मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डेथ क्लीनिंग… (अनु.) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : वर्षा अडालजा – हिन्दी अनुवाद : डॉ.रजनीकान्त एस.शाह ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ डेथ क्लीनिंग… (अनु.) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : वर्षा अडालजा – हिन्दी अनुवाद : डॉ.रजनीकान्त एस.शाह ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

☆☆☆☆

भल्या पहाटे, नेहमीप्रमाणेच नीलाचे डोळे उघडले. काही वेळ ती तशीच झोपून राहिली. तिचे योगगुरू म्हणायचे, जेव्हा बिछान्यातून उठाल, तेव्हा उजवीकडे वळून आरामात उठा. अचानक झटकन उठलं, तर हार्ट अ‍ॅटॅकची शक्यता असते.

ती हळुवारपणे उठली, तेव्हा उजव्या पायाच्या गुढग्यात थोडं दुखत असल्याचं जाणवलं. गेले काही महीने असंच चाललं होतं. अजून निशांतला सांगितलं नव्हतं, नाही तर लगेच म्हणाला असता, ‘ चल आई, ओर्थोपेडिक डॉक्टरला दाखवून येऊ.’ पण जास्त त्रास होत नव्हता, त्यामुळे त्याची तिला फारशी गरज वाटली नाही. चहा टाकला. बाल्कनीत ठेवलेल्या कुंडीतील पुदिन्याच्या झाडाची ताजी पाने, थोडंसं आलं आणि मसालेदार चहाने भरलेला मग घेऊन ती त्या छोट्याशा बाल्कनीत बसली.

अनेक वर्षे हा क्रम चालू होता. अभिजीत जीवंत होता तेव्हा आणि तो नसतानाही. सूर्य आपल्या किरणांची टोपली घेऊन इथूनच त्यांच्या घरात आणि जीवनात प्रवेश करायचा. काही काळ घर चमकून उठायचं. नंतर तो उंच उंच वृक्ष ओलांडून निघून जायचा. तिथे वर्तमानपत्रे यायची. सकाळी वर्तमानपत्रे वाचत, त्यातील वेगवेगळ्या बातम्यांवर चर्चा करायची दोघांनाही सवय होती.

आज एकटी असतानाही तिची ही सवय तशीच आहे. तेव्हा अभिजीतचं ऑफिस, निशांत आणि रीचाची शाळा, नाश्ता, घरातली छोटी-मोठी कामे, दुपारी महिलाश्रमात जाणं… जीवन दोन काठांमधून वाहाणार्‍या नदीसारखं वेगाने धावत होतं. अनेक आवाज घरातून यायचे. नंतर एकामागून एक सगळे निरोप घेऊन निघून गेले. निशांत बंगलोरच्या एका कंपनीत काम करत होता. त्याने आपल्याबरोबर काम करणार्‍या प्रियम बरोबर लिव-इनमध्ये राहून नंतर कोर्ट मॅरेज केलं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. नियमित फोन करत होते. चार-सहा महिन्यांनी भेटायलाही येत होते. प्रियमने त्यांना आयफोन भेटीदाखल दिला होता. ‘मम्मा यू हेव टु वोट्सएप मी, ओ.के’.

तसं सगळं ओ.के.चं होतं. तरीही मनात एक चिंता होती. रीचाने आपल्या मर्जीने, आपल्याला आवडणार्‍या तरुणाशी विवाह केला होता. याबद्दलही काही विरोध, हरकत नव्हती. पण कलंकित चारित्र्य असलेल्या राजकारणी पुढार्‍याचा परिवार. परिवारातलं कुणी ना कुणी जेलयात्रा करून आलेलं होतं. त्याच्या मुलाबरोबर विजयबरोबर इथले सगळे संबंध तोडून ती कॅनडाला निघून गेली होती. तिने तिची मनधरणी केली होती, पण क्वचित कधी हाय-हॅलोच्या पुढे बोलणं जात नव्हतं.

डोअर बेल वाजली. ती हळूच उठली. आज रविवार. पाच-सहा वर्तमानपत्रांचा गठ्ठा आला. तिने पुन्हा चहा करायला ठेवला आणि सोफ्यावर पाय पसरून बसली. जगभरातील बातम्या आरामात वाचत राहिली. वय झालं. आता आम्हाला काय करायचय, असं म्हणणं तिला मुळीच आवडत नव्हतं. तरुणपणात जेव्हा ती अतिशय व्यस्त असायची, तेव्हाही तिचे पती म्हणायचे, आम्ही आमच्या जीवनात भलेही व्यस्त असलो, तरी जगाशी जोडलेलं असलं पाहिजे. त्यामुळे आपली क्षितिजे रुंदावतात.

दुपारी थोड्या वेळासाठी ती महिलाश्रमात जायची. तिथे अनेक प्रकारचे आभ्यासवर्ग चालायचे. एक वर्ग तिचाही असायचा. देशाच्या वेगवेगळ्या भागात घडणार्‍या घटनांविषयी ती रसाळ भाषेत माहिती द्यायची. कधी कधी त्यांना इंग्रजीही शिकवायची. अनेकांच्या जीवनाचा ती हिस्सा बनली होती. घराच्या समोर म्युन्सीपल गार्डन होती. तिथे काही वेळ योग करणार्‍या गटाशी ती जोडली गेली होती. परतू तास संपला, की ती लगेचच घरी यायची. निवृत्त झालेली पुरुष मंडळी तिथे गप्पा-गोष्टी करत रहात. संध्याकाळी ती फिरायला जायची, तेव्हा अनेक शेजारणी गप्पा मारताना दिसायाच्या, पण ती त्यांची नजर चुकवून तिथून निघून जायची. आज रविवार. आज योगाच्या क्लासला सुट्टी. आज वेळच वेळ होता. तिने दोन पेपर पलंगावर ठेवले. दुपारी वाचण्यासाठी. निशांत आणि प्रियमशी बोलणं झालं. मग आंघोळ करून तयार होऊन बाजारातून सांभाराचं साहित्य आणलं. मोबाईलवर गुलजारांची गाणी ऐकता ऐकता तिने इडली सांभार बनवलं. अंजू कामाला आली, तेव्हा तिलाही खायला दिलं. नवीन आलेल्या सिनेमाबद्दल ती बोलत राहिली, तेव्हा तिला तिकिटाचे पैसे दिले आणि म्हणाली, ;जा बाई, तू पण जा. मजा कर. तिला खूप आनंद झाला. फटाफट काम आवरून ती निघून गेली.

मग घर पुन्हा एखाद्या ध्यानस्थ मुनीप्रमाणे शांत आणि निश्चल झालं. वर्तमानपत्रांच्या कागदांच्या फडफडण्याचा आवाज तेवढा त्या शांततेचा अधून मधून भंग करत होता. इजिप्तमध्ये नवी ममी सापडली… करोडोंचा भ्रष्टाचार…इराणमध्ये स्त्रियांचे आंदोलन… तिने काही बातम्या रेखांकीत केल्या. इंग्रजी कथांच्या अनुवादाच्या पुस्तकाचा रिव्ह्यू वाचून ते पुस्तक अ‍ॅमेझॉनवर ऑर्डर केलं. थोडी डुलकी आली, म्हणून वर्तमानपत्र बाजूला ठेवता ठेवता, एका लेखाच्या शीर्षकाकडे लक्ष गेलं… डेथ क्लीनिंग.

डेथ क्लीनिंग? म्हणजे? … एक नवीनच शब्द.

तिने लेख वाचायला सुरुवात केली. अप्रतिम लेख आणि अगदी नवा विचार. ब्याऐंशी वर्षाची एक महिला विशाखा सुब्रमण्यम यांची मुलाखत घेऊन वर्तमानपत्राच्या एका वार्ताहराने लेख तयार केला होता. 

नीला उत्साहाने लेख वाचू लागली.

सुरुवातीलाच लिहिलं होतं – हा लेख सिनियर सिटीजन्ससाठी खास आहे, पण शीर्षक वाचून, लेखातील विचार निराशावादी वा पलायनवादी आहेत, असे समजू नका. डिप्रेशनशी यातील विचारांचा काहीही संबंध नाही, उलट डेथ क्लीनिंग इज सेलिब्रेशन ऑफ लाइफ। मृत्यू जीवनाचा उत्सव आहे.

नीला बसली आणि तिने एकाग्रतेने तो लेख वाचला.

2017 मधे स्वीडिश महिला मार्गारेटने `जेंटल आर्ट ऑफ स्वीडिश डेथ क्लीनिंग’ विचाराचे प्रवर्तन केले. आपल्या जीवनाच्या सूर्यास्ताच्या काळात हे विचार तिने अमलात आणले. जीवन हा लोहचुम्बक आहे. तो अनेक वस्तुंना आपल्याकडे खेचत रहातो. जीवनाच्या दरम्यान अनेक छोट्या-मोठ्या वस्तुंनी आपलं घर भरून जातं. आपल्यानंतर त्या सगळ्या वस्तूंचं काय? गुजरीबाजारातून आणलेले आपले मनपसंत जुने घड्याळ, आजीच्या काळातील जुनी तिवई, मुले छोटी होती, तेव्हा त्यांच्यासाठी खरीदलेली आणि मोठ्या काळजीपूर्वक जपून ठेवलेली खेळणी, फोटोंचे आल्बम, भांडी-कुंडी, कपडे… आपल्याला निरोप दिल्यानंतर, या सगळ्याची विल्हेवाट लावताना आपल्या स्वजनांना नाकी नऊ येतील. कदाचित ते आपल्यावर रुष्ठही होतील. त्या ऐवजी आपण आपल्याच अनावश्यक वस्तू, ज्यांना जी गोष्ट पसंत आहे, त्यांना, किंवा ज्यांना उपयोगी पडतील त्यांना देत रहा. याला डिकल्टरिंग म्हणतात. ’डिकल्टरिंग युवर हाउस एँड लाइफ टु.’ आपल्याला गृहस्थाश्रमानंतर सन्यस्ताश्रमात प्रवेश करायचा आहे. नाही… नाही… वनात प्रवेश करायचा नाहीये. साधं जीवन जगणं हा उद्देश आहे. त्यामुळे आपोआप मोह सुटत जातील. वस्तू कमी असतील. त्यामुळे पॉज़िटिव एनर्जीच्या लहरींनी आपलं जीवन पुलकित होईल.

लेख मोठा होता. नीलाने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. हे सगळं वाचण्याची गरज नाही. डेथ क्लीनिंग या शब्दानेच मनाचा कब्ज़ा घेतला. तिने घरात सगळीकडे नजर फिरवली. घरात अनेक चीजवस्तू भारंभार होत्या. इथे जे लोक राहिले होते, त्यांनी आपल्या पदचिन्हांबरोबर आणखीही अनेक गोष्टी ठेवून दिल्या होत्या. ड्रॉइंगरूमच्या सीलिंगवर लावलेले झुंबर. रीचा जेव्हा कॉलेजमध्ये होती, तेव्हा कुणा मैत्रिणीच्या घरी असं झुंबर पाहिलं होतं आणि हट्टाने अभिजीतला ते विकत आणायला लावलं होतं. घरात अनेक वेळा अभिजीतचे मित्र येत. ऊंधियापार्टी आणि पाकातल्या पुर्‍या यांनी आदरातिथ्य होई. रीचा-निशांतच्या वाढदिवसाची पार्टी होई. तेव्हा ते झुंबर घर प्रकाशमान करत राही. घर उजळून जाई. 

ती विचार करत राही. किती तरी वर्षांपासून स्वीचच चालू केलेला नाही. कोणासाठी चालू करायचा? कोणत्या निमित्ताने? निशांत आणि प्रियमला एकदा म्हंटलं होतं, झुंबर खूप महाग आहे. घेऊन जा. पण, ती म्हणाली, ‘आई, आम्हाला ‘कंसिल्ड लाइटिंग’ पसंत आहे.

तिने खाली उभं राहून त्या झुबराकडे बघितलं. त्याला खूप लोलक जडवले होते आणि त्या सगळ्यांवर धूळ माखली होती. ज्याचा उपयोग अनेक दिवसात केलेला नव्हता आणि पुढही केला जाण्याची शक्यता नव्हती, अशा गोष्टीचा उपयोग कुणी करणार असेल, तर त्याला का देऊ नये? अरे, यापूर्वी असा विचार का मनात आला नाही? हे म्हणजे काही मनपसंत वस्तू विकणं नव्हे. हळू हळू हे विचार मनात रुंजी घालू लागले.

नीला सकाळी उठून योगाच्या क्लासला गेली. गुरूजींनी ध्यानधारणेबरोबरच व्यायामदेखील करवून घेतला. क्लास संपल्यावर तिने गुरूजींना विचारले, ‘आपण रामकृष्ण आश्रम, चिदानंद गुरुकुल, हरद्वारचा आश्रम इथेही वर्ग घ्यायला जाता. तिथे सणावारी, संमेलने वगैरे होतात. माझ्याकडे एक चांगले झुंबर आहे. तिथे झुंबराचा उपयोग होणार असेल, तर तिथे ते मी पाठवण्याची व्यवस्था करेन. त्यासाठी होणारा खर्चदेखील मी करेन.’ गुरूजींनी मोठ्या खुशीने लगेचच संमती दिली.

‘हरिद्वारला गंगाघाटावर एक मोठं भवन आहे. तिथे अनेक उत्सव होतात. ताई, आपण व्यवस्था करत असाल, तर उत्तम होईल.’

तिने त्याच दिवशी पॅकर्स अ‍ॅंड मूव्हर्स कंपनीला फोन लावला. झुंबर काढले. ते स्वच्छ केले आणि ‘फ्रेजाईल’ च्या स्टिकरसह एक मोठा कंटेनर हरिद्वारच्या आश्रमात पोचला.

घरात खूप फर्निचर होतं. आता त्याची जरूर नव्हती. जास्तीच्या खुर्च्या, सोफा, तिवया, ट्रकमधून प्रवास करून महिलाश्रमात पोचले. जास्तीच्या गाद्या, उशा आणि चादरी अ‍ॅनिमल शेल्टरमध्ये गेल्या.

आता स्वैपाकघरात प्रथमच पहात आहोत, अशी ती चमकली. अरे, इतक्या सार्‍या बरण्या, डबेडुबे, भांड्यांचा ढीग जमला होता आणि तिला त्याचा पत्ताच नव्हता. स्टुलावर चढून वरचे कापाट उघडले. अरे एकदम नवीन अनब्रेकेबल इंपोर्टेड डिनरसेट! तिला आठवलं, ती आणि अभिजीत बँकॉकला मित्रांबरोबर गेले होते, तेव्हा त्याला हा डिनरसेट खूप आवडला होता. आणि पाच किलो अतिरिक्त सामानाचे पैसे काउंटरवर जमा करून त्यांनी तो आणला होता. आपल्या हातांनी तो कुरवाळत, तेव्हा ती म्हणाली होती, आता यानंतर आपली ऊंधियापार्टी याच डिनरसेटमध्ये। पण तशी वेळ आलीच नाही..

बँकॉकहून परतल्यावर काही काहीने गेले असतील. एका रात्री फिल्म बघून परतल्यावर दोघे जण गप्पा मारत झोपी गेले, तर सकाळी अभिजीतने डोळेच उघडले नाहीत. झोपेतूनच अंतहीन प्रवासासाठी ते निघून गेले.

आठवणींनी तिला असं घेरून टाकलं होतं, की तिला गुदमारल्यासारखं होऊ लागलं होतं. इथल्या घरात जशी ती कैद झालीय, असं तिला वाटू लागलं. ती लगेचच बागेत फिरायला बाहेर पडली. हळू हळू अंधुक दिसू लागलं होतं. दिवे झगमगू लागले होते. काही पुरुष मंडळी खाण्या-पिण्याची मजा घेत होते. आया आपल्या मुलांना घेऊन निघून गेल्या होत्या. झोपाळे आता रिकामेच झुलत होते. त्यांचं किलबिलणं अजूनही हवेत गुंजत होतं. ती निघाली.

– क्रमश: भाग १ 

☆☆☆☆

मूळ लेखिका – वर्षा अडालजा – मोबाइल: 9833076673

हिन्दी अनुवाद – डॉ.रजनीकान्त एस.शाह – मोबाइल: 9924567512

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुर्गा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ दुर्गा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवीच्या नवरात्र उत्सवाचा, घटस्थपनेचा दिवस. पुढील नऊ दिवस विश्वात देवीचा शक्तिरूपाने वावर होणार. तिचा ‘उदो, उदो’ होणार. भुत्ये नाचणार, दिवट्या फुरफुरणार, कवड्याच्या माळा चकाकणार, संबळी कडाडणार! संध्याकाळी अंगणात मुली-लेकी-सुनांच्या भोंडल्यांचे फेर धरले जाणार. आपले दुखरे गुढगे सांभाळत दुडक्या चालीनं आज्या सुद्धा त्यात सहभागी होणार! आईचे आगमन होणार, ती आमच्या घरी उत्सवाला येणार. भक्तांची केवढी लगबग, धांदल उडालीय पहा. 

☆

उठा, सिद्ध व्हा, चला

दुर्गैचे स्वागत करायला! ।।

☆ दुर्गा ☆

सडे कुंकवाचे दारी, उठा चला घाला

उत्सवास येई “दुर्गा”, चला स्वागताला।।धृ।।

*

हरित वसन ल्याली, माथा शोभतो किरीट

मुक्त कुंतलांची शोभा, मेखला कटीस

हळद-कुंकुमाचे लेपन लाविले कपाळा

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला।।१।।

*

विमल हास्य वदनी विलसे धवल चंद्रिकेचे

विलग अधर, त्यातुन दिसती रदन हीरकाचे

पुष्ट उरोजांवर रुळती कनक, रत्नमाला

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला।।२।।

*

अष्टभुजा धारण करिती विविध आयुधांना

चक्र, खड्ग, अंकुश, पाश, चाप, बाण, भाला

शीघ्र गती चाले माता जणू अग्निज्वाला!

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला।।३।।

☆

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११७ आणि ११८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११७ आणि ११८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ११७ – – – 

धुरु लेकरू बापुडे दैन्यवाणे ।

कृपा भाकिता दीधली भेटि जेणें ।

चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११७।।

अर्थ : ध्रुव बाळ बिचारा दीनवाणा बालक होता. त्याने भगवंताजवळ कृपेची याचना केली तेव्हा प्रसन्न होऊन भगवंताने त्याला दर्शन दिले. आपल्या प्रेमभक्तीने त्याचे जीवन परिपूर्ण करून भगवंताने त्याला तारकामंडळात अढळ स्थान दिले. भगवंत आपल्या भक्तांचा अभिमानी असून तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही. 

(धुरु – ध्रुव बाळ, बापुडे – बिचारा, दैन्यवाणा – ज्याची कीव यावी असा, कृपा भाकणे – कृपेची याचना करणे, चिरंजीव – अमर, प्रेमखाणी – प्रेम/भक्तीचा साठा /उगम)

विवेचन : देव आपल्या भक्ताचा कैवारी कसा आहे ते समर्थ या श्लोकातही आपल्याला सांगतात. ध्रुव बाळाची गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनी बहुतेक ऐकलेली असते. परंतु परमेश्वराची कृपा काय असते ते समर्थ या श्लोकातून सांगतात. ध्रुव हा उत्तानपाद राजाचा मुलगा. या उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या. सुनिती ही मोठी राणी होती आणि धाकटी होती सुरुचि. सुरुचि ही राजाची लाडकी आणि त्यामुळेच गर्विष्ठ झालेली होती. सुनीति मात्र अत्यंत समजूतदार आणि गुणी होती. तिचाच मुलगा ध्रुव. सुरुचि ही सुनीतिचा आणि तिच्या मुलाचा अतिशय द्वेष करीत असे. राजा तर पूर्णपणे सुरुचिच्याच कह्यात गेला होता. एक दिवस खेळता खेळता छोटा ध्रुव राजाच्या म्हणजे आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसला. सुरुचिला ते अजिबात आवडले नाही. तिने राजाच्या मांडीवरून ओढून त्याला हाकलले आणि ओरडून म्हणाली, ” जा चालता हो. पुन्हा इथे यायचे नाही. राजाची मांडी किंवा राज्याचे सिंहासन यावर बसण्याची तुझी पात्रता नाही.” ध्रुव बिचारा रडत आपल्या आईकडे गेला. त्याने आईला ही घटना सांगितली. आईला खूप वाईट वाटले पण ती काही करू शकत नव्हती. तिने त्याची समजूत घातली. ती म्हणाली, ” बाळा, मागील जन्मी काहीतरी पातक आपल्या हातून घडले असेल. त्यामुळे आज असे दिवस आपल्याला पाहावे लागत आहेत. पण एक लक्षात ठेव. राजाची मांडी किंवा सिंहासन या तात्पुरत्या गोष्टी आहेत. तू परमेश्वराची आराधना कर. तो सर्वांचे पालन करणारा आहे. तो प्रसन्न झाला म्हणजे तुला कोणी कुठूनही हाकलू शकणार नाही. “

आपल्या आईचे हे उद्गार ऐकून ध्रुव बाळाने परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा निश्चय केला. तो लहान असला तरी दृढनिश्चयी होता. त्याने जंगलाचा रस्ता धरला. वाटेत त्याची आणि नारदमुनींची भेट झाली. नारदांनी त्याची हकीगत जाणून घेतली. त्याला मंत्र देऊन भगवद्भक्तीचा मार्ग सांगितला. ध्रुवाने तहान -भूक कशाचीच पर्वा न करता कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले. 

ध्रुव भगवंताच्या नामस्मरणात एवढा मग्न होता की प्रत्यक्ष देव त्याच्यासमोर उभा राहिला तरी त्याला त्याचे भान नव्हते. शेवटी भगवंताने त्याला म्हटले, ” बाळ, डोळे उघड. मी प्रत्यक्ष परमेश्वर तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन तुला वर देण्यासाठी आलो आहे.”

देवाचे मनोहर रूप पाहताच ध्रुव आपल्याला काय मागायचे आहे हे विसरला. भगवंताने आपल्या दिव्य शंखाचा स्पर्श त्याच्या गालाला करताच त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो भगवंताची स्तुती करू लागला. भगवान विष्णूंनी त्याला त्याचे राज्य तर दिलेच परंतु आकाशातील तारकासमूहात त्याला असे अढळ स्थान प्राप्त करून दिले की जिथून त्याला कोणीही उठ म्हणू शकणार नाही. आपण आकाशात पाहतो तोच तेजस्वी ध्रुवतारा म्हणजे बाळ ध्रुव. तो परमेश्वरकृपेने चिरंजीव झाला. 

परमेश्वर आपल्या भक्तांना न मागता सर्व काही देतो हे आपल्याला मागील श्लोकातील उपमन्यू किंवा या श्लोकातील ध्रुव बाळाच्या उदाहरणावरून समजते. तो आपल्या भक्तांचा कैवारी आहे. त्यांची तो उपेक्षा करीत नाही. उपमन्यू किंवा ध्रुव बाळाची कथा या प्रतीकात्मक आहेत असे आपण मानले तरी परमेश्वराची कृपा काय असते हे या उदाहरणांवरून आपल्याला दिसते. राजाची मांडी किंवा सिंहासन या प्रतीकात्मक गोष्टी आहेत. त्या ऐहिक सुखाचे प्रतिनिधित्व करतात. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की काही मिळवायचे शिल्लक राहत नाही. म्हणून आपण भक्तिमार्गाचा अवलंब केला पाहिजे असे समर्थ यातून सूचित करतात. 

स्वसंवाद

१. ध्रुव बाळाप्रमाणे माझ्या आयुष्यात जेव्हा कुणी माझा अपमान करतं, तेव्हा मी सूडबुद्धीने रागावत बसतो, की त्या दुःखाचे रूपांतर एखाद्या उच्च ध्येयाच्या (किंवा ईश्वराच्या) आराधनेत करतो?

२. “राजाची मांडी किंवा सत्ता ही तात्पुरती आहे, ” या सुनीतीच्या उपदेशाप्रमाणे, मला हे समजले आहे का की संसारातील भौतिक पदे क्षणभंगुर असून केवळ सत्कर्म आणि भक्तीच अढळ असते?

३. ध्रुव बाळासारखा दृढनिश्चय माझ्या अंगी आहे का? एखादे चांगले काम किंवा साधना हाती घेतल्यावर तहान-भूक विसरून मी त्यात पूर्णपणे मग्न होतो का?

४. जेव्हा मला ईश्वराची कृपा किंवा आयुष्यात मोठे यश प्राप्त होते, तेव्हा मी भौतिक गोष्टींची हाव न धरता केवळ कृतज्ञतेने ‘स्तुती’ (समाधान) करायला शिकलो आहे का?

===== 

श्लोक क्र. ११८ – – –

गजेंद्र महा संकटी वास पाहे ।

तयाकारणे श्रीहरी धावताहे ।

उडी घातली जाहला जीवदानी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११८।।

अर्थ : गजेंद्रावर जिवावरचे संकट आले. त्याने भगवंताचा धावा केला आणि तो त्याची वाट पाहू लागला. त्याच्या सुटकेसाठी भगवंत धावून आले. (त्या संकट समयी) उडी घालून भगवंताने आपल्या भक्ताचे प्राण वाचवले. आपल्या भक्ताचा अभिमानी असलेला भगवंत त्याची कधी उपेक्षा करीत नाही. 

(वास पाहे – वाट पाहत होता, जीवदानी – जीवदान देणारा)

विवेचन : आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत कसा धावून येतो हे समर्थ आपल्याला विविध उदाहरणांद्वारे पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकात आपण अंबरीष राजा, उपमन्यू आणि ध्रुव बाळाचे उदाहरण पाहिले. या श्लोकात समर्थ आपल्याला गजेंद्राचे उदाहरण देत आहेत. हा श्लोक समजून घेण्यासाठी आपल्याला ही पौराणिक कथा जाणून घ्यावी लागेल. भागवत आणि पद्मपुराणात या कथेचा उल्लेख येतो. फार पूर्वी पांड्य देशात इंद्रद्युम्न नावाचा एक राजा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. एकदा त्याची भेट घेण्यासाठी त्याच्याकडे अगस्ती ऋषी आले. त्यावेळी राजा पूजेत मग्न होता. आपल्या स्वागतासाठी राजा आला नाही म्हणून अगस्ती ऋषी रागावले. ते म्हणाले, ” हे राजा तू उन्मत्त झाला आहेस. ऋषींचे आदरातिथ्य करण्याचे तुला भान नाही. तेव्हा तू माझ्या शापामुळे एक मदोन्मत्त हत्ती म्हणून जन्माला येशील.” राजाने त्यांची क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी त्याला उ:शाप दिला की हत्ती असताना जेव्हा तू प्राणांतिक संकटात सापडशील आणि भगवंताचा धावा करशील, तेव्हा भगवंत स्वतः येऊन तुझा उद्धार करतील. ऋषींच्या शापानुसार हत्ती झालेला हा राजा नंतर गजेंद्र म्हणून ओळखला गेला. तो एका हत्तींच्या कळपाचा नायक झाला. 

एके दिवशी आपल्या समूहासह तो एका तळ्यात जलक्रीडा करीत असताना एका मगराने त्याचा पाय पकडला. त्याने सुटकेसाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च करूनही मगराच्या तावडीतून तो स्वतःला सोडवू शकला नाही. त्याच्या कळपानेही त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आता आपल्यापुढे दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही असे लक्षात आल्याने त्याने भगवंताचा आर्ततेने धावा केला. तशाही जखमी अवस्थेत आपल्या सोंडेने तळ्यातील एक कमळ उपटून आकाशाच्या दिशेने फेकले. त्याचा आर्त धावा ऐकून भगवंत धावून आले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने त्या मगराचा वध केला आणि गजेंद्राचा उद्धार केला. 

या कथेतील जो मगर आहे, तो देखील आधीच्या जन्मात गंधर्व होता. परंतु देवल ऋषींच्या शापामुळे त्याला मगराचा जन्म प्राप्त झाला. या प्रसंगी भगवंताच्या हातून मृत्यू आल्याने मगराचा देखील उद्धार झाला आणि तो पुन्हा गंधर्व लोकात परत गेला. इंद्रद्युम्न राजा वैकुंठात भगवंताचा सेवक झाला. 

थोडक्यात सांगायचे तर “माणसाचे स्वतःचे बळ जिथे संपते, तिथे भगवंताचे बळ सुरू होते. संकटसमयी सर्व अहंकार सोडून मनोभावे आणि अनन्यभावाने ईश्वराचा धावा केल्यास तो भक्ताच्या रक्षणासाठी नक्कीच धावून येतो.” हाच या कथेचा मुख्य संदेश आहे.

स्वसंवाद  

१. माझ्यावर जेव्हा मोठे संकट येते, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या बळाचा, पैशाचा किंवा ओळखीचा अहंकार बाळगून लढत राहतो, की माझ्या मर्यादा ओळखून ईश्वराला शरण जातो?

२. गजेंद्राने प्राणांतिक संकटातही जसे मनोभावे तळ्यातील कमळ भगवंताला अर्पण केले, तसा निस्सीम आणि शुद्ध भाव माझ्या प्रार्थनेत कधी असतो का?

३. “माणसाचे स्वतःचे बळ जिथे संपते, तिथे भगवंताचे बळ सुरू होते” या सत्यावर माझा खरोखरच अढळ विश्वास आहे का?

४. संकटाच्या वेळी मदतीला न येऊ शकणाऱ्या जगावर विसंबून राहण्यापेक्षा, जो ‘भक्ताभिमानी’ माझी कधीच उपेक्षा करणार नाही त्या ईश्वराचा मी खऱ्या मनाने धावा करतो का?

– क्रमशः श्लोक ११७ आणि ११८

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। महालक्ष्मी कृपा प्रार्थना स्तोत्र ।। ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। महालक्ष्मी कृपा प्रार्थना स्तोत्र ।। ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆

☆ इन्द्र उवाच ☆

☆

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।

शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।१।।

*

नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।

सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।२।।

*

सर्वज्ञे सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयंकरि।

सर्वदु:खहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।३।।

*

सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।

मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।४।।

*

आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।

योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।५।।

*

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे।

महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।६।।

*

पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी।

परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।७।।

*

श्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते।

जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।८।।

☆

☆ फलप्राप्ती ☆

☆

महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर:।

सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा।।९।।

*

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम्।

द्विकालं य: पठेन्नित्यं धन्यधान्यसमन्वित:।।१०।।

*

त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।

महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा।।११।।

☆

मराठी भावानुवाद:

☆ कथित इन्द्र ☆

श्रीपीठस्थित सूरपूजित महामाये तुज नमन

शंखचक्रगदाधारिणी महालक्ष्मी तुज नमन॥१॥

*

गरुडवाहिनी कोलासुराऽभयदायिनी तुज नमन

समस्तपापहारिणी देवी महालक्ष्मी तुज नमन ॥२॥ 

*

देवी सर्ववरदा भयकारी सकल दुष्टा सर्वज्ञ

सर्वदुःखहारिणी देवी महालक्ष्मी तुज नमन ॥३॥

*

देवी सिद्धीबुद्धीदायिनी मंत्रजागरे सदैव पावन

भोगमुक्तीदायिनी देवी महालक्ष्मी तुज नमन ॥४॥

*

देवी आदिशक्ती महेश्वरी असशी अनादिअनंत

योगे जनन योगे प्रकट महालक्ष्मी तुज नमन ॥५॥

*

महाशक्ती महोदरी स्थूल सूक्ष्म महारौद्र रूपिणी

देवी महालक्ष्मी तुज नमन हे महत्पापनिवारिणी ॥६॥

*

परब्रह्मस्वरूपिणी कमल आसने विराजमान

जगन्माते परमेश्वरी महालक्ष्मी तुज नमन ॥७॥

*

धवल वस्त्र धारिणी विविध अलंकार भूषण

जगन्व्यापिणी जगन्माते महालक्ष्मी तुज नमन ॥८॥

☆

☆ फलप्राप्ती ☆

☆

पठण करता भक्तीपूर्वक महालक्ष्मी अष्टक स्तोत्र 

सकल सिद्धी राजवैभव नित्य तयासी होत, प्राप्त ॥९॥

*

पठण करता एकेवेळी नित्य विनाश महापापाचा

नित्य करिता पठण दोन वेळा वर्षाव धनधान्याचा ॥१०॥

*

त्रिकाले करिता नित्य पठण विनाश महाशत्रूचा

सदा प्रसन्न कल्याणकारिणी वरदहस्त महालक्ष्मीचा॥११॥

☆

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… – लेख क्र. १ ☆ मंजिरी येडूरकर ☆

मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… – लेख क्र. १ ☆ मंजिरी येडूरकर ☆

*

या मालिकेमध्ये आपण ज्या स्त्रिया घेणार आहोत त्या स्त्रियांनी कदाचित स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला नसेल पण इतिहास घडवताना त्यांनी आपल्या पाऊल खुणा उमटविल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या उल्लेखशिवाय हा इतिहास अपुरा नक्कीच असेल. स्वातंत्र्य एका दिवसात मिळाले नाही, तसेच ते मोजक्या व्यक्तींनीही मिळवून दिले नाही. अनेक हात वेगवेगळ्या प्रकारे पुढे आले आणि त्यात स्त्रिया कधीच मागे नव्हत्या. म्हणजे स्त्रियांची संख्या इतकी मोठी आहे की मी या मालिकेत फक्त मोजक्या नऊ स्त्रिया घेत आहे.

गत वर्षी झलकारीबाई, दुर्गा भाभी, राणी अवंतीबाई, राणी गाइदिनल्यू, मातंगिनी हाजरा, कनकलता बरुआ, उदादेवी, कुमारी मैना, सुशीला दीदी या नऊ स्त्रिया घेतल्या होत्या.

आज पहिले नाव आहे, राजमती पाटील!

यांचा जन्म १९२० साली सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील धार्मिक वळणाचे होते. असे म्हणतात की त्या लहानपणी कंदीलात रॉकेल भरत असताना रॉकेलचा भडका उडाला व मुलीला वाचवताना त्यांची आई मात्र भाजून गंभीर जखमी झाली व त्यातच आईचा अंत झाला. आपल्यामुळे आपली भावंडे पोरकी झाली हे शल्य बोचत राहिले. त्यामुळे त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला व घरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. 

लहान भावाला शिक्षणासाठी बाहुबलीच्या आश्रमात ठेवण्यासाठी गेल्या असता त्यांची भेट आचार्य समंतभद्रा यांच्याशी झाली. त्यांनी राजमतीला सोलापूरच्या जैन श्राविकाश्रमात जाण्याचा सल्ला दिला. श्रीमती राजूलमती शहा यांनी स्त्रियांसाठीचा आश्रम सोलापूर येथे १९२३ साली सुरू केला होता. तेथे गरीब, निराधार स्त्रियांना शिक्षण देऊन समर्थ केले जात होते. बोलक्या व निर्भिड स्वभावामुळे राजमती या आश्रमातील सर्वांच्या अतिशय लाडक्या झाल्या.

राजमती जेंव्हा आश्रमातून आपल्या गावी यायच्या तेंव्हा त्यांना चळवळीची माहिती मिळत असे. त्याची चर्चा श्राविकाश्रमातील मैत्रिणींशी व्हायची. इंग्रजांना हकलण्यासाठी आपल्या भागातील तरुण मुले जीवाचे रान करत आहेत, तुरुंगवास भोगत आहेत, याची जाणीव होत होती. आश्रमातील इतर मैत्रिणींसह राजमती सभा, मिरवणुका यात सहभागी व्हायच्या. आश्रमातील सुमतीबाई शहा ह्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या होत्या. ४२ च्या चळवळीतील सातारच्या प्रतिसरकारचे भूमिगत कार्यकर्ते सोलापुरात आश्रय घेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे योगदान, शांतीलाल शहा, तुलसीदास जाधव अशा कार्यकर्त्यांची प्रेरणा यामुळे आश्रमातील मुलींचे व्यक्तिमत्व घडत होते.

सोलापूरच्या आश्रमात असतानाच त्या शाळेतील तास चुकवून क्रांतिकारकांना मदत करीत असत. भित्तीपत्रके तयार करणे, त्यांची बुलेटिन्स कुठे पाठवायची, कशी वाटायची हे कार्य करीत होत्या.

तिथून सातवी पास झाल्यावर त्यांना मेरी होर्डिंग ट्रेनिंग कॉलेज मधील शिक्षिका प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले. सातारच्या प्रतिसरकारचे भूमिगत कार्यकर्ते सोलापूरला येत तेव्हा राजमती कोणाला न कळत कॉलेजच्या वेळात बाहेर पडून सोलापूरच्या टिळक चौकातील देश बांधवांच्या घरी चालणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीच्या चर्चेत सहभागी होत होती. 

तिच्या धाडसी स्वभावामुळे ९ ऑगस्ट १९४२ ला टिळक चौकात तिरंगा फडकवण्यासाठी राजमतीचे नाव निश्चित केले गेले. आठ ऑगस्ट च्या रात्री तिने गरजेच्या वस्तू एका गाठोड्यात बांधल्या व रात्री ठरलेल्या ठिकाणी पोचली ते सामान ठेवले व पुन्हा आश्रमात परत आली. आश्रमात जर या गोष्टी कळल्या तर आपली येथून गच्छंती होईल म्हणून सर्व प्रकारची काळजी तिने घेतली. सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेज साठी म्हणून आश्रमा बाहेर पडली. टिळक चौकातील देशभक्तांच्या घरी जाऊन नऊवारी साडी, ठसठशीत मोठे कुंकू लावून, हातात तिरंगा घेऊन, भारत मातेच्या जय घोषात टिळक चौक गाठला. क्रांतिकारी जमले होतेच. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. एक स्त्री समोर पाहिल्यावर पोलीसही गोंधळले. त्यांनी राजमतीला झेंडा खाली ठेवण्यास सांगितले. पण तिने ठाम नकार दिला. त्यामुळे तिला अटक झाली व सोलापूरच्या तुरुंगात तिची रवानगी झाली. कोर्टात तर तिने सिटी मॅजेस्ट्रेट गिरमे साहेब यांच्या समोर आपली बुलेटिन्स ठेवली. त्यामुळे तिला सत्याग्रहा बद्दल सहा महिने व बुलेटिन्स ठेवून कोर्टाचा अवमान केल्याबद्दल तीन महिने कारावास व दोनशे रुपये दंड पण दंड न भरल्यामुळे आणखीन दोन महिने ज्यादा शिक्षा झाली. मग तिची रवानगी येरवड्याच्या तुरुंगात झाली. तिथे तिची भेट तुरुंगातील इतर क्रांतिकारी स्त्रियांशी झाली. आणि स्वातंत्र्य लढ्यात समर्पणाची भावना दृढ झाली. चांगल्या वागणुकीमुळे सहा महिन्यातच ती श्राविकाश्रमात परत आली. 

पण आश्रमाच्या मागे राजमतीमुळे पोलिसांचा ससेमिरा सुरू राहणार म्हणून राजमतीला आश्रमात प्रवेश नाकारला गेला. मग ती साताऱ्यामध्ये प्रतिसरकारच्या रूपाने सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाली. त्यांनी तिला कुंडल व वाळवा या गटातील क्रांतिकारी लोकांमध्ये धाडले.

त्यांच्याकडे सरकारी खजिन्यांवर धाडी टाकणे, दळणवळणाची साधने उध्वस्त करणे व त्यासाठी लागणारी काडतुसे पिस्तुले मिळवून आणणे अशी कामे सोपविली होती. या मोहिमेत जी.डी लाड, नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यासह राजमती पण होती. गोवा, बेळगाव, नाशिक या भागातून हे साहित्य आणले जाई. अशी जोखमीची कामे गुप्त राहून राजमतीने केली. असे असामान्य धैर्य, स्वातंत्र्यासाठी काहीही करण्याची जिद्द असणाऱ्या राजमती पाटील यांना आमचा मानाचा सलाम!!

इतिहासात काही पानांना मोठी अक्षरे मिळतात तर काही पानांना लहान अक्षरे मिळतात.राजमतीची कथा त्या लहान अक्षरात लिहिलेल्या मोठ्या धैर्याची आहे.

– क्रमशः भाग १  

© मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दोन डोळे आणि छत्तीस म्हणी… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दोन डोळे आणि छत्तीस म्हणी… कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

☆

अनुभवा ही माय-मराठीची समृद्ध करणारी ताकद :

१. डोळा लागणे (झोप लागणे)

२. डोळा मारणे (इशारा करणे)

३. डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

४. डोळे येणे (नेत्रविकार होणे)

५. डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

६. डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

७. डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

 ८. डोळे खिळणे (एकटक पाहणे)

 ९. डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

 १०. डोळे दिपणे (थक्क होणे)

 ११. डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

 १२. डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

 १३. डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

 १४. डोळे भरून येणे (रडू येणे)

 १५. डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

 १६. डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

 १७. डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

 १८. डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

 १९. डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

 २०. डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

 २१. डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

 २२. डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

 २३. डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

 २४. डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

 २५. डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

 २६. डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

 २७. डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

 २८. डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

 २९. डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

 ३०. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

 ३१. डोळे फुटणे (प्रत्यक्ष असलेली वस्तू दिसत असूनही नकळत दुर्लक्ष करणे किंवा नसल्याचा भाव असणे)

 ३२. डोळा फडफडणे (भविष्यात घडणाऱ्या घटनांचे शुभ किंवा अशुभ संकेत सुचणे)

 ३३. ⁠डोळ्यात बोटे घालणे (अप्रिय, दुःखदायक किंवा संतापजनक वर्तन करणे)

 ३४. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे (अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे)

 ३५. डोळे मिचकावणे (गुपित संकेत देणे, किंवा चेष्टा करणे)

 ३६. डोळा लवणे (शुभ घटना घडणार आहे असा संकेत)

३७. डोळे मिटून दूध पिणे(स्वतःचा गुन्हा वा दुष्कृत्य इतरांना दिसत नाही अशी स्वतःची समजूत करून घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणे)

 कल्पनातीत असे हे सौंदर्य आहे.

 अजून मोठा संग्रह होऊ शकतो!

☆

कवी – अज्ञात 

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पदर… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ पदर… ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

आईचा असो वा साडीचा

 सन्माननीय असतो पदर

 साडीचा पदरात सौंदर्य

 आईच्या पदरी असे आदर!

*

साडी परिधान करते जी

 पदर सावरणे असे भान

 पदर जिचा नीट असतो

 सनातनाचा तो सन्मान!!

 *

साडी म्हणजे सात्विकता

 साडीमधे वेगळाच डौल

 विदेशी परिधान सोप्प तरी

 देशी बाजाच ह्रदयस्थ मोल!!

 *

गोल साडी सुटसुटीत तर

 गुजराथी साडी वाटते छान

 केरळ कर्नाटकी साड्यामधे

 काठापदराच वेगळच भान!!

 *

नऊवारी महाराष्ट्रीय साडी

 परिधान करणे जरा अवघड

 तीच साडी साड्यामधला

 जिंकून जाते सगळे गड!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ डायरी के बहाने ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ कविता  ☆ डायरी के बहाने ☆ श्री कमलेश भारतीय ☆

मेरी डायरी पर बहुत से

पते हो गये हैं

जब कभी पन्ने पलट कर देखता हूं

अनेक चेहरे

सामने आने लगते हैं

कब मिला, कहां मिला, कैसे मिला

सब याद दिलाने लगते हैं ।

जब कभी हम

कहीं दूर जाते हैं

नये लोगों से मिलते हैं

हम उनको वादा करते हैं

मिलते रहने का या

याद करते रहने का ।

पर बहुत दिनों तक नहीं चल पाता

यह सिलसिला

पते लिखे रह जाते हैं

चेहरे धुंधले होने लगते हैं ।

अचानक फिर किसी मोड़ पर

होती है मुलाकात

सामने वाला पूछता है-पहचाना?

कुछ याद नहीं आता ।

शर्मिंदगी का अहसास होने लगता है ।

फिर से लिखता हूं नाम और पता ।

डायरियां बदलती रहती हैं

नाम और पते

अपनी जरुरत के चलते

कटते और छूटते रहते हैं ।

सबकी अपनी अपनी जरुरत

अपने अपने शौक

कौन कब तक अच्छा लगे

जो याद रखा जाये ?

डायरी में नाम

कटते और छूटते रहते हैं ।

कभी ऐसा भी होता है

पता चलता है कि

लिखे नाम और पता वाला आदमी

इस दुनिया से विदा हो गया।

तब डायरी पर देर तक

देखता रह जाता हूं

सब याद आने लगता है ।

कब मिले , कहां मिले

कितने हंसे, कितने रोये

आंखें नम होने लगती हैं

बेशक नहीं जा पाता

उनकी अंतिम बेला में

पर लगता है

जीवन का कुछ छूट गया

भीतर ही भीतर कुछ टूट गया ।

कोई अपना चला गया

डायरी से नाम काटते वक्त

बड़ा अजीब लगता है

यह सोच कर कि इस पते पर

भेजी चिट्ठी का

कोई जवाब नहीं आएगा।

सच, मेरी चिट्ठी कभी पहुंच भी गयी

तो कौन देगा जवाब?

बेबसी में डायरी बंद कर देता हूं ।

क्या आपके साथ भी ऐसा नहीं होता,,,,?

 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – छोटी-छोटी खुशियों का उत्सव… ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆

श्री अरुण कुमार डनायक

(श्री अरुण कुमार डनायक जी  महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर  विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे  सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के  लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है.

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – छोटी-छोटी खुशियों का उत्सव।)

☆ कथा-कहानी – लघुकथा – छोटी-छोटी खुशियों का उत्सव… ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆

नौकरी और विवाह—दोनों सपने पूरे हो चुके थे। अब अमेरिका में नए जीवन की शुरुआत थी। सबसे पहले शिक्षा ऋण चुकाया गया। फिर तय हुआ कि एक-तिहाई वेतन भविष्य के घर के लिए, एक-तिहाई कभी पूरे अमेरिका घूमने के सपने के लिए और बाकी रोज़मर्रा के जीवन के लिए रहेगा। हिसाब-किताब ने फिलहाल उन्हें स्टूडियो अपार्टमेंट में ही रहने को विवश किया।

समय अपनी रफ़्तार से बीतता रहा। एक दिन अचानक थोड़े बड़े घर की तलाश शुरू हुई। अब तक नवदंपती भी जीवन के व्यावहारिक गणित में कुछ अनुभवी हो चुके थे। उन्होंने दो शयनकक्ष वाला एक अपार्टमेंट पसंद किया। घर इतना बड़ा था कि स्टूडियो अपार्टमेंट का सारा फर्नीचर उसके एक कोने में ही सिमट गया।

अब तक अमेरिकी उपभोक्तावादी संस्कृति की हवा उन्हें भी कुछ-कुछ लग चुकी थी। एक टीवी पहले से था, फिर भी दूसरा टीवी उन्हें पसंद आ गया।

अमेरिका में कोई चीज़ पसंद आ जाए, तो उसके घर पहुँचने में देर नहीं लगती। टीवी महाशय घर पधार गए। युवक टूल बॉक्स लेकर जुट गया। युवती कभी दीवार नापती, कभी पीछे हटकर देखती कि टीवी किस जगह सबसे अच्छा लगेगा। दो घंटे की मशक्कत के बाद नया टीवी दीवार पर अपनी जगह पा चुका था।

युवक के मुँह से अनायास निकला, “यार, सेलिब्रेशन तो बनता है!”

दोनों हँस पड़े। फिर अचानक चुप हो गए।

उस शहर में अधिकांश पड़ोसी एक-दूसरे के नाम तक नहीं जानते थे। भारतीय मित्र शहर के दूसरे छोर पर रहते थे और रिश्तेदार दूसरे राज्यों में।

“चलो, हलवा बनाते हैं,” युवती ने कहा।

थोड़ी ही देर में घी और सूजी की महक पूरे घर में फैल गई। छोटा-सा अपार्टमेंट जैसे पल भर में भारतीय रसोई में बदल गया।

हलवा तैयार हुआ। दोनों ने कपड़े बदले। तभी युवती की आँखों में चमक उभरी।

युवक ने कहा “रेडी… वन… टू… थ्री…”

युवती ने बड़े जतन से नए टीवी का पारदर्शी प्लास्टिक आवरण हटाया। दीवार पर टँगी चमचमाती स्क्रीन के साथ दोनों के चेहरे भी खिल उठे।

कुछ क्षण तक मुस्कान बनी रही। फिर अचानक मोबाइल की छोटी-सी स्क्रीन से माँ की आवाज़ आई—

“बेटा… काश, हम भी इस खुशी में तुम्हारे साथ होते…”

 ©  श्री अरुण कुमार डनायक

42, रायल पाम, ग्रीन हाइट्स, त्रिलंगा, भोपाल- 39

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पथ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – पथ… ?  श्री संजय भारद्वाज ?

न दुर्गम था, न सुगम। न जटिल था, न सरल। पथ वैसा ही था, जैसा होना चाहिए। कहीं प्रशस्त, कहीं संकीर्ण। कहीं समतल, कहीं उबड़खाबड़। कहीं पुष्पित, कहीं कंटकाकीर्ण। सभी चलते रहे।

एक सहयात्री ने कहा, “वाह! पुष्प ही पुष्प भरे हैं पथ पर..” और उसने ढेर सारे पुष्प आँचल में भर लिए। एक को पूरे मार्ग में टेढ़े-मेढ़े से लेकर सुघड़-सुंदर छोटे-छोटे पत्थर दृष्टिगोचर हुए। उसने पत्थर बटोर लिए। एक वनस्पतिशास्त्री को भाँति-भाँति की वनस्पतियाँ दिखीं, उसने उनके पत्ते चुन लिए। हरेक की अपनी आँख थी और थी अपनी दृष्टि। उसे चप्पे-चप्पे पर कविता और कहानियाँ मिलीं, उसने सहेज लीं।

” इन्होंने अनगिन कविताएँ और कहानियाँ रची हैं..”,   किसीने उनका परिचय देते हुए कहा।

वह सोच में पड़ गया कि चलना और रचना समानार्थी कैसे हुए?

 

?

© संजय भारद्वाज   

( श्रीविजयादशमी 2019, अपराह्न 3.57 बजे।)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रीगणेश साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जावेगी। 🕉️

💥 💥

💥 हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

≈≈हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares