– हे पुस्तक पाहिलं, आणि नकळतच मनात प्रश्न उभा राहिला की… ‘‘वार्धक्य… आणि कृतार्थ…?” … आणि तेही आत्ता आजूबाजूला सातत्याने दिसणा-या परिस्थितीत? उत्सुकता स्वस्थ बसू देईना… मग लगेचच हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणि अगदी प्रस्तावनेपासूनच पानागणिक मिळणारी वेगवेगळी शास्त्रीय माहिती वाचतांना, वृध्दत्त्वाशी निगडित असणा-या अनेक प्रश्नांचे वेगवेगळे आकृतीबंध डोळ्यासमोर उभे राहिले.
माणसाचे सर्वसाधारण आयुष्यमान ७५ ते ८० वयापर्यंत वाढले आहे हे तर जाहीरच आहे… त्यामुळे या वयोगटातील माणसांची संख्याही वाढली आहे. आणि अर्थातच् वृध्दांसमोरची आव्हानेही वाढली आहेत. इथे वृध्दांसमोरच्या ‘समस्या’ न म्हणता ‘आव्हाने’ म्हणणे, इथेच लेखिकेचा या विषयाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे. आणि मग टप्याटप्याने पुढे जात, ही आव्हाने यशस्वीपणे कशी पेलता येतात, याचे लेखिकेने सोदाहरण विवेचन केले आहे… अगदी पटलेच पाहिजे… आणि आचरणातही आणले पाहिजे असे.
‘एखादी व्यक्ती वृध्द होते, म्हणजे नेमके काय होते? ’ हा पहिलाच प्रश्न… इथूनच या पुस्तकाला सुरुवात झालेली आहे. उमलणे… उभरणे… कोमेजणे… थोडक्यात उत्पत्ती-स्थिती-लय… यापैकी ‘ कोमेजत जाणे ’… हा तिसरा टप्पा वृद्धत्वाचा. हे जरी सत्य असले, तरी माणसाचे कोमेजत जाणे कसे असते, हे त्याच्या शारिरिक व मानसिक स्वास्थ्यानुसार, त्याच्या कार्यरत रहाण्याच्या क्षमतेनुसार, अंगभूत कौशल्यानुसार, आणि या अनुषंगानेच, त्याने आयुष्यभर केलेल्या व्यवसायानुसार, प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असते. म्हणूनच वय आणि कार्यमग्न रहाण्याची क्षमता, याचे कुठचेही ठाम गणित मांडता येत नाही, मांडले जाऊही नये, हा विचार नकळत वाचकाच्या मनात भुंग्यासारखा गुणगुणायला लागतो, याचे श्रेय लेखिकेला द्यायलाच हवे. इथेही…१)‘नववृध्द, म्हणजे तरूण जेष्ठ’, २)‘वृध्द किंवा ज्येष्ठ’ , ३) ‘अतिवृध्द किंवा अति ज्येष्ठ’, हे वृध्दत्त्वाचे तीन टप्पे असतात हे सांगतांना लेखिकेने… १ ला टप्पा म्हणणे शिशिरातील चांदणे, २ रा टप्पा म्हणजे हेमंत ऋतूतील पानगळती, आणि ३ रा टप्पा म्हणजे शिशिरातील गूढ शांतता… अशी अगदी सुंदर… सहजपणे पटणारी उपमा दिलेली आहे. आणि अशाच अनेक चपखल उपमा, प्रसिध्द लेखकांच्या साहित्यातले या विषयाला अचूक लागू होतील असे वेचे, काही सुंदर कविता, यांचा अगदी यथायोग्य उपयोग सहजपणे या पुस्तकात केलेला आहे.
याच्याच जोडीने, आत्तापर्यंत विकसित झालेल्या ‘ वृध्दशास्त्राच्या ’ वेगवेगळ्या शाखांचा उहापोहही केलेला आहे, आणि त्याला सहाय्यभूत असणारे कितीतरी आलेख, लहान लहान तक्त्यांच्या माध्यमातून दिलेली प्रत्यक्षदर्शी माहिती, पूरक चित्रे, याद्वारे या विषयाची परिपूर्ण माहिती देण्याचा लेखिकेचा हेतू स्पष्टपणे जाणवतो.
वृद्धत्वाचे स्वरूप, वृध्दांची मनोधारणा, बौध्दिक स्थिती, सामाजिक स्थिती, अशा अनेक गोष्टींचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतांना, वृध्दांनी ‘स्वयंशोध’ घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर लेखिकेने आवर्जून भर दिला आहे, आणि त्यादृष्टीने मांडलेला प्रत्येक मुद्दा कोणत्याही ‘सजग’ वृध्दाला पटलाच पाहिजे असा आहे. कोणाचेही वय विचारायचे असेल तर ‘How old are you?’ असे विचारले जाते. पण वृध्दांच्या बाबतीत मात्र, त्याऐवजी ‘How young are you?’ हा प्रश्न विचारायला हवा, हे लेखिकेचे म्हणणे मला अतिशय आवडले… मनापासून पटले. कारण या प्रश्नाच्या उत्तरातच, माणूस स्वत:च्या वृध्दत्त्वाकडे कशाप्रकारे बघतो… किंवा स्वत:ची निराशेकडे झुकणारी मानसिकता बदलू इच्छितो की नाही, याचे उत्तर दडलेले आहे… वृध्द असणे आणि सारखे वृध्द असल्यासारखे वाटत रहाणे यातला फरक यामुळे आपोआपच ठळकपणे अधोरेखित होतो.
याच अनुषंगाने पुढे वृद्धत्वाच्या गरजा आणि अपेक्षा, नकळतपणेच पण महत्त्वाची ठरणारी मानसिक निवृत्ती, अटळ असे शारीरिक आणि आर्थिक परावलंबन, हे सगळे निरोगी मनाने स्वीकारून, ते आपल्या परीने जास्तीत जास्त नियंत्रणात ठेवण्याची मानसिकता जोपासण्याची गरज, अशा अनेक अतिशय महत्त्वाच्या मुद्यांवर लेखिकेने परिपक्व म्हणावे असे भाष्य केले आहे. खरं तर ते फक्त भाष्य नसून, वाचकांच्या विचारांना अगदी योग्य आणि आवश्यक दिशा देणारे मार्गदर्शन आहे, ज्यातून प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखे, प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखे आहे.
भूतकाळाच्या तुलनेत आत्ताच्या काळात वृध्दांच्या समस्या बदलल्याही आहेत आणि वाढल्याही आहेत हे तर खरेच. लेखिका स्वत: मानसशास्त्र तज्ञ आणि ख्यातनाम समुपदेशक असल्याने, वृद्धत्व या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातली मानसिकता, झेपतील की नाही अशा वाटणा-या या वयातल्या समस्या, याबद्दल फक्त शास्त्रीय माहिती देऊन न थांबता, त्यावरच्या प्रत्यक्षात करता येणा-या उपाययोजनाही त्यांनी सहजपणे समजतील, आणि तितक्याच सहजपणे प्रत्यक्ष आचरणातही कशा आणता येतील, हे अगदी उत्तमपणे, गप्पा मारता मारता महत्त्वाचे काही आवर्जून सांगावे, अशा पध्दतीने अगदी सहजसोप्या भाषेत सांगितले आहे, असे मी ठामपणे म्हणू शकते. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात असलेले उत्तम समुपदेशनपर लेखही पुस्तकातील मार्गदर्शनाला अतिशय पूरक असेच आहेत.
मीही आता “ 72 years young “ आहे, आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आता ‘ मीच माझा दिवा आहे ’ हे मला पूर्णपणे आणि मनापासून पटले आहे. अर्थात याचे सर्व श्रेय मी लेखिकेला द्यायलाच हवे. हे पुस्तक वाचल्यानंतर, त्यात केलेले समुपदेशन मनापासून आचरणात आणण्याचा निश्चय मी तरी नक्कीच केला आहे. आता माझे वार्धक्य नक्कीच “ कृतार्थ “ होईल हा विश्वास या पुस्तकाने मला दिला आहे, आणि तोच विश्वास या पुस्तकातून सर्वांना मिळेल, याची मला खात्री आहे.
या अतिशय वाचनीय, आणि त्याहूनही मननीय अशा पुस्तकाबद्दल लेखिका डॉ.वनिता पटवर्धन यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार !!!
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज आजी उदास आहेत, हे आजोबांच्या लक्षात आलं.”काय झालं ग?” आजोबांनी विचारलं. आजी म्हणाल्या, “अहो, आता थकवा येतो. आधीसारखं राहिलं नाही.आता गडबड,तडतड सहन होत नाही.कुठे जायचं म्हटलं तर जास्त चालवत नाही.आॕटोमध्ये चढताना त्रास होतो . कधी भाजीत मीठ टाकायला विसरते,तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलं आहे, माहीत नाही.”
आजोबा म्हणाले, “देवाचा हिशोब मला माहीत नाही.आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. त्याच्या planning मध्ये एक क्षणाचाही बदल करणे, आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, त्याचा विचार करावा. अग ,वयानुसार हे सर्व होणारच. आधीचे दिवस आठव ना. किती काम करायचीस! पूर्ण घर तू खूप छान सांभाळलेस. मला कशाची काळजीच नव्हती कधी.आता वयोमानाप्रमाणे हे सर्व होणारच. पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणे,आपल्या हातात आहे. जीवनाच्या प्रत्येक फेजमध्ये थोडे शारीरिक बदल होतातच.थोडे आपल्याला करायचे असतात.आपली lifestyle reorganize करायची ,म्हणजे ,
आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते.कळलं का ? “
आजोबा पूढे म्हणाले,
“चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ या आपण.ती छान नारंगी साडी नेस. बाहेरच जेवू . आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. जवळच असलेल्या बसस्टाॕप वर जाऊन बसले. दोघे बराच वेळ तेथेच गप्पा मारत बसले . आजोबा आजींना म्हणाले,” अगं, पाय दुखत असतील तर, मांडी घालून बस छान.”नंतर , ‘गणेश भेळ ‘खाऊनच दोघं घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला शोभेसे outing होते आज दोघांचे . आजींची उदासी मात्र कुठे पळाली, हे त्यांना कळलेच नाही.अगदी ‘refresh’ झाल्या .
आज आजोबांनी आजीसाहेबांसाठी on line ‘Mobile stand’ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .
आज आजींनी तर आजोबांना सकाळीच सांगून टाकलं,” मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही. काही तरी चमचमीत खायला घेऊन या”. आजोबांनी आनंदाने समोसे, ढोकळा, खरवस, दोन पुरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली. ते बघून आजी म्हणाल्याच, “अहो, केवढं आणलंत?” “अग, आज आणि उद्या मिळून संपेल की.” आज आजी-आजोबांची पार्टी छान झाली.
कोणी तरी खरंच खूप छान म्हटलं आहे •••
” खुशियां बहुत सस्ती हैं इस दुनिया में ,
हम ही ढूंढते फिरते हैं, उसे महँगी दुकानों में”।”
आजोबा बऱ्याच वेळापासून एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून अजय म्हणाला , “द्या, आजोबा. मी उघडून देतो”. तेव्हा आजोबा म्हणाले, “अरे, नको. मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक कामात वेळ लागतोच . हे natural आहे . पण काही हरकत नाही. जोपर्यंत करू शकतो, तोपर्यंत काम करायचे, हे मी ठरवलं आहे. रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी चिरणे, washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशा बऱ्याच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला मदत होते. व माझापण वेळ जातो. Something new and different. I am enjoying it. And I feel good.
तो तुमचा actor आहे ना, अक्षयकुमार? त्याने एका advertisement मध्ये म्हटले आहे,
“बस, तुम कभी रुकना मत.”
अक्षय कुमारने म्हटलेले हे वाक्य मला खूप आवडलं.
एक छोटंसं वाक्य. मोजक्या शब्दात.
पण किती अर्थपूर्ण .जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .एक छोटासा उपदेश जीवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची स्फुर्ती देतो. विचारांत परिवर्तन आणतो .
तो म्हणतो, “कधीही थांबू नका,चालत रहा.
म्हणजेच ‘active’ रहा. ‘मनाने आणि शरीराने .’
वाहतं पाणी बघताना, एक वेगळीच उर्जा निर्माण होते.’ धारा ‘ म्हणजे पुढे पुढे जाणारी, वाहणारी .तेच जमलेलं पाणी म्हणजे अनेक रोगांचा उगम. म्हणून पाण्याला जमू देत नाही आपण. जमलेल्या पाण्यात मच्छर किडे पडतात .पाण्याला वास येतो.डेंग्यू पसरतो.
आयुष्याचे पण तसेच आहे. शक्य तेवढं active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते.जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल, ते करत रहाणे गरजेचे आहे.
चलती का नाम ही तो जिंदगी है ।”
आपल्या पिढीने तरूणपणी एकमेकांचे हात हातात घेतले नाहीत /नसतील .पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने, विश्वासाने , हातात घेणे ही काळाची गरज आहे .
“कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हैं !
इसलिए नहीं की उनके जीवन में सबकुछ ठीक होता है!
बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है”!!!
“ना थके कभी पैर
ना कभी हिम्मत हारी है।
जज्बा है परिवर्तन का जिंदगी में,
इसलिये सफर जारी है।”
“प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.”
“बस , तुम कभी रुकना मत
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
हे पाहून क्रोधित झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून कुंभाराच्या बायको व मुलाला ठार केले…
शेवटी जेव्हा शेतकऱ्याला पश्चात्ताप झाला, तेव्हा तो त्या भूताला म्हणाला, “तुझ्यामुळे माझी पत्नी, कुंभार, कुंभाराची बायको व मुलगा मेले अन् माझ्या घराची राखरांगोळी झाली. तू असं का केलंस?”
त्यावर भूताने शांतपणे उत्तर दिले… “मी कुणालाही ठार केले नाही, मी फक्त ‘दोरीने बांधलेले गाढव’ सोडले !!”
– तात्पर्य –
आज माध्यमं (WhatsApp, Facebook, Instagram, Twitter, Print Media, News Channel etc.) भूतासारखी झाली आहेत. ते रोज नवनवीन गाढवांच्या दोऱ्या सोडतात आणि लोकं कसलाही विचार न करता, सत्यासत्यता न पडताळता उलट – सुलट प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांची मने दुखावतात. माध्यमं मात्र तमाशा घडवून आणतात आणि बक्कळ पैसा कमावतात… आपले मित्र, नातेवाईक, हितचिंतक आणि सहकारी यांचेशी असलेले संबंध जपण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे.
सतर्क राहा… सुरक्षित राहा…
लेखक – अज्ञात
संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अमिताभ बच्चनजी ८० वर्षांचे झाले तरी अजूनही काम करतात, म्हणून बातमी होते. देव आनंदच्या चिरतरुण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते, यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयातील देखणेपण जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.
आपण फिल्मी सिताऱ्यांत इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलीकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना, इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॅा.रघुनाथ माशेलकर. १ जानेवारी २०२३ रोजी ते ८१ वर्षाचे झाले.
शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून दहावीला संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे आले, तर बारावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. बारावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.
तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॅाक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दिसंपदेचा मालक असलेला हा महामानव.
हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही आकारानेच एवढी मोठी असलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.
२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॅालिमर रिअॅक्शन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार प्राप्त.म्हणजे फक्त भारतरत्न बाकी.
असा ऋषितुल्य भारतीय ८१ व्या वयात पदार्पण करताना अजूनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल असो.
या महान वैज्ञानिकाला ८१ व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
लेखक :अज्ञात
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
की दुखावलेल्या श्रांत मनासाठी जी शीतल श्रावणधारा होते……ती सखी?
रोज नियमाने GM-GN चे मेसेज किंवा डझनावारी emoji चा रतीब न घालताही, जी आपल्यासाठी सतत connected mode मध्ये असते…..ती सखी?
जिच्याशी बोलताना किती सांगू नि किती नको असं होतं…..ती सखी?
की जिला मौनाची भाषा अवगत आहे, अवाक्षरही न बोलता-जसा की शब्देविण संवादु-आपलं मन जी सहज वाचू शकते…..ती सखी?
प्रवासात असताना मधल्या स्टेशनवर चहा-नाश्ता (चहात आलं घालायला विसरु नकोस ग!…) घेऊन येण्यासाठी जिला हक्काने सांगता येतं, प्रत्येक वेळी प्लीज-थॅंक्यू म्हणण्याची कसरत न करता…..ती सखी?
जिच्या सहवासात असताना आपल्याला कोणताही मुखवटा चढविण्याचा व्यायाम करावा लागत नाही,आपण आरस्पानी, जेव्हा जसे आहोत तसे– नाठाळ, खट्याळ,आनंदी,उदास,
वाचाळ व्याख्यानी भाषा न वापरताही , आपल्या एखाद्या achievementचं कौतुक जिच्या नजरेतून ओसंडताना दिसतं…..ती सखी?
की हक्काने कान पकडून जी आपली चूक-उणीव दाखवून देत असतानाही आपला एरवी एवढ्या-तेवढ्याने फडा वर काढणारा ego आता अजिबात मान वर करीत नाही….ती सखी?
एखाद्या वैतागवाण्या गुंत्यात नाहक गुरफटायला होत असताना, जिच्या आश्वासक आधाराने आपण अलगद आपला पाय आणि श्वास मोकळा करून घेतो… त्याला तणावाचे व्यवस्थापन-भावनिक समुपदेशन अशी भारी भारी नावं (आणि भारी-भक्कम फी!) न देता….ती सखी?
जन्मजात आणि जुळलेल्या नात्यांच्या अपेक्षांचे कंगोरे जेव्हा कधी काचू लागतात, तेव्हा नात्याचे कोणतेही लेबल न लावता, जिच्या निरपेक्ष जवळीकीचे दार आपल्यासाठी नेहमीच खुलं असतं……ती सखी?
ठाशीव ठिपक्यांनी मांडलेल्या, रेखीव रेघांनी जोडलेल्या आणि सप्तरंगी छटांनी सजवलेल्या अंगणातील रांगोळीचे आमंत्रण जसे सुखद, तसेच जिचे व्यक्तिमत्त्व लोभस…..ती सखी?
होय,ही सगळी तर सखीची नानाविध विलोभनीय रूपे आहेतच,पण सखीत्व नेहमीच त्यापेक्षाही ओंजळभर अधिकच राहणार आहे ! कारण सखी म्हणजे केवळ व्यक्ती नसते,तर वृत्ती असते!!आणि ही वृत्ती सदाच वय,लिंग, भौगोलिक-आर्थिक-सामाजिक अंतर इ. निकषांच्या अतीत असते, स्वयंभू असते.(शक्य आहे,कदाचित् काहींना ही वृत्ती व्यक्ती ऐवजी एखाद्या पाळीव प्राण्यात,निसर्गात, पुस्तकांत सुद्धा सापडू शकेल !)
असं काही घडतं की, माणसांच्या आणि वस्तूंच्या या अपार कोलाहलात अवचित एक संवादी सूर ऐकू येऊ लागतो आणि मग त्या सुराशी असे लयदार सख्य जुळून येते की, आयुष्य म्हणजे एक जमलेली सुरेल मैफलच होऊन जाते! निरपेक्ष ,अयाचित दान देणाऱ्या प्राजक्तासारखी परिमळणारी ! …..म्हणूनच राधा कृष्णाची सखी होऊ शकते आणि कृष्ण द्रौपदीचा सखा !!
कविवर्य ग्रेस यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, असे सखीत्व म्हणजे
‘ सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला !’
ज्यांना आयुष्यात असा सखीपणाचा आपापला ‘राघव शेला ‘ सापडला आहे, त्यांनी तो खूप निगुतीने सांभाळावा,हीच एका सखीची अपेक्षा!!
संग्राहिका – सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈