मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुरुजी… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ गुरुजी… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

विसरलो नाही मी

तळव्यावरची जांभळी खूण

फोकाचा तो जाड व्यास

गणित म्हणजे काय अजून?

इतिहासाच्या सनावळी

एकाखाली एक शंभर ओळी

खाडाखोड केलीत तर

जाळ काढेन कानाखाली

शुद्धलेखन अलंकार

निबंधाचा साँल्लिड त्रास

वहीवरती लाल भोपळे

ओणवे रहा एक तास

आम्ल आणि अल्कली

सारी अक्कल बुडाली

शिवाय होती ठरलेली

शिव्यांची लाखोली

पाढे जर चुकलात तर

पायाखाली तुडवीन

कोंबडीचे पाय काढलेत तर

वहाणेने बडवीन

शीत वारे उष्ण वारे

इकडून तिकडे वाहून गेले

आमचे सारे बालपण

त्यांच्या संगे उडून गेले

गुरुजींच्या भितीमुळे

आपसूक शिकत गेलो

फटके खाल्ले थोडेफार

कणखर मात्र बनत गेलो

आयुष्यातले स्थैर्य

पाच आकडी पगार

कुणामुळे मिळाला

हा सुखी संसार?

ब्रँडेड शूज घेताना

तुटकी वहाण आठवते

कुणास ठाऊक कशासाठी

पापणी थोड़ी ओलावते!

 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कवी : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #२९९ ☆ आरास डोळ्यांची… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # २९९ ?

☆ आरास डोळ्यांची… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

अशी आरास डोळ्यांची

केली काजळ घालून

आनंदाच्या क्षणी सुद्धा

आली आसवे धावून

*

स्वच्छ झाला हा आरसा

डोळे निघाले धुऊन

त्याने डोळ्यात पाहिले

दिले स्वतःला झोकून

*

शुष्क ओठ पाकळीला

अश्रू घेतो हा चाटून

त्याला ओठाने टिपता

गेली लाली ही पुसून

*

ओंजळीत तो सुगंध

आला झाकून घेऊन

वेलीवर काही फुले

गेला होता उधळून

*

कार्य संपता फुलांचे

फुले जातात वाळून

काल शीर्षस्थानी होती

आज दिलेली फेकून

अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांज मला डसते… + संपादकीय निवेदन – श्री विष्णू सोळंके – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री विष्णू सोळंके

🪻 अभिनंदन 🪻

🌹🌹🌹 अभिनंदन 🌹🌹🌹

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक अमरावती येथील श्री विष्णू सोळंके यांचा कातरवेळी हा काव्य संग्रह आणि संवाद मौनाशी हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे.

श्री.सोळंके यांच्या नव्या साहित्य कृतींबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐✒️💐

आज त्यांची कविता “सांज मला डसते…“,कवितेचा उत्सव‘ या सदरात देत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ? 

सांज मला डसते… ☆ कवी : श्री विष्णू सोळंके

कातरवेळी संध्याछाया हळूच ही हसते

आयुष्याच्या वळणावरची सांज मला डसते…१

*

उन्हं सावली खेळत आहे प्रारब्धाची रेषा

मी कशाला कुणास दावू हातावरच्या रेषा…२

*

कशी विणावी विण सुखाची कशी म्हणावी गाणी?

मखमालीचा देश पेटला डोळा आले पाणी…३

*

निळ्या जळावर कोरुन घ्यावी नाही ऐशी नक्षी

जीव कुणावर लावून द्यावा दिसला नाही पक्षी…४

*

श्र्वास मोजके जीवन थोडे क्षणाक्षणाला घाई

सुख दुःखाच्या वाटेवरती पहाड आणि खाई…५

*

© श्री विष्णू सोळंके

अमरावती,४४४६०६

मो 7020300824

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – काय ते विरक्ती… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – काय ते विरक्ती … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

काय ते विरक्ती न कळेची आम्हां /

जाणों एक नामा विठोबाच्या//१//

*

नाचेन मी सुखें वैष्णवांचें मेळीं /

दिंडी टाळघोळीं आनंदें या //२//

*

शांति क्षमा दया ते मी काय जाणें /

विठ्ठलकीर्तनें वांचूनियां //३//

*

कसया एकांत सेवूं तया वना /

आनंदें या जनामाजी असो//४//

*

कासया उदास होऊं देहावरीं /

अमृतसागरीं डुबोनियां //५//

*

तुका म्हणे मज असे हा भरवसा/

विठ्ठल सरसा चालतसे//६//

*

तुका म्हणे

तुकाराम महाराजांनी आत्मानुभवाने साधा सोपा भक्ती मार्ग स्वीकारला आहे. आणि तोच त्यांनी आपला जीवनक्रम ही मानला आहे. त्या मार्गाचे मोठेपण आणि सोपेपणा सांगताना ते म्हणतात.

विरक्ती म्हणजे नेमके काय हे आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त विठ्ठलाचे नाम जाणतो त्याचेच नाम संकीर्तन करतो. त्यांच्याच पायी लीन होतो.तेथेच आम्हाला जीवनाचे सारसर्वस्व भेटते. तेच आम्हाला सुखशांती मिळवून देते. म्हणूनच आम्ही टाळमृदंगाचा गजर करत वैष्णवाच्या मेळ्यात सहभागी होऊन आनंदाने नाचत भक्तीरसात न्हाऊन निघतो

.दया,क्षमा, शांती हे सारे काही आम्ही विठ्ठलाच्या तन्मयतेने केलेल्या कीर्तनातूनच जाणतो. विठ्ठला शिवाय आम्ही काहीच जाणवत नाही. मग आम्ही जप तप साधना करण्यासाठी काय म्हणून वनवासात एकांतात राहून तपश्चर्या करावी.आम्ही जनसमुदायात मिसळताना आनंदी होतो. तेच आम्हाला फलदायी वाटते. हितकारक वाटते. परमार्थ, अध्यात्म, विरक्ती हे शब्द आम्हाला फारच बोजड वाटतात. त्यांचा अर्थ ही आम्हाला निपटणे कळत नाही.ते सारेच कठीण आहे.अवघड आहे.म्हणून त्या जंजाळात पडावेसेही वाटत नाही. देवाचे भक्तीभावाने नामस्मरण करा. आनंदाने नाचा.तुम्हाला सर्व काही तेथेच मिळेल. त्यासाठी वनात राहून तपश्चर्या करण्याची जरुरी नाही. विविध प्रकारची कर्मकांडे, यज्ञयाग वृतवैकल्ये करण्यात ही काही अर्थ नाही.

.सर्वसामान्य माणसांच्या आनंदायी मेळ्यात राहूनच परमोच्च पारमार्थिक आनंद परम सुखाने लुटता येतो. भक्ती रसाने तुडूंब भरलेल्या अमृतसागरात डुंबत असताना परमेश्वरानेच दिलेल्या या देहाकडे मी उदास वाण्याच्या नजरेने मी का पाहावे आणि त्याला कशासाठी दंडीत करावे. लोकांच्यात सामील होऊन,त्यांच्यात मिळूनमिसळून विठ्ठलाचे नामस्मरण व नामसंकीर्तन करत रहाणे हाच परमार्थ करण्याचा अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी मार्ग आहे. तो मार्गच आपल्या मनोकामना पूर्ण करील. तोच आपल्याला सर्व काही शिकवील.म्हणूनच परमार्थ करताना विषेश आणि विशिष्ट कर्मकांडे करण्याची आवश्यकता नाही. भक्ती मार्ग इतका सहज आणि सोपा असताना तो अवघड आणि दुस्तर का करावयाचा.?

 *

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ त्याच त्याच रोज | मरणयातना || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? त्याच त्याच रोज | मरणयातना || ? श्री आशिष  बिवलकर ☆

राज्यकर्ते करी | स्वतःचीच लाल |

जनता बेहाल | रस्त्यावर ||१||

*

त्याच त्याच रोज | मरण यातना |

प्रश्नच सुटेना | ट्राफिकचा ||२||

*

तासोंतास चाले | वाहतूक कोंडी |

जीव रडकुंडी  | प्रवासात ||३||

*

ट्राफिक पोलीस |  करे मनमानी |

गाड्या आडवुनी | जैसी मर्जी ||४||

*

मंत्री संत्री ताफा | पळतो सुसाट |

जनतेचे वाट | लावोनिया ||५||

*

रोड टॅक्स टोल | सर्रास वसुली |

जनता मामुली | सत्तेपुढे ||६||

*

एकमेकांचीच | खेचा तुम्ही टांग |

वाहनांची रांग | आम्हां भाळी ||७||

*

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तू असतांना.. तू नसतांना… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “तू असतांना.. तू नसतांना…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

एकटीच मी बरी वाटे तू असतांना

उगाच का विरह दाटे तू नसतांना?

*

सततची धांदल वाटे तू असतांना

उगाच का निरव साचे तू नसतांना?

*

अधीर मी पुस्तक वाचण्या तू असतांना

पानोपानी तुझी प्रतिमा तू नसतांना?

*

स्वच्छंदीचा ध्यास मज, तू असतांना

उगाच का भयाण भासे तू नसतांना?

*

चहाचा मी आग्रह धरी तू असतांना

कॉफी तुझी का प्रिय वाटे तू नसतांना?

*

अंधार निमाला, किरणे प्रकाशतांना

पाने हसली तुझी चाहूल लागतांना..

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कर्तृत्व … ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कर्तृत्व… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

सुधारणांचा सोस असावा

जुना लाभण्या पुन्हा विसावा

*

समाजसेवा करणारला

कुटुंब वत्सल ज्ञात असावा

*

सुखात जनता वावरण्याला

गुंडगिरीला चाप बसावा

*

समर्थ करण्या व्याख्यानाला

आत्मस्तुतीचा दर्प नसावा

*

लिखानातल्या पसा-यातुनी

भरीव काही अर्थ निघावा

*

भक्कम करण्या आधाराला

आपुलकीने स्पर्श करावा

*

मैत्री मधल्या वागणुकीला

प्रेमाचा अनुबंध कळावा

*

समेट पुरता घडवायाला

तना मनाचा द्वेष जळावा

*

परोपकारी बनण्यासाठी

दातृत्वाचा हात मिळावा

*

यशसंपादन करण्यासाठी

कर्तृत्वाचा ध्यास जपावा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सामंजस्य… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ सामंजस्य सुश्री नीलांबरी शिर्के 

मी अविश्वाच्या गैरसमजाच्या

मातीत रोवल साम॔जस्याच बी

नुसत पेरलच नाहीतर

रूजवल खतपाणी देऊन

निकोप अस वाढवल ही!

त्याला फळही लागली गोड

खाणारांनी ती खाल्ली

अगदी मनापासून आवडीने

चाखत चोखत रस शोषत

पण

फळाच त्याच्या स्वादाच

कौतुक अजिबात नाही केल

याला कारण ती मातीच असावी कदाचित!

एक मात्र बर झाल

त्यांनी फळ खावून

साल तिथच टाकली

बियाही तिथल थुंकुन टाकल्या

झाडाला थोड समाधान मिळालं

आता मातीला सालांच खत मिळेल

बिया आपसुक रूजतील

सामंजस्याची झाड रूजतील

त्यांची संख्या वाढत जाऊन

गैरसमजाची मातीही

समुतदार सुपीकपणात गणली जाईल

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आम्ही जातो आमच्या गावा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आम्ही जातो आमच्या गावा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

निघालो घेऊन

उर्जेची गाठोडी

साधनेस उपयोगी

निशीदिनी…

*

शब्दात ओवणे

कठीण कठीण

अनुभवाल तेव्हाच

येता तपोवनी…

*

धागा एक एक

पाश एक एक

तुटून, सुटून

व्हाल आबादानी…

*

साधन आणि सेवा

एकाच नाण्याच्या

बाजू दोन

व्हाल अष्टावधानी..

*

प्रपंच हवा नेटका

तोचि परमार्थ साधका

आहे हे अभेद्य

जाण त्वा जगामाजी..

*

आले डोळा पाणी

जड झाले पाऊले

शरीराने जरी माघारी

मन मात्र अजूनही तपोवनी..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आमचाच खरा राजा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

☆ आमचाच खरा राजा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

गल्ली मधल्या राजांमध्ये

लागे कसून नेहमी चुरस,

भव्यदिव्य आरास सारी

सगळा देखाव्यांचा भास!

*

होती उंचीवरुनी हेवेदावे

सारे खेळ जाहिरातींचे,

‘आमचा पावतो नवसाला’

लागती फलक मंडळांचे!

*

ऐकून एखाद्याची कीर्ती

रात्र रात्रभर रांगा लागती,

फुललेल्या चेंगरा चेंगरीत

मोबाईल पाकीटं जाती!

*

आता तर झाली विभागणी

उजव्या डाव्या पायाची,

उरली नाही कोणा चाड

वक्रतुंडाच्या खऱ्या भक्ताची!

वक्रतुंडाच्या खऱ्या भक्ताची!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares