मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवनाचे नियम ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ जीवनाचे नियम ☆ श्री दिवाकर बुरसे

हे एक गंभीर चिंतन आहे. माझे नाही तर आजपर्यंतच्या अनेक संत माहात्म्यांनी, तत्वचिंतकांनी, विचारवंतांनी केलेले. मी केवळ त्यातले मला जे उमजले, ते माझ्या शब्दात मांडले आहे.

`फोडिले भांडार, धन्याचा तो माल। मी तो हमाल, भारवाहू।।”* येवढीच माझी भूमिका.

 हे चिंतन थोडे दीर्घ वाटेल, नव्हे आहेच, पण वाचकांना प्रार्थना की त्यांनी थोडी कळ सोसून हे अंतापर्यंत वाचावे. मला विश्वास आहे, तुम्हाला ते निश्चित काही देऊन जाईल.

जीवनाचे नियम ☆ 

जीवन दिसते तेवढे सरळ नाही

वाटते तेवढे सोपेही नाही.

करतो काही, घडते काही

असे का? समजत नाही.

नुसता त्रागा, चिडचीड होते

सारे आयुष्य यातच जाते!

याला काही उपाय आहे?

आहे, आहे, निश्चित आहे.

 *

जीवनाचे काही नियम आहेत.

ते समजून घ्यायला हवेत.

नियम बदलता येत नाहीत

तशा प्रयत्नांना यश नाही.

पण, जगायचे तर बदलायला हवे-

स्वतःला, नियमांना नव्हे!

आपल्या जीवनावर आपला अधिकार.

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार “

ज्यांना हे कळते, त्यांचे जीवन कृतार्थ होते!

 *

पेराल तरच उगवेल

म्हणून आधी पेरायला हवे.

खडकावर पेरून कसे चालेल?

सुपीक भूमीत रुजवायला हवे.

जे पेराल तेच उगवेल.

धोत्र्याला केशर कसे लागेल!

 *

आधी कष्ट मग फळ

कष्ट नाही ते निर्फळ.

केले तर सारे होते

न केले तर तसेच राहते.

 *

गमावण्यासाठी असायला हवे.

सापडण्यासाठी शोधायला हवे.

समजण्यासाठी विचारायला हवे.

कुणी सांगितले, तर ऐकायला हवे.

 *

मोती, रत्ने हवी असतील

तर सागरतळ गाठायला हवा.

किना-यावर बसणा-याला

माती, रेती, खारी हवा!

 *

अंधार आहे? दिवा घ्यावा.

अवघड वाट? आधार घ्यावा.

मागे कुणी यायला हवे?

आपण पुढे व्हायला हवे!

 *

देणे-घेणे व्यवहार आहे.

नुसते घेणे बेकार आहे.

देणारा दानशूर होतो.

नुसते घेणारा भिकार ठरतो!

 *

यश हवे? अपयश पचवा.

शांति हवी? कलह मिटवा.

एकी हवी? बेकी तोडा.

अंतराळ हवे? भूतल सोडा!

 *

येत नसेल? शिकायला हवे.

जमत नसेल? साधायला हवे.

घडवायचे असेल तर करायला हवे.

मरायचे नसेल तर जगायला हवे!

 *

इथे कर्म करायलाच हवे.

त्याखेरीज सुटकाच नव्हे.

कर्मात दोष असुदे काही,

निर्दोष कर्मे शक्य नाही.

त्यातील दोष तेव्हाच जळतील

जेव्हा कर्मे यशस्वी होतील!

 *

सार काय? असार काय?

याचा विचार व्हायला हवा.

मी कोण? कोठून आलो? जाणार कोठे?

याचा शोध घ्यायला हवा.

 *

कर्मासाठी काया दिली.

ज्ञानासाठी इंद्रिये दिली.

भवनांसाठी मन आहे.

निर्णय करणारी बुद्धी आहे.

जन्मसिद्ध हा ठेवा

अहंकार मात्र दूर ठेवा!

 *

दिसेल ते नासेल, रचेल ते खचेल.

चढेल ते पडेल, पडेल ते चढेल.

वाढेल ते मोडेल, येईल ते जाईल.

पसरेल ते आक्रसेल, जन्मेल ते मरेल.

 *

या स्वाभाविक नियमांच्या चौकटीत

आपले जीवन बसवायला शिका.

आनंदाने जगता जगता

आत्माराम विसरू नका!

 *

संशय नको, नाश पावाल.

विश्वास ठेवा, ज्ञानी व्हाल.

जेव्हा जग सोडून जाशील

सारे काही इथेच राहील.

आलास तसाच निघून जाशील

कीर्ति परिमल पसरत राहील!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३९ ☆ झाडतो पायरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३९ ?

☆ झाडतो पायरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नाही सोडून वागलो, माझी जाणतो पायरी

आधी खायचो हापूस, आता मागतो पायरी

*

पायरीच्या दगडामधे, होय भक्ती साठलेली

अनवाणी पायाने मी, पुढची चालतो पायरी

*

लाज वाटावी कशाला, मला देवाच्या दारात

जातो देवळात तेव्हा, तेथे झाडतो पायरी

*

छोट्या जागेत बंगला, झाल्या उंच या पायऱ्या,

मोठ्या कष्टाने तरिही, मी ही लांघतो पायरी

*

माणसाची जात आहे, राग येतो केव्हा तरी

तेव्हा काही काळ तरी, मीही सोडतो पायरी

*

आहे सत्तरी गाठली, थके पायाचा पाळणा

वाटे काळजी स्वतःची, तेव्हा टाळतो पायरी

*

पुढे जायची बाळाला, आता आगलेली ओढ

बाळराजाला उत्साह, तोही रांगतो पायरी

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हायकू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ हायकू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

भार मनाचा

धरा विलासा

ओला खुलासा.

*

कृष्णमेघ नभी

इंद्रधनू छबी

पापण्यांवर.

*

शोधताना वाट

दृष्टीपथा काठ

अस्थीप्रवाह.

*

रंगछटा हृदयी

स्पंदनांचे सवयी

समयसुची.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रीकृष्णावरील भारुड ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ श्रीकृष्णावरील भारुड ☆ शालिनी जोशी

संत एकनाथांचे श्रीकृष्णावरील भारुड-पाखरू–

कृष्णा एक पाखरू आहे, ते मुखाविण चारा खाय रे l

डोळे नाही तरी ते पाहे, वाचेविण स्वये खाये रे l

सख्या त्यास नाव कान्होबा, कृष्ण म्हणती सर्व रे l

त्याचे वास्तव्य कोठे आहे, पर नाही परी ते उडे रे l

तिहेलोकी हिंडते, त्रिभुन त्याला थोडे रे l

त्याचे नखात आकाश बुडे, तो संमुख चहुंकडे रे l

हो त्याला मायबाप दोन्ही नाही रे l

एकवीण पाहती जनार्दनाचे पायी रे l

हे रूपक एक कोडे आहे. पेंद्याने श्रीकृष्णाला टाकलेला कुट प्रश्न आहे. याचे उत्तर श्रीकृष्णरूपी सगुण निर्गुण परमात्मा आहे. देवभक्त यातील हा विनोदी संवाद. श्रीकृष्णाच्या स्वरूपाचा यथार्थ भाव ‘पाखरू’ मधून व्यक्त होतो.

पेंद्या श्रीकृष्णाला एक कूट प्रश्न टाकतो. कृष्णा एक पाखरू आहे. ते तोंड नसताना चारा खाते. डोळे नसताना पाहते. वाचा नसताना खाते. श्रीकृष्ण समजून उमजून विचारतात, त्या पाखराचे नाव तरी काय?

पेंद्या म्हणतो त्याचे नाव कान्होबा. पण सर्व त्याला कृष्ण म्हणतात. पंख नसताना ते पाखरू उडते. त्रिभुवनही त्याला कमी पडते. आकाशही त्याच्यापुढे थोकडे. ते सर्वत्र असलेले. पण मायबाप नसलेले.

देहरूपाने अवतार कार्यात लीला करणारा श्रीकृष्ण, तसा नसून सर्वगत अद्वैत परमात्मा आहे. येथे पाखराच्या रूपकातून एकनाथ सांगतात, तो चैतन्य रूप त्रिभुवनाला व्यापून आहे.

त्याला रूपच नसल्याने मुख नाही .पण विश्वातील जीवांच्या मुखाने अन्न खातो म्हणून तो विश्वातोमुख आहे. मूळ ब्रह्म स्वरूपाला डोळे नसले तरी चैतन्यामुळे जगाचे डोळे त्याचेच. इतकेच नव्हे तर विश्वाच्या नेत्रांची दृष्टी तो आहे. डोळ्यांचा डोळा आहे. म्हणून तो विश्वातश्चक्षु आहे. चैतन्य रूपाने सर्वत्र आहे. स्थावर जंगमात भरून आहे. सर्वगत आहे. म्हणजेच पंख नसून सर्वत्र उडतो. त्याच्या आधारावर तीनंही लोकांची रचना असून त्याच्या पलीकडेही तोच इतका व्यापून आहे, जणू काही त्याच्या नखात आकाश गडप व्हावे. तिकडे पहावे तिकडे त्याचेच अस्तित्व. रिती जागा नाही. स्वयंभू असल्याने उत्पन्न करणारा कोणी नाही. म्हणून आई-बाप नाही. उलट त्याच्या आधारावरती विश्वाची निर्मिती. म्हणून तोच जगाचा आईबाप. असे हे परमेश्वराच्या निर्गुण रूपाचे वर्णन पाखराच्या रूपकाने एकनाथांनी सुरेख केले आहे. कूट प्रश्न आहे तोही प्रत्यक्ष श्रीकृष्ण- सगुण रूपाला विचारलेला. यातून सगुण कृष्णाचे खरे रूप एकनाथांनी दाखवून दिले. रूपाशी नम्र झाले.

🙏  श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खंबीर लढायाला ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खंबीर लढायाला ? श्री आशिष  बिवलकर ☆

साजूक तुपात | घोळले मराठी |

बापटांच्या ओठी | भाषा तैसी ||१||

*

ध्वनी प्रदूषण | समस्या गंभीर |

बापट खंबीर | लढायाला ||२||

*

सवंग प्रसिद्धी | नसे त्यास लोभ |

डीजेप्रती क्षोभ | प्रकर्षाने ||३||

*

सण उत्सवात | आली मक्तेदारी |

हैराण बिचारी | जनताच ||४||

*

संस्कृतीच्या आड | वाढे झुंडशाही |

समर्थन नाही | विवेकाने ||५||

*

एकला चलो रे | धमक्याचं जमा |

नसे त्यास तमा | विरोधाची ||६||

*

सामान्य माणूस | उठवी आवाज |

उतरतो माज | बलाढ्यांचा ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कनकभरली फुले… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ कनकभरली फुले… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वर्णसंख्या 16 यती 8 व्या अक्षरावर)

उंच उंच डोंगरात झाडेवेली घनदाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||ध्रु||

रिमझिम रिमझिम श्रावणाच्या येती सरी

घाटाघाटातली झाडी वेली त्यात रंग भरी

कनकभरली फुले सोनमोहोराचा थाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||1||

 *

हिरव्यात डोकावती पहा देखणी पिवळी

पर्ण पाचूवर आली कळी कोवळी कोवळी

मधू प्राशनास धावे फुलपाखरु सुसाट

किती सारी साजरी धुकं भरली पहाट ||2||

 *

वाटा वळणे वळणे झरे पाण्याचे खेळणे

ताम्रफुले पहुडली त्यांचे मातीशी लोळणे

पायघड्या देखण्याश्या वारा घालतो मोकाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||3||

 *

माकडांचे लोट आले इकडे तिकडे पळे

ताम्रशेंगा पितवृष्टी खळखळून ओघळे

माझ्या कवन शेल्याला पितंबरी ताम्र काठ

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||4||

 *

कुठे बेफाटला वारा कुठे पाऊस सरारा

ताम्रवृक्ष उंच उंच फुले घागरा गरारा

ओंजळीत सोनफुले शब्दांची वाहती लाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||5||

 

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रिती आस ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रिती आस ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

काळे करुनी अंबर 

आस जिवा लावीशी 

तुज टोलवता समीराने 

तोंड तुझे काळे करशी

*

तळ गाठला धरणांनी 

भेगाळली सारी अवनी 

वाट पाहुनी कासकराच्या 

आले बघ नयनी पाणी 

*

आहे वाहन यंदा गर्दभ 

झाड दुगाण्या लवकर 

शांत करुनी धारित्रीला 

भरून काढ सारी कसर

*

नटव लवकर हिरवाईने 

उघड्या बोडक्या सृष्टीला

तृप्त होता सारे चराचर 

देईल आशीर्वाद तुजला

देईल आशीर्वाद तुजला

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संध्यारंग… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

?संध्यारंग – ? ☆ श्री राहूल लाळे ☆

संध्याकाळच्या आभाळात

केशरी रंग भरला,

अन्

दिवसभराचा प्रवास संपवून

सूर्य क्षितिजाकडे वळला…

 

ढगांच्या कुशीत विसावताना

क्षणभर थांबला तो,

जणू निरोप देताना म्हणाला—

“उद्याही भेटेन पुन्हा! ”

 

रस्त्यावरची धावपळ सुरूच,

वाहनांची गर्दी तशीच,

पण त्या गोंगाटातही

निसर्गाची कमाल दिसली…

 

एक क्षण टिपला कॅमेऱ्याने,

एक क्षण मनात साठला,

मावळता सूर्य सांगून गेला—

“अंत नाही हा…हा तर नव्या पहाटेचा वायदा! ”

© श्री राहुल लाळे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२८ ☆ साजण… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२८ ?

☆ साजण ☆  प्रभा सोनवणे ☆

निशेच्या देहावर

पुनवेचं चांदणं

गेला साजण दूरदेशी

माझं उदास अंगण!

*

किती?किती वाट पाहू?

डोळी आसवाचं शिंपण

जीव तिळ तिळ तुटे

साक्षी मेंदीचं शिंपण !

*

सोबतीला हातावर

त्याच्या नावाचं गोंदण

कपाळीच्या कुंकवाला

त्याच्या प्रीतीचं कोंदण !

*

चांदराती एकली मी

माझं रडणं कुढणं

कसं समजेल त्याला

दूरदेशी गं साजण!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चटके… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव ?

 ☆ चटके नीलांबरी शिर्के 

 जीवनभर चटके मिळता

चटक्यांचे भय ना उरते

हे सोसुन सारे आता

सरणाचे भय कुठले ते!!

*

मी छिन्न नयनबाणांच्या

कायेच्या जखमा शिवते

शब्दांनी विदीर्ण ह्रदया

हळू फुंकर घालत बसते!!

+

मी कणभर गंधासाठी

अनवाणी पावली फिरले

तळपायीच्या फोडांना

अश्रुंनी चुंबीत बसले!!

*

गगनाला भिडण्यासाठी

पंखाची फडफड केली

झेपाऊन उडण्या आधी

मी पंख गमाऊन बसले!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares