मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रिय सावरकर… – कवी : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ प्रिय सावरकर… – कवी : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

प्रिय सावरकर,

 

न तुमच्या नावे कारखाने, न बँका,

 न पतपेढ्या

न सहकारी सत्तेत मुरलेली मस्ती

न राजघाट, न शांतिवन.. समाधीलाही पारखे

न पद्मांचे भूषण, न रत्नांचे मुखवटे.

 

न चलनी नोटांवर तुमचे चित्र

न इतिहासाच्या पुस्तकात तुमचे पान

तरीही काळजावर कोरले तुमचे नाव

हाच तुमचा सन्मान.

 

नातू-पणतू नात-पणती कोणी गादीवर नाही

आमदार-खासदार सोडा साधा नगरसेवकही

न वांग्याची शेती, न लवासाची सृष्टी

न वाळूचे ट्रक, न दारूचे परवाने

न सरकारी गुत्तेदारीच्या गोष्टी

न हप्त्याची टोळी, न गुंडांची फौज दिमतीला

न कुबेरगिरी करणारा पेपर तुमच्या मदतीला.

 

लाभला नाही तुम्हाला पॅलेसचा तुरुंग

तुम्ही झाला नाहीत कधी विदेशी सत्तेचे

Sincere friend, Obedient servant

तुम्ही होतात शत्रू आणि

राहिलात खरोखरीचे शत्रू

अखेरपर्यंत.

 

तुमच्या वाट्याला आलं फक्त अंदमान

तिथली ती यमाच्या मालकीची काळकोठडी

निरंतर अकरा वर्षे कोलू ओढणारा देह

दिवस दिवस खडीबेडीत

जखडून ठेवलेले प्राण

हाच तुमचा काळ्या पाण्याचा लेखाजोखा.

 

खिळ्याने भिंतीवर कोरलेली

कविताच होतं जणू

साखळदंडांत बांधलेलं तुमचं आयुष्य.

 

अंदमानातून सुटलात

पण शत्रूच्या मगरमिठीतून नाही

अलीपूर, भायखळा, रत्नागिरी, येरवडा

तीन वर्षात चार-चार तुरुंग

सजा चुकली नाहीच

तेरा वर्षे नजरकैदेची बेडी आणखी.

 

स्वातंत्र्याच्या शत्रूने

अखेरपर्यंत माफ केलं नाही

म्हणून तर तो इतिहासपुरुष

स्वातंत्र्यवीरम्हणतो तुम्हाला.

 

शत्रूने दिली जन्मठेप

एक नव्हे दोन दोन

आम्ही दिली एक ‘मृत्युठेप’

जिवंतपणी आणि मरणोपरांतही

आणि आमच्यासाठी केलीत तुम्ही

राखरांगोळी स्वतःच्या आयुष्याची

 

जिवंतपणी मरण भोगलेत

आता मेल्यावरही मरण भोगा

हा आमचा कृतज्ञतेचाशाप!

 

“माफ करा सावरकर”..

ओठी येते, पण अडते

कारण माफीच्या त्या डावालाही

ठोठावले त्यांनी काळे पाणी पुढे.

 

उठेल पुन्हा वणवा तेथून

चितेच्या राखेचीही भीती त्यांना

म्हणून हा अट्टाहास सारा

हा दरारा जिता राहावा..!

 

कवी:अज्ञात

प्रस्तुती: अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आम्ही मध्यमवर्गीय होतो…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आम्ही मध्यमवर्गीय होतो…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी ‘मध्यमवर्गीय’ ही जमात अस्तित्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतःचा असा ‘ब्रँड’ होता.

घरात एक कमावता पुरुष, दोन-तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला, अशी एकूण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंडं ५-६, हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही. म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती… एकहाती सत्ता! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं… पक्कं गणित..! त्यावरच सगळे हिशोब जुळत होते.

अन्नाच्या बाबतीत, “पोटाला खा हवं तेवढं, पण नासधूस नको, ” असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची, “खाऊन माजावं, पण टाकून माजू नये. “

कढी, पातळ भाजी, कालवण करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस वगैरे असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या… अशी साधी साधी समीकरणं असायची. घरातली पुरुषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खाऊन घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी-भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा ‘कुचकरा’ किंवा ‘फोडणीचा भात’. जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.

मुलांची शाळा म्हणजे ‘टेन्शन’चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. १००-१५० रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज २ वर्ष जायचा.

पुस्तकांचा जरा ‘जुगाड’ असायचा. म्हणजे समजा ‘अ’ ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर ‘ब’ ला ७०% किमतीत विकायचा.. अन् मग ‘ब’ तीच पुस्तकं ‘क’ ला ४०% मधे विकायचपुस्तकाच्या या ३ वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल, अहिल्याबाई अशा ‘दूरदृष्टी’च्या व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.

बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाजं फिरत असायची. पण शाळेत असताना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवॉटर अशी Destinations मला नकाशातसुद्धा कधी भेटली नाहीत.

पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा ‘अ’ करून मोकळा व्हायचा… म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त चित्रकलेतच “स्कोप” उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानावर यायचा…

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत. मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं, त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ‘इगो बिगो’ कोणाचा आड येत नव्हता. स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा. त्यातही लहान बाळाचा स्वेटर, कपडे, दुपटे, झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला आठवायचं नाही.

पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना “यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू.. ” आणि मुलांना, “तुला रिक्षा घेवून देवू चालवायला” अशी ‘जागतिक’ धमकी मिळायची..

SSC नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं… Proposals.. हे आजच्या काळातले ‘Highly Personal Issues’ त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते, तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात Space. बाकी सगळा ‘लेकुरवाळा’ कारभार!!

आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा ‘बाबा’ लोकांचा प्रांत होता. प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी RD, LIC काढलेल्याच असायच्या… आणि त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा ‘एजंट’ त्या काळी उदयाला आलेला नव्हता आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा… Share market म्हणजे जुगार.. हा ‘समज’ अगदी पक्का होता..

‘फॅमिली डॉक्टर’ हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण ‘नीतिमत्ता’ वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया, पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा ‘व्यावहारिक’ पवित्रा असायचा.

जसा ‘फॅमिली डॉक्टर’ तशीच एक फॅमिली ‘बोहारीण’ पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही ‘बोहारिण’ एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी ‘तहा’ ला सुरवात व्हायची.. तिची गाळणी खपवायची घाई.. तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा! खूप घासाघीस करून ‘Deal’ चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या कार्यक्रमात २-३ तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या. शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..

खरं सांगू का.. मध्यमवर्गीय ही काही ‘परिस्थिती’ नाहीये, ती ‘वृत्ती’ आहे… साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा ‘कणा’.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित ‘कर’ भरणारे, वाहतुकीचे काटेकोर ‘नियम’ पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत ‘मतदान’ करणारे. असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..

अचानक १९९०-९१ मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्या पर्यंत यायला १०-१२ वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच, ‘ वादळ ‘ झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण..

प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही… अचानक ‘प्रोफेशनल’ झालो. माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.

पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या. Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या ‘गोंडस’ नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ पैकेजेस मध्ये गुंडाळला गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणासुद्धा.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ही देखील प्रथा सुरू करावी..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

ही देखील प्रथा सुरू करावी..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

आजपासून… आत्तापासून…

हॉस्पिटल = लिफाफा.

हीच खरी माणुसकीची प्रथा.

 

लग्न… मंडप सजलेला असतो. सनईचे सूर घुमत असतात.

नवरी नटून थटून बसलेली असते.

आपण मोठ्या तोऱ्यात जातो. खिशातला लिफाफा काढतो.

“नव्या संसाराला हातभार” म्हणून 500, 1000, 5000 रुपये हसतमुखाने देतो.

फोटो काढतो. स्टेटस ठेवतो.

“किती भारी आहेर दिला” याची चर्चा चार दिवस रंगते.

 

पण…

पांढऱ्या भिंती. औषधांचा दर्प.

ICU बाहेर एक बाई भिंतीला टेकून बसलेली असते.

तिची ओटी रिकामी, कपाळावरचं कुंकू पुसट होत चाललंय.

नवऱ्याचा श्वास नळीतून चाललाय.

डॉक्टर दर 2 तासांनी बाहेर येतात आणि एकच वाक्य बोलतात: “बिल भरलं का?”

 

तिच्या पोरगं मेडिकलच्या काऊंटरवर उभं राहतं.

हातात चिठ्ठी असते: “इंजेक्शन 8000 रुपये. ”

खिशात फक्त 2000.

तो गुपचूप मागे फिरतो. इंजेक्शन न घेताच.

बाप आत तडफडतोय आणि पोरगं बाहेर लाचार उभं आहे.

 

घरातलं मंगळसूत्र केव्हाच विकलं गेलंय.

बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेली FD मोडली गेलीय.

शेजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे हात पसरून झाले.

आता फक्त डोळ्यात पाणी आणि ओठावर एकच प्रार्थना: “देवा, वाचव रे माझ्या माणसाला. “

 

आणि अशा वेळी आपण जातो…

हातात दोन सफरचंदं.

टेबलावर ठेवतो आणि म्हणतो, “काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. ”

“काही लागलं तर बिनधास्त सांग. ”

 

खरंच?

बिनधास्त सांगू?

“वहिनी, 50 हजार कमी पडतायत, द्याल का?” असं विचारायची हिंमत आहे का तिच्यात?

नाही. ती फक्त मान डोलावते आणि आतल्या आत मरते.

 

आपण निघून येतो. गाडीत बसतो.

“बिचारी” म्हणून एक सुस्कारा टाकतो.

आणि घरी येऊन जेवण करतो.

 

पण तिचं जेवण?

तिच्या पोरांचं जेवण?

हॉस्पिटलच्या बिलाने त्यांच्या ताटातला घास हिरावून घेतलाय.

 

जिथे ढोल ताशे आहेत, तिथे आपण लाखो उधळतो.

आणि जिथे व्हेंटिलेटरचा ‘बीप बीप’ आवाज येतोय, मृत्यू दारात उभा आहे, तिथे आपण 100 रुपये द्यायलाही दहा वेळा विचार करतो.

 

ही कुठली माणुसकी? ही कुठली रीत?

 

आज शपथ घ्या…

पुढच्या वेळी कुणी आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, तर रिकाम्या हाताने जायचं नाही.

लिफाफा न्यायचाच. 100 रुपये असले तरी चालतील.

कारण तो लिफाफा नसतो… तो ‘श्वास’ असतो.

“तू लढ, मी आहे सोबत, ” हा दिलासा असतो.

 

कदाचित तुमच्या त्या लिफाफ्यामुळे…

एका बापाला त्याची पोरं पुन्हा “बाबा” म्हणू शकतील.

एका नवऱ्याला त्याची बायको पुन्हा “अहो” म्हणू शकेल.

एका पोराला त्याची आई पुन्हा जेवू घालू शकेल.

 

लग्नातला आहेर लोक विसरतात हो…

पण स्मशानाच्या वाटेवरून परत आणणारा आधार, माणूस मेल्यावरही विसरत नाही.

 

ही प्रथा सुरू करा.

कारण उद्या काळाने घाला घातला आणि तुमचाच माणूस त्या बेडवर असेल…

तेव्हा तुम्हाला कळेल की ‘Get Well Soon’ च्या कार्डापेक्षा 500 च्या नोटेची किंमत काय असते.

 

आजपासून… आत्तापासून…

हॉस्पिटल = लिफाफा.

हीच खरी माणुसकीची प्रथा.

 

वाचून डोळे पाणावले असतील तर नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्यातरी घरचा दिवा विझायचा थांबेल…

 

लग्नातला आहेर मिरवला जातो,

आजारपणातला आधार जपला जातो.

कारण मृत्यूच्या दारात उभा असताना,

माणूसच माणसाचा देव असतो.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वामी विवेकानंद म्हणतात… – लेखक: स्वामी विवेकानंद ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वामी विवेकानंद म्हणतात… – लेखक: स्वामी विवेकानंद ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)

धर्मसंबंधीच्या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्पना आता लयास जावयास हव्यात. धर्मसंबंधीच्या साऱ्या पंथनिष्ठ, जमातनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ कल्पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्येक जाती-जमातीचा फक्त स्वतःचा असा एकेक विशिष्ट देव असावा आणि स्वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्हावयास हवी. असल्या सगळ्या कल्पनांचा सपशेल त्याग करावयास हवा.

धर्मांनी समावेशक वृत्ती धारण केली पाहिजे, ईश्वरविषयीच्या त्यांच्या विशिष्ट कल्पना इतरांहून वेगळ्या आहेत एव्हढ्याचसाठी त्यांनी तिरस्काराने एकमेकांना तुच्छ न लेखले पाहिजे. मी आपल्या आयुष्यात अशी कितीतरी धार्मिक माणसे पाहिली आहेत, अशी समंजस माणसे पाहिली आहेत की ज्यांचा ईश्वरावर, आपण त्या शब्दाचा जो अर्थ करतो त्या अर्थाने मुळीही विश्वास नाही. कदाचित तुम्हा-आम्हाला कधी कळू शकला असेल त्यापेक्षा कितीतरी चांगल्या रीतीने ईश्वर त्यांना कळला आहे.

धर्मांनी, त्यांच्या ठायी प्रचंड शक्ती वसत असल्यामुळे, जगाचे भले करण्यापेक्षा त्याचे नुकसानच जास्त केले आहे, आणि असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा संकुचितपणा आणि विशिष्ट सीमांमध्येच घुटमळत राहण्याची त्यांची प्रवृत्ती.

– स्वामी विवेकानंद (पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)

लेखक: स्वामी विवेकानंद

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “व्हाट्सऍपची काठी” –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “व्हाट्सऍपची काठी” –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित 

उतार वयात  मिळाली

व्हाट्सऍपची काठी !

कपाळावरची मिटली

आपोआप आठी !

 

वेळ कसा जातो आता

हेच कळत नाही !

वर्तमान पत्राचं पानसुद्धा

हल्ली हलत नाही !

 

चहा पिताना लागतो

व्हाट्सऍप हाताखाली !

डाव्या बोटाने हलके हलके

मेसेज होतात वरखाली !

 

कुणाचा वाढदिवस आहे ?

कोण आजारी आहे ?

कोण चाललंय परदेशात

अन काय घडतंय देशात ?

 

कधी लताची जुनी गाणी तर

कधी शांताबाईंची कविता !

बसल्या बसल्या डुलकी लागते

कधी एखादी गझल समोर येते ! 

 

टीव्हीवरचं चॅनेलसुद्धा

हल्ली बदलत नाही

व्हाट्सऍपशिवाय आमचं

पान जरासुद्धा हलत नाही !

 

वय जरी होत चाललं

हातपाय जरी थोडे थकले !

तरी व्हाट्सऍपच्या औषधाने

मन मात्र रिलॅक्स झाले !

 

आता फार काळजी करत नाही

आता चिडचिडसुद्धा होत नाही !

व्हाट्सऍपचा मित्र भेटल्यापासून

आता मनातसुद्धा रडत नाही !

 

आनंदी कसे  जगायचे याचे

आता कळले आहे तंत्र !

व्हाट्सऍपच्या या जादूच्या

काठीने दिला सुखाचा मंत्र.

  

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कट्टी-बट्टी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कट्टी-बट्टी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम

कट्टी आणि बट्टी दोन साधे शब्द, पण मानसिक स्वास्थ्याच्या दोन गुरू किल्ल्या!

आपल्या सगळ्यांच्या बालपणात हे दोन शब्द आपल्या आयुष्याचा भाग नक्की असायचे.

 

कट्टी म्हणजे आपला पहिला emotional withdrawal.

 

ना भांडण, ना आरडाओरड, ना मोठं स्पष्टीकरण…

फक्त शांतिपूर्वक घेतलेली तात्पुरती माघार.. …

“मला तुझ्याशी बोलायचे नाही.”

 

त्याचा साधा अर्थ होता,

“मी दुखावलो आहे… पण ते कसं सांगायचं कळत नाही. ”

 

आणि बट्टी?

ती म्हणजे दुरुस्ती.

थोडी awkward असायची..

थोडी न बोलता झाली, तरी पण लगेच व्हायची…

 आपलं मन शांत झाले की लगेच..

 

ना माफीची गरज,

ना कुठले स्पष्टीकरण…

 

एक चॉकलेट शेअर व्हायचे,

एक चोरटे हसू यायचे…

एक “चल ना, जाऊ दे ना”

आणि सगळं पुन्हा मस्त!

 

लहानपणी आपण emotional regulation चांगले करायचो…

फक्त हा शब्द माहीत नव्हता.

पण शरीराने, वयाने मोठे होताना, मनाचा मोठेपणा मात्र लहान होत गेला…

 

आता मोठेपणी कट्टी झाली की,

Emotional distance,

Ghosting,

थंड responses,

लांबलेला आणि अहंकाराच्या खांद्यावर बसलेला अबोला…

न वाचलेले मेसेज,

कधीकधी वरवरची नम्रता,

कोरडे बोलणे…

 

आणि बट्टी?

ती मात्र कठीण होत गेली,

बर्‍याचदा झालीच नाही..

निरागसपणा गेला,

अहंकार आला,

आणि अबोला कायम त्याच्या खांद्यावर घर करून बसला…

 

आपण “तू दुखावलंस मला” न म्हणता, बाहेरून

“ठीक आहे” म्हणायला शिकलो …

आणि आतून मात्र त्याच्यापासून दूर चालायला लागलो…

 

आपण वस्तू Repair करायला जसे विसरलो, तसेच उसवलेल्या फाटलेल्या मनालासुद्धा Repair करायला विसरलो.

 

मनात साठवून ठेवायला लागलो..

भावनांच्या जागी हिशेब आणि गणिते ठेवू लागलो…

आणि डोक्याला त्रास नको म्हणून लांब रहायला लागलो..

 

लहानपणी कट्टी ही तात्पुरती असायची, पण मोठेपणी ती कायमची झाली…

 

आपण विसरलो —

कट्टी म्हणजे शिक्षा नव्हती,

फक्त दुखावलेल्या मनाला थोडी space हवी असायची, म्हणून हक्काने घ्यायचो…

 

आणि बट्टी म्हणजे जिंकणं किंवा हरणं नव्हतं, ते होतं पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येणं..

आपल्या अमूल्य अशा मैत्रीला जगणं…

 

भक्कम नाती ती नसतात, जिथं भांडणं होत नाहीत.

भक्कम नाती ती असतात, जिथं

“बट्टी” अबोल्याला अहंकाराच्या खांद्यावरून खाली घेते आणि पुन्हा एकदा गप्पिष्ट बनविते…

 

मोठं होणं म्हणजे कट्टीला टाळणं नाही, तर बट्टीला कडेवर घ्यायचा मोठेपणा दाखवणं..

 

हेच खरं ‘कटी-बट्टी’चं सौंदर्य!

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ बहावा फुलला… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बहावा फुलला… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

बहावा फुलला…

बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो.

याला पावसाचा “नेचर इंडीकेटर” असेही म्हणतात, या वर्षी हा लवकर फुलला आहे.

आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला शॉवर  ऑफ फॉरेस्ट  असेही म्हणतात.

आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो…

 *

नकळत येती ओठावरती

तुला पाहता शब्द वाहवा,

सोनवर्खिले झुंबर लेउन

दिमाखात हा उभा बहावा ।

 *

लोलक इवले धम्मक पिवळे

दवबिंदूतुन बघ लुकलुकती,

हिरवी पर्णे जणू कोंदणे

साज पाचुचा तया चढवती ॥

 *

कधी दिसे नववधू बावरी

हळद माखली तनु सावरते

झुळुकीसंगे दल थरथरता

डूल कानिचे जणू हालते ।

 *

युवतीच्या कमनीय कटीवर

झोके घेई रम्य मेखला,

की धरणीवर नक्षत्रांचा

गंधर्वांनी झुला बांधला ॥

 *

पीतांबर नेसुनी युगंधर

जणू झळकला या भूलोकी,

पुन्हा एकदा पार्थासाठी

गीताई तो सांगे श्लोकी ।

 *

ज्या ज्या वेळी अवघड होई

ग्रीष्माचा तुज दाह सहाया,

त्या त्या वेळी अवतरेन मी

बहावा रुपे तुज सुखवाया ॥

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

मे महिन्याचा दुसरा रविवार उजाडतो आणि अचानक संपूर्ण आभासी जग (Social Media) भावूक होतं. मोबाईलच्या स्क्रीनवर ‘Happy Mother’s Day’ चे स्टेटस झळकू लागतात. कुणी फुलांचा गुच्छ देतं, कुणी केक कापतं, तर कुणी आईसोबतचं एखादं जुनं कृष्णधवल छायाचित्र शेअर करतं. दिवस संपतो, त्या फोटोंवरचे ‘लाईक्स’ मोजून आपण सुखावून जातो आणि पुन्हा आपल्या दिनचर्येत व्यस्त होतो. पण या उत्सवाच्या झगमगाटात एक जळजळीत प्रश्न उभा राहतो — मदर्स डे म्हणजे कॅलेंडरने दिलेला केवळ २४ तासांचा तुकडा आहे, की तो आपल्या बोथट होत चाललेल्या संवेदनांना आरसा दाखवणारा एक क्षण?

भारतीय संस्कृतीने आपल्याला ‘मातृदेवो भव’ हा मंत्र दिला. तैत्तिरीय उपनिषदातील हा विचार केवळ भिंतीवर टांगण्यासाठी किंवा भाषणात वापरण्यासाठी नव्हता, तर ते एक मूलभूत जीवनमूल्य होतं. घराच्या देव्हाऱ्यात देव असतोच, पण एका बालकाच्या जगात देवाची पहिली सगुण प्रतिमा ही आईच्या रूपातच उभी राहते. देव निराकार असतो, पण आई साकार असते—स्पर्शात, शब्दात आणि नजरेत. मात्र, आज हेच ‘दैवत’ अनेक ठिकाणी वृद्धाश्रमांच्या उंबरठ्यावर का दिसते? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. आपण भक्तीचा उच्चार तर मोठमोठ्याने करतो, पण व्यवहारात मात्र स्वतःची ‘सोय’ बघतो. आईच्या अथांग कष्टांच्या पायावर आपल्या आयुष्याची देखणी इमारत उभी राहिली; पण तिच्या वार्धक्यात तिला पेलताना आपल्याला ‘जागा नाही’, ‘वेळ नाही’ किंवा ‘परिस्थिती नाही’ या सबबी आठवू लागतात. आईने मात्र आपल्याला वाढवताना कधीही ‘परिस्थिती’ची अट घातली नव्हती, हे आपण सोयीस्करपणे विसरतो.

आजच्या आधुनिक आणि तथाकथित प्रगत जगात काही जण केवळ बुद्धीची कसरत करत असं मांडतात की, “आपण आईच्या उदरातून आलो, म्हणून तिचा आपल्यावर मालकी हक्क नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि जन्म घेणं हा केवळ एक जैविक ‘इन्सिडन्ट’ (योगायोग) आहे.” तत्त्वज्ञान म्हणून हे ऐकायला आकर्षक वाटतं, कारण ते जबाबदारीतून मुक्त करतं. मान्य आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि नातं म्हणजे गुलामगिरी नव्हे. पण नातं हे केवळ जैविक नसतं, ते ‘ऋणाचं’ असतं. आणि ऋण म्हणजे ओझं नव्हे, तर ते कृतज्ञतेचं भान असतं. आपल्या पहिल्या भीतीला जिने कुशीत घेतलं, आपल्या पहिल्या पडण्यावर जिने मायेची फुंकर मारली आणि आपल्या पहिल्या यशात जिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, त्या नात्याला केवळ ‘योगायोग’ म्हणणं ही हृदयाशी केलेली प्रतारणा आहे. बुद्धीला ते पटू शकतं, पण हृदयाला ते कधीच शिवणार नाही.

आई ही कोणी परिपूर्ण ‘देवी’ नाही. ती एक हाडामांसाची माणूस आहे. तिलाही अपेक्षा असतात, तिच्याही मर्यादा असतात आणि तिच्याकडूनही चुका होऊ शकतात. म्हणूनच ती आपल्याला अधिक जवळची वाटते. आपण तिला देव्हाऱ्यात बसवतो आणि तिच्याकडून ‘त्याग’ आणि ‘सहनशक्ती’ची अपेक्षा करतो. पण तिला देव्हाऱ्यापेक्षा तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी दोन शब्द बोलायचे असतात. म्हणूनच मदर्स डे हा केवळ उत्सवाचा क्षण नसावा, तर तो आत्मपरीक्षणाचा क्षण असावा. आपण शेवटचं आईशी निवांत कधी बोललो? तिच्या आरोग्याची मनापासून विचारपूस कधी केली? तिला एखादं महागडं गिफ्ट देणं सोपं असतं, पण तिला आपला ‘वेळ’ देणं कठीण असतं. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट टाकणं सोपं असतं, पण तिच्या वाढत्या वयातील हट्टासमोर संयम बाळगणं कठीण असतं.

आईचा खरा सन्मान म्हणजे तिच्या वार्धक्यात तिच्या थरथरत्या हाताला आधार देणं. तिच्या एकटेपणाला आपली जिवंत उपस्थिती देणं आणि तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी तिला ‘ओझं’ नव्हे तर ‘आपलं’ असल्याची जाणीव करून देणं. ‘मातृदेवो भव’ हा मंत्र उच्चारण्यासाठी नसून तो जगण्यासाठी आहे. भावना व्यक्त करणं सोपं असतं, पण जबाबदारी उचलणं कठीण असतं. ही जबाबदारी म्हणजे केवळ आर्थिक तरतूद नव्हे, तर तिला आदराचं स्थान देणं होय.

कॅलेंडरवर ‘मदर्स डे’ दरवर्षी येईल आणि जाईल. पण आईचा वरदहस्त आपल्या डोक्यावर किती काळ राहील, याची कोणतीही शाश्वती नाही. फुले देण्यापेक्षा तिला मानसिक आधार द्या. पोस्ट टाकण्यापेक्षा तिच्या शेजारी बसून तिचं ऐकून घ्या. ज्या दिवशी घरातील आई खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी असेल, तो प्रत्येक दिवस ‘मदर्स डे’ ठरेल. कारण आईची सावली असेपर्यंतच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित असतं.

तिच्या सुरकुतलेल्या कपाळावर, तुझ्या सुखाचा इतिहास आहे,

तिच्या थरथरत्या हातांमध्येच, जीवनाचा विश्वास आहे…

 

तिची सोबत आहे तोवर  तिचं हसणं कमावून घे,

मदर्स डे च्या स्टेटस पेक्षा, तिचं मन कुरवाळून घे!

 

वेळ निघून गेल्यावर रडून, काहीच साध्य होणार नाही,

आई नावाचं विद्यापीठ, पुन्हा पुन्हा मिळणार नाही…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भारतीय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भारतीय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

जपानमध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ राहणाऱ्या एका भारतीयाने एक गोष्ट पाहिली..

त्याचे जपानी मित्र अतिशय नम्र, सभ्य आणि मदत करणारे होते,

पण त्यातील एकानेही त्याला कधी घरी बोलावले नाही…

ना चहासाठी, ना साध्या भेटीसाठी.

 

तो भारतीय थोडा आश्चर्यचकित झाला आणि दुखावला गेला.

एके दिवशी त्याने आपल्या एका जपानी मित्राला विचारले,

“तुम्ही इतके चांगले, प्रेमळ आहात… तरीही मला का कधीच घरी बोलावत नाही?”

 

त्या जपानी मित्राने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं –

“आम्हाला भारतीय इतिहास शिकवला जातो… पण प्रेरणा म्हणून नाही,

तर सजगता म्हणून.”

 

तो भारतीय थक्क झाला..

“सजगता? भारतीय इतिहास सावधानतेसाठी शिकवला जातो? का?”

 

जपानी मित्र म्हणाला,

“सांग बरं, इंग्रज जेव्हा भारतात राज्य करत होते,

तेव्हा किती इंग्रज असतील?”

भारतीय म्हणाला, “कदाचित… दहा हजार?”

 

जपानीने गंभीर चेहऱ्याने मान हलवली,

आणि विचारलं — “आणि त्या वेळी भारतात किती भारतीय होते?”

“सुमारे ३० कोटी,” भारतीय म्हणाला.

 

जपानी शांतपणे म्हणाला —

“मग सांगा, अत्याचार कोणी केला?

भारतीयांवर चाबकाचे फटके कोणी मारले?

गोळ्या कोणी झाडल्या?”

 

तो पुढे म्हणाला —

“जेव्हा जनरल डायरने जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश दिला,

ट्रिगर कोणी दाबला?

इंग्रज सैनिकांनी?

नाही… ते भारतीय सैनिकच होते.”

 

“कोणत्याही भारतीयाने जनरल डायरकडे बंदूक का उगारली नाही?

एकाने पण का नाही?”

 

“तुम्ही ज्याला गुलामी म्हणता,

ती शरीराची नव्हती… ती आत्म्याची होती.”

 

भारतीय गप्प उभा राहिला, डोळ्यात पाणी.

 

जपानी मित्र पुढे म्हणाला —

“मध्य आशियातून आलेले मुगल किती होते? काही हजार?

आणि तरी त्यांनी शतकानुशतके राज्य केलं.

 

ते बलाच्या जोरावर नव्हे,

तर तुमच्याच लोकांच्या नम्रतेवर,

त्यांच्या विश्वासघातावर.”

 

“तुमच्याच लोकांनी धर्म बदलला,

तुमच्याच लोकांनी आपल्या बहिणींचं, मुलींचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं.

तुमच्याच लोकांनी तुमचे नायक इंग्रजांच्या हाती दिले.

 

चंद्रशेखर आझाद कुठे लपले आहेत हे इंग्रजांना कोणी सांगितलं?

भगतसिंहांना फाशी देणं इतकं सोपं होते का? पण तुमच्याच लोकांनी पाठ फिरवली”

 

 

“तुम्हाला बाहेरून शत्रूंची गरजच नाही.

तुमचे स्वतःचे लोकच सत्तेसाठी, पदासाठी,

थोड्याशा फायद्यासाठी तुम्हाला वारंवार धोका देतात.

म्हणूनच आम्ही भारतीयांपासून थोडं अंतर ठेवतो.”

 

“जेव्हा इंग्रज हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आले,

तेव्हा एकाही स्थानिकाने त्यांच्या सैन्यात प्रवेश केला नाही.

पण भारतात?

तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती झालात,

त्यांची सेवा केली,

त्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्याच लोकांना मारलं.”

 

“आणि आजही तुम्ही बदलले नाही.

थोडीशी मोफत वीज,

एक बाटली दारू,

एक चादर दिली की

तुमचं मत, तुमचा आत्मा,

सगळं विकत घेता येतं.”

 

तुमची निष्ठा देशाशी नाही,

तर तुमच्या पोटाशी आहे.”

“तुम्ही घोषणा देता, आंदोलन करता,

पण जेव्हा देशाला तुमच्या त्यागाची गरज असते,

तेव्हा तुम्ही कुठे असता?

 

तुमची पहिली निष्ठा अजूनही

तुमचे घर, कुटुंब आणि पैशाशी आहे —

देश आणि धर्म नंतर.”

 

इतकं बोलून तो जपानी शांतपणे निघून गेला,

आणि तो भारतीय तिथेच उभा राहिला —

डोळ्यांत लाज, मनात वेदना ठेऊन…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नंतर नाही, आताच… – लेखिका : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नंतर नाही, आताच… – लेखिका: अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

“साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी… आणि आयुष्य सरण्यापूर्वी जगून घ्यायला हवं. ”

ही ओळ साधी वाटते, पण तिच्यात आयुष्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान दडलं आहे.

आपल्या कपाटात अनेक साड्या असतात… काही खास प्रसंगासाठी, काही “नंतर कधीतरी” म्हणून ठेवलेल्या. पण तो “नंतर” अनेकदा कधीच येत नाही. साडी तशीच राहते… आणि हळूहळू तिचा रंग फिका होत जातो.

हेच आपल्या आयुष्याबाबतही होत नाही का?

आपण सतत काहीतरी पुढे ढकलत राहतो—

“आत्ता वेळ नाही… नंतर करू…”

“थोडं स्थिर झाल्यावर जगू…”

“जबाबदाऱ्या कमी झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढू…”

पण खरं सांगायचं तर,

आयुष्य कुणासाठीही थांबत नाही.

क्षण निघून जातात… आणि आपल्याला कळतही नाही.

आपण इतरांसाठी जगताना स्वतःला विसरतो.

इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधताना,

आपली स्वप्नं, आपल्या इच्छा… हळूहळू मागे पडतात.

साडीप्रमाणेच आयुष्यही जपून ठेवायचं नसतं,

ते जगून घ्यायचं असतं.

मनात येईल तेव्हा हसायचं,

आवडेल तसं सजायचं,

ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ द्यायचा,

आणि स्वतःलाही थोडंसं जगू द्यायचं.

कारण शेवटी,

ना साड्या कायम राहतात…

ना क्षण परत येतात…

म्हणूनच—

“साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी…

आणि आयुष्य सरण्यापूर्वी मनापासून जगून घ्यायला हवं. ”

कारण आयुष्य खूप मोठं नसतं,

पण ते सुंदर नक्की असू शकतं…

जर आपण ते मनापासून जगलो तर…

शेवटी इतकंच—

“उद्या” कधीच खात्रीचा नसतो…

म्हणून आजचं आयुष्य, आजचं हसू, आजचं प्रेम…

आजच जगून घ्या…

 

लेखिका:अज्ञात

प्रस्तुती: अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares