मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ शब्द… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

शब्द.  अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे

“शब्द.” मूल बोलू-चालू लागण्यापूर्वी च ऐकण्याच्या माध्यमातून  ‘अडगुलं-मडगुलं’ सारखी बडबडगीतं ऐकतं नि मोठं होतं.चिऊकाऊच्या गोष्टी ऐकत, चांदोबाकडे पाहत, आजुबाजुचा परिसर न्याहाळत ते भोवताल समजून घेतं.लहानपणी आकलनक्षमता जास्त असते त्यामुळे मूल पटकन शिकतं.अक्षर ओळख झाल्यानंतर कांही काळ गेला कि तेच मूल मोठ्या टाइपमधील गोष्टींच पुस्तक वाचू लागतं ,यातून पुढे वाचनाची आवड निर्माण होते नि वाचनाची सवय जडते.

शब्द एकदा जवळचे झाले कि मग ते सर्वस्वच बनतात.संत तुकाराम महाराज तरी म्हणतात

आम्हां घरी थन शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शस्त्रे यत्नें करू ||१||

शब्दची आमुच्या जीवाचे जीवन

शब्दे वाटू धन जन लोका  ||२||

तुका म्हणे पहा,शब्दची हा देव

शब्देचि गौरव ,  पूजा करू ||३||

केवढा अर्थ भरला आहे या अभंगात.आपण थन कशाला म्हणतो तर सोने,चांदी,रत्ने,माणके,रुपये इ.ना.पण तुकाराम महाराज शब्दांनाच धन मानतात.कारण त्यांच्याकडं शब्दांच असं ऐश्व्य आहे कि जे हिरावून घेताच येणार नाही.शब्दांनाच ते शस्त्र मानतात .हे सुद्धा पटतं कारण महात्मा गांधींच्या “चले जाव “किंवा “छोडो भारत ” या शब्दात शस्त्रासारखं सामर्थ्य होतंं ज्यामुळं ब्रिटीश साम्राज्य हादरलं.अजूनही शिकण्यापूर्वी किंवा शिटताना प्रारंभी श्री सरस्वतीची,शब्द ब्रह्माची पूजा करतात.

संत रामदास स्वामी सुद्धा म्हणतात _

नाना शब्द,नाना स्पर्श  |

नाना रुप नाना रस |

नानागंध ते विशेष |

नरदेह जाणे ||

एवढच म्हणून ते थांबत नाहीत तर ते देवाजवळ मागण मागतात

कोमल वाचा दे रे राम |

संगीत,गायन दे रें राम |

आलाप,गोडी दे रे राम

रसाळ मुद्रा दे रे राम |

शब्द मनोहर देरे राम ||

म्हणूनच या शब्दांशी मैत्री करु या

शब्दसंग्रह वाढवू या नि त्याचबरोबर शब्दांची गोडी जाणु या नि कटु शब्द टाळू या.

खरोखरच शब्द हे सुंदर आहेत.मनातल्या भावना आपण शब्दातूनच व्यक्त करतो. अगदी एकाक्षरी हुंकारातुनही हे घडू शकतं.

उदा.” हं ” हा शब्द कधी संमती दर्शवितो,तर कधी समाधान.कधीकधी तिरस्कार किंवा क्रोध सुद्धा हुंकारातूनच प्रगटतो.

गोड शब्द दुसर्याला आपलसं करुन घेतात नि नाती जोडतात. याउलट कटु शब्द दुरावा निर्माण करतात नि नाती तोडतात.अशक्य वाटणारं मोठं काम नुसत्या गोड शब्दांच्या वापरातून पूर्ण होतं.म्हणूनच या शब्दास आपण

“शब्दब्रह्म “म्हणुया नि नि नि:शब्द होऊन शब्दांपुढे नतमस्तक होऊ या. 🙏

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तंत्रज्ञान दिनानिमित्त…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “तंत्रज्ञान दिनानिमित्त…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कुठलाही महत्त्वाचा प्रसंग आयोजित करतांना माणूस आजकाल एखाद्या महत्वाच्या,वैशिष्ट्यपूर्ण वा खास दिवसाचे औचित्य साधायचा प्रयत्न करतो.त्यायोगे तो खास दिवस अजूनच खास होऊन कायमचा चांगल्या आठवणींनी स्मरणात राहायला मदतच होते.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जर टप्प्याटप्प्याने गेलेल्या काळाचा विचार केला तर आपल्याला आपल्या भारताची झालेली लक्षणीय प्रगती लक्षात येईल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली भारताची वेगवेगळी प्रगती झालेली दिसून येईल.आपल्या होणाऱ्या प्रगतीमध्ये तसेच विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे ह्यात कुठलीच शंका नाही. हे युगच यंत्रांच युग आहे.पण फक्त मनात मात्र एक भिती दडून बसलीयं की हे  प्रगत यंत्रयुग चालत्याबोलत्या माणसाला यंत्र तर बनवीत नाही नां ? अर्थातच ही भिती काही अगदीच अनाठायी नाही बरं का,ब-याच अनुभवाने जाणवलेली ही भिती आहे. तरीही नाण्याला दोन्ही बाजू असल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे तंत्रज्ञानाबाबत उजव्या विचारसरणीचं पारडं नक्कीच जड आहे हे विसरून चालणार नाही.  11 मे  हा  “तंत्रज्ञान दिन “!

विज्ञानामुळे नवनवीन क्रांती उदयास येते  आणि हीच क्रांती आपली उत्तरोत्तर प्रगती घडवून आणते.हल्ली काळ खूप बदललायं. परंतु पूर्वीच्या काळी ह्या विज्ञानाच्या अद्भूत कामगिरीमुळे निर्माण झालेले चमत्कार आणि त्या चमत्कारांमुळे तयार झालेले अविष्कार जनमानसाकडुन पचविल्या जाणं ही खूपच अवघड गोष्ट होती.

विज्ञानाचे अविष्कार येतांनाच दोन रुप घेऊन येतं.त्याच्या योग्य वापरामुळे झालेली  प्रगती, विकास आणि उत्कर्ष हे एक रुप आणि त्याच्या अतिरेकी ,चुकीच्या वापरामुळं झालेली अधोगती,पिछेहाट हे दुसरं रुपं.

पूर्वी माणसं ही नोकीयाच्या जाहीराती प्रमाणे ” कनेक्ट दी पीपल ” ह्यावर विश्वास ठेवणारी होती. माणसाचं माणसावाचून अडायचं असा हा “अच्छे दिन” असलेला काळ होता. ह्या यंत्रयुगामुळे माणसाला माणसाची गरज नसल्याची परिस्थिती निर्माण होऊ घातलीयं आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे.

पूर्वी एकमेकांची मदत घेणं ह्यात प्रेम,आपुलकी हक्क दडलेला होता आणि तोच एकमेकांतील दरी मिटवून त्यांना जोडण्याचं दुव्याचं काम करायचा. आता ह्या यंत्रयुगांने एकमेकांची मदत घेतांना एकप्रकारची “हिचकीच”आलीयं.मुळात मदत घेणं हे कमीपणाचं लक्षण हा अत्यंत चुकीचा विचार मनात ठसवतं पिढी उत्तरोत्तर पुढे जातेयं.साधं उदाहरणं पूर्वी एकमेकांना पत्ते विचारतांना,ते शोधतांना खूप मजा यायची. पत्ता विचारणारा, शोधणारा थोडा काळजीत विचारायचा आणि समजावून सांगणारा अगदी तो प्रश्न चुटकीसरशी सोडवूंन दिलासा द्यायचा. आता मुळात पत्ता शोधणेच जवळपास बंद झालयं कारण एकमेकांकडे जाणीयेणीच मुळात कमी झालीयं आणि अगदीच नाईलाजाने जावं लागलं तर कमीपणा न वाटू देणारं “जीपीएस”वरील कोरडी बाई तुम्हाला पोहोचवते इप्सित स्थळी.

आता अत्याधुनिक बँकींग चे बदलते रुपं बघतांना तर हा अनुभव पावलोपावली येतोयं. अर्थातच ह्या नवीन तंत्रज्ञानाने सगळं खूप सहज,सोप्प झालयं हे ही खरचं किंवा ही काळाची गरज म्हणू हवतरं.मध्ये एक आजोबा आणि नातू बँकेत आले होते. ते दोघेही त्या  आजोबांना घरबसल्या बँकींग करता यावे म्हणून अँप डाऊनलोडींगसाठी बँकेत आले होते. अर्थातच आजोबांची सोय बघणं हा निरपेक्ष प्रामाणिक उद्देश नातवाचा होता पण आजोबा ह्यातून काय मिळवतात आहेत हे बघण्याच्या नादात आजोबा खूप काही गमावतात आहे हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. आजोबा गमावतं होते त्यांचा वेळ घालवणं, आजोबा गमावत होते संवाद साधणं,आजोबा गमावत होते तो पासबुकातील आकडे बघतं राहण्याचा,मनाशी हिशोब करण्याचा आनंद, ते गमावतं होते मित्रमंडळी,समवयस्क परिचीत लोकांना एकत्र भेटण्याचा,वैचारिक देवाणघेवाणीचा आनंद,ते गमावतं होते अतिशय काटकसरीतून जमा केलेल्या पुंजीतुन केलेले फिक्स डिपाँझीट परतपरत वाचण्याचा, हाताळण्याचा आनंद.हे त्या नातवाला कळतच नव्हते वा जाणवतही नव्हते. असो कालाय तस्मै नमः हेच खरे.दोघही योग्यच होते फरक फक्त पिढीचा होता.”कुछ पाने के लिये कुछ तो खोना पडता है”ह्यावर परत एकदा विश्वास बसला.

11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरण मध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरण मधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्‍या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम केलेच कसे ह्या विचारानेच जगाला धक्का बसला. 

भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती.  १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.

तंत्रज्ञानाचा विषय निघाला तेव्हा अजून लक्षात आलं अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली. ह्या व्यतिरिक्त भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं. हे सैन्य आणि नौदल यांनी एकत्रित केले आणि भारत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग बनला.

आजचा हा तंत्रज्ञान दिन आपल्यासाठी एखादा सोहळा,समारंभ ह्या  सारखाच महत्त्वाचा आहे हे नक्की. आजच्या ह्या तंत्रज्ञान दिनी ह्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शांत झोप आनंदी मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ शांत झोप आनंदी मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

हे वाचूनच छान वाटते.काही जण म्हणतील की आनंदी मन असेल तर शांत झोप लागेल.आणि काहींचे म्हणणे असेल शांत झोप लागली तर मन आनंदी होईल.थोडक्यात या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.

प्रथम आपण शांत झोप लागण्या साठी काय करायचे ते बघू.

यात काही भौतिक ( शारीरिक व्याधी व बाह्य ) व काही मानसिक कारणे असतात.

बाह्य कारणे आपणच निर्माण करतो. त्या साठी पुढील उपाय करावेत.

१) झोपण्या पूर्वी किमान ३ तास आधी जेवावे.

२) जेवल्यावर शतपावली  करावी

३) झोपण्या पूर्वी २ तास टीव्ही,मोबाईल अशी साधने दूर ठेवावीत.

४) झोपण्या पूर्वी १ तास आधी एखादे पुस्तक वाचावे/नामस्मरण करावे/ मंद संगीत ऐकावे.

 मानसिक कारणे

🔹 भूतकाळातील कटू आठवणी

🔹 आपल्या चुका

🔹 ईर्षा, राग, वाईट विचार, हतबलता, जबाबदाऱ्या

हे सगळे विचार झोपताना येतात आणि झोप येत नाही.

या साठी पुढील गोष्टी करता येतील.

शांत झोप येण्यासाठी हे करू शकतो.

१) सकाळी मेडिटेशन करणे.

२) दिवसात आवश्यक तेव्हा व्हाईट लाईट घेणे.

३) दीर्घ श्वसन करायचे.

झोपताना म्हणायचे, मी एक महान, पवित्र आत्मा आहे. मला शांत व गाढ झोप लागली आहे. या मुळे मनाला तशी आज्ञा मिळते.

४) असे डोळ्या समोर आणायचे, माझ्या हृदयातून शांती व प्रेमाची किरणे बाहेर पडून ती मेंदूत जात आहेत. आणि तिथे खूप शांती अनुभवत आहे.

हे केल्यामुळे

शांत झोप लागते

कमी वेळेत झोप पूर्ण होते.

सकाळी गजर न लावता जाग येते.

उत्साही व प्रसन्न वाटते.

♦️ या मुळे दिवसाची सुरवात प्रसन्न चित्ताने व आनंदाने होते.

या उपयामुळे जो आपला मूळ विषय आहे, शांत झोप आनंदी मन साध्य करू शकतो.

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विरंगुळा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ विरंगुळा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

“विरंगुळा” या शब्दाचा अर्थ काही कालावधीसाठी दैनंदिन दिनक्रमात केलेला बदल. अर्थात हा बदल मुख्यत्वे मनाशी निगडीत असतो. विरंगुळा म्हणून पूर्वी  महिला वर्ग थोड्या वेळासाठी एकत्र येऊन गप्पागोष्टी करीत. एखाद्या आवडीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी थोडा वेळ काढणे हा विरंगुळा च ठरतो. काही लोक हख विरंगुळा म्हणून एखाद्या नृत्याच्या किंवा करमणुकीच्या कार्यक्रमाला जायचा बेत आखतील. तर काहीजच मित्र-मैत्रिणींसमवेत खाण्याचा कार्यक्रम ठरवितील. विरंगुळा म्हणजेवेळ चांगल्या प्रकारे घालविण्याचे विसावा घेण्याचे “क्षण.” स्नान, गृहकृत्ये, स्वयंपाकपाणी, बाजारहाट या रोजच्या बाबी आहेत च पण मन प्रसन्न, ताजे, टवटवीत ठेवण्यासाठी विरंगुळ्याची गरज असते. म्हणूनच तर अलिकडे. शहरात निरनिराळ्या ठिकाणी विरंगुळा केंद्रे उभारलेली दिसतात.

यापैकी बरीचशी “विरंगुळा केंद्रे ,”ज्येष्ठांसाठी विविध कार्मक्रमांचे आयोजन करतात. या केंद्रात महिन्यातील एखाद्या विशिष्ट दिवशी कधी व्याख्यान तर कधी गाण्याचे/नृत्याचे कार्यक्रम ठरविले जातात.. ज्येष्ठांना तरी याची विशेष गरज असते. महिन्यातून एखाद्या दिवशी सहभोजन आयोजित केलं जातं. त्यामुळे समवयस्क मित्र-मैत्रिणींसोबत आंनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला जातो. इतकच नव्हे तर अनेक सणांच औचित्य साधून त्यानुसार विरंगुळा केंद्रत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सरत्या वर्षाला निरोप किंवा नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी नियोजन केले जाते.

अलिकडे फ्लॅट संस्कृतीत हादगा  जणू हद्दपार झाला आहे. मुलींनाही शाळा, क्लासेस यातून वेळ नसतो. मग ज्येष्ठ महिला सामुहिक हादगा आयोजित करतात नि वेळ आनंदाने घालवितात.

आजी-आजोबांनी नातवंडांना गोष्टी सांगणे हा दोघांसाठी विरंगुळा च. विरंगुळा म्हणूंन आवडीचे छंद जोपासण्याची संधी मिळते.

मृहणजेच निष्कर्ष काय तर “विरंगुळा ” ही प्रत्येकाचीच गरज आहे जी व्यक्ती आपापल्या आवडीनुसार ठरविते नि त्यातून आनंद लुटते.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिलो दिमाग की बात है… डाॅ.राजेंद्र  बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

 ☆ दिलो दिमाग की बात है… डाॅ.राजेंद्र  बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

हिंदी सिनेमातला तद्दन फिल्मीपणा सोडला, कमालीची भावविवशता सोडली ,तर खरं म्हणजे खूप काही ऐकण्यासारखं  व क्वचित पाहण्यासारखं असतं.अखेर, दौलत- इज्जत, खानदान की आबरु, जमीन जायदाद यांपेक्षा मोहब्बत, प्यार आणि इश्क नक्कीच श्रेष्ठ  असतं.माणसांना जोडणाऱ्या या प्यारच्या पुलाची भिस्त असते हृदयावर आणि कमानीअसतात त्यागाच्या! पण या ‘प्यार’चा डोस जरा अति आणि नाटकी होतो व तो विश्वासार्ह वाटेल अशा रीतीने पेश केला जात नाही, एवढाच त्यातला दोष. अमेरिकेत ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या संकल्पनेनं धुमाकूळ घालण्यापूर्वीच हिंदी सिनेमाच्या संवाद लेखकांनी दिल आणि दिमाग यातील फरक पचनी पाडला होता. दिल क्या चाहता है और दिमाग क्या सोचता है, अशा टाईपचे संवाद नेहमी ऐकायला मिळतील. विशेषतः शम्मी कपूर आणि दिलीप कुमारच्या सिनेमात. 

गोष्ट साधी आहे. दिल म्हणजे जजबात म्हणजेच भावना. भावना म्हणजे तरल संवेदना. कधी हलक्या कधी जजबात का तुफान किंवा सैलाब .तर दिमाग म्हणजे बुद्धीचातुर्य, तर्कनिष्ठ विचार, परिस्थितीचं सुसंगत, सुसूत्रित विश्लेषण व त्यानुसार काढलेले अनुमान आणि घेतलेले निर्णय.

दिल की बाते दिल ही जाने…. भावनांच्या मागे तसं लॉजिक नसतं. सिर्फ एहसास है ये, जो ‘रुह’नेच मेहसूस करायचा असतो. भावना समजून घ्यायच्या, त्या तशा का?  असा विचार करायचा नाही. तशा असतात झालं! त्याच्याशी युक्तिवाद न करता त्यांच्याशी एकरूप व्हायचं.

 दिल व दिमाग यातील फरक विशेषत: आपण व दुसरे यांच्याबाबत लक्षात घ्यायला हवा.

दुसऱ्याचा विचार करताना आपला दिमाग वापरायचा नाही; दिल वापरायचं. दुसऱ्या व्यक्तीशी संवाद करताना त्याच्या भावना जाणून घ्यायच्या. त्या व्यक्तीबरोबर सहानुभूतीनं (एम्पथी) वागायचं!

स्वतःचा विचार करताना मात्र दिलाऐवजी दिमाग वापरायचा. स्वतःविषयी निर्णय घेताना दिल के बजाय दिमागपर जोर दो बरखुरदार!

आपण प्रत्यक्षात नेमकं उलटं करतो. आपल्याला वाटतं दुसऱ्यानं दिमाग लढवावा आणि आपल्या दिलाला आपण कुरवाळावं!

** समाप्त**

लेखक डॉ.राजेंद्र बर्वे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गंधवेडा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

🌸 विविधा 🌸

☆ गंधवेडा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

गंधवेडा, सुरम्य वैशाख,☀️🌾

🌹वैशाख  फुलांचा दरवळ

     वैशाख  रंगांची प्रभावळ

    वैशाख  सुरावलींची मैफल

     वैशाख  सूर्याची तेजावळ

आज भल्या पहाटेच जाग आली.मी बेडवर उठून बसले.एवढ्यात खिडकीतून वाऱ्याची हलकीशी झुळूक आली. पण ती गंधित होती. मला जाणवले हा तर मदनबाणचा गंध. अरे वा, माझा मदनबाण फुलला का? थोड्या वेळाने उजाडलं आणि पाहिलं माझ्या बाल्कनीत मी हौसेनं लावलेला मदनबाण फुलू लागला होता. आता चार फुले फुलली. मला फार आनंद झाला आणि प्रकर्षानं एक गोष्ट जाणवली अरे वैशाख मास अगदी जवळ आला.

मदनबाण हा वैशाख महिन्याचा मानबिंदू.मोगरा, सायली जाई जुई, चमेली आणि हा मदनबाण या महिन्यात उच्च कोटीच्या सुंगधाची उधळण करीत असतात.

वास्तविक या महिन्यात कडक उन्हं असतात.सूर्याचे तीव्र तेजस्वी शर बरोबर आपल्यावर संधान साधून असतात. रवीराजाचं हे तेजस्वी रुप फार प्रखर तेजानं झळकत असते.दिवस मोठे होऊ लागतात. कडक उन्हं. त्यात गंधाची उधळण. रंगांची आपसातील चढाओढ. काय कमालीचं रंगतदार वातावरण असते.गुलमोहोर अगदी आतून रंगबावरा होतो. तर बहावा सोनपिवळ्या कळ्याफुलांची झुंबरं अंगांगावर मिरवत असतो. अगदीबांधा वरच्या  बाभळीला ही फुलायचे वेड लागते.तिची गोंड्यासारखी पूर्ण केसरयुक्त गोल गोंडस फुलं अंगभर लेवून ती अगदी पूर्ण सौंदर्यानिशी दिमाखात  उभी असते.

या सर्व गडबडीत पक्षीही मागे नसतात.कारण काही घरटी बांधण्यात मग्न,काही घरट्यातील पिलांना भरवण्यात दंग.कोकिळा बरोबर आता वैशाखात बुलबुल पक्ष्यांचा गळा खुला झालेला असतो आणि त्यांच्या सुरेल मनभावन ताना मनाला तरतरी देतात.खरंतर बुलबुल पक्ष्यांच्या मुखातून वसंतच गातो असे वाटते.

वैशाख महिन्यात निसर्ग गंधाळतो,रंगतो,तसाच हा  व्रतस्थ महिनाही आहे. परम पावन असा हावैशाख महिना पुण्यप्रद आहे.या महिन्यात भगवान विष्णू, परशुराम यांचा जन्मझालाअसेम्हणतात.म्हणून या महिन्यात भगजोवान, विष्णू लक्ष्मी, भगवान परशुराम यांचे पूजन केले जाते.पूर्ण वैशाख महिना सूर्याला अर्घ्य (जल)देतात, नदी, सरोवरात स्नान करतात.तसेच उत्तराखंड येथील परमपावन  बद्रिनाथ मंदिराचा दरवाजा या महिन्यात  वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेला उघडला जातो.जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा याच महिन्यात शुद्ध व्दितीयेला निघते.शुध्द नवमीला सीता भूमीतून प्रकट झाली अशी मान्यता आहे.या महिन्यात पौर्णिमेला अनन्यसाध़ारण महत्व आहे. तो दिवस बुध्द जयंती म्हणूनच साजरा केलाजातो.वैशाखातील एकादशी ही मोहिनी कादशी. समुद्रमंथनावेळी अमृत निघाले. त्यावेळी विष्णूंनी मोहिनी रुप घेतले ते याच दिवशी.अशा रीतीने वैशाख हा व्रतांचा, दानाचा सुद्धा महिना आहे. या महिन्यात जलदानाचे महत्त्व आहे. वाटसरूंसाठी रस्त्याच्या कडेला मातीच्या घड्यात पाणी ठेवले जाते. तसेच पाणपोया सुरु केल्या जातात. आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून हे जलदान करण्यात येते.

वैशाखातील रात्री या हव्याशा वाटतात. चांदण्यांचे तेज जरी थोडेफार मंदावले असले तरी दिवसभराच्या तलखी नंतर गारवा देणाऱ्या रात्री सुखद वाटतात.पण पौर्णिमेला तर सौंदर्याचा अत्युच्च बिंदू चंद्राच्या चांदण्यानं गाठलेला असतो.अगदी अंतर्गर्भाला सादावणारी ही प्रसन्न पौर्णिमा म्हणजे स्वर्गीय सुख. रातराणी, मोगऱ्याच्या गंधानं भारावलेली, शांत हवीशी.

वसंताच्या गंधसृष्टीचे पूर्ण वैभव वैशाखातच असते.अगदी फुलांच्या गंधाचा परम उत्कर्ष याच महिन्यातला.जे जे वसंत ऋतूचे आहे त्याला पूर्णत्व आणि विराम देण्याचे कामही चैत्र सखा या नात्याने वैशाखास पूर्ण करावे लागते. वास्तविक सौंदर्याची ही विकलावस्था धीरोदात्तपणे वैशाख पाहतो. त्यामानाने चैत्र हा मनाने अतिशय हळवा वाटतो. सौंदर्याची ही अवस्था, ही विपन्नावस्था चैत्र बघू शकणार नसतो पण ते काम    वैशाख पूर्ण करतो कारण त्याला ज्येष्ठाच्या   मदतीने  सृष्टीचा नूर आणि  तोल सांभाळायचा असतो. अगदी झाडाची पाने सुद्धा टपटप गळताना तो पाहतो.तर असा हा गंधवेडा,सुरम्य आणि रुपरंगाचा चाहता,सौंदर्यासक्त, तसाच व्रतस्थ,आणि  धीरगंभीर स्वभावाचा कर्तव्यदक्ष वैशाख.याचं मोठेपण अगदी मनाला भावून जातं.

       वैशाख सुरम्य मनभावन

       गंधवेडा रंगूनी  तनमन

       स्वरवेडा हा हरपून भान

      परी हा कर्तव्य परायण

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचारपुष्पातील मधुसंचय… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

🌸 विविधा 🌸

विचारपुष्पातील मधुसंचय… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

स्वामी विवेकानंद  यांचे जीवन व कार्य  याविषयी सविस्तर  माहिती देणारी ‘विचारपुष्प ‘ ही डॉ.नयना कासखेडीकर लिखित  लेखमाला नुकतीच समाप्त झाली. सुमारे सव्वावर्षाहून अधिक काळ  ही साप्ताहिक  लेखमाला चालू होती.  स्वामीजींच्या बालपणापासून  ते त्यांची जीवनज्योत मालवेपर्यंतचा जीवनपट यात त्यांनी मांडला आहे. अवघ्या एकोणचाळीस वर्षांच्या अल्पायुष्यात असामान्य  कार्य करणा-या महामानवाचे कार्य  मोजक्या शब्दमर्यादेत  लोकांपर्यंत  पोहोचवणे हे काम सोपे  नव्हते.पण सौ.कासखेडीकर  यांनी आपल्या  अन्य जबाबदार-या पार पाडून  ते पूर्ण  केले आहे.

डाॅ.नयना कासखेडीकर

स्वामीजींचे बालपण, युवावस्था, त्यांचे मानसिक द्वंद्व, जिज्ञासा, प्रखर बुद्धीमत्ता, विदेशातील कार्य अशा अनेक बाबींवर या लेखमालेतून वाचायला मिळाले. लेखमालेतील  सर्वच भागांचा आढावा घेणे शक्य  व योग्य  नसले तरी स्वामीजींचे  काही विचार, वचने ही कधीच विसरता येणार  नाहीत. त्यापैकी  काहींचा उल्लेख  इथे करावासा वाटतो.

जीवनातील ध्येयाविषयी स्वामीजी म्हणतात, “जीवनात आदर्श  हवा. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि दुर्दम्य  इच्छाशक्ती असेल तर अपयशाला  यशामध्ये बदलता येते.”

शिक्षणाविषयी ते म्हणतात

“जे शिक्षण सामान्य  लोकांमध्ये चारित्र्य, बल, सेवा, तत्परता आणि साहस निर्माण करु शकत नाही, ते काय कामाचे ? ज्यामुळे सामान्य  माणूस  स्वतःच्या पायावर  उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण.”

कशासाठी वाचायचे?

“वाचनाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन  मिळतो, उमेद मिळते. मन संवेदनाशील होते. एकमेकांच्या सुखदुःखाची  तीव्रता कळते. शब्दसंग्रह  वाढतो.”

स्वामीजींचे संगीताविषयीचे  ज्ञानही सखोल होते. ते स्वतः गात असत. ते म्हणत, “संगीत ही सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ज्यांना समजू शकते त्यांच्या दृष्टीने ईश्वराची  पूजा करण्याचा तो सर्वोत्कृष्ट  प्रकार आहे.”

“परिस्थिती जितकी प्रतिकूल असेल तितकी तुमच्या आंतरिक शक्तींना अधिक जाग येत असते. “हे स्वामीजींचे विधान सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे.

निरासक्त, निःसंग,वैराग्यशीलता आणि विनम्रता हे स्वामीजींचे विशेष गुण. अनेक प्रसंगातून याचे दर्शन घडते.

स्वामीजींची धर्माविषयीची मते तर जाणून घेऊन  आचरणात  आणणे आवश्यक  आहे.कर्मकांडाचा अतिरेक झाल्यामुळेच  समाज रचनेत दोष निर्माण  झाला आणि त्यामुळेच संस्कृतीचा-ह्रास झाला हे त्यांचे मत परखड असले तरी सत्य आहे. “आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक  आदर्श  आपण विसरुन गेलो आहोत हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वतःच्या अस्मितेचे भान उत्पन्न  होईल  तेव्हाच  आपले सारे प्रश्न  सुटतील. “स्वामीजींचे हे निरीक्षण आजही खरे ठरत आहे. सर्वधर्मसमभाव हा शब्द आपणा सर्वांनाच  माहित आहे. स्वामीजी म्हणतात, “प्रत्येकाने दुस-या धर्मातलं सारभूत तत्व ग्रहण करायचं आहे. त्याचवेळी आपलं वैशिष्ट्यही जपायचं आहे. आणि अखेर स्वतःच्या स्वाभाविक  प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास  करुन घ्यायचा आहे.”

अध्यात्म आणि विज्ञान  यांचा सुरेख  संगम  व्हावा अशी इच्छा बाळगणारे  स्वामी विवेकानंद  म्हणतात, “भारताचा अध्यात्म  विचार पाश्चात्य  देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान  घेतले पाहिजे.”

प्रत्येक  लेखातून  अशी नवीन  माहिती, विचार, वचने मिळत गेल्याने संपूर्ण  लेखमाला वाचनीय झाली आहे. मालिका संपली असली तरी त्यातील विचार कण वेचावेत तेवढे थोडेच  आहेत. हा सारांश नव्हे पण लेखमाला वाचल्यानंतर  आपल्याला मिळालेले इतरांनाही द्यावे, म्हणून  लिहावेसे वाटले, एवढेच !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अबोल झाली घरं…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

? विविधा ?

☆ “अबोल झाली घरं…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

आपण एखाद्या परिचित किंवा अपरिचित घरात पाय टाकला तर कोणता अनुभव यायला हवा? त्या घरातील माणसांनी किमान “या”  असं म्हणावं!पेलाभर पाणी द्यावं.अपरिचित असू तर कोण? कुठले? अशी साधी चौकशी करावी.बरं घर म्हंटल्यावर त्या घरातील माणसांच्या बोलण्याचा, हसण्याचा, मुलांच्या ओरडण्याचा, भांडणाचा आवाज तरी कानावर पडायला नको का? पण हल्ली घरात आवाज असतो तो दूरदर्शन चा. घरं कशी अबोल झाल्यासारखी वाटतात.घरात माणसं असून ही एक वेगळीच शांतता जाणवते.या शांततेला कुठला चेहरा आहे हेही अनाकलनीय असतं.मंदीराच्या गाभा-यात जाणवणारी शांतता, ध्यान विपश्यना अशा साधनेत अनुभवायला मिळणारी शांतता,प्रचंड दडपणाखाली निर्माण झालेली शांतता किंवा एखाद्या वनराईतून संथपणे वाहणा-या नदीकाठ ची शांतता या प्रत्येक प्रसंगात, क्षणात जाणवणा-या शांततेला तिचा स्वतःचा एक चेहरा आहे, हे आवर्जून जाणवतं. पण घरात माणसं असून ही निर्माण झालेली शांतता अनुभवतांना तिचा चेहरा एकदम अनोळखी वाटायला लागतो.

आठवणीतल्या घरातलं लहानपण आठवलं की एक गोष्ट लक्षात येते की     पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती…त्यामुळेच घर कसं भरलेलं वाटायचं.मुलांची भांडणं झाली की आजी आजोबांचं कोर्ट! हट्ट पुरविणारे ही तेच! संध्याकाळी ” शुभं करोती ” म्हणजे मुलांच्या हजेरीची वेळ!संस्कृत मधील अनेक श्लोक, स्तोत्र पाठ करवून घ्यायची जबाबदारी आजोबांकडे.आणि गोष्ट सांगून मनोरंजन आजीकडे.सतत पाहुणे आणि येणा-या जाणा-यांचा राबता!त्यामुळे घरात माणसं असल्याचं जाणवायचं. घर चैतन्याचं आवार वाटायचं.आता अशी घरं आठवणीत गेलीत. पूर्वी घरात ‘आम्ही’ होतो, आता घरात ‘मी’  वास्तव्य करतांना दिसतो.’मी’  ‘मी’ मध्ये संवाद कसा होणार? गप्पा कशा रंगणार?

या ‘मी’ मुळे हल्ली शेजारधर्म ही उरला नाही. फ्लॅट पद्धतीत आपल्या आजूबाजूला, वर खाली घरं असली तरी त्या घरांचा आपल्या घराशी संपर्क नसतो. माणसांची सलगी नसते. नावही माहीत नसतात.फक्त जाता येता ओळख असल्याचं दाखवायचं… बळजबरीनं हसायचं. शेजारधर्म हा एकोपा वाढवणारा, सहकार्याची भावना जागवणारा असतो. नात्याची वीण घट्ट करणारा असतो. पण सा-याच घरात ‘मी’. मग दोष कुणाला द्यायचा?’मी ‘ आणि ‘मी’ चं मैत्र झालंयं का कधी?  ‘मी’ ला ‘आपण’ मध्ये विरघळून जायला हवं तेव्हाच मैत्र निर्माण होतं.  घर केवढं आहे याला महत्व नाही.फक्त त्यात माणसं असावीत.माणसा-माणसात आत्मीयता जिव्हाळा असावा. घरातून बाहेर गेलेल्याला घराची ओढ वाटावी.इतरांच्या सुखासाठी स्वतःतला ‘मी’ विरघळविण्याची सवय असावी. अशी माणसाला माणसांची ओढ, माणसाला घराची ओढ, घरांना घराची ओढ निर्माण झाली की ” हे विश्वचि माझे घर” म्हणणारा, ज्ञानोबा एखाद्या घरातून विश्वकल्याणाचं स्वप्न घेऊन बाहेर पडेल.कुणी सांगावं?

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक  परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात अशी एक म्हण आहे.त्यानुसार आपल्या आवडीनिवडी, कल हा बालपणी पासून लक्षात येतो.अर्थातच ह्यात काही अंशी बदलही होतोच. माझ्या लहान बहिणीचा सेवाभावी कल ओळखून ही वैद्यकीय पेशा स्विकारुन रुग्णसेवा उत्तम करेल हे लहानपणीच लक्षात आलं.ती ह्या शिक्षणाच्या मार्गाने गेली नाही परंतु तिची रुग्णांची सेवा मनापासून करण्याची सवय मात्र अजूनही तशीच आहे. तसचं आमच्या व्हाट्सएप समुहामधील  एक सदस्या श्रुती आंबेकर ह्या तर विदेशात राहून आवडीने मनापासून रुग्णसेवा करतात ह्याच खूप कौतुक वाटतं. आज ही आठवण यायला आजचा दिवस खूप खास.

एखादी आपत्ती, संकट ह्यांचा अनुभव आल्यानंतर त्यातील गांभीर्य हे कळायला लागतं

तमाम जगाला हा अनुभव कोविड च्या येऊन गेलेल्या जीवघेण्या लाटेने दिला . ह्या अनुभवा नंतर मात्र जवळपास प्रत्येकाला “सर सलामत तो पगडी पचास”ह्या म्हणीवर विश्वास बसायला भाग पाडले. ह्या आणिबाणीच्या काळात महत्त्वाचे, विश्वासाचे जिव्हाळ्याचे तसेच  आजार,दवाखाने, रुग्ण ह्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार.

12 मे .   “जागतिक परिचर्या दिन”. आज आपण ह्या दिनाच्या निमीत्ताने “जगाची सुश्रुषा”हे घोषवाक्य सत्यात उतरविणा-या सर्व परिचारीकांचे मनापासून धन्यवाद. खरतरं त्या करीत असलेल्या सेवेसाठी धन्यवाद हा शब्दच मुळी खूप तोकडा आहे.

असं म्हंटलं जातं सेवा करणं ह्या मागे बरेच वेळा स्वार्थ दडलेला असतो परंतू सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की कोरोना काळात सुद्धा अमरावती ला सरकारी दवाखान्यात आणि अनेक कोवीड आयसोलेशन सेंटर मध्ये ह्या परिचारीकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक वृद्धांची, रुग्णांची निस्वार्थ भावनेने मनापासून सेवा केली. नुसतेच औषधोपचार न करता रुग्णांना तुम्ही नक्की बरे होऊन घरी जाणार हे मनावर ठसवितं भक्कम मानसिक आधार पण दिला. विशेष म्हणजे हा चांगुलपणाचा परिचारीकांचा अनुभव एकट्यादुकट्याचा नसून अनेकांनी अनुभवला आहे. खरोखरच आपले ब्रीदवाक्य आचरणात आणून जगणाऱ्या ह्या परिचारीकांना मानाचा मुजरा.

नाइटिंगेल ह्यांचे नाव माहिती नसलेली एकही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात आढळणार नाही. ह्या परिचारिका, लेखिका,संख्याशास्त्रज्ञ होत्या. 1853 मध्ये त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार केला.त्यांनी शरीरासोबतच त्यांच्या मनावरील जखमा भरून काढल्या.त्यांना लेडी विथ दी लँप ही उपाधी मिळाली.त्यांचा जन्मदिवस 12 मे हा त्यांच्या सन्मानार्थ जागतिक परिचर्या दिन म्हणून साजरा केल्या जातो.

आजच्या दिनी कौशल्यवान,सेवाव्रती, प्रेमळ, सामाजिक कार्यात भाग घेणारी,आणि रुग्णसेवा हीच ईशसेवा मानणारी परिचारिका अरुणा शानबाग हीचेही हटकून स्मरण होतचं.

आजच्या ह्या दिनी परिचारिका नाइटिंगेल व अरुणा शानबाग ह्यांना अभिवादन करुन आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे,घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे’माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसलं की मन असे स्वैर पणे फिरत असते! सध्या बाहेर फिरणे कमी झाले आहे,पण या बाल्कनीतल्या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येते! दिवसभराच्या उन्हाच्या काहिलीनंतर येणारी संध्याकाळची वार्याची झुळुक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते!थंडी किंवा पावसाळ्यात या झुळुकेचे तितके महत्त्व नाही,

पण उन्हाळ्यात ही झुळुक खूपच छान वाटते. दु:खानंतर येणारं सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!सतत सुखाच्या झुल्यावर झुलणार्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्या नंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला आनंद देतात आणि गार वार्याच्या झुळुकीचा आनंद देतात!

हीच झुळुक कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही, पण दुसऱ्या कुणाकडून तरी,अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र मैत्रिणींकडून मिळते.

तो प्रेमाचा सुखद ओलावा त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळुक असते.

कधीं कधीं साध्या साध्या गोष्टीतून ही आपण आनंद घेतो.

गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते तेव्हा खिडकीतून येणारी वार्याची झुळुक आपल्याला ‘हुश्श् ‘ करायला लावते! कधीं अशी झुळुक एखाद्या बातमी तून मिळते! अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळूक च असते. माणसाचे आयुष्य सतत बदलते असते. कधी एका पाठोपाठ एक इतकी संकटे येतात की या सर्वाला कसे तोंड द्यावे कळत नाही, पण अशावेळी अचानक पणे एखादी चांगली गोष्ट घडते की त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते.

माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवर्या चा अॅक्सिडेंट झाला. जीव बचावला, पण हाॅस्पिटलमध्ये दोन महिने पडून रहावे लागले. दोन लहान मुलं होती तिला, नवर्याचा व्यवसाय बंद पडलेला,रहायला घर होते, पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरी चा काॅल आला,ट्रेनिंगसाठी एक महिना जावं लागणार होतं,मुलांना कुणाजवळ तरी सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली. नोकरी कायम स्वरुपी झाली. आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.

वादळवार्यात झाडं, घरं, माणसं सारीच कोलमडतात. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात

असतेच असे नाही, पण झुळुक ही सौम्य असते. ती मनाला शांति देते.

लहानपणी अशी झुळुक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा,आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळुकीसारखा वाटायचा. रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकंफुलकं पीस व्हायचं आणि वार्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळुक अनुभवायला मिळायची!

वेगवेगळ्या काळात,वेगवेगळ्या रूपात ही ‘झुळुक’ आपल्या ला साथ देते. कधी कधी

आपण संकटाच्या कल्पनेनेही टेंशन घेतो. प्रत्यक्ष संकट रहातं दूर, पण आपलं मन मात्र जड झालेले असते. अचानक कुणीतरी सहाय्य करतं,संकट जाते आणि एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.

मध्यंतरी कोरोनाच्या काळात आपण कठीण काळातून जात होतो. मन साशंक झाले होते., अस्थिर होते.

जीविताची काळजी तर होतीच, पण भविष्याची होती. अचानकपणे आलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देताना लोक अगदी हवालदिल झाले होते. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! रोजच्या बातम्या आपल्या ला आशा – निराशेवर झुलवत होत्या. लवकरच हे ‘कोरोना’ चे संकट दूर होईल असं ऐकलं की समाधानाची झुळुक येत होती तर पुढील दहा दिवस धोकादायक आहेत ऐकलं की मनात ्वादळ उठतं होतं!आता हे रोगाचं उच्चाटन हळूहळू होत जाईल ही आशा आपल्या मनी होती. निसर्गाने हिरावून घेतलेलं आपलं स्वातंत्र्य परत मिळवून आपण जर जाणीवपूर्वक वापरले तरंच आपल्याला ही सुखाची झुळूक मिळणार! याची जाणीव माणसाला होत होती.

संध्याकाळी येणारी वाऱ्याची झुळूक ही अशीच सौम्य,आनंद देणारी आहे. तिच्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि त्यांचे थैमान नसते. ती हळूहळू अंगात भिनते. तिचा आस्वाद घेता आला पाहिजे.

कोरोनाचे वादळ घोंघावत होतं ते हळूहळू शांत होत गेले. लोकांनी संयमाने आणि धीराने तोंड दिले.

अशावेळी कुठून तरी आशादायी स्वर येतात, ‘दिस येतील, दिस जातील. . . गाण्याचे! हे संकटाचे वादळ जाऊन झुळुक येईल आशेची, आनंदाची!

वादळ जेव्हा परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधी तरी ते लयाला जाणारच असते!

ते वादळ जाऊन शांत झुळूक येईल या आशेवर प्रत्येक भारतीय आलेल्या वादळाला धीराने,संयमाने तोंड देऊन त्या शीतल झुळुकीचे सर्वांत करण्यास तयार होता! सुदैवाने त्या कोरोनाच्या वादळाला आपण धैर्याने तोंड दिले आणि ती जीवनातील शीतल झुळूक अनुभवता आली हे आपले भाग्यच!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print