कचरा पडलेला असतो / कागदाची खोकी  पडलेली असतात. आज मात्र रस्ता एकदम चकाचक दिसत होता. काही जण कार चालवत असतात / स्कुटर चालवत असतात आणि काहीतरी खात असतात. खाऊन झाले कि कागद / प्लॅस्टिक पिशवी रस्त्यावर टाकतात. आज कुणीच कचरा फेकलेला  दिसत नव्हता. 

कां? ते मात्र समजत नव्हते.

सिटी प्राईड च्या रस्त्यावर आलो, की तिथे, कुत्री घेऊन फिरणारे स्त्री-पुरुष नेहमीच दिसतात. रस्त्यावर कुठेही कुत्र्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे त्यांचे शी – शू करणे सुरू असते. कुत्रे फिरवणाऱ्याला मात्र त्याचे काही देणे घेणे नसते. आज पण कुत्र्याला घेऊन हिंडणारी मंडळी दिसत होती. फुटपाथवर एका ठिकाणी एका कुत्र्यानी शी केली, आणि मालकाने लगेच प्लास्टिकच्या पिशवीत शी गोळा केली. आणि आश्चर्य म्हणजे आज कुत्री फिरवणाऱ्या  सगळ्यांच्याच  हातात प्लास्टिकच्या पिशव्या दिसत होत्या. हा बदल कशामुळे घडला?  ते मात्र समजत नव्हते.

पुढे मेन रोडला आलो. नेहमीचा देखावा म्हणजे, हॉर्नचे कर्कश आवाज, काही चौकांमध्ये सिग्नल सुरू असतात, काही ठिकाणी बंद असतात. सिग्नल पाळणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच असतात. सगळ्याच गाड्या बेफाम वेगाने धावत असतात. झेब्रा क्रॉसिंग वर रस्ता ओलांडणारे  जीव मुठीत घेऊन धावत असतात. काहीजण उलटी कडून वेगाने येत असतात. काहीजण फुटपाथवर गाड्या घालत असतात.

आज मात्र सगळेच बदललेले दिसत होते. सगळे सिग्नल चक्क सुरु होते. कोणी हॉर्न वाजवत नव्हते. सिग्नल तोडून जाणारी एकही गाडी दिसत नव्हती. झेब्रा क्रॉसिंग वरून पादचारी आरामात रस्ता ओलांडत होते. सगळ्या गाड्या २० – ३० च्या वेगाने जात – येत होत्या. उलटी कडून येणारी किंवा फुटपाथ वरून जाणारी एकहि टु व्हीलर दिसली नाही. वळणारी प्रत्येक गाडी चक्क साईड इंडिकेटर देत होती. 

हा बदल बघून, मी माझे फिरणे विसरलो, आणि ट्रॅफिकचा हा नवीन रंग बघण्यात रममाण झालो. काहीतरी कारणामुळे माझी तंद्री मोडली आणि मी पुढे निघालो. ट्रॅफिक मध्ये एकदमच ही सुधारणा कशामुळे झाली, ते मात्र काही समजत नव्हते.

पुढे मारुती मंदिर लागते, तिथे फुटपाथवर नेहमीच लोक कबुतरां करता धान्य टाकत असतात. त्यामुळे कबुतरांचे थवे कायम तिथे असतात. कबुतरांमुळे काही आजार पसरतात, त्यांना रस्त्यावर धान्य टाकू नका, असे बरेच वेळा पेपरमध्ये आपण वाचतो. पण त्याची दखल कुणीच घेताना दिसत नसते. आज मात्र फुटपाथ वर कोणीही धान्य टाकले नव्हते. त्यामुळे आज एकही कबूतर दिसत नव्हते. हा बदल कशामुळे  ? हे मात्र समजत नव्हते.

थोडं पुढे गेलं की गणपतीचे मंदिर आहे. रोज मी बाहेरून दर्शन घेतो आणि पुढे जातो.

गणपती उत्सव सुरू असल्यामुळे गणपतीचे दर्शन घेण्याकरता मी मंदिरात गेलो. बाप्पाला नमस्कार करताना एकदम लक्षात आलं की गणपती उत्सवामुळे बाप्पा सगळ्यांना दर्शन देण्याकरता दहा दिवसां करता इथे आले आहेत. आणि आत्ता येताना रस्त्यावर जो बदल दिसत होता तो सगळा त्यांच्या अस्तित्वामुळेच आहे.

मी बाप्पांना नमस्कार केला. डोळे मिटले आणि इतका सुंदर बदल घडवून आणल्याबद्दल देवाचे आभार मानले, आणि असाच बदल कायम ठेव अशी बाप्पाकडे प्रार्थना केली.

आणि चक्क बाप्पा बोलत आहेत असा मला भास झाला – 

बाप्पा : तुमच्या सगळ्यांकरता काय योग्य आहे हे दाखवण्याकरता मी हा बदल दहा दिवस घडवून आणणार आहे. सगळ्यांना जर हा बदल आवडला तर पुढचे सगळे दिवस मात्र तुम्ही त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करायचा आहे. आपण रस्त्यावर असताना आपल्या बेशिस्त  वागण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही हा विचार सगळ्यांनीच जर केला तर हे सहज शक्य आहे. इतरांमध्ये आपले आई वडील बघा, आपले वयस्कर आजी आजोबा बघा, आपले मित्र बघा, आपले नातेवाईक बघा, आपली लहान मुलं बघा, आपली बायको बघा/ नवरा बघा,’ आणि आपोआपच हा बदल तुमच्यामध्ये घडून येईल. 

तथास्तु…

 

© श्री सुधीर करंदीकर 

मोबाईल नंबर 9225631100

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कसं रिऍक्ट व्हावं हेच समजत नाही…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “कसं रिऍक्ट व्हावं हेच समजत नाही…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

झालं असं की,

दुपारची वेळ, हॉस्पिटलमध्ये फार गर्दी नव्हती तेव्हा वेदनेनं विव्हळणाऱ्या आजीला घेऊन म्हातारबा आले. आजींची अवस्था पाहून नर्सनं ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं.

“डॉक्टर, म्हातारी लई तळमळतीये. ”म्हातारबांनी हात जोडले. आजींना तपासल्यावर डॉक्टर म्हणाले “बरेच दिवस दुखणं अंगावर काढलेलं दिसतंय. सर्दी ताप, खोकला आणि अशक्तपणा आहे. खूप दिवसांच्या उपाशी दिसतायेत. हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. काही तपासण्या कराव्या लागतील. तुम्ही यांचे कोण?

“कुणी बी नाई. रस्त्यावर तडफडत व्हती माज्याच्यानं बघवलं नाय म्हणून इत घेऊन आलो.”

“आजींचे नाव काय? कोणी नातेवाईक??”

“लई येळा ईचारलं पण म्हातारी काय बी बोल्ली नाय. बहुतेक मुकी हाय.”

“पोलिसांना कळवावं लागेल”

“कशाला? त्यापरिस असं करा. माजी सावत्र बहीण समजा”

“ठीकये. तुम्ही जबाबदारी घेत असाल तर हरकत नाही. फॉर्मवर सह्या कराव्या लागतील. ”

“हा करू की. काही पैशे बी भरू. आधारकार्ड बिर्ड पायजे असलं तर ते बी घ्या पर हीला बरी करा. ” – – 

– – अनोळखी व्यक्तीसाठी धडपडणाऱ्या म्हातारबांचे सगळ्यांना खूप कौतुक वाटलं. “अजूनही माणुसकी शिल्लक आहे. ”असं प्रत्येकाला वाटतं होतं.

आजीना ऍडमिट करून गेलेले म्हातारबा नंतर चार दिवस फिरकलेच नाहीत. फोन केल्यावर पाय मुरगळल्यानं येऊ शकत नाही असं सांगितलं. त्यानंतर काही ना काही कारणं देत म्हातारबा टाळत होते. पंधरा दिवस होऊन गेले तरी म्हातारबा आले नाहीत आणि मोबाइलही बंद. आजीची तब्येतीत सुधारत होती परंतु बोलता आणि लिहिता-वाचता येत नसल्यानं काहीच माहिती मिळत नव्हती. सगळंच अधांतरी आणि त्यात भरीसभर म्हणजे बिल वाढत होतं.  

शेवटी नाईलाजानं पोलिसांना बोलवावं लागलं. म्हातारबांना ओळखता का? विचारल्यावर आजींनी होकारार्थी मान डोलावली. हातवारे करत आजी काही सांगायचा प्रयत्न करत होत्या पण कोणाला समजत नव्हतं. त्याचवेळी दुसऱ्या पेशंटला भेटायला आलेल्या जोडप्याकडं आजींनी बोट दाखवल्यानं गोंधळ अजून वाढला. पोलिसांनी चौकशी केली पण ते जोडपं आणि आजींचा काहीही संबंध नव्हता तरीही आजी सारखं सारखं बाईंच्या कपाळावरच्या टिकलीकडे आणि मंगळसूत्राकडं बोट दाखवत होत्या. तेव्हा एका सीनियर नर्स अंदाजानं ‘नवरा-बायको’ म्हणाल्या तेव्हा आजींनी जोरजोरात मान डोलावली. एक बोट स्वतःकडं आणि दूसरा हात उंचावत इशारा केला तेव्हा गुपित उलगडलं आणि पोलिसांची चक्र हलली. दुसऱ्या दिवशी म्हातारबा हॉस्पिटलमध्ये हजर झाले.

“साहेब, डॉक्टर, माप करा. लई मोटी चुक झाली. मी खोटं बोल्लो. ही माजी पयली बायको. आमचा काडीमोडहून तीस वर्ष झाले. त्यानंतर आमच्यात कायबी संबंध राहिला नाही. म्या दुसरं लग्न केलं. दोन पोरं हायेती पर ही एकटीच राहिली. काई दिसांपूर्वी अचानक दिसली. लय वाईट अवस्थेत व्हती. इच्या गावाकडं ईचारलं तवा कळलं की आता हीचं कुनीबी नाय. लोकांनी फसवून घरदार लुटलं. भीक मागून जगतेय. मिळालं तर खाते नाईतर उपाशी. “

“मग स्वतःच्या घरी जायचं ना” पोलीसांनी खडसावलं.

“लई ईच्चा हाय पन घरी नेता येत नाई कारण मीच पोरांच्या जिवावर जगतोय. म्हणून ही लबाडी केली. बरी झाल्यावर कुठल्या तरी म्हाताऱ्यांच्या आश्रमात ठेवेन. माज्या घरी सांगू नगा नाईतर मीपण रस्त्यावर येईल. बँकेत दोन यप डी हायेत त्यातून दवाखान्याचे पैशे फेडेन. आता वरच्याजवळ एवढंच मागणं हाय की.. हिचं जगणं सुखाचं झालं नाही. निदान मरण तरी… ” बोलता बोलता म्हातारबा ढसाढसा रडायला लागले.

त्यावेळी आजी मात्र एकदम निर्विकार आणि पोलिस, डॉक्टर, हॉस्पिटल स्टाफ सगळे सुन्न.

– – काही वेळा कसं रिऍक्ट व्हावं हेच समजत नाही.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक खास बर्थडे पार्टी…” – लेखक – व. पु. काळे ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “एक खास बर्थडे पार्टी…” – लेखक – व.पु.काळे ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

एका मित्राच्या बर्थडेची पार्टी होती.एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती.मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते..”हाय हॅलो “वगैरे सगळं झालं.मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले..पार्टी रंगात येऊ लागली होती.मग जेवणाच्या आधी ‘ड्रिंक्स & डान्स ‘चं आयोजन होतंच.

सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले..डी.जे. चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं..नाचायला पूर्ण तयार झालेली लोकं, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती.आणि गाणं सुरु झालं..

“गजानना श्री गणराया,आधी वंदू तुज मोरया ..मंगलमूर्ती….” सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले.बर्थडे पार्टी,हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? ‘ गजानना गणराया ‘? लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली..शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, “ए,हे काय..?पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार “- तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला..

“मित्रांनो..माझी बर्थडे पार्टी आहे.आता पार्टी म्हटली की त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना? अर्थात असणारच..पण जसं एखाद्या पार्टीत, हे ‘गजानना गणराया ‘ गाणं शोभत नाही ना,तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवातदेखील एखादं पार्टी सॉन्ग शोभत नाही..पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही.. ‘आपल्याला काय करायचंय ‘ म्हणून सोडून देतो..पण हे चुकीचं आहे..गणेशोत्सव हा ‘उत्सव ‘आहे आणि गणपती हा आपण देव मानतो.त्याला  Show -Piece करून ठेवू नका..आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना,तसाच विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा..D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो..उत्सवाची नाही..हे लक्षात ठेवा..हातात दारूचे ग्लास,पार्टीत बरे वाटतात..गणपतीच्या मिरवणुकीत नाही..विरोध दर्शवा.आपण गप्प बसतो, म्हणून हे खूळ बोकाळलंय..सगळीकडे दारू आणि डी.जे. चालणार नाही, हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना..

अशा उत्सव मंडळांना वर्गणी,देणगी जाहिरात देऊ नका, जिथे असला थिल्लरपणा चालत असेल..मग बघा परिवर्तन होतं की नाही ते..आणि..सो सॉरी.मला ही गोष्ट खटकते..गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत..आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती.म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं..Now enjoy your Party, Friends ..” -म्हणत हा खाली उतरला..टाळ्यांचा कडकडाट झाला..

मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं ..हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “काळे, लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं..कशी वाटली आयडिया ? ” -तसं मी हसत म्हटलं, ” साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट!चियर्स “..

 

लेखक:व. पु. काळे

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जिवलग मित्र सारे! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जिवलग मित्र सारे! ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

जन्माला जरी आलो एकटा,

मित्रांनी नाही जाणवून दिले एकटेपण!

अनेक सुख दुःख आली,

हाक न मारता धावून आले सारेजण!

*

बालवाडी खेळी एकत्र दमलो,

तारुण्यात मौजमस्तीत रमलो!

तिसरा अंक येईल तेव्हा येईल,

वर्तमानात एकमेकांसाठी जमलो!

*

कधी जरी उदास वाटे मनाला,

डोळे पाहून मनातले सारे वाचतात!

कष्ट करून यश मिळते तेव्हा,

माझ्यापेक्षा तेच आनंदाने नाचतात!

*

आर्थिक प्रगती पुढे मागे असे,

तुलना सुखाची कुणा अंतरी नसे!

एकाच कट्यावर एकत्र सारे बसे,

निखळ मैत्रीचा भाव ह्रदयात वसे!

*

आयुष्यभर साथ दिलीत,

भावनांचा केला नाही कधी धंदा!

अमरपट्टा नाही घेऊन आलो,

जाईन तेव्हा मित्रांचाच मिळू दे खांदा!

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # ३०१ – ठंडे ये ज्वालामुखी करो…१ ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता –  प्रायमरी का मास्टर…५।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # ३०१ ☆

☆ – ठंडे ये ज्वालामुखी करो…१ ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ✍

आज

आम आदमी

संत्रस्त है, परेशान है

और है बेहद दुखी,

धैर्य के धिक्कार से

सहिष्णु मन भी

आतुर है

बन जाने को ज्वालामुखी।

याद आ रहा है

एक पुराना गीत-

‘मन के हारे हार है

मन के जीते जीत! ‘

गीत, आखिर गीत होता है

खण्डहर में गूँजते गीत से

आदमी भयभीत होता है।

हम,

खण्डहर में खड़े खड़े

भयभीत होते जा रहे हैं-

हमारी नियति-

होठों से गिरकर

पत्थर पर लिखे गीत होते जा रहे हैं।

हमारे नाकनक्श भूख

तराशे हैं,

हकीकत ये है –

हम कई दिनों से उपासे हैं, प्यासे हैं,

और

क्रमशः…

स्व डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # २९८ – “प्राण पखेरू उड़े अचानक…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “प्राण पखेरू उड़े अचानक...”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # २९८ ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “प्राण पखेरू उड़े अचानक...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

☆

सारे बेटे रहे पालते

” पापा ” को स्नेह से

मरे एक दिन किन्तु पिताजी

हत्यारी मधुमेह से

 

कोई दवा काम ना

आयी तरह तरह बदली

जब भी जिस ने जो

बतलायी वह गोली निगली

 

सोया करते पूज्य पिता

तब बाहर की दालान में

जिस में भीग भीग जाते

थे चौमासे के मेह से

 

जब भी कोई व्यक्ति

माँगने दरवाजे आता

उसे मना की नहीं कभी

वह खुश होकर जाता

 

कीर्तिमान यह रहा पिता

का कुछ न कुछ देते

कहा किये थे याचक ना

खाली जाये इस गेह से

 

बहुत तसल्ली थी उनको

जायेंगे माघ मेला

तभी राम ने उन से था

खेला ऐसा खेला

 

प्राण पखेरू उड़े अचानक

रोक नहीं पाये

लगा कि सारा नेह चुक गया

उनका था इस देह से

 

☆

©  श्री राघवेन्द्र तिवारी

08-092024

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अनुभव… ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – अनुभव… ?  श्री संजय भारद्वाज ?

…उसने कहा था कि तुम उस पर विश्वास कर सकते हो।

…हाँ।

…फिर तुमने उसकी बात को अनसुनी क्यों कर दिया?

…मैंने अपने अनुभव की सुनी।

…क्या कहा तुम्हारे अनुभव ने?

 …यही कि मैं एक और विश्वासघात सहन नहीं कर सकता।

 

?

© संजय भारद्वाज   

रात्रि 11:47 बजे, 19 सितंबर 2025

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रीगणेश साधना, गणेश चतुर्थी तदनुसार सोमवार 14 सितंबर को आरम्भ होकर अनंत चतुर्दशी तदनुसार शुक्रवार 25 सितम्बर तक चलेगी। 🕉️

💥 इस साधना का मंत्र होगा – ॐ गं गणपतये नमः।💥

💥 साधक को इस मंत्र की कम से कम एक माला (108 जप) का संकल्प लेना होगा। इस मंत्र के मालाजप के साथ ही कम से कम एक पाठ अथर्वशीर्ष का भी करना है। जिन्हें अथर्वशीर्ष बहुत कठिन लगे, वे इसे सुनें अवश्य।🕉️

💥 हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

≈≈हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares