☆ तुका म्हणे – पडिलो भोवनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
पडिलों भोवनीं
बहु चिंतवणी //१//
*
होतो चुकलो मारग /
लाहो केला लागवेग //२//
*
इंद्रियांचे संधी /
होतो सापडलो बंदी //३//
*
तुका म्हणे बरे झाले/
विठ्ठलसें वाचे आले //४//
*
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
मी जन्म घेतला तेव्हापासूनच संसाराच्या भोव-यात अडकून पडलो होतो. खूप अडचणीत अडकलो होतो. खरे तर मी निवडलेला माझा रस्ताच चुकला होता.
मी मग लगबग करून तो बदलूनच टाकला. इंद्रिय सुखाच्या जाळ्यात अडकल्यामुळे मी तिथेच पुरता बंदिवान झालो होतो. गुरफटून गेलो होतो. पण मग अचानक पुढे विठ्ठलाचे नाव माझ्या मूखी आले.मी त्याच्या नामाचा नामघोष चालू केला आणि त्या जंजाळातून माझी सुखरूप सुटका झाली.हे खूप बरे झाले.
प्रपंच करताना सतत येणा-या अडचणीतून कुणाची कधीच सुटका होत नाही. त्या अडचणी कुणालाही टाळता येत नाहीत.त्या मुळे संसारात गुंतलेला माणूस सतत चिंताग्रस्त असतो.त्या मुळेच तो इंद्रिय सुखाच्या मागे लागतो आणि तेथेच कायमचा गुंतून पडतो.पण जेव्हा असे होवू लागते तेव्हा आपला रस्ता चुकला आहे हे त्याच्या ध्यानात यायला पाहिजे. आपण प्रापंचिक चिंतेतच गुंतून पडलोय, इंद्रिय सुखाच्याच मागे धावतोय हे काही बरे नाही असे वाटायला पाहिजे. यातून आपण बाहेर पडण्यासाठी धडपड केली पाहिजे हे सुचले पाहिजे. अशावेळी शांतचित्ताने मुखाने विठ्ठलाचा नामघोष केला तरी पुरेसे आहे. केवळ तसे केले तरी या सतावणा-या चिंतेत पासून आपली मुक्तता होईल. आणि मुक्तीचा सन्मार्ग आपल्याला नक्कीच सापडेल. पण त्यासाठी प्रबळ इच्छा शक्ती मात्र निर्माण करायला हवी. सामान्य माणसाला येवढे करणे सहज शक्य आहे. असे तुकाराम महाराज येथे सांगतात.
☆ तुका म्हणे – तेथे नाही उरो आले अवतार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
तेथें नाही उरों आलें अवतार /
ते पामर जीव किती//१//
*
विषयाचे झणी व्हाल लोलिंगत /
चेवलिया अंत न लगे मग //२//
*
वाहोनिया भार कुंथसील ओझे /
नव्हे तेचिं माझें थीता त्याग //३//
*
तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज /
संती केशीराज साधिकेला//४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
येथे धरतीवर अवतार घेऊन आलेले भले भले देव दानवही कायमचे टिकले नाहीत.मग पामरांची तरी येथे काय गनती. विषयसुखात कायमचे गुंतून पडाल तर अंतकाळ वाट्याला येणार हे ठरलेलेच आहे. मग तेच ओझे पाठीवर वहात कुंथत बसाल. खरेतर ते ओझे तुम्हाला पेलण्या सारखे नाही. त्याचा तर तुम्ही त्यागच करायला पाहिजे.
येथे मोठमोठ्या व्यक्ती, दानव,देव,इतकेच नव्हे तर देवानी घेतलेले दशावतारही टिकले नाहीत. त्यांचे नाव तरी त्यांच्या मागे किती काळ टिकले? मग तुम्हीच सांगा त्यांच्या समोर सरळ साध्या भोळ्या जीवांची ती कथा काय,?
तेथे किती आले आणि किती गेले. कसे गेले. याची मोजदाद तरी आहे काय? हेच येथले खरे सत्य आहे हे लक्षात ठेवावे. विषय सुखात आणि विषय उपभोगात गुंतण्यासाठी काही कष्ट पडत नाहीत आणि त्याला फारसा वेळही लागत नाही. तेथे गुंतल्यावर दुसरे काही करणेही सूचत नाही. सत्कर्मे करण्यासाठी वेळच मिळत नाही. विषयसुखांचे जडशीळ ओझे अंगावर पडल्यामूळे तेथेच तुम्ही कुंथत बसता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सामान्य माणसाने जेवढे ओझे पेलेल तेवढेच उचलावे. जे जमेल तेवढेच करावे, शोभेल तेच ल्यावे. व पचेल तेच खावे. असा मोलाचा सल्ला तुकाराम महाराज आपल्याला आवर्जून देताना दिसतात.
मा. सुरेश भट हे प्रामुख्याने गझल मराठीत रुजविणारे कवी म्हणून ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांचे काव्य देखील उत्कृष्ट असेच आहे. आपल्या कविते मधून मानवतेची मूल्ये त्यांनी अतिशय सुंदर शब्दात मांडली आहेत. हा कवी माणूस म्हणून अतिशय संवेदनाशील होता. मराठीत काव्य लिहिताना संतांचे खूप मोठे योगदान आहे हे त्यांना मान्य आहे. म्हणूनच ते म्हणतात…
“माझिया गीतात वेडे, दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या, अमृताचे फूल यावे”
संत नेहमीच समाजाचे मार्गदर्शक असतात. आपले जीवन वेचून संघर्ष करून विरोधाचे दुःख पत्करून, ते समाजाचे दीपस्तंभ होत असतात.अशाच अनुभूतीतून संत काव्य ही निर्माण होत असते सुरेश भटांचीही तीच इच्छा आहे की मी संतांप्रमाणे जगेल तेव्हाच ते माझ्या काव्यात येईल.आज मी वाळल्या वेलीप्रमाणे आहे. संतांइतका संवेदनाशील नाहीय. पण मी तसे व्हावे आणि त्याला अमृताचे फूल यावे म्हणजेच मी संतांसारखे दुसऱ्यांचे दुःख जाणणारा झालो तर त्यानंतर मी लिहिलेले वाङ्मय अमृताच्या फुलाप्रमाणे अमर राहील. खरंच त्यांचे काव्य तसेच आहे.
म्हणूनच ते पुढे म्हणतात की आशयाचे खूप मोठे आकाश माझ्या छोट्या शब्दांमध्ये भरले जावे. मी जर समाजाशी एकरूप होऊन जगत नसेल तर आता तरी तसे जगावे समाजाचे देणे फेडले तर जीवनाच्या माधुर्यात मी न्हाऊन निघेल.
याच काव्यात ते पुढे म्हणतात ज्ञानेश्वरांच्या दुःखांची स्पंदने माझ्या वक्षात यावी आणि इंद्रियां वाचून इंद्रिय मी भोगून घ्यावी. म्हणजेच ज्ञानदेवांनी अतिशय कमी वयात खूप मोठी दुनिया बघितली दुःख जगले व त्यातून त्यांचे अक्षर वाङ्मय जन्माला आले तेच मला पण प्राप्त व्हावे असे कवी म्हणतात.
पुढे ते म्हणतात नामदेवांप्रमाणेच जीवनाच्या सगळ्या अंगांना मी स्पर्श करावा एकनाथांनी त्यांच्या पंगतीला मला बसवून घ्यावे व नामदेवांप्रमाणे सर्व समावेशक चविष्ट गोपालकाला माझ्या जीवनाचा व्हावा.
कवी पुढे म्हणतात की तुकाराम महाराजांचे डोळे मला प्राप्त होऊन रंजला गांजल्यांचे दुःख मला बघता यावे. व तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे……
“जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
उदास विचारे वेच करी”
असा चोख व्यवहार माझ्यात भिनावा व शेवटी हे ह्या कवितेत ते पांडुरंगाची विनवणी करतात आणि म्हणतात की पांडुरंगा मी वर मांडलेले मागणे तुला मागितले आहे. त्याशिवाय आणखी मला काहीच नको. फक्त एवढीच मागणी तू पूर्ण कर.आणि ही मागणी तू पूर्ण करावी यासाठी मी तुझ्या दारात दंगा मांडलेला आहे.
या पूर्ण काव्यातून कवींची स्वतःची जीवनमूल्ये आपल्याला जाणवतात समाजातली रंजल्या गांजल्यांची दुःखे त्यांनी नेहमी आपलीच मानली व तसेच जगले. याचाच परिपाक म्हणून त्यांनी शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला होता.
सुरेश भटांच्या कवितेत आशयाचे सौंदर्य तर असतेच. परंतु त्यांच्या बहुतांश कविता वृत्तबद्धच असतात.आपल्या अतिशय सरळ भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी या काव्यात अतिशय सरल असे मनोरमा हे वृत्त निवडले आहे. या काव्याची भाषा मधुर तर आहेच.परंतु अतिशय सरल सोपी कुणालाही समजेल अशी प्रासादिक आहे. अतिशय सुंदर शब्दांची पखरण काव्यात त्यांनी केली आहे.
जसे की…
” स्पंदने ज्ञानेश्वरांची माझिया वक्षात यावी “
“माझ्यासाठी जगाचे जाते रोज घर्घरावे “
” ह्याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा”
अशा अतिशय सुंदर व सरल शब्दातून काव्य मधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच गझल व काव्यामध्ये येणारी ही वैशिष्ट्ये या काव्यातही येतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काव्य लिहिताना ते वृत्त अतिशय काटेकोरपणे व नीट सांभाळतात. त्याचप्रमाणे काव्यात ऱ्हस्व दीर्घाच्या चुका अजिबात नसणे हे देखील त्यांच्या काव्यातले एक वैशिष्ट्य आहे. याही काव्यात आपल्याला ते जाणवते.
प्रामुख्याने ते गझलकार आहेत.या गझल काराबद्दल शेवटी मी असे म्हणेल की……
☆ तुका म्हणे – आधारावाचुनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
आधारावाचुनी /
काय सांगशील कहाणी//१//
*
ठावा नाही पंढरीराव /
तोंवरी अवघेचि वाव //२//
*
मानिताहे कोण /
तुझे कोरडे ब्राह्मज्ञान //३//
*
तुका म्हणे ठेवा /
जाणपण एक सवा //४//
*
– संत तुकाराम.
तुका म्हणे
सामान्यपणे माणसांची समजूत काय असते आणि त्याने ती कशी बदलायला पाहिजे याविषयी सांगताना तुकाराम महाराज स्वानुभवातून आपले विचार मांडताना म्हणतात. तुमच्या जवळ भक्कम आधार असल्या शिवाय तुम्ही कुठलीही कहाणी सांगू शकतनाही. हा वरवरचा अर्थ आहे. पण त्यातून त्यांना , “कोणत्याही बाबतीतले तत्वज्ञान सांगताना तुमचा त्याविषयीचा परिपूर्ण अभ्यास असल्या शिवाय तुम्ही त्याविषयी काही ही बोलू शकत नाही किंवा मनघडंत कुठल्याही थापा मारू शकत नाही ” हे नेमके पणाने सुचवायचे आहे. पुढे ते म्हणतात “जोपर्यंत तुम्हाला पंढरीरायाच्या सामर्थ्याचे योग्य आकलन होत नाही तो पर्यंत तुम्हाला काहीही बोलण्यास वाव आहे .पण जेंव्हा पांडुरंग तुम्हाला परिपूर्णतेने कळेल तेव्हा तुम्ही अंतर्मुख होऊन विचार कराल आणि कुठलीही वायफळ बडबड मुळीच करणाक नाही. जर विठ्ठलाच्या स्वभावाचे आणि त्याच्या गुणसंपन्न तेचे तुम्हाला आकलनच झाले नाही तर तुम्ही सांगत असलेले तुमचे कोरडे ब्रम्हज्ञान कोणीही ऐकून घेणार नाही. कारण या जगात असणारे अनेक शेरास सव्वाशेर तुम्हाला भेटतील. आणि तेव्हा तुमचे ब्राह्मज्ञान त्यांच्या समोर उघडे पडेल. याची जाणीव ठेवा .आधी तुम्ही पांढरीराया निट समजून घ्या आणि तो तुमच्यात आहे असे समजून वागा.म्हजे मग सगळेच सोईस्कर होईल.
☆ तुका म्हणे – माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव /
आपणचि देव होय गुरु//१//
*
पढियें देहभाव पुरवी वासना /
अंती तें आपणापाशी न्यावें //२//
*
मागें पुढें उभा राहे सांभाळीत /
आलिया आघात निवारावे //३/
*
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी /
वाट दावी करी धरूनियां //४//
*
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनीं //
पहावें पुराणी विचारूनी //५//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
विठ्ठल हेच तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत, त्याच्यावरच त्यांचा दृढ विश्वास आहे. देवालाच ते आपले सर्वस्व मानतात. म्हणून विठ्ठल त्यांच्या मनीध्यानी सतत वास करत असतो. कारण देवावर त्यांचा पूर्ण भरवसा आहे. आपल्या आराध्य दैवतांची स्तूती करतान ते म्हणतात. मी माझ्या विठ्ठलाचा माझ्या विषयीचा प्रेमभाव काय वर्णन करू. तोच माझा देव आहे आणि माझा गुरू सुद्धा तोच आहे. तोच सतत माझे निरीक्षण करतो,माझा देहभाव तोच ओळखतो. माझे मनही तोच वाचतो.व माझी वासना आणि माझी मनोरथे तोच पुरवतो. येवढे सगळे करून मला तोच माझ्या गुणदोषा सह आपल्या जवळही घेतो. तो माझ्या मागेपुढे सदोदित उभा असतो. माझ्यावर आललेल्या संकटांचे ही तोच निवारण करतो. माझा प्रतिपाळ ही तोच करतो. माझ्यावर आललेल्या बिकट परिस्थिती मुळे मी जर माझा स्वीकारलेला मार्गासोडून इकडेतिकडे भटकत राहिलो तर तोच माझा हात आपल्या हाती घेवून मला मार्गस्थ करतो. तो माझी सतत विचारपूस करतो. या गोष्टीवर ज्यांचा विश्वास बसनार नाही त्यांनी आपल्या पुराणातील दाखले शोधून ते वाचावेत. म्हणजे त्याना तेथे याचे सबळ दाखले सहज मिळतील. व मग खात्री पटेल. महाराजांची देवावर नितांत श्रद्धा होती.जेव्हा देव आणि भक्त दृढ विश्वासाने व द्रढनिश्चयाशे परस्परांना जोडले जातात तेव्हाच मनातील द्वैत भाव नाहिसा होतो व ते समरूप होतात. पण ही स्थिती सहजासहजी प्रात्प होत नाही. त्यासाठी अंत:करणं शुद्ध ठेवून भक्ताला परमेश्वराच्या चरणी लीन होता आले पाहिजे. भक्ताला आपल्या मनो विकारांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.
☆ तुका म्हणे – काय ते विरक्ती … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
काय ते विरक्ती न कळेची आम्हां /
जाणों एक नामा विठोबाच्या//१//
*
नाचेन मी सुखें वैष्णवांचें मेळीं /
दिंडी टाळघोळीं आनंदें या //२//
*
शांति क्षमा दया ते मी काय जाणें /
विठ्ठलकीर्तनें वांचूनियां //३//
*
कसया एकांत सेवूं तया वना /
आनंदें या जनामाजी असो//४//
*
कासया उदास होऊं देहावरीं /
अमृतसागरीं डुबोनियां //५//
*
तुका म्हणे मज असे हा भरवसा/
विठ्ठल सरसा चालतसे//६//
*
तुका म्हणे
तुकाराम महाराजांनी आत्मानुभवाने साधा सोपा भक्ती मार्ग स्वीकारला आहे. आणि तोच त्यांनी आपला जीवनक्रम ही मानला आहे. त्या मार्गाचे मोठेपण आणि सोपेपणा सांगताना ते म्हणतात.
विरक्ती म्हणजे नेमके काय हे आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त विठ्ठलाचे नाम जाणतो त्याचेच नाम संकीर्तन करतो. त्यांच्याच पायी लीन होतो.तेथेच आम्हाला जीवनाचे सारसर्वस्व भेटते. तेच आम्हाला सुखशांती मिळवून देते. म्हणूनच आम्ही टाळमृदंगाचा गजर करत वैष्णवाच्या मेळ्यात सहभागी होऊन आनंदाने नाचत भक्तीरसात न्हाऊन निघतो
.दया,क्षमा, शांती हे सारे काही आम्ही विठ्ठलाच्या तन्मयतेने केलेल्या कीर्तनातूनच जाणतो. विठ्ठला शिवाय आम्ही काहीच जाणवत नाही. मग आम्ही जप तप साधना करण्यासाठी काय म्हणून वनवासात एकांतात राहून तपश्चर्या करावी.आम्ही जनसमुदायात मिसळताना आनंदी होतो. तेच आम्हाला फलदायी वाटते. हितकारक वाटते. परमार्थ, अध्यात्म, विरक्ती हे शब्द आम्हाला फारच बोजड वाटतात. त्यांचा अर्थ ही आम्हाला निपटणे कळत नाही.ते सारेच कठीण आहे.अवघड आहे.म्हणून त्या जंजाळात पडावेसेही वाटत नाही. देवाचे भक्तीभावाने नामस्मरण करा. आनंदाने नाचा.तुम्हाला सर्व काही तेथेच मिळेल. त्यासाठी वनात राहून तपश्चर्या करण्याची जरुरी नाही. विविध प्रकारची कर्मकांडे, यज्ञयाग वृतवैकल्ये करण्यात ही काही अर्थ नाही.
.सर्वसामान्य माणसांच्या आनंदायी मेळ्यात राहूनच परमोच्च पारमार्थिक आनंद परम सुखाने लुटता येतो. भक्ती रसाने तुडूंब भरलेल्या अमृतसागरात डुंबत असताना परमेश्वरानेच दिलेल्या या देहाकडे मी उदास वाण्याच्या नजरेने मी का पाहावे आणि त्याला कशासाठी दंडीत करावे. लोकांच्यात सामील होऊन,त्यांच्यात मिळूनमिसळून विठ्ठलाचे नामस्मरण व नामसंकीर्तन करत रहाणे हाच परमार्थ करण्याचा अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी मार्ग आहे. तो मार्गच आपल्या मनोकामना पूर्ण करील. तोच आपल्याला सर्व काही शिकवील.म्हणूनच परमार्थ करताना विषेश आणि विशिष्ट कर्मकांडे करण्याची आवश्यकता नाही. भक्ती मार्ग इतका सहज आणि सोपा असताना तो अवघड आणि दुस्तर का करावयाचा.?
☆ तुका म्हणे – काय ते विरक्ती… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
काय ते विरक्ती न कळेची आम्हां /
जाणों एक नामा विठोबाच्या//१//
*
नाचेन मी सुखें वैष्णवांचें मेळीं /
दिंडी टाळघोळीं आनंदें या //२//
*
शांति क्षमा दया ते मी काय जाणें /
विठ्ठलकीर्तनें वांचूनियां //३//
*
कसया एकांत सेवूं तया वना /
आनंदें या जनामाजी असो//४//
*
कासया उदास होऊं देहावरीं /
अमृतसागरीं डुबोनियां //५//
*
तुका म्हणे मज असे हा भरवसा/
विठ्ठल सरसा चालतसे//६//
– संत तुकाराम.
तुका म्हणे
तुकाराम महाराजांनी आत्मानुभवाने साधा सोपा भक्ती मार्ग स्वीकारला आहे. आणि तोच त्यांनी आपला जीवनक्रम ही मानला आहे. त्या मार्गाचे मोठेपण आणि सोपेपणा सांगताना ते म्हणतात.
विरक्ती म्हणजे नेमके काय हे आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त विठ्ठलाचे नाम जाणतो त्याचेच नाम संकीर्तन करतो. त्यांच्याच पायी लीन होतो. तेथेच आम्हाला जीवनाचे सारसर्वस्व भेटते. तेच आम्हाला सुखशांती मिळवून देते. म्हणूनच आम्ही टाळमृदंगाचा गजर करत वैष्णवाच्या मेळ्यात सहभागी होऊन आनंदाने नाचत भक्तीरसात न्हाऊन निघतो
दया, क्षमा, शांती हे सारे काही आम्ही विठ्ठलाच्या तन्मयतेने केलेल्या कीर्तनातूनच जाणतो. विठ्ठला शिवाय आम्ही काहीच जाणवत नाही. मग आम्ही जप तप साधना करण्यासाठी काय म्हणून वनवासात एकांतात राहून तपश्चर्या करावी. आम्ही जनसमुदायात मिसळताना आनंदी होतो. तेच आम्हाला फलदायी वाटते. हितकारक वाटते. परमार्थ, अध्यात्म, विरक्ती हे शब्द आम्हाला फारच बोजड वाटतात. त्यांचा अर्थ ही आम्हाला निपटणे कळत नाही. ते सारेच कठीण आहे. अवघड आहे. म्हणून त्या जंजाळात पडावेसेही वाटत नाही. देवाचे भक्तीभावाने नामस्मरण करा. आनंदाने नाचा. तुम्हाला सर्व काही तेथेच मिळेल. त्यासाठी वनात राहून तपश्चर्या करण्याची जरुरी नाही. विविध प्रकारची कर्मकांडे, यज्ञयाग वृतवैकल्ये करण्यात ही काही अर्थ नाही.
सर्वसामान्य माणसांच्या आनंदायी मेळ्यात राहूनच परमोच्च पारमार्थिक आनंद परम सुखाने लुटता येतो. भक्ती रसाने तुडूंब भरलेल्या अमृतसागरात डुंबत असताना परमेश्वरानेच दिलेल्या या देहाकडे मी उदास वाण्याच्या नजरेने मी का पाहावे आणि त्याला कशासाठी दंडीत करावे. लोकांच्यात सामील होऊन, त्यांच्यात मिळूनमिसळून विठ्ठलाचे नामस्मरण व नामसंकीर्तन करत रहाणे हाच परमार्थ करण्याचा अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी मार्ग आहे. तो मार्गच आपल्या मनोकामना पूर्ण करील. तोच आपल्याला सर्व काही शिकवील. म्हणूनच परमार्थ करताना विषेश आणि विशिष्ट कर्मकांडे करण्याची आवश्यकता नाही. भक्ती मार्ग इतका सहज आणि सोपा असताना तो अवघड आणि दुस्तर का करावयाचा.
☆ तुका म्हणे – होय होय वारकरी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
होय होय वारकरी /
पाहे पाहे रे पंढरी //१//
*
काय करावी साधने/
फळ अवघेंचि येणें
*
अभिमान नुरे/
कोड अवघेचि पुरे //३//
*
तुका म्हणे डोळा /
विठो बैसला सावळा//४//
*
– संत तुकाराम.
तुका म्हणे
तुकाराम महाराजांची साधी सोपी सरळ पण रसाळ भाषा भक्ती मार्गातल्या अडाणी माणसाला सहजतेने उमगते व महाराजाना भक्ताला काय सांगायचे आहे ते नेमके पणाने ध्यानी येते.
भक्ती मार्ग किती सोपा आहे हे सांगताना ते म्हणतात. तुला जर भक्तीच करायची आहे तर तू पंढरीला जा आणि कयमचा वारकरी हो. जर तुला त्यातच समरसून भक्ती करण्याचे फळ मिळत असेल तर मग अन्य जप तप साधने या सारखे काही उपाय करण्याची गरजच नाही.
तू तेथे गेल्यावर तुझ्यातला अभिमानाचा ताठा आपोआपच गळून पडेल. तुझ्या मनाचे भक्ती रसाचे कोडकोतूक ही पूर्ण होईल. कारण तू एकदा का पांडुरंगाचे सावळे लोभस रूप पाहिलेस की ते तुझ्या डोळ्यात आणि काळजात कायमचे ठाण मांडून बसेल. आणि तिथला अनुपम्य सोहळा तू कधीच विसरू शकणार नाहीस.
परमेश्वराची भक्ती करण्यास भावना आणि श्रद्धा एकवटली पाहिजे. त्यासाठी तू एकदा पंढरीला जा. आणि खरोखरचा वारकरी बन. तिथे गेल्यावर तू तिथल्या आनंदमयी सोहळ्यात समरसून एकरूप झालास की तुझा अहंकार आणि स्वाभिमान आपोआप गळून पडेल. कारण तिथे कोणताही भेदभाव द्वैष, द्वैतभाव जातीपाती या सारखे काही ही उरत नाही. सगळे समसमन होवून एकामेकात पांडुरंग पहातात. गळा मिठी घेतात. परस्पर दर्शनाने पावन होतात. आपल्या मनातील भक्तीचे कोडकोतूक पूर्ण करून घेत पांडुरंग मय होवूनच वावरताना दिसतात. असा अनुपम्य सोहळा इतरत्र कोठे पहावयास मिळत नाही.
अशा वातावरणात सर्वांभूती संचारणारा सावळा विठूराया तुझ्या ही अंत:करतात कायमचा भरून राहिल. इतका साधा आणि सोपा भक्ती मार्ग सांगितल्यावर लोक भक्ती मार्ग अनुसरतील याचा विश्वास महाराजाना होता तो आज सार्थ आणि समर्थपणे चालत आलेल आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. हेच आहे समाजाकडून वारीचे शतकानुशतके चालत आलेले महत्त्व.
☆ तुका म्हणे – आहा हे कौतुक… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
तुका जगा द्यावी नीती /
करावे फजित चुकती ते //१//
*
कासयाचा बाध एकाच्या निरोपें
काय व्हावें कोपें जगाचिया //२//
*
अविध्येचा येथें कोठें परिश्रम/
रामकृष्णनाम ऐसें बाण //३//
*
तुका म्हणे तेथें ख-याचा विकरा /
न सरती येरा खोट्या परी //४//
*
– संत तुकाराम.
तुका म्हणे
जो चुकतो त्याची पुरती फजिती करावी आणि साध्या सामान्य लोकांना खरी नितीमत्ता शिकवावी हेच आमचे कौतुकाचे नव्हे तर मुख्य काम आहे. तो अधिकार आम्हाला मिळाला आहे. आम्ही असे वर्तन केल्याने सगळे जग जरी आमच्यावर रागावले तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. कारण आम्ही कुठल्याही अविध्येचा प्रचार प्रसार मुळीच करत नाही आणि तो खोटारडेपणा मिळवण्यासाठी नको ते आडवळनाचे कष्ट ही करत नाही. त्याला विरोध करण्यासाठी आमच्या हातात रामकृष्णनामाचे प्रभावी शस्त्र आम्ही धारण केले आहे. या जगात फक्त ख-याचीच प्रामुख्याने विक्री होते हे आमच्या पुरते लक्षातही आले आहे. खोटारडा हिंनसक, येरागबाळा माल येथे खपत नाही हेही आता आम्ही जाणून आहोत.
आपण जे करतो आहे त्याच्यावर तुकाराम महाराजाची दृढ श्रध्दा आणि अतूट विश्वास आहे. त्यालाच ते सत्याचा खरा मार्ग आहे असे मानतात. आणि म्हणूनच जगातील सामान्य भोळ्याभाबड्या लोकांना नैतिकतेचा बोध देणे आणि ती त्यांना शिकवणे व तिच्यापासून जर कोणी दूर जात असतील तर त्यांना जाग्यावर आणने हेच आपले महत्त्वाचे काम आहेअसे महाराजमानतात. तेच मी आवडीने करत आहे. असे म्हणतात. जग मला काय म्हणेल, कोणाला काय वाटेल कोणाला राग येईल. याच्याशी माझे काहीही देणेघेणे नाही. त्या मुळे मी करत असलेल्या कामात कसलीही बाधा येणार नाही. महाराजांचा हा दृढनिश्चय आहे. कारण ते म्हणातात आम्ही चांगले म्हणजे देवानेच काम करीत आहेत. आणि आमच्या कामात अडथळा आणणाऱ्याच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही आता रामकृष्ण हरी नामाचे अत्यंत प्रभावी शस्त्र ही हाती धारण केले आहे. म्हणून आम्ही आमचे कार्य चालूच ठेवणार आहोत. तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना स्वानुभवातून दिलेला हा संदेश प्रभावी आणि परिणामकारक वाटतो. व ते सर्व त्याचा विनंम्रभावे स्विकारावी करतात. व तेथेच नतमस्तक होऊन आपली अतूट श्रद्धा ही ठेवतात. हेच तर तुकाराम महाराजांच्या लोकमान्य तेचे खरे गमक आहे. ह्मणूच तुका झालासे कळस असे लोकांना वाटत रहाते.
☆ तुका म्हणे – समचरणदृष्टि विटेवरी साजिरी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी /
तेथे माझी हरी वृत्ती राहो //१//
*
आणीक न लगे मायिक पदार्थ /
तेथे माझे आर्त नको देवा //२//
*
ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी /
तेथे दूश्चित झणी जडो देसी //३//
*
तुका म्हणे त्याचें कळालें आम्हां वर्म
जे जे कर्मधर्म नाशवंत //४//
*
– संत तुकाराम.
तुका म्हणे
तुकाराम महाराज देवाकडे मागणी करताना म्हणतात. सर्वांभूती समदृष्टीठेवून तुझी साजिरी मूर्ती समचरणावरती जेथे उभी आहे तेथेच माझी दृष्टी कायम खिळून राहू दे. दूस-या कोणत्याही मोहमायेत मला गुंतवून तू माझे हाल करून नकोस. जी उच्य वर्गतील ब्रह्मादिक सामर्थ्याची पदे आहेत ती सारी दु:खाची गाठोडी आहेत त्यांच्याकडे माझी नजर सुद्धा फिरकू देवू नकोस. त्यातील खरे काय आहे ते मला आता पुरते कळालेले आहे. तेथे जे काही कर्मधर्म करावे लागणारआहे ते सगळेच नाश पावणारे आहे. फक्त तुझे सावळे रुपच तेवढे चिरस्मरणीय आहे.