मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ज्याचे त्याचे स्थान… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ज्याचे त्याचे स्थान ? श्री आशिष  बिवलकर ☆

मृदूंग वाजतो मंदिरात,

खेटरं गांजती पायरीशी.

जरी चर्म दोन्ही अंगी,

कर्म ज्याचे त्याच्यापाशी.

*
मृदूंग मिरवती गळ्यात,

पायताणं घासती पायात.

दोष ना तो चामड्याचा,

जडणं घडणं जैसे भाग्यात.

*
मृदंग देई भजनात साथ,

खेटरं सोसती भार लाथ.

योग्यता ठरवी चामड्याची,

घडवणाऱ्याचे दोन हात.

*
मृदूंग दुमदुमतो ताल,

खेटरं करकरतो चाल.

उमटणारा ध्वनी सांगे,

दोघांच्या अंतरीचे हाल.

*
कातडं जरी साम्य दोघांत,

कारागीर गुरु बाणवतो मोल.

जैसा गुरु मिळे भाग्यात,

तैसा साधती जीवनाचा तोल.

*
मृदूंग घडावा वा वाहणा,

ज्याचे त्याचे असते स्थान.

गुरु, कर्म आणि भाग्य देते,

जीवनात यथोचित सन्मान.

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गूढ कोडे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ गूढ कोडे☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

नकोसे रत्न कन्येचे तुम्हाला रे!

तरी नारी हवी पत्नी कशाला रे?

*

अकाली पावसा केलीस नासाडी

बळीचे दु:ख का परक्या ढगाला रे?

*

खु्डावीशी कशी रे वाटली कलिका

तिला जखमा, न थोडी झळ नराला रे

*

अहंकारास सोडोनी सुखी व्हावे

शिरावर भार शोभेना वयाला रे

*

कशी तू गूढ कोडी टाकली देवा

किती सुटली तरी उरली उद्याला रे

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – पुढीलाचे इच्छी पळ… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – पुढीलाचे इच्छी पळ… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

पुढिलाचें इच्छी पळ /

नाहीं बळ ते अंगीं //१//

*

संत गेले तया ठाया /

देवराया पाववीं //२//

*

जेष्ठांची कां आम्हा जोडी /

परवडी न लभे //३//

*

तुका म्हणे करीं कोड /

पुरवी लाड आमुचा //४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

तुकाराम महाराजांनी स्वतःच अंतर्मुख होऊन स्वतःला पूर्ण रुपाने जणून घेतले होते. आपल्याच आपल्यावर पडलेल्या मर्यादा ते ओळखून होते. म्हणून अगदी खुलेपणाने मनमोकळे व्यक्त होताना ते म्हणतात. मनात खूप काही प्रबळ इच्छा आहेत. पण त्या इच्छांचे मिळणारे फळ प्राप्त करून घेण्यासाठी लागणारे बळ मात्र अंगी नाही. महान संत जेथे पोहचले तेथे आपणही पोहचावे असे सारखे वाटत रहाते ते आपणाकडून मला मिळावे म्हणूनच मी आपणाकडे आलो आहे. त्यासाठी तुम्ही मला पावन व्हावे. या बाबतीत जेष्ठ आणि श्रेष्ठ असणा-या मंडळीची जोड मला मिळाली तर आयुष्यभर आमची होणारी परवड तरी टळेल. येवढ्यासाठी तरी देवा तुम्ही मला पावन व्हा आणि माझे लाड पुरवणारे व्हा.

मनात बाळगलेले ध्येय गाठण्यासाठी पाठीशी ईश्वरी कृपा असलीच लागते. येवढ्याच साठी महाराज देवाकडे ही आग्रहाची मागणी करत आहेत.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांग कोणासाठी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ सांग कोणासाठी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

वारा सांगतो कहाणी,

सांग कोणासाठी !

*

वृक्ष बहरती रानी,

सांग कोणासाठी !

*

पक्षी गाती गाणी,

सांग कोणासाठी !

*

मेघ वाहती हे पाणी,

सांग कोणासाठी !

*

नभ कोसळे तुफानी,

सांग कोणासाठी !

*

नदी सांगते विराणी,

सांग कोणासाठी.

*

डोळा येते पाणी,

सांग कोणासाठी !

सांग कोणासाठी,

सांग कोणासाठी !

*

उगा रडते का कोणी,

सांग कोणासाठी !

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ चंद्र.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ चंद्र.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे… नुकतंच नवरात्र झालं होतं आणि कोजागरी पौर्णिमा जवळ आली होती. मी बँकेतर्फे एका ट्रेनिंगसाठी नाशिक ट्रेनिंग सेंटरला गेलेली होते. दसऱ्याला सुट्टी होती म्हणून त्या एका दिवसासाठी घाईघाईने घरी जाऊन परतले होते… पण यावर्षी नेहेमीसारखी कोजागरीची रात्र साजरी करता येणार नाही म्हणून जरा हुरहुरल्यासारखं वाटत होतं…

…. रात्री झोप येत नव्हती म्हणून रूमच्या खिडकीतून आकाशाकडे बघत बसले होते… हा माझा जुनाच छंद होता म्हणा… मुक्त विहरणाऱ्या ढगांमुळे आकाशात उमटणारे वेगवगळे आकार, त्यातून मधेच डोकावणाऱ्या चांदण्या, वडलांनी बघायला शिकवलेली नक्षत्रं… हे सगळं बघण्यात मन नेहेमीच खूप रमायचं… तर त्या वर्षी पाऊसही थोडा रेंगाळलेला होता… आकाशात पावसाचे ढग रेंगाळतांना दिसत होते… आणि मधूनच अचानक त्यातून चंद्र डोकावतांना दिसला…मध्येच झाकला जात होता…परत दिसत होता…कधी अर्धा…कधी पुरता… या चंद्राला पाहून आजवर कितीतरी कवींना वेगवेगळे अर्थ ध्वनित करणारी काव्यं सुचली आहेत, आणि ती सुचतच रहातील असा जणू ‘प्रेमाचा साक्षीदार’च करून टाकलाय त्याला कायमचा.

… ’पण या चंद्राला जर बोलता आलं असतं तर काय म्हणाला असता हा?’ …त्याच्याकडे बघता बघता अचानक मनात आलं होतं… मग हाच विचार कितीतरी वेळ डोक्यात घोळत राहिला होता आणि जराशाने काही ओळी आपसूक सुचल्या… ती ही कविता …

☆  चंद्र… ☆

काल सहज फिरता फिरता रस्त्यात एक गंमत झाली

एका वळणावर जरा आडोशाला, मला चंद्राची पालखी दिसली ॥

*

आत चंद्र होताच, पण बसला होता चेहरा पाडून

तो उदास निस्तेज चेहेरा पाहून, मी गेले चक्रावून ॥

*

नेहेमीचे ते सुंदर रुपडे, आठवले मग क्षणात

नकळतच माझ्याही, अन् गलबलले मग मनात ॥

*

घाबरतच गेले जवळ त्याच्या, खांद्यावर थोपटले

स्पर्शातल्या माझ्या विश्वासाने, बोलते त्याला केले ॥

*

खिन्न उद्विग्न मनात त्याच्या वादळ होते घोंघावत

कुठून आलो इथे, म्हणून मन होते पस्तावत ॥

*

म्हणे कशी सांगू तुला, व्यथा माझ्या मनीची

सारेच इथे स्वत:त गर्क, खंत नाही कशाची ॥

*

निवांत रम्य वेळ साधून, आलो सागराला भेटायला

मला पाहून चक्क तो, मागेच लागला हटायला ॥

*

मला पाहून मनात त्याच्या उर्मी उठतात ऐकलं होतं

प्रत्यक्षी पण खरं त्याचं, रूप काही वेगळंच होतं ॥

*

दु:खी कष्टी झालो आणि, नाद त्याचा सोडला

माझ्या साक्षीने प्रेम करणाऱ्या माणसांचा रस्ता धरला ॥

*

इथेही पण घोर निराशाच, आली माझ्या वाट्याला

विचारपूसही करायला, तो वेळच नाही कोणाला ॥

*

दुरूनच पाहून नाक मुरडून कुजबूज काहीतरी

खडबडीत माझा चेहरा त्याची.. किळस म्हणे वाटते भारी ॥

*

नेहेमीच यांना हवी पौर्णिमा, पण अमावस्या नको

सुखात सगळे वाटेकरी, पण दु:खात वाटा नको ॥

*

माहीत नव्हती मला इथली उफराटी ही तऱ्हा

चुकलंच आलो इथे, आपला लांबच होतो बरा ॥

*

एक मात्र पटलं, माणसं हुशार इथली खरोखर

दुरून डोंगर साजरे, हे कळलंय् यांना बरोबर ॥

*

एवढं बोलून हुंदका आवरून, निघाला तो जायला

सोडून गेला मनात माझ्या, भुंगा एक छळायला ॥

सोडून गेला मनात माझ्या, भुंगा एक छळायला ॥

*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कोण खरे आहे… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कोण खरे आहे… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

रंग पानांचा लेऊन

झाडावर राही किडा

एकरूप व्हावे कसे !

यातुनच घेऊ धडा

*

रंग पानांचा घेऊन

किडा पान कुरतडे

बाह्यरूप बदलून

स्वार्थ साधती किडे

*

किड पानाला लागते

किड फळ पोखरते

डोळे उघडून पाहू

कोण खरे आपले ते

*

 ज्ञान देतसे निसर्ग

 ज्ञान देतात हे किडे

 योग्य तेच शिकण्या

 डोळे ठेऊ या उघडे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्थि त्यं त र ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

☆ 😞🕺स्थि त्यं त र🫡 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कुंकू गेले टिकली आली

ती ही न्हाणीघरात गेली,

अवघी न्हाणी स्वतःला

सौभाग्यवती म्हणू लागली!

*

स्कर्ट गेला, साडी गेली,

गायब झाला फ्रॉक,

पंजाबी ड्रेसमध्ये मग

पोरी करू लागल्या रॉक!

*

फेटा उरला कार्यापूरता

दिवस टोप्यांचे सरले,

तरुण वयातच पोरांना

टक्कल पडायला लागले!

*

इंटरनेट, कॉंमप्युटरमुळे

जग फारच जवळ आले,

गर्दीतल्या सर्व माणसांचे

माणूसपणच घेवून गेले!

*

वैज्ञानिक प्रगतीमुळे

कष्ट फारच कमी झाले,

सामान्य लोकांच्या जीवनात

मरण फक्त स्वस्त झाले! 😔

मरण फक्त स्वस्त झाले! 😔

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनाचा गाभारा… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

सुश्री प्राची जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ मनाचा गाभारा… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

सागराच्या लाटेची गाज जसे मनीचे हितगूज

वाटे वरवर संथ जरी, खोल खोल अथांगात!!

*

कधी मनीच्या खोल डोहात, आठवणींचा पडतो पाऊस

कधी तरल भावनांचा, उसळतो मनावर तरंग!!

*

कधी मन जाई आत आत उदास, निराशेच्या गर्तेत

त्या भावनांसम जाणिवेने, अविरत हे नेत्र झरतात!!

*

आठवणींचे गोड गाठोडे, मनाच्या खोल कप्प्यात

त्यांच्या सहज सान्निध्यात, मन मोरपिशी आनंदात!!

*

आठवणी दाटतात सुहृदांच्या, मनी त्याचा लख्ख प्रकाश

कधी मनावर दाटते मळभ, अन् जीव होई कासावीस!!

*

कधी वाटे शांत निवांत, आठवणींच्या हिंदोळ्यात

कधी मनाचा होई कल्लोळ, त्यासी कोण सावरेल!!

*

आठवणी या पावसासम, येता जाता भिजवतात

परी त्या भिजण्यामागे, एक असे शांत सरोवर!!

*

असे आठवणींचे येणे जाणे, मनातील शांत सरोवरात

तेजाळली निरांजनाची ज्योत, मनाच्या खोल गाभाऱ्यात….

 मनाच्या खोल गाभाऱ्यात….

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चित्र एक… काव्ये दोन : डाव – डॉ. सोनिया कस्तुरे (२) उल्लंघल्या सीमारेखा – डॉ. स्वाती नाईक ☆ प्रस्तुती – सौ गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  चित्र एक… काव्ये दोन : डाव – डॉ. सोनिया कस्तुरे (२) उल्लंघल्या सीमारेखा – डॉ. स्वाती नाईक ☆ प्रस्तुती – सौ गौरी गाडेकर ☆

( १ )

डॉ. सोनिया कस्तुरे

 डाव ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

डाव जाणिवांचा एकदा 

निर्भीडपणे खेळून तर बघ 

रणरणत्या उन्हात सुद्धा 

एकदा फुलून तर बघ 

*

अडथळे तुझ्या वाट्याची 

कमी नाहीत कधीच 

लोकभान विसरून 

आत्मभान जगून तर बघ 

*

अन्याय अत्याचारी हात 

जोडले जातील तुझ्यापुढे

तुझ्या अंतरिक शांततेला 

क्रांतीच रूप देऊन तर बघ

*

तुला हीन-दीन अबला मानणारे 

कोसळतील एक दिवस

मनातल्या रणांगणात 

एकदा झुंजून तर बघ..

© डॉ. सोनिया कस्तुरे 

9326818354

( २ )

उल्लंघल्या सीमारेखा ☆ डॉ. स्वाती नाईक ☆

पोळपाटाची बॅट झाली 

लाटण्याचं हॅन्डल

कणकेच्या गोळ्याचा बॉल 

चुलीतल्या ठिणग्या 

डोळ्यातुन तडतडल्या 

आज आमच्या मुली 

वर्ल्ड चॅम्पियन झाल्या.

*

रांधा, वाढा. उष्टी काढा 

समीकरणच बदललं 

जेंव्हा आमच्या पोरींनी

साऊथ आफ्रिकेला धुनकलं.

*

पोरींनी आज मैदानात

इतिहासच रचला

पुरुषी अभिमानाचा

पार चकणाचूर केला.

*

मुली मुलांच्या बरोबरीच्या

फक्त हे नाही सिद्ध केलं

जगात त्यांचं स्थानच वेगळंय

हे दाखवून दिलं.

*

स्त्री शक्ती काय असते

सगळ्यांना दिसलं

ती महिषासुरमर्दिनी आहे

अख्ख्या जगालाच पटलं.

*

चुलीतली लाकडं 

चुलीतच विझली

विश्वकपाच्या झगमगीत

सगळी दुनिया दीपली.

*

सगळे गड सर झाले

सगळ्या सीमारेखा उल्लंघल्या

आता आमच्या पोरी

खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्या.

© डॉ. स्वाती नाईक

अहमदाबाद

प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कामलता ही कामिनी भासे ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कामलता ही कामिनी भासे ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त: पादाकुलक)

रुपडे सुंदर कांती कोमल

मनास माझ्या ओढ लावते

पहा उतरले धरणीवरती

तारांगण हे मला भावते

कुंजलता ही बहरत आली 

इकडे तिकडे वळणे घाली

कोवळ कांती सुमंगलाही 

कुमकुम टिकली अंगी ल्याली

*

कामलता ही कामिनी भासे

मोहक सुंदर किती देखणी

लटका बांधा अन् शेलाटी

ललना भासे लावण्यखणी 

*

कामिनी कुणी म्हणे तरुलता 

जयंती फूल अत्तर दाता

गजाननाच्या किरिटी साजे

झिरमिर झिरमिर पल्लव पाता

*

हरित पिसारा त्यात जणू ही

लाल चांदणी उमलत येते

गणेशवेली प्रिय साऱ्यांची 

मनास माझ्या मोदच देते 

*

भिरभिर भिरभिर शब्द फिरावे

कविता सुमने त्यात फुलावी

लाल तारका काशीरत्नम्

हिंदोळ्यावर गोड झुलावी

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares