मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दुधावरची साय – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – दुधावरची साय – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

कोण मी? ओळखा पाहू 

डोळे झाकी आजोबांचे 

कोण बरं? कोण आहे?

बोल खोटे फसण्याचे ||

*

साखरेचे पोते गोड 

आवडते सगळ्यांचे 

ओढ लावी जीवा भारी 

असे सर्वस्व घराचे ||

*

आजी-आजोबा नातीचे 

मस्त रंगे रसायन 

घोडा घोडा करताना 

हृदयाचे सिंहासन ||

*

नाती संगे खेळताना 

देहभान हरपते 

आजोबांच्या जगण्याचे 

प्रयोजन ती ठरते || 

*

खेळ लुटूपुटीचा हा 

गाभा आनंदाचा असे 

डोळ्यांमध्ये पाणी अन 

ओठांवर गोड हसे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०२ ☆ हे शिव शंकर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०२ ?

☆ हे शिव शंकर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 हे शिवशंकर, कर्पूरगौरांगा,

पार्वती पती, माथ्यावर गंगा,

*

महादेव, चंद्रशेखरा, केदारा,

शांभवी प्रिया, हे हरिहरा !

*

 करते पूजा शिवरात्रीला

ही सारी तर तुझीच लीला

*

 अभिषेक करते, बेल वाहते

व्रत, उपासना, आरती करते

*

 शिवशंभो कर रक्षण आता

तूच असशी भाग्य विधाता!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खिडकी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ खिडकी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

आगगाडीचा प्रवास

खिडकीची जागा,

मनावर भयंकर बोझा

मन सैरभैर…

 

पळती झाडे, डोंगर

मायावी सारं

डोकावू का आत रं?

मन भावविभोर…

 

मागे जाणा-या झाडाप्रमाणे

गतायुष्य आठवून

मन जाईल रडवून

पसाभर…

 

खिडकीतून बघता

दिसली मला माझी

बदलली दशा माझी

आरपार…

 

जिवनाच्या प्रवासात

असावी अशी खिडकी

दु:ख मागे टाकी

भरभर…

 

अहंकाराचा नी

कुविचारांचा

कचरा फेकायचा

भरपूर…

 

आता बघा कसा

सुखाचा गारवा

फुले पिसारा मनाचा

सरसरसर…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसुचित… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसुचित… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सुचिता न सुचती शब्द

घडता न घडे कविता

क्षणभर मनाचे मौन

आठवण तुझी का यावी

नयन भरुनी यावेत

नि अश्रुंच्या शाईनेच

हृदयाच्या पानावर

भावनांच्या लेखणीने

जीवनाचे काव्यसंग्रहच

होऊन जावे!

प्रतिभेत

सजवताना मात्र तुला,

विरहाचे दुःखच

वरदान ठरावे काव्य

रोजच्या क्रमाचे आयुष्य

म्हणजे निघून गेलेल्या

सुंदर क्षणांची ओढचं

माझ्या ध्येयाचे अंतरंग

फुलवीत जाणारी कविता

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१८ ☆ तपस्या… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१८ ?

☆ तपस्या… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तुडवला मार्ग मी खडतर?

मिळवण्या देह हा नश्वर

*

पुढ्यातच ती उभी रंभा

मनाला थांबवू कुठवर

*

जगाचे बोट धरुनी मी

कळेना जायचे कुठवर

*

शिवाचे घर तिथे आहे

नगाच्या उंच शिखरावर

*

अशी केली तपस्या मी

सुखाला मारुनी ठोकर

*

सुरक्षा कवच मेंढीचे

कशी ती पांघरू लोकर

*

कबीरासारखा दोहा

विणावा होउनी विणकर

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ –घायाळ मी… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? घायाळ मी? श्री आशिष  बिवलकर ☆

घायाळ केलंस सखे,

नयन तुझे तलवार!

हृदयाला भिडलीस,

केलेस जुलमी वार!

 

कुंतल तुझे

रेशमी जाल!

गोरे गोरे

मऊ मऊ गाल!

 

किती सुंदर अशी,

बहारदार तू हसते!

हास्यात तुझ्या

शरद पौर्णिमा भासते!

 

सौंदर्यात तुझ्या,

पुरता मी बुडालो!

प्रेमात तुझ्या,

पार वेडावलो!

 

एकटक तुला,

पहावेसे वाटे!

ह्रदयात तुझ्या,

पत्ता माझा भेटे!

 

तुला पहात पहात लिहावी 

कविता की गझल!

अप्सरा जरी अवतरली,

तुझ्या पुढे काय तिची मजल!

 

तुझ्या वर्णनात

शब्द सुंदर होतात!

शृंगार रसात

कवितेत सजतात!

 

तुझ्या नावाने अखंडित,

श्वासांची गुंफलीय माळ!

मृत्यू जरी आला तरी,

थांबेल तो ही सर्वकाळ!

 

स्तुतीने सुखावलीस तू,

हरवून गेलीस काही काळ!

एव्हढ्या शिट्या दिल्यात मी ,

शिजली का ग माझी डाळ! 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळोख… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ काळोख… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मी संत कुळीचा झालो संतांच्या सहवासाने

मन झाले साक्षात्कारी भक्तीच्या अभिमानाने

*

नादान जगाचे वारे घोंगावत होते भवती

मज वास्तव कळले माझे गाथेची वाचत पाने

*

भवसागर ओलांडाया झालीच तयारी होती

देहाची सुंदर नौका तरताना आनंदाने

*

काळोख गडद करणारे होतेच बिलंदर काही

त्यांनीच ठरवल्या जाती स्वार्थाच्या हव्यासाने

*

भलतेच कुणी तर होते समतेला तुडवत पायी

होत्याचे नव्हते केले मनमानी अधिकाराने

*

आताही होते आहे रणकंदन भलते येथे

सोसावे कितपत कोणी हे सगळे अपमानाने

*

खोट्याचा वाजे डंका सत्याला नाही थारा

हे घडते सारे आहे कोणाच्या कर्तृत्वाने

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकटा? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ एकटा?... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

“तुम्ही एकटेच राहणार?

असं तू विचारतेस तेव्हा,

खरं तर मला हसूच येतं

 

कुठे असतो मी एकटा?

सोबतीला असतातच ना

हे शब्द, कल्पना आणि आपली स्वप्न!

खरंच,

एकटाच आलास आणि एकटाच जाणार

असं कितीही म्हटलं

तरी ते काही खरं नसतं!

येतानं असतातच की आपल्याबरोबर

आपल्या उज्वला भविष्याची स्वप्नं

आणि जाताना असतातच ना

आयुष्यभरातल्या आठवणींची गाठोडी!

मग मी एकटा कसा?

गर्दीत तर मी एकटा नसतोच

पण एकटा असतानाही नसतो मी एकटा

माझ्या आतल्या आत असते

स्वप्नांची एक नगरी

आणि आठवणींच साम्राज्य

 

मग सांग

 

मी एकटा कसा?

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सृष्टीचा आहेर ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सृष्टीचा आहेर ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

नाजुक हलकी

गिरकी घेऊन

तलम पाकळी

देठात स्थिर!!

फिकट गुलाबी

देखणे फुल

सृष्टीचा दृष्टीला

जणू आहेर!!

हात लावता

मलीन होईल

वाटतो मनाला

उगाच घोर!!

दुरून पाहू

पाहत राहू

फुलाचे सौंदर्य

मनोहर!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८१ – मनमीत…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८१ – विजय साहित्य ?

☆ मनमीत…!

प्रेमाचे नाते,गुलाब जोडी

प्रेम देवता, वाढवी गोडी.

*

उत्कट उर्जा, असे केशरी

आकर्षणाची, प्रथम पायरी..!

*

मैत्री,आनंद, पिवळ्या‌ रंगी

वेलीवरती, नवीन ढंगी…!

*

कृतज्ञतेने आनंद वाटी

रंग गुलाबी,हृदयी दाटी…!

*

समर्पणाचा, लाल गुलाब

देई वचने, नसे रूबाब…!

*

श्वेत पांढरा, लक्ष वेधतो

शुद्ध भावना, नाते जपतो..!

*

उत्साह इच्छा, उत्कट भाव

रंग नारिंगी, वसवी गाव..!

*

आदर आणि,गूढ भावना

रंग जांभळा, पूर्ण कामना..!

*

सुख समृद्धी, प्रेम लाजरे

हिरव्या रंगी, होय साजरे…!

*

गुलाब काळा,दडून राही

वैर भावना, मनात‌ साही..!

*

गुलाब रंगी, मने सांडली

प्रेम भावना, तिथे नांदली..!

*

रंगामधूनी, उमले प्रीत

देई‌ शोधून, हा मनमीत…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares