मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ५ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ५ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक ४१ ते ५३

प्रपद्यन्ते लोकाः कति न भवतीमत्रभवती-

मुपाधिस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि ।

शपे तुभ्यं मातर्मम तु पुनरात्मा सुरधुनि

स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान् ॥ ४१॥

*

ललाटे या लोकैरिह खलु सलीलं तिलकिता

तमो हन्तुं धत्ते तरुणतरमार्तण्डतुलनाम् ।

विलुम्पन्ती सद्यो विधिलिखितदुर्वर्णसरणिं

त्वदीया सा मृत्स्ना मम हरतु कृत्स्नामपि शुचम् ॥ ४२॥

*

नरान् मूढांस्तत्तज्जनपदसमासक्तमनसो

हसन्तः सोल्लासं विकचकुसुमव्रातमिषतः ।

पुनानाः सौरभ्यैः सततमलिनो नित्यमलिनान्

सखायो नः सन्तु त्रिदशतटिनीतीरतरवः ॥ ४३॥

*

यजन्त्येके देवान् कठिनतरसेवांस्तदपरे

वितानव्यासक्ता यमनियमरक्ताः कतिपये ।

अहं तु त्वन्नामस्मरणकृतकामस्त्रिपथगे

जगज्जालं जाने जननि तृणजालेन सदृशम् ॥ ४४॥

*

अविश्रान्तं जन्मावधि सुकृतजन्मार्जनकृतां

सतां श्रेयः कर्तुं कति न कृतिनः सन्ति विबुधाः ।

निरस्तालम्बानामकृतसुकृतानां तु भवतीं

विनाऽमुष्मिंल्लोके न परमवलोके हितकरम् ॥ ४५॥

*

पयः पीत्वा मातस्तव सपदि यातः सहचरै-

र्विमूढैः संरन्तुं क्वचिदपि न विश्रान्तिमगमम् ।

इदानीमुत्सङ्गे मृदुपवनसञ्चारशिशिरे

चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम् ॥ ४६॥

*

बधान द्रागेव द्रढिमरमणीयं परिकरं

किरीटे बालेन्दुं नियमय पुनः पन्नगगणैः ।

न कुर्यास्त्वं हेलामितरजनसाधारणतया

जगन्नाथस्यायं सुरधुनि समुद्धारसमयः ॥ ४७॥

*

शरच्चन्द्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां

करैः कुम्भाम्भोजे वरभयनिरासौ च दधतीम् ।

सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकर-

स्थितां त्वां ये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभवः ॥ ४८॥

*

दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतै-

र्भवज्वलनभर्जिताननिशमूर्जयन्ती नरान् ।

चिदेकमयचन्द्रिकाचयचमत्कृतिं तन्वती

तनोतु मम शन्तनोः सपदि शन्तनोरङ्गना ॥ ४९॥

*

मन्त्रैर्मीलितमौषधैर्मुकुलितं त्रस्तं सुराणां गणैः

स्रस्तं सान्द्रसुधारसैर्विदलितं गारुत्मतैर्ग्रावभिः ।

वीचिक्षालितकालियाहितपदे स्वर्लोककल्लोलिनि

त्वं तापं तिरयाधुना मम भवज्वालावलीढात्मनः ॥ ५०॥

*

द्यूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं

सर्वस्वं हारयित्वा स्वमथ पुरभिदि द्राक् पणीकर्तुकामे ।

साकूतं हैमवत्या मृदुलहसितया वीक्षितायास्तवाम्ब

व्यालोलोल्लासिवल्गल्लहरिनटघटीताण्डवं नः पुनातु ॥ ५१॥

*

विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा सद्यःकृतानेकजनार्तिभङ्गा ।

मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु ॥ ५२॥

*

इमां पीयूषलहरीं जगन्नाथेन निर्मिताम् ।

यः पठेत्तस्य सर्वत्र जायन्ते सुखसम्पदः ॥ ५३॥

मराठी भावानुवाद – –

गङ्गेमाते जन अपरिमित येत तुला शरण

इच्छित फलदायी तू असशी धरिती तव चरण

प्रेम अमित माझे तुजठायी आण घेउनी कथन

तव हृदयी मजला घे माझ्या भक्तीसी जाण॥४१॥

*

मृत्तिका तुझी भाळि लाविता पाप तमाचे हरण

माध्यान्हीच्या सूर्यासम तिज करिता धारण

विधीलिखित दुःखांच्या पंक्ती टाकिते पुसून

मृदा तुझी ही सदैव करुदे माझे शोकहरण ॥४२॥

*

भागिरथीचा वास न तेथे मूढ लोभी वसती

मळकट तरिही पुष्पसाथिने सुगंधीत होती

मळलेल्या त्या सर्व जनांचे सखे म्हणून असावे

पादप तुझिया तटावरिल मम शाश्वत मित्र व्हावे ॥४३॥

*

दुरापास्त अर्चना पूजिती भक्त देवतांचे

काही करिती सदा आचरण यज्ञाचे यागाचे

अन्य कर्मीं आसक्तीपोटी मार्ग यमनियमांचे

कामपूर्ती त्रिपथगे जपतो भासे जाल भवाचे ॥४४॥

*

जन्मापासुन अखंड अविरत पुण्यकर्म करिती

कल्याणास्तव देवता तयांचे समर्थ असती

पुण्य न पदरी निराधार जे जगासिया भार

उद्धरण्याला अशा जिवांना तूच एक आधार ॥४५॥

*

उदक प्राशुनी तुझे मूढ मी गेलो मित्रांसवे

मिळाला न मज काही विसावा शांत कसे व्हावे

मृदु वाऱ्याने शीतल तुझिया जलअंकावर घेई

अखेरची चिरनिद्रा मजसी तव सान्निध्ये देई ॥४६॥

*

बद्धपरीकर होवोनीया होई सिद्ध गङ्गे

किरिट सजवुनी बालचंद्रे होई सज्ज गङ्गे

उपेक्षा नको करू ग माझी सामान्यासम गङ्गे

जगन्नाथाच्या उद्धाराचा समय पातला गङ्गे ॥४७॥

*

शरद्ऋतूतिल शुभ्र पांढरी चंद्राची कोर

धारण करुनी कुम्भ कमळ अन् अभयमुद्रा कर

शुभ्र मकर स्थित अमृतभूषण धवल वसन लेवुन

अजीत शाश्वत असती करता मनोमनी तव ध्यान ॥४८॥

*

स्मितहास्याने वदनावरती सुधाकांति विलसत

भवाग्नीदग्ध जनास पामर करिसी तू शांत

चमत्कारीक चिदानंदरूपी चंद्रकांती

माते शंतनुकांते प्रसन्न होई मजवरती ॥४९॥

*

मंत्रौषधांनी झाकियलेला भवताप व्यस्त

वैनतेय पाषाणे भग्न देवगणांनी त्रस्त

सुधारसाने चरण कालियामर्दक क्षालन

उद्धर मजला आत्मताप मम शाश्वत दूर करून ॥५०॥

*

उमा जिंकली द्यूतामध्ये महादेव सर्वस्व

गण मणि श्रेणी नंदी इंद्र माळ चंद्र गजचर्म

स्मितकटाक्ष तुजवरी उमेचा देह पणे लाविता

पावन करी मज गङ्गे तांडव शिवशंकर नाचता ॥५१॥

*

भूषविते देहास देखण्या रतीकान्त अरीचा

विनाविलंब भंग करते समग्र जनपीडांचा

मनोहारी उत्तुंग चंचल मोहक लहरींनी

निर्मल करी गे देहा माझा माये प्रक्षालुनी ॥५२॥

*

पियूषलहरी पठण करी जो जगन्नाथ निर्मित

सुखसमृद्धी सदासर्वदा तयासि होई प्राप्त ॥५३॥

– क्रमशः भाग पाचवा (समाप्त)

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तूचि पालनहार खरा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तूचि पालनहार खरा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

 उदयाचळी पूर्वेला

दर्शन तव घडते

सर्व जीवांचे

तम विलया जाते…

 

सृष्टीचे संतुलन

तूझ्याच मुळे राही

नवचैतन्य चराचरी

तूझ्याच मुळे येई..

 

तूझ्याशिवाय

सृष्टीची कल्पना

विदारक होय,

जसे शरीर आत्म्याविना..

 

रहाटगाडगे सृष्टीचे

तूच चालविशी भास्करा

तूचि अरुणा जगताचा

पालनहार खरा…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आठ त्रेपन्न! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आठ त्रेपन्न! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

जीव गुदमरला वडाचा 

फास बसताच दोऱ्याचा 

फळा फुलांच्या भाराने 

दबला आवाज मुळांचा

*

बदलले साऱ्या सणांचे 

साजरे करण्याचे रंग 

वट पौर्णिमा राखून आहे 

आपला पारंपरिक ढंग

*

छाटून हात पाय वडाचे 

त्याला कशास दुखवावे 

करुनी मानसपूजा घरात 

तुम्ही सत्पात्री दान करावे

*

तन करी पूजा वडाची 

मन धावते स्टेशनकडे 

आठ त्रेपन्न चुकली तर 

साहेब घेतील वाकडे

साहेब घेतील वाकडे

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हाक सृष्टीची… ☆ दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ हाक सृष्टीची… ☆ दीप्ती कुलकर्णी ☆

(काव्यप्रकार:- अष्टाक्षरी * मातृ-पितृ छाया)

 मायबापां ची ही छाया

 स्मरतसे नित्य माया

स्म्रृतीगंध दरवळे

भिजतेही चिंब काया…!

आई एक नाते असे

घास देत भरविते

स्वत: तीच तृप्त होते

बाळ ते जेंव्हा जेवते…!

 *

पिता छत्र धरतसे

शिस्त-धाक ठेवतसे

लेकरेच ती सर्वस्व

सदा मनी मानतसे…!

 *

कल्याणही चिंततात

आई-बाप कृपावंत

ऋण त्यांचे जगी थोर

जीवनही वेचतात…!

 *

ठेवा भान लेकरांनो

मायेलाया नाही मूल्य

लेकरांना घडविती

ठेवा देती तो अमुल्य…!

© दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद

भ्र.९५५२४४८४६१

 

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मयूरशिखेची फुलवारी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मयूरशिखेची फुलवारी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

 भावगीत (वर्ण संख्या १२ यति ६ व्या अक्षरावर) 

कोंबड्या कोंबड्या दिसतोस भारी 

रानी वनी राजा तुझी ललकारी ||ध्रु||

*

काळी काळी माती ओली पहा झाली 

कुर्डूच्या भाजीने हिरवाई ल्याली

पाने तुझी किती आरोग्य देणारी 

रानी वनी राजा तुझी ललकारी ||१|| 

*

गुलाबी पांढरी चंदेरी रुपेरी 

मलमल सारी अंगावर पेरी 

मयूरशिखेची दिसे फुलवारी 

रानी वनी राजा तुझी ललकारी ||२||

*

पावसा संगती सुमने सजली

मुलायम माझ्या मनात रुजली 

मांजरी साजरी तरारली सारी

रानी वनी राजा तुझी ललकारी ||३||

*

पावसाळा आला कुर्डूने घेतला 

साज नवा नवा मोहक वाटला 

मऊ मऊ तुझी पाकळी फुलारी

रानी वनी राजा तुझी ललकारी ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२१ ☆ पाऊस… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२१ ?

☆ पाऊस ☆  प्रभा सोनवणे ☆

पाऊस असा पाऊस तसा

पाऊस आहे कसा कसा …

*

पाऊस आहे मस्त कलंदर ,

खट्याळ ,खोडकर आणि बिलंदर !

*

पाऊस आहे निर्मळ, प्रेमळ

तसाच पाऊस भलताच चंचल!

*

पाऊस मुक्त पाऊस अनुरक्त

पाऊस असतो आसक्त !

*

पाऊस रिमझिम, पाऊस घनघोर ,

कधी विनयशील, कधी शिरजोर !

*

सांगू पाऊस कुणासारखा ?

लहरी लबाड नवऱ्या सारखा .

*

पाऊस वाटतो हवाहवासा

मनातनावर बरसावासा !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बरेच झाले… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बरेच झाले ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

खूप तिष्ठलो ज्यांच्यासाठी ते नच आले.. बरेच झाले

अनाहुतांशी जुळले बंधन युगायुगांचे.. बरेच झाले

प्रकाशवर्षे ज्यांचे अंतर, किती निकट ते दिसती तारे

दृश्य दृष्टीच्या अद्वैताचा फिटला संभ्रम.. बरेच झाले

 *

वंदनीय त्या जखमा ज्यांनी, अंत:करणा आभाळ दिले

समशेरींनो ऋण तुमचेही आले ध्यानी.. बरेच झाले

 *

आडातिल हे उसने पाणी, झरे दूरचे उदंड दाते

सोस न उरला पोहऱ्यास या श्रेयाचाही.. बरेच झाले

 *

चुकलो वाटा अनुभवली पण, अज्ञाताची अद्भुत नगरी

कधी शुभंकर दिशाभूलही, कळले पांथा.. बरेच झाले !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

मागच्या भागात आपण पाहिलं की, देव- पिता, माता, बालक, पती या रूपात टागोरांना कसे भेटतात. या भागात आपण टागोरांना जाणवणारी देवाची अन्य रूपे पाहू…

देव प्रियकर म्हणून:-

प्रियकर – प्रेयसी यांच्यातील अनोख्या नात्यांचं उदाहरण राधा कृष्ण यांचं आहे. गीत क्र. २३ मधे कवीला वाटतं, प्रियकर रूपातला देव प्रेमरथावर स्वार होऊन येईल. म्हणून प्रेयसी रूपातला कवी त्याची वाट पहात आहे. तो कोणत्या वाटेने येईल? चुकामूक तर होणार नाही नां? त्याच्या भेटीसाठी ती आसुसलेली आहे.

देव मित्र म्हणून:-

गीत क्र.९७ मधे कवी म्हणतो तू बालपणीचा माझा सखा! तू रोज यायचास. आपण एकत्र रानावनात फिरत होतो. तुझी गाणी मी ऐकायचो आणि त्या सुरांच्या वर्षावात माझा मनमोर नाचू‌ लागे. पण तुझं नांव गाव मला काहीच माहित नव्हतं. आज जाणवतं की, लहानपणी ज्याच्याबरोबर आपण खेळलो तो कोणी सामान्य नव्हता हे आपल्याला कळलंच नाही. तो प्रत्यक्ष देवच होता.

देव गायक म्हणून:-

कवीला कधी कधी देव गायकाच्या रूपात दिसतो. तो म्हणतो, तुझी गाणी, तुझं संगीत यांची अवीट  माधुरी मला कधी कळलीच नाही. मी अल्पमती होतो. कडे कपारीतून वाहणाऱ्या पाण्याचा नाद म्हणजे तुझेच गीत आहे. आकाशात होणारा गडगडाट, कडकडाट ही पण तुझीच गाणी आहेत. हे मला समजले नाही. तू मात्र तुझ्या गीत संगीताच्या वर्षावानं मला मंत्रमुग्ध करत होतास. (गीत ३)

देव श्रोता म्हणून:-

कधी देव कवीला गीत गाण्याची आज्ञा देतो तर कधी तो कवीची गाणी ऐकायला श्रोता म्हणून येऊन बसतो, कवी म्हणतो तुझ्याच कृपेमुळे मी ही गीते गाऊ शकतो. (गीत २). गीत क्र. ४९ मध्ये कवी देवाला म्हणतो, ” तुझ्या दरबारातली यक्षकिन्नरांची गाणी सोडून तू माझी बेसूर गाणी ऐकायला येऊन बसतोस कारण त्या गीतांतला भक्तीभाव तुला भावतो. तू माझी गाणी फक्त ऐकत नाहीस तर तुला ती आवडली म्हणून जाताना मला बक्षीस म्हणून एक फूल पण देऊन जातोस.”

देव दाता म्हणून:-

देव दाता म्हणूनही काही गीतांत दिसतो. कवी म्हणतो (गीत १), तूच ह्या देहात चैतन्य भरून देतोस (जन्माला घालतोस) आणि एक दिवस हा चैतन्याचा घट रिकामाही करतोस (मृत्यू). माझा आत्मा वेष बदलून पुन्हा पुन्हा  या धरणीवर येतो आणि पुन्हा पुन्हा तू त्याची झोळी भरतोस. असा मी युगायुगांचा याचक आहे आणि तू कल्पांतापर्यंत हे दान देतच राहतोस. अशी सुंदर कल्पना ते करतात. तसंच दुसऱ्या कवितेत ते म्हणतात, (गीत ५०) “मी एक भिक्षेकरी! तुझा सुवर्ण रथ दिसल्यावर मला वाटलं की तू सुवर्ण मुद्रा उधळशील  आणि मी त्या गोळा करेन आणि खूप श्रीमंत होईन. पण अचानक तुझा रथ माझ्यासमोर थांबला आणि तूच माझ्याकडे  भिक्षा मागितलीस. मी बावरलो. माझ्या झोळीतले चार दाणे तुला काढून दिले. असं वाटलं की असला कसला राजा, भिकाऱ्याकडेच भीक मागतो. घरी गेलो. झोळीत असणारा एखादा दाणा भुकेल्या पोटाला द्यावा म्हणून झोळी झाडली तर त्यातून सुवर्णाचे दाणे पडले. मला कळलेच नाही की, तू गरिबांसाठी न मागता दान देणारा दाता असतोस.(कविता ५०)

देव दास म्हणून:-

कवी देवाला भक्तांचा सेवक म्हणूनही पाहतो. गीत क्र. ८१ मधे ते म्हणतात, कामामध्ये वेळ वाया जातो म्हणून दु:खी कशाला व्हायचं? सगळा भार त्याच्यावर टाकून आपण मुक्त व्हायचं. जसा तो संत  जनाबाईला कामात मदत करायचा तसा तो आपल्यालाही करेल. दीन दुबळ्यांच्या जवळ तो बसतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्यासाठी उन्हापावसात, धुळीत, मातीत काम करतो. मात्र जे माझ्यासारखे उन्मत्त, अहंकारी आहेत त्यांना त्याचे चरण देखील दिसत नाहीत. (गीत १०,११)

देव राजा म्हणून:-

आपले संत म्हणतात तसं परमेश्वराला आपल्याकडून फक्त भक्तीभाव हवा असतो, दुसरं काहीही नको असतं. (अर्थात आपण त्याला काय देणार? कारण आपलं असं काहीच नसतं. सगळं त्यांनंच दिलेलं असतं.) एका कवितेत त्यांना देव  राजाच्या रूपात दिसतो. राजा रथारूढ होऊन येत आहे हे कळताच कवी घाबरून जातो. त्याला वाटतं आता राजाचं स्वागत कसं करायचं? सिंहासन कुठून आणायचं? दिवे, झुंबर कुठून आणायचं? गालीचा कुठून आणायचा? माझ्याकडे तर फक्त एक फाटकी चादर आहे. ती कशी घालू त्याच्या स्वागताला? पण शेवटी कवीचा अंतरात्मा त्याला सांगतो की काही काळजी करू नकोस. त्याला हे काही नको आहे. तो फक्त भावाचा भुकेला आहे. 

(कविता ५१)

देव‌ मोक्ष दाता म्हणून :-

सगळ्यात उच्च प्रतीची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती! यामध्ये आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होतं. द्वैत रहातच नाही. एका कवितेमध्ये कवी म्हणतो मला पाहिलं की तुझ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम जागृत होतं. मी नसतो तर तू कोणावर प्रेम केलं असतंस? मला जे जे आवडतं ते ते सगळं मला देतोस. माझं मन जिंकण्यासाठी अनेक रूपे घेऊन माझ्यासमोर येतोस. आता सुद्धा तुझं सर्वस्व मला अर्पण करून माझ्या हृदयात बसला आहेस. कळलंच नाही मला, तुझ्यात मी आणि माझ्यात तू कधी विलीन झालो. जीवा – शिवाचे मीलन झाल्यामुळे मला आता मुक्ती मिळाली आहे.(गीत ५६) 

– – – अशाप्रकारे आपल्याला विविध रूपातील परमेश्वर टागोरांच्या गीतांतून पहायला, अनुभवायला मिळतो. ही निरनिराळी रूपे रेखाटताना त्यांचा सुंदर कल्पनाविलास, रूपकांचा वापर, शब्दांची योग्य निवड, मांडणी, मनाला मोहून जाते. अनेक नैसर्गिक घटनांमधून, नैसर्गिक आवाजात त्यांना विधात्याचा भास होत असतो. कवीला सर्वत्र प्रेम प्रतिबिंबित झालेले दिसते. त्यांनी देवाची निरनिराळ्या प्रकारे भक्ती केली असली तरीही अंधश्रद्धेच्या पायावर उभा असलेला कोणताही भक्तीमार्ग त्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांची अध्यात्मिक उंची त्यांच्या कवितांमधून जाणवते.

—– 

☆ गीत : ९१ ☆

O THOU the last fulfilment of life, Death, my death, come and whisper to me! 

Day after day have I kept watch for thee; for thee have I borne the joys and pangs of life. 

All that I am, that I have, that I hope and all my love have ever flowed towards thee in depth of secrecy. One final glance from thine eyes and my life will be ever thine own. 

The flowers have been woven and the garland is ready for the bridegroom. After the wedding the bride shall leave her home and meet her lord alone in the solitude of night. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९१ ☆

☆ येई प्रियकरा, येई मंदिरा॥ ☆

*

सरली वर्षे वाट पाहता

मृदु बोल तव कानी पडता

अंतिम ध्येया जवळी जाता

जीवन सार्थक होई, मधुकरा

येई प्रियकरा, येई मंदिरा॥

*

तुझ्याचसाठी रिचवित गेले

सुखदुःखाचे अगणित प्याले

पाश सर्व मी तोडित आले

तुझिया भेटी लागी, सुखकरा

येई प्रियकरा, येई मंदिरा॥

*

तुलाच सारे प्रेम अर्पुनि

आस एक तुजवरी लावुनि

सर्वस्व माझे तुला देऊनि

माहेरा टाकीन, हृदयेश्वरा

येई प्रियकरा, येई मंदिरा॥

*

भेट आपुली पहिल्या राती

हितगुज होईल मग एकांती

अन्य नको मज, नकोत नाती

मृत्युदेवा, पती परमेश्वरा

येई प्रियकरा, येई मंदिरा॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत : ९२ ☆

KNOW that the day will come when my sight of this earth shall be lost, and life will take its leave in silence, drawing the last curtain over my eyes. 

Yet stars will watch at night, and morning rise as before, and hours heave like sea waves casting up pleasures and pains. 

When I think of this end of my moments, the barrier of the moments breaks and I see by the light of death thy world with its careless treasures. Rare is its lowliest seat, rare is its meanest of lives. 

Things that I longed for in vain and things that I got ⎯ let them pass. Let me but truly possess the things that I ever spurned and overlooked. 

—–  

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९२ ☆

या नाट्यावर पडदा पडता।

शांतपणे मी निरोप घेता॥

*

कुठे धरा ती, कुठले गगन।

मिटले असतील माझे नयन॥

*

तारे तरिही टिमटिम करतील।

सूर्य उगवता, कलिका फुलतील॥

*

काळाच्या लाटांवरती स्वार। 

असतील सुखदुःखांचे शृंगार॥

*

अंतिम घडीचा विचार करता।

काळाचा अडसर तेथे नसता॥

*

अमर्त्य जग तुझे मज मिळे।

मृत्यूनेच ज्या उजळून दिले॥

*

असीम खजिना तुझ्या स्वर्गीचा।

मागमूस ना दुष्कर जिण्याचा॥

*

उच्च नीचतेचे नाही दुखणे।

नसे भेदभाव नच उणेदुणे॥

*

उभ्या जन्माचे देणे घेणे।

कामना वासनांचे उजवणे॥

*

हिशेब इथले इथेच टाकून।

आजवरी जे दिले लाथाडून॥

*

त्याच सुखाचा स्वाद मोहवे।

आता मज ना दूरी साहवे॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत : ९३ ☆

 HAVE got my leave. Bid me farewell, my brothers! I bow to you all and take my 

departure. 

Here I give back the keys of my door ⎯ and I give up all claims to my house. I only ask for last kind words from you. 

We were neighbours for long, but I received more than I could give. Now the day has 

dawned and the lamp that lit my dark corner is out. A summons has come and I am ready for my journey. 

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९३ ☆

अज्ञाताचा प्रवास करण्या।

निघतो तुम्हा करुनि नमना॥

*

दोन शब्द तुम्ही प्रेमाचे देणे।

तीच शिदोरी घेऊनि जाणे॥

*

लौकिक सारे इथे सोडतो।

धनदौलत नेऊ ना शकतो॥

*

आजवरी मी बहुत घेतले।

तुम्हा परंतु कांही न दिधले॥

*

सुदिन आज अजि उगवला।

काळोखाचा अंतचि झाला॥

*

क्षमा करा जर कांही चुकले।

मज मूढाला नाही कळले॥

*

तत्पर मी हा प्रवास करण्या।

निघतो तुम्हा करुनि नमना॥

निरोप द्या मज प्रिय सखयांनों।

निरोप द्या मज प्रिय सखयांनों॥

– क्रमशः भाग ३१

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३४ ☆ पाखरू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३४ ?

☆ पाखरू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

भेटायला, पाखरू आलंय दुरून

पाहू नका, शृंगार केवळ वरून

*

दिवसा ढवळ्या अंधार पडला

असा कसा हा प्रकार घडला

मळभ होतं, आलं प्रीतीचं भरून

*

मिठीत तुमच्या वाटतंय गोड

श्वास कोंडलाय करा धरसोड

हात माझा, ठेवा कायमचा धरून

*

तुमच्या नावाचं कुंकू भाळी

मळा हा पिकवा होऊन माळी

न्याहरीला, सकाळी आणते घरून

*

तुमच्या नावावर वावर सारं

नाही त्याच्यावर कसला भार

सातबारा, ठेवलाय कोरा करून

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ☆ गार झुलवा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ गार झुलवा... ☆ श्रीशैल चौगुले ☆

वैषाखी अंगारा निवला

पश्चीमी वार्याचे गमन

ऋतू घनांचा हर्ष मना

पाखरांचे झुले सदन.

सुगरण ही विहारते

रान-माती प्रतिक्षा धरी

पहिला थेंब काळजात

स्पर्श सुखाचा फुले उरी.

 *

मृग नाचत येई आता

रिमझीम गारवा गंध

ओहोळ सज्ज जळी न्हाणे

गगन-धरा ओले बंध.

 *

मानव-पशू ऋतू ऋणी

पाऊस भिजवेल भाव

जिथे-तिथे झुलते दृष्य

क्षणात लुप्त सूर्य ताव.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares